The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गायींमुळे विषारी वायूंचं प्रमाण वाढतंय का?

by द पोस्टमन टीम
7 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


बर्गर किंगचं नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. २०२० साली त्यांनी एक जाहिरात केली होती ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या जाहिरातीत त्यांनी दाखवलं होतं की गायींना गवती चहाचे पानं खायला घातली पाहिजेत जेणेकरून त्यांच्यामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रमाण कमी होईल.

cow farts & burps are no laughing matter. they release methane, contributing to climate change. that’s why we’re working to change our cows’ diet by adding lemongrass to reduce their emissions by approximately 33%. learn about our ongoing study: https://t.co/kPCXpjfbGL #CowsMenu pic.twitter.com/DnmF8gVVL0

— Burger King (@BurgerKing) July 14, 2020

आता प्रश्न हा उपस्थित राहतो की गायींमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विषारी वायू उत्सर्जित होतात का? काही संशोधनानुसार गायींची पचनक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मिथेन आणि तत्सम विषारी वायू उत्सर्जित होतात. खरं काय आहे ते जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.

नासाच्या एका संशोधनानुसार एका गायीच्या ढेकर देण्यामुळे वर्षभरात जवळपास ८० ते १२० किलो मिथेन वायू उत्सर्जित होतो. हा आकडा एखादी कार वर्षभरात जेवढा कार्बन उत्सर्जित करते तितकाच आहे. पण फक्त गायच नाही तरत इतर पाळीव प्राण्यांमुळेदेखील विषारी वायूंचे प्रमाण वाढते आहे.



असं म्हणतात की जगातील एकूण विषारी वायूंचं प्रमाण काढलं तर त्यातील १४% वायू केवळ गाय, बकरी, डुक्कर, शेळी यांच्यामुळेच उत्सर्जित होतो.

सगळीच जनावरं आपल्या पचनक्रियेसाठी आतड्यात असलेल्या बॅक्टेरियाची मदत घेतात. जेव्हा एखादा पदार्थ पचायला जड असतो तेव्हा हे बॅक्टेरिया व्हिटामिन K आणि B यांमध्ये परावर्तित होतात. याच प्रक्रियेमध्ये हे बॅक्टेरिया काही वायू निर्माण करतात. हाच तो मिथेन गॅस.

पण, मग प्रश्न असा येतो की जर सगळीच जनावरं ही प्रक्रिया करतात तर गायींनाच जास्तं ढेकर का येते?

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

तर गायींच्या आतड्यांत एक बॅक्टेरिया असतो जो यासाठी कारणीभूत ठरतो. ‘रुमेन’ नावाचा हा बॅक्टेरिया बिना प्राणवायूचाही राहू शकतो. गायींच्या आतड्याच्या बाहेर हा आढळून येतो. आता जेव्हा गायी चारा खातात तेव्हा त्याला सडवून (फरमेंट करून) त्यातून त्याला हवं ते पोषण घेऊन तो जिवंत राहतो. फरमेंट केल्यामुळे जास्त वायू निर्माण होतात. त्यांना बाहेर काढणं गरजेचं असतं. यामुळेच गायींना जास्तं ढेकर येतात, असं काही स्टडीज सांगतात.

हे प्रमाण कमी कसं करता येईल यासाठी संशोधनं सुरु आहेतच. एका संशोधनानुसार गायीच्या जेवणात जर आपण शेवाळ मिसळलं तर हे प्रमाण ३०% कमी होईल.

याच कारणासाठी बर्गर किंगने पण जाहिरात केली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या इथल्या गायींना गवतीचहा खाऊ घालतो ज्यामुळे या विषारी वायूंचं उत्सर्जन ३३% एवढं कमी झालंय. भारत सोडून इतर देशांत गायीचं मांस मिळतं हे तर आपल्याला माहितीच आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे जगभरात लोकांचं मांसाहार करणं कमी झालंय अशातच बर्गर किंगच्या या जाहिरातीने सगळीकडे धुमाकूळ घातला होता.

आता, फक्त गायींमधूनच हे वायू उत्सर्जित होतात का?

नाही! 

ज्या प्राण्यांच्या पोटात पचनक्रियेसाठी चार चेंबर्स असतात त्या सगळ्याच पाळीव प्राण्यांच्या पचनक्रियेतून हे विषारी वायू उत्सर्जित होतात. UNच्या फूड ऍंड ऍग्रीकल्चरल ऑर्गनायझेशननुसार गायींव्यतिरिक्त मेंढ्या, बकऱ्या आणि डुक्करसुद्धा मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जित करतात. यात गायींचं प्रमाण जास्तं आहे.

एक गाय रोजच्या जेवणातून ३०० ते ५०० लिटर वायू उत्सर्जित करते. याचं प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. त्यांच्या आहारात बदल करून किंवा त्यांना इंजेक्शन देऊन हे प्रमाण कमी करता येते पण, काही शास्त्रज्ञांच्या मते त्यांना मारण्याच्या नादात गायींच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

आता यावर पुढे काय उपाययोजना निघेल हे तर येणारा काळच ठरवेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

परदेशी खेळाडू आपल्याकडे येऊन IPL खेळतात पण आपले खेळाडू बाहेरच्या लीगमध्ये का खेळत नाहीत?

Next Post

अमेरिकेत लोक पैसे देऊन चक्क परमाणू स्फो*ट पाहायला जायचे..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

अमेरिकेत लोक पैसे देऊन चक्क परमाणू स्फो*ट पाहायला जायचे..!

जवळपास साडे चारशे दिवस समुद्रात हरवला होता पण जगण्याच्या जिद्दीने परत आला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.