The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मृत्यूनंतर देखील हा भारतीय सैनिक देतोय सीमेवर पहारा !

by द पोस्टमन टीम
26 March 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


एखादा सैनिक सीमेवर शहीद झाल्यानंतर देखील सीमेवर गस्त घालतो, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही एक खरी गोष्ट आहे. हे एक असे रहस्य आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सिक्कीममध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या एका अशाच सैनिकाचा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मृत्यूला पन्नास वर्षं उलटले तरीदेखील हरभजन अजूनही सीमेवर गस्त घालत असतात. हरभजन यांच्या राष्ट्रभक्तीचे प्रतिक असलेले स्मारक भारतीय सैनिकांनी तयार केले आहे. हे स्मारक एका मंदिरासमान असून या ठिकाणी नियमित पूजा अर्चना केली जाते.

पंजाब रेजिमेंटचे सदस्य असलेल्या बाबा हरभजन यांना ५० वर्षांपूर्वी याच सीमेवर मरण आले. त्यांनी शरीर जरी त्यागले तरी त्यांच्या आत्म्याचा अजूनही या सीमेवर वास आहे, अशी आख्यायिका प्रचलित आहे.

बाबा हरभजन यांची आत्मा चीनच्या दिशेकडून येणाऱ्या कुठल्याही आपत्तीचा इशारा भारतीय सैनिकांना देते. बऱ्याचदा बाबा हरभजन यांची आत्मा सांकेतिक संदेशाच्या माध्यमातून चीनी सैन्याला चुकीची हालचाल केल्यावर इशारा देते, असे मानले जाते.

भारतीय सैनिकांप्रमाणे चीनी सैनिकांच्या मनात देखील बाबा हरभजन यांची आदरयुक्त भीती आहे, अनेक चीनी सैनिकांनी त्यांना सीमेवर गस्त घालताना पाहिले असल्याचे म्हटले जाते. जेव्हा भारत आणि चीनमध्ये फ्लॅग मिटिंग होते त्यावेळी बाबा हरभजन यांच्यासाठी एक तिसरी खुर्ची ठेवण्याच्या प्रथेचे दोन्ही सैन्यदलाकडून पालन करण्यात येते. बाबा हरभजन त्या खुर्चीवर बसून मिटिंगला उपस्थित राहतात अशी आख्यायिका प्रचलित आहे.



हरभजन सिंह यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४६ रोजी गुजरावाला येथे झाला. हा भाग सध्या पाकिस्तानात आहे. १९६६ साली बाबा हरभजन सिंह जवान म्हणून भारतीय सैन्यदलाच्या २४ पंजाब रेजिमेंटमध्ये भरती झाले. फक्त दोन वर्षच देशाची सेवा करण्याचे भाग्य हरभजन सिंह यांना लाभले.

१९६८ मध्ये सीमेवर गस्त घालत असताना एका अपघतात त्यांचा मृत्यू झाला. ते एका खेचरावर बसून नदी पार करत असताना त्या खेचरासह ते नदीत वाहून गेले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या त्यांचा मृतदेह त्यांचा हाती लागत नव्हता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

एक दिवस बाबा हरभजन त्यांच्या एका सहकाऱ्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी स्वतःहून त्यांचे शव कुठे आहे याची माहिती दिली. सकाळी जेव्हा या स्वप्नाविषयी त्या सैनिकाने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले त्यावेळी एक शोध मोहीम राबविण्यात आली आणि त्याच जागेवर त्यांना बाबा हरभजन यांचे शव आढळले, जी स्वप्नात सांगितली होती.

बाबा हरभजन सिंह यांचे शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हरभजन सिंह यांच्या या अनुभूतीनंतर त्यांच्या साथीदरांनी त्यांचे मंदिर उभारले. आजही मंदिर तिथे आहे.

आज याठिकाणी बाबा हरभजन सिंह यांचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर गंगटोकच्या जवळ नथुलाच्या आसपास १३ हजार फुट उंचीवर आहे, आधीचे बंकरवाले मंदिर तर याहून हजार फूट उंचावर आहे.

बाबा हरभजन यांच्याबद्दल माहिती देताना सिक्कीम सीमेवर तैनात असलेले सैनिक सांगतात की ते आजही मनोभावे आपली ड्युटी करतात. त्यांना सैन्याकडून देण्यात येणारा पगार आणि रँक दोन्ही आजही कायम आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत बाबा हरभजन यांच्या भुताला सुट्टीवर पाठवण्याचे काम देखील सैनिक करायचे, त्यावेळी रेल्वेच्या कंपार्टमेन्टमधील एक सीट आरक्षित केलेली असायची ज्यात त्यांचे सामान घेऊन दोन सैनिक त्यांच्या मूळगावी जायचे.

पुढे काही लोकांनी यावर आक्षेप घेतल्याने हा प्रकार थांबवावा लागला होता. आजही बाबा हरभजन यांच्यासाठी एक वेगळी खोली सिक्कीमच्या बॉर्डरवर आहे, जिथे ते बाराही महिने आपली ड्युटी करतात. रोज रात्री त्यांच्या खोलीत चादर आणि बूट साफ करून ठेवण्यात येतात, इथे एक सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे. बाबा हरभजन सिंह यांची आत्मा अजूनही तिथे भेट देते, कारण जेव्हा सैनिक त्या खोलीत जातात तेव्हा त्या बुटांना चिखल लागलेला आढळून येत असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चिडक्या आणि रडक्या ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅकग्रा कायमच वेगळा वाटायचा

Next Post

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या ‘गाझी’चा भुगा केला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या 'गाझी'चा भुगा केला होता

भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' मध्ये भरती कसं व्हायचं?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.