The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हैसूरच्या राजाने दिले होते ब्राम्हणांना आरक्षण !

by द पोस्टमन टीम
2 April 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कायमच ऐरणीवर असतो. अनेक नेते आरक्षणाच्या समर्थन करतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा फायदा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी लोकसभेत हे विधेयक देखील पारित केले होते. राज्यसभेत सामान्य प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यसभा अधिवेशन एका दिवसाने लांबवले होते. सामान्य प्रवर्गात मोडणाऱ्या घटकांना आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याला अनेकांनी विरोध देखील केला होता.

पण, सवर्ण समाजातील घटकांना आरक्षण प्रदान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, या अगोदर देखील असे प्रयत्न करण्यात आले होते.

१९९१ साली मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी गरीब सवर्ण समाजघटकांना १०% आरक्षणाचा प्रस्ताव समोर ठेवला. १९९२ साली सुप्रीम कोर्टाने हा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचे निरीक्षण नोंदवले व हा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढे भारतीय जनता पक्षाकडून देखील २००३ साली या प्रस्तावावर विचार विनिमय करण्यासाठी शिष्टमंडळाचे गठन करण्यात आले होते. परंतु याचा भाजपाला काहीच फायदा मिळवता आला नाही.

२००४ च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पराभवानंतर हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. २००६ ला काँग्रेसकडून देखील अशा अभ्यास मंडळाचे गठन करण्यात आले ज्यांच्यावर आरक्षणा पासून वंचित समाज घटकांच्या अभ्यासाचे दायित्व सोपविण्यात आले. परंतु पुन्हा एकदा यावर कुठलीच योजनाबद्ध कारवाई न झाल्याने हा प्रस्ताव देखील थंडबस्त्यात गेला.



आरक्षणाचा इतिहास फार जुना आहे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी देखील आपल्या दरबारात ब्राम्हणेतर समाजाला आरक्षण प्रदान केले होते. त्या अगोदर १८७४ साली म्हैसूर संस्थानात आरक्षणाचा प्रयोग करण्यात आला होता.

म्हैसूर संस्थांनच्या राजपुत्राने आपल्या पोलीस दलात ब्राम्हण जातीच्या युवकांसाठी निम्न व मध्यम दर्जाच्या पदांसाठी २० टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. ८० टक्के जागांवर ब्राह्मणेतर, मुस्लिम आणि ख्रिस्ती यांची नेमणूक करण्यात येत होती. राजपुत्राने घेतलेला ब्राम्हणांना आरक्षण देण्याचा निर्णय ब्राम्हणांच्या हिताचा नव्हताच, उलट या निर्णयाचा ब्राम्हण समाजाला फटकाच बसला होता.

खरंतर म्हैसूरच्या राजदरबारात उच्चस्तरीय पदे भुषविणारे बहुतांश लोक ब्राह्मण समाजाचे होते, त्यांची संख्या या पोलीस दलातील संख्येपेक्षा जास्त होती, राजपुत्राच्या या निर्णयाने अनेक ब्राम्हणांना जबरदस्ती पोलिस दलात सहभागी व्हावे लागले होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ब्राम्हणांना आरक्षण देणाऱ्या म्हैसूरच्या राजपुत्राचे चमराजेंद्र वाडियार असे नाव होते. १८३१ साली ब्रिटिशांनी म्हैसूर आपल्या अधिपत्याखाली घेतले होते, त्यांनी राजघराण्याचा राज्य करण्याचा हक्क संपुष्टात आणला होता. त्यांनी तत्कालीन राजा कृष्णराज वाडियार याला त्याच्या पदावरून हाकलले होते.

ब्रिटिशांच्या या वागणुकीच्या विरोधात म्हैसूरचे राजघराणे ब्रिटिश कोर्टात गेले. तेथे वाडियार यांनी उत्तमपणे बाजू मांडली व लंडनच्या प्रिव्ही कॉन्सिलने ब्रिटनच्या म्हैसूरला ताब्यात घेण्याच्या कृतीला कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरवले. १८८१ साली रेंडीशन ॲक्टनुसार ब्रिटिश सरकारने म्हैसूरचा ताबा पुन्हा राजघराण्याला दिला. चामराजेंद्र वाडियार यांचा सांभाळ देखील ब्रिटीशांनीच केला होता. २५ मार्च १८८१ ला ब्रिटिशांनी वाडियार यांच्याकडे म्हैसूरचा कारभार सोपवला होता.

भविष्यात म्हैसूर संस्थानाने भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुघलांच्या तोंडचे पाणी पळवणारा वीर शीख यो*द्धा बंदा सिंह बहादूर

Next Post

एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !

या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.