The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑपरेशन कॅक्टस: असं केलं होतं मालदिवचं भारताने रक्षण

by द पोस्टमन टीम
29 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारताकडे कुणी मदत मागितली आणि भारताने केली नाही असा क्वचितच प्रसंग इतिहासात आढळेल! स्वतःच्या कक्षा वाढवण्यासाठी भारताने कधीही आक्र*मणं केली नाहीत. एवढंच नाही तर, कक्षा वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षाने झालेल्या आक्र*मणांचा प्रतिकार केला आहे. शरणागतांची कायमच रक्षा केली आहे. हेच भारताचे संस्कार आहेत आणि हाच वैभवशाली इतिहास !

याच इतिहासातील एका सोनेरी पानावर मिशन कॅक्टस लिहिलं गेलं आहे.

नोव्हेंबर १९८८ मध्ये मालदिव येथे जवळपास ८०-२०० अ*तिरेक्यांनी तख्तपालटासाठी विद्रोह केला. हे अ*तिरेकी ‘पीपल्स लीबेरशन ऑर्गनाइज़ेशन ऑफ तमिल इलम ‘ या संघटनेचे होते.

त्यांचं नेतृत्व मालदीवमधील एक व्यापारी अब्दुल्ला लूथूफ्फी करत होता. हा विद्रोह तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल गायूम यांना अटक करून मालदीवची सत्ता घ्यावी या उद्देशाने झाला होता. अतिरेक्यांनी मालदीवमधील सर्व प्रमुख शहरांचा ताबा घेतला. तात्कालिन राष्ट्रपती गायूम स्वतःचा जीव वाचून पळाले व राष्ट्रीय सुरक्षा मुख्यालयाचा आसरा त्यांनी घेतला. इथून सगळ्या हालचाली सुरू झाल्या.

मालदीवने अनेक देशांकडे मदत मागितली. भारत, पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, श्रीलंका व इतर काही देशांसोबत मदतीची बोलणी केली. पण कुणीच प्रतिसाद द्यायला तयार नव्हतं. समुद्र मार्गाने गेलं तर श्रीलंकेसाठी मालदीव केवळ तीन ते चार दिवसांच्या अंतरावर आहे. पण तरीही त्यांनी त्यांच्या सौन्याला रत्मानला हवाई अड्डयावर तैनात ठेवलं. पण पुढे जाण्यासाठी अनुमती दिली नाही.



अमेरिका व इंग्लंडमध्ये दीर्घ चर्चा झाली. या चर्चेतून असं ठरवण्यात आलं की इंग्लंड किंवा अमेरिका प्रत्यक्षपणे यात उतरणार नाहीत. पण भारत जो काही क्रिया करेल त्यावर समन्वय साधून अप्रत्यक्षपणे मदत करेल. अखेर भारताने मदतीचा हात मालदीव कडे वाढवला. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अत्यंत चपळाईने निर्णय घेऊन, काही तासांतच सहभाग कळवला.

३ नोव्हेंबर १९८८ रोजी, चोवीस तासाच्या आत सैन्याची एक तुकडी मालदीवसाठी रवाना करणायात आली. या कारवाईला ‘मिशन कॅक्टस’ नाव देण्यात आलं. अ*तिरेक्यांनी जी चुक केली तिचा फायदा भारताच्या या सैन्य तुकडीला झाला. अ*तिरेक्यांनी शहरातील मुख्य भाग ताब्यात घेतले, पण हूलहूले हवाईअड्डा ते ताब्यात घ्यायला विसरले. याचाच फायदा भारतीय सैन्याने उचलला. भारतीय सैन्य आग्रा एअर फोर्स स्टेशनवरून एका एयरक्राफ्टमधून रवाना करण्यात आलं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

सैन्याची नीती स्पष्ट होती. अत्यंत अभ्यासपूर्ण नियोजन केलेलं होतं. हूलहूले हवाई अड्डा, जिथे अ*तिरेक्यांचा ताबा नव्हता, तिथे भारतीय सैन्य उतरले. राजधानी इथून केवळ एका तासाच्या अंतरावर होती. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

थोड्याच वेळात सैन्याने राजधानी ताब्यात घेतली. राष्ट्रपतींना सोडवण्यात आलं. अ*तिरेक्यांवर कारवाई करून संपूर्ण शहराचा ताबा घेण्यात आला. काही अतिरेकी समुद्र मार्गाने निसटले. पण भारतीय नौसेना त्यांच्यावर नजर ठेवून होती. आयएनस गोदावरी आणि आयएनस बेट्वा यांनी या अ*तिरेक्यांना ताब्यात घेतलं.

दुसऱ्या दिवशी इंडियन मिलिटरी स्ट्राईक फोर्सने त्यांना ताब्यात घेतलं. या कारवाईत भारताला एकही सैनिक गमवावा लागला नाही.

केवळ एका सैनिकाने स्वतःच्या पायात गोळी मारून घेतली होती. पण मालदीवला मात्र मोठी हानी सहन करावी लागली, १९ नागरिक या कारवाईत मारले गेले. अनेक अ*तिरेक मारले गेले , जखमी झाले , काहींना ताब्यात घेण्यात आलं. संपूर्ण कारवाईत राष्ट्रपती आर. वेंकटरामन आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचं मोठं योगदान आहे. भारतीय सैन्याने हीं कारवाई ब्रिगेडियर फारूक बुल्सारा आणि कर्नल सुभाष जोशी यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पुर्ण केली. मालदीवच्या सैन्याने व अधिकाऱ्यांची देखील त्यांना मदत मिळाली.

या मदतीसाठी मालदिवने भारताचे आभार मानले. शिवाय इतर देशांनी देखील भारताचं कौतुक केलं. अमेरिकेचे तात्कालिन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी, “आशियात स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी भारताने खुप मोठं योगदान दिलं आहे” या शब्दांत भारताचा गौरव केला.

ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थेचर यांनी देखील भारताचं कौतुक केलं. या प्रसंगामुळे आशियात भारताचं वजन व ताकद वाढली. आशियातील इतर देश भारताला वेगळ्या दृष्टीकोनातून बघू लागले.

आशिया बाहेरील देशाचं लक्ष देखील भारताने वेधून घेतलं. आशियात पुढे येणाऱ्या प्रसंगात भारताची काय भूमिका राहते याचा सगळे अंदाज बांधू लागले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: IndiaIndian ArmyRajiv Gandhi
ShareTweet
Previous Post

१८ वर्षीय तरुणी तयार करते स्वत:चे सॅनिटरी नॅपकिन्स!

Next Post

सरदार पटेलांनी आयुष्यात तीन वेळा मृत्यूला हुलकावणी दिली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सरदार पटेलांनी आयुष्यात तीन वेळा मृत्यूला हुलकावणी दिली होती

food atm featured

"फुड एटीएम" च्या भन्नाट कल्पनेमुळे ओरिसातल्या हजारो गरजवंतांची भूक भागतेय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.