The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाश्चात्त्यांवर गांधीजींच्या विचारांइतकाच प्रभाव त्यांच्या चष्म्यानेही पाडला आहे

by द पोस्टमन टीम
29 December 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह असलेला गांधीजींचा चष्मा हा आपल्याला अनेक प्रकारे गांधीजींच्या संपूर्ण चरित्राचा एक परिचयात्मक आरसा भासत असतो. गांधीजी त्यांनी समाजाला दिलेली मूल्ये, दृष्टी, विचार या सर्वांचे प्रतीक त्या चष्म्यात दडले आहे. या गांधीजींच्या चष्म्याकडे बघण्याची आपली एक दृष्टी आहे.

पण त्या दृष्टीपल्याड गांधीजींच्या या चष्म्याच्या मागे एक रंजक कथा देखील आहे, जी गांधींच्या परोपकारी भावनेशी निगडित आहे. त्याच कथेवर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखन प्रपंच!

“या चष्म्याने मला स्वतंत्र भारताकडे बघण्याची दृष्टी प्रदान केली” असं गांधीजी नेहमी आपल्या आयकॉनिक चष्म्याबद्दल बोलत असत. १९३० साली त्यांनी हा चष्मा कर्नल एच. एस. श्रीदिवाण यांना देऊ केला होता. कर्नलने महात्मा गांधींकडे एका अशा गोष्टीची मागणी केली होती जी त्यांना सतत प्रेरणा देते त्यावेळी त्यांच्याकडे गांधींनी आपला चष्मा दिला होता.

गांधींचा हा चष्मा कसा तयार झाला? हा चष्मा एक स्टाईल म्हणून जगभरातील लोकांनी कधीपासून घालायला सुरुवात केली? हे जाणून घेऊयात..



कधी घेतला चष्मा?

गोलाकार लेन्स असलेला भिंगाचा चष्मा गांधीजींनी सर्वप्रथम लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेताना विकत घेतला होता. डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा चष्मा फार चांगल्या किंमतीत विक्रीस गेला होता. मोठा लिलाव झाला होता.

या चष्म्याच्या कव्हरचा फोटोदेखील डेली मेलने छापला होता. ज्यात ग्लोसेटर नामक एका चष्मे विक्रेत्याची छाप दिसून येते.

गांधीजींनी गोल भिंगाचा चष्मा घालायला का सुरुवात केली, याचा ऐतिहासिक संदर्भ नसला तरी सभ्यता आणि साधेपणाचे लक्षण तो चष्मा बनला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

लंडनमध्ये घेतलेला तो चष्मा अखेरच्या काळापर्यंत गांधींसोबत नव्हता. त्यांनी कर्नल नवाबाला आपला चष्मा दिल्यावर त्यांनी त्यांच्यासारखाच एक हुबेहूब चष्मा बनवून घेतला होता.

खरंतर गांधीजी त्या काळात स्वदेशी आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यामुळे त्यांनी आपल्या जुन्या चष्म्याप्रमाणे अगदी सारखाच नवा चष्मा बनवला होता. त्याची डिझाइन सारखीच होती. अनेकांच्या मते हा तोच चष्मा होता, जो गांधी आधीपासूनच वापरत होते. 

परंतु गांधीजींच्या सहकारी राजकुमारी अमृत कौर यांनी लिहिलेल्या एका पत्रात गांधीजी नवा चष्मा घालत असून त्यापासून त्यांना काही त्रास नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे गांधीजींनी नवीन चष्मा घेतला होता हे सिद्ध झाले होते.

दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याचा काळात आणि भारतात परतल्यावर पुढील अनेक वर्षे महात्मा गांधी नियमितपणे चष्म्याचा वापर करत नव्हते. १९२० सालातील त्यांचे जे चित्र उपलब्ध आहे. त्यात मात्र त्यांनी चष्मा घातलेला आढळून येतो आहे. त्यांचे आंदोलन, विचार यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक हा चष्मा बनला होता.

इतकेच नाहीतर त्यांच्या बौद्धिक चिंतनाचे आणि सहिष्णुतेचे बोधचिन्ह हा चष्मा बनला होता. अनेक ठिकाणी महात्मा गांधींचे प्रतीक म्हणून या चष्म्याचा वापर केला जातो

गांधीजींच्या चष्म्याचा ट्रेंड

चष्मा विक्री करणाऱ्या एका पोर्टलवर गांधी स्टाईल गोल भिंगाचे चष्मे विकत घेण्याचा ट्रेंड जगभरात असल्याचे म्हटले गेले आहे. लोक या गोल भिंग्याचा आणि बारीक दांडीच्या चष्म्याच्या खरेदीसाठी फार उत्सुक असते असं मत या पोर्टलच्या मालकाने व्यक्त केले आहे.

गांधी चष्म्याचा वापर करणारे सेलिब्रिटी

बीटल्स या समूहाचे एक गायक जॉन लेनन, हे महात्मा गांधींचे एक चाहते होते. त्यांनी सत्याग्रह व अहिंसावादी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. लेनन यांनी बरीच वर्षे हा गांधी चष्मा वापरला इतकेच नाहीतर हा चष्मा प्रसिद्ध देखील केला.

प्रसिध्द उद्योगपती आणि तंत्रज्ञ स्टीव्ह जॉब्स यांनी देखील गांधी चष्मा वापरला होता. त्यांनी गांधींना आपला हिरो आणि आदर्श मानून त्यांच्या सिध्दांतांवर अतूट श्रद्धा ठेवली होती.

गांधींच्या चष्म्यावर आधारलेला अनोखा प्रयोग

गांधींच्या चष्म्याची क्रेझ आजच नाहीतर भविष्यात देखील असणार आहे. गांधींच्या चष्म्यावर आधारलेल्या एका देवनागरी स्क्रिप्टची रचना बेनेट कंपनीकडून करण्यात आली असून लवकरच ती वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

गांधीजींचा चष्मा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक उत्तम दर्शकच नाहीतर एक हाडामाणसाचा संत पुरुष या पृथ्वीवर वावरला होता याची एक आठवण आहे. डोळ्याला डोळा फोडण्याचा न्याय वापरला तर सारे जग आंधळे होईल या गांधी तत्वज्ञानाचा प्रसार या गांधींच्या चष्म्याने केला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दाऊद इब्राहीम नाही तर हा आहे भारताचा मोस्ट वाॅन्टेड..!

Next Post

कॉंग्रेसच्या रॅलीला जागा दिली नाही म्हणून या कलाकाराला रस्त्यावरच मारून टाकण्यात आलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

कॉंग्रेसच्या रॅलीला जागा दिली नाही म्हणून या कलाकाराला रस्त्यावरच मारून टाकण्यात आलं होतं

या ४ भारतीयांना युनोने द*हश*तवादी म्हणून घोषित करावं यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.