The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

९० च्या दशकातील शाळकरी मुलांच्या मनात अजूनही ‘बजाज मेटाडोर’च्या आठवणी कायम आहे !

by द पोस्टमन टीम
29 April 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आज भारतात सार्वजनिक वाहतूक बरीच सुधारली आहे. मालवाहतूक करणे असो की प्रवाशांची वाहतूक असो अनेक प्रकारच्या गाड्यांनी आज भारतीय रस्त्यावर चांगलाच जम बसवला आहे. पण, काही काळापूर्वी मालाची वाहतूक करण्यासाठी हातगाडी, बैलगाडी किंवा घोडागाडीचाच वापर केला जात असे. अशा काळात बजाज या भारतातील अग्रेसर वाहन निर्मिती करण्याऱ्या कंपनीने पहिल्यांदा टेम्पोचे भारतीय व्हर्जन आणले. या टेम्पोला भारतात भरभरून प्रतिसाद मिळाला.

१९६०च्या दशकात हा टेम्पो भारतात बराच लोकप्रिय ठरला. हा टेम्पो एकाच वेळी फॅमिली व्हॅन, माल वाहतूक, अँब्युलंस, पोलीस व्हॅन आणि स्कूल बस अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जात होता.

आज टेम्पो म्हटले की आपल्या डोळ्यासमोर धुळीने माखलेली आणि विशेषत: मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी गाडीच डोळ्यासमोर उभी राहते. खरे तर टेम्पो हा जर्मनीतील विडाल अँड सॉन टेम्पो-वेर्क या ऑटोमोबाइल कंपनीचा ट्रेडमार्क होता. या कंपनीने मेटाडोर आणि हॅन्सिटसारख्या क्लासिक गाड्यांची निर्मिती केली. भारतातील, “बजाज” या वाहन निर्मिती करण्यात अग्रेसर असणाऱ्या कंपनीसोबत करार करून बजाज टेम्पो मोटर्सची निर्मिती केली.

क्लासिक व्हॅनचे हे भारतीय व्हर्जन होते. याचेच नामांतर पुढे फोर्स मोटार असे करण्यात आले. बजाज टेम्पोने दोन वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पो लॉंच केले होते. १९६४ साली त्यांनी पहिल्यांदा बजाज टेम्पो विकिंग लॉंच केले. नंतर १९६९ साली त्यांनी बजाज टेम्पो मेटाडोरचे लॉंचिंग केले.

बजाजचा एक प्रॉडक्शन प्लांट पुण्याजवळच होता. त्यामुळे पुणेकरांना तरी मेटाडोर आणि विकिंग या दोन्ही गाड्या फारच प्रिय आहेत. मुंबईकरांना जसं फियाटचं आकर्षण आहे, अगदी तीच भावना पुणेकरांना या टेम्पोविषयी आहे.



विकिंग टेम्पो पेट्रोलवर चालत होता, तर मेटाडोर डीझेलवर आणि याच्या इंजिनचे वजन देखील हलके होते. या दोन्हीत एकच मोठा फरक होता. तो म्हणजे विकिंगच्या हेडलाईट्स या गोलाकार होत्या. तर मेटाडोरच्या हेडलाईट्स चौरसाकृती होत्या आणि दोन्ही हेडलाईट्सच्या मध्ये एका ग्रीलवर धातूने बनवलेले F हे अक्षर बसवलेले असे. दोन्ही गाड्या खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जात.

या गाड्या स्कूलबस म्हणून फार वापरल्या जायच्या. अनेकांच्या बालपणीच्या खास आठवणी या गाड्यांसोबतही जोडलेल्या आहेत. शाळेला जाण्यासाठी तयार होऊन दारात या गाडीसाठी वाट पाहत थांबलेले तुम्हालाही आठवत असेल. विंडोसीटसाठी केलेली भांडणेही नक्कीच आठवतील!

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

परंतु अचानकच १९७० साली विकिंगचे प्रॉडक्शन बंद करण्यात आले. यामागे इंधनाचे वाढते दर हेही एक कारण सांगितले जाते. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या सर्वच गाड्या त्याकाळी हळूहळू बंद होत गेल्या. मेटाडोरला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर २००० साली मेटाडोरचे प्रॉडक्शन बंद करण्यात आले.

काळाच्या ओघात या वाहनात काही सुसंगत बदल घडवून आणणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने गाड्यांच्या अद्यावतीकरणाकडे फारसे लक्ष दिले नाही.

नेमके याचवेळी जपानी मॉडेलच्या नव्या गाड्या बाजारात आल्या आणि टेम्पोची क्रेझ कमी कमी होत गेली. शिवाय, पर्यावरण कायद्यातही नवे बदल करण्यात आले. उत्सर्जनासंबंधीच्या नियमांमध्ये फिट बसत नसल्याने मेटाडोरचे उत्पादन बंद करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

जसे काही लोकांना वेगवेगळे पोस्टकार्ड्स, नाणी जमवण्याचा छंद असतो तसाच काही लोकांना जुन्या वाहनांचे मॉडेल जमवण्याचा छंद असतो. अशा लोकांकडील वाहन कलेक्शनमधे या विकिंग आणि मेटाडोरचे नमुने आजही दिसतील. आज मेटाडोरचे उत्पादन बंद असले आणि बाजारातून ही गाडी गायब झाली असली तरी, याच्या आठवणी मात्र काही लोकांनी आवर्जून जपल्यात.

पुण्याच्या धनंजय बदामेकर यांनी आपल्या क्लासिक व्हॅनच्या ताफ्यात अलीकडेच बजाज विकिंग आणि बजाज मेटाडोर या दोन जुन्या वाहनांचा समावेश केला. धनंजय यांच्या वडिलांचा खाजगी प्रवास वाहतुकीचा व्यवसाय होता. लहानपणी धनंजय यांना बालपणी अनेकदा विकिंग किंवा मेटाडोरच्या फ्रंट सीटवर बसून केलेला प्रवास आजही आठवतो.

केरळच्या वायनाडमधील सहा तरुणांनी एकत्र येऊन एक म्युझिकल रॉक-बँड तयार केला आहे. त्यांनी आपल्या या रॉक-बँडला मेटाडोरीया असे अफलातून नाव दिले आहे. या तरुणांनी २०१० मधे हा रॉक-बँड स्थापन केला. तोपर्यंत तर विकिंग आणि मेटाडोर दोन्हींचे प्रॉडक्शन बंद झाले होते. परंतु हे सहाही जण लहानपणी याच गाडीतून शाळेला जात असत.

गंमत म्हणजे शेवटी त्यांनी गेल्याच वर्षी स्वतःची मेटाडोर घेतली सुद्धा. जेव्हा त्यांच्याकडे मेटाडोर घेण्याइतके पैसे जमले लगेच त्यांनी ती विकत घेण्याचे ठरवले. अगदी मार्केटमधून हे मेटाडोर आउट झालेली असतानाही त्यांनी मी मिळवली आणि बालपणीचे स्वप्न सत्यात उतरवले देखील.

ही गाडी घेताच त्यांनी ‘धुरे’ नावाचा एक व्हिडीओ देखील युट्युबवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे, प्रवास, स्वप्न आणि व्हॅनचे अचाट किस्से यांचीच गाथा आहे.

पूर्वीच्या काळी बॉलीवूडच्या चित्रपटातही मेटाडोर व्हॅनसारखी वापरली जात असे. राकेश रोशन आणि पर्ल पदमसी यांच्या ‘खट्टा मिठा’ मधील ही गाडी आजही अनेकांना आठवत असेल.

अगदी अलीकडे म्हणजे २०१४ साली सोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेला ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ नावाचा चित्रपट येऊन गेला. यातील नायिका लैलाचे कुटुंबीयही हीच मेटाडोर F307 वापरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील नायिका लैला ही सेलेब्र्ल पाल्सी सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. या मेटाडोरमुळे तिचा आणि तिच्या कुटुंबियांचा प्रवास कसा सुकर होतो हे या चित्रपटात पाहायला मिळते.

अगदी स्कूलबसपासून बॉलीवूड व्हॅनपर्यंत आजही या गाडीचे चाहते या मॉडेलमधे काही नवनवे बदल करून ही गाडी वापरण्याचे नवनवे मार्ग शोधतच आहेत. आजही या गाड्यांविषयी लोकांमध्ये तितकीच क्रेझ आहे जितकी अगदी त्यांच्या पदार्पण काळात होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं त्यांनाच पुढे जनता पक्षाने हाकलून लावलं

Next Post

त्या मॅचमध्ये गावस्कर आऊट व्हावा म्हणून आपलेच लोक देव पाण्यात घालून बसले होते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

त्या मॅचमध्ये गावस्कर आऊट व्हावा म्हणून आपलेच लोक देव पाण्यात घालून बसले होते

ज्या तुलुगमा यु*द्धनीतीच्याच जोरावर बाबरने हिंदुस्तानावर राज्य केले ती काय आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.