The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका चोराच्या साक्षीमुळे तब्बल २८ वर्षांनी सिस्टर अभयाच्या खु*नाचा खुलासा झाला!

by द पोस्टमन टीम
9 December 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही आत्मह*त्येच्या अनेक प्रकरणांना बघितले असेल पण तुम्ही अशी केस बघितली आहे का ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने केलेली आत्मह*त्या ही आत्मह*त्या नसून तर खू*न होता असे सिद्ध झाले आहे? अशीच एक केस केरळमधे उघडकीस आली असून गेल्या २८ वर्षांपासून या केसचा तपास चालू होता. काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालायाने दोन जणांवर खु*नाचा ठपका ठेवला आहे.

अठ्ठावीस वर्षांपूर्वी कॅथलिक नन सिस्टर अभया यांचा मृतदेह एका विहिरीत आढळला. त्यावेळी पोलिसांनी फादर कोत्तुर आणि सिस्टर सेफी या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. केरळच्या कोट्टायममध्ये १९९२ साली सिस्टर अभया यांचा मृतदेह सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत या घटनेत अनेक आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहेत. चोरीच्या उद्देशाने बाहेर पडलेला एक चोर हा या घटनेचा प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. अनेक नाट्यमय वळणं असलेल्या या केसचा घटनाक्रम आपण समजून घेऊया..

 केरळच्या कोट्टायममध्ये  २७ मार्च १९९२ रोजी २१ वर्षांच्या सिस्टर अभयाचा मृतदेह आढळला. केरळ पोलिसांच्या क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास करायला सुरवात केली.

पोलिसांनी प्राथमिक पुराव्यांच्या आधारावर या केसकडे आत्मह*त्येचे प्रकरण म्हणून बघितले. परंतु वर्षभराने सिस्टर अभया ज्या चर्चचा भाग होती तेथील सिस्टर बनिकॅसिया, मदर सुपीरियर आणि ६७ नन्सने केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्याकडे या प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याची तक्रार केली होती. याच काळात जोमोन पुथेनपुरुकल या सामाजिक कार्यकर्त्याने यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.

फादर कोत्तुर, सिस्टर सेफी आणि सिस्टर अभया हे तिन्ही एका चर्चचा भाग होते. या चर्चचे मुख्यालय कोट्टायम येथे आहे. सिस्टर अभया यांनी चर्चच्या कॉलेजमधेच शिक्षण घेतले. सिस्टर अभयाने मानसशास्त्राचे शिक्षण घेतले होते. फादर कोत्तुरच्या स्वीय सहाय्यकपदाची जबाबदारी सिस्टर अभयाकडे होती. सिस्टर अभया सेंट पायोस हॉस्टेलमध्ये राहत होत्या. तिथेच सिस्टर सेफी त्यांच्यासोबत राहायला  होती व तिच्याकडे हॉस्टेलचा कारभार सोपविण्यात आला होता.



१९९६ मध्ये ज्यावेळी सीबीआयने त्या प्रकरणाचा तपास संपवला त्यावेळी त्यांना सिस्टर अभया यांनी आत्मह*त्या केली की त्यांचा खू*न करण्यात आला हा निष्कर्ष काढता येत नव्हता. सीबीआयने त्यावेळी स्पष्टीकरण देताना म्हटले होते,

या सर्व प्रकरणात घातपाताची शक्यता म्हणून अनेक दुवे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इतके वर्ष तपास करून देखील हाती काहीच न लागल्यामुळे आम्हाला आरोपीला पकडता आलेले नाही.

मुख्य न्यायाधीशांच्या कमिटीने सीबीआयच्या या रिपोर्टला फेटाळून त्यांना पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआयने १९९७ साली दुसरा रिपोर्ट सादर केला, यात त्यांनी हे प्रकरण घातपाताचे असल्याचे स्पष्ट करत तीन तज्ञ डॉक्टरांचा अहवाल सादर केला. सीबीआयने त्यावेळी सिस्टर अभया यांच्या एखाद्या निकटवर्तीयाने त्यांची ह*त्या केला असल्याचा संशय व्यक्त केला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ऑगस्ट २००५ मध्ये सीबीआयने आपला अजून एक रिपोर्ट कोर्टासमोर प्रस्तुत केला. या रिपोर्टमध्ये त्यांनी या प्रकरणाच्या तपासात काहीच ठोस आढळून आले नसल्यामुळे हे प्रकरण थंड-बस्त्यात घालावे अशी विनंती कोर्टाकडे केली.

२००८ ला कोर्टाने हे प्रकरण केरळच्या स्पेशल सीबीआय युनिटकडे सोपविले, त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. सीबीआयच्या या टीमचे नेतृत्व नंदकुमार नायर या अधिकऱ्याने केले. या टीमने सतीश मॅथ्यूज चर्चच्या आसपास राहणाऱ्या माणसांची चौकशी केली असता, ह*त्येच्या रात्री फादर कोत्तुर त्याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणात लगेचच फादर कोत्तुर, सिस्टर सेफी आणि फादर जोस पुथिरीकरियल या तिघांना अटक करण्यात आली, पण केरळ कोर्टाने त्यांना सहा महिन्यांत जामीन मंजूर केला.

जून २००९ मध्ये सीबीआयने या प्रकरणात आपली अंतिम चार्जशीट दाखल केली. दशकभरानंतर २०१८ साली पुथरीकरियल यांना पुराव्या अभावी क्लीन चिट देण्यात आली.

सीबीआयच्या तपासात काय समोर आले?

सीबीआयच्या रिपोर्टनुसार, सिस्टर सेफी यांचे फादर कोत्तुर आणि फादर पुथरीकरियल यांच्या सोबत अनैतिक संबंध होते. एके दिवशी सिस्टर अभया यांनी सिस्टर सेफी आणि इतर दोघांना संदिग्ध अवस्थेत पाहिले. सकाळी चार वाजता सिस्टर अभया रेफ्रिजरेटर जवळ थंड पाणी आणायला गेली असता तिला, दोन्ही फादर आणि सिस्टर सेफी लैंगिक चाळे करताना आढळून आले. म्हणून इतर दोघांनी तिला पकडले आणि सिस्टर सेफी यांनी तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर त्यांनी तिचे मृत शरीर जवळच्या विहिरीत फेकून दिले.

दरम्यान याच वेळी अडक्का राजा नावाचा एक चोर त्या चर्चच्या आवारात चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता, त्याने दोन्ही फ़ादर्सना सिस्टर सेफीसोबत पाहिले होते. गेल्या २८ वर्षांत या प्रकरणातील अनेक साक्षीदारांनी आपले स्टेटमेंट बदलले, पण अडक्का यांनी मात्र कुठल्याही परिस्थितीत आपले स्टेटमेंट बदलले नव्हते. त्यांना अनेक प्रलोभने देण्यात आली होती, पण त्यांना ते भुलले नाही. आज अडक्का यांच्यामुळेच सिस्टर अभया यांना प्रदीर्घ काळानंतर न्याय मिळाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या मराठी प्राध्यापकाला समलैंगिक असल्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठामधून हाकलण्यात आलं होतं

Next Post

…म्हणून भारतात दुसरा राहुल द्रविड होणं शक्य नाही!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

...म्हणून भारतात दुसरा राहुल द्रविड होणं शक्य नाही!

या महिलेने फ्रान्सच्या जनतेत स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली होती !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.