The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरबस्तानातील यझिदी लोक श्रीकृष्णाच्या मोरपिसाची पूजा का करतात..?

by द पोस्टमन टीम
31 July 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगात अनेक धर्म आहेत. या सर्व धर्मात विविधता असली तरी काही मुल्ये सारखीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्याच धर्माची स्थापना ही दुखमुक्तीच्या उद्देशानेच झाली आहे. काही धर्मातील रूढी आणि कर्मकांडामध्येही साम्य आढळते. असे म्हटले जाते की अरब देशात आढळणारा यझिदी धर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे.

यझिदींच्या मंदिरातही दिवे लावले जातात, होमहवन केला जातो आणि त्यांच्यातील बऱ्याच प्रथा हिंदू धर्मातील प्रथेशी साधर्म्य असणाऱ्याच आहेत.

हिंदू धर्मात परमेश्वराच्या अवतराला आणि अवतार कार्याला खूपच मानले जाते. कृष्ण हा देखील परमेश्वराचा आठवा अवतार असल्याचे मानले गेले. कृष्णाच्या बासुरीत किंवा मुकुटात मोरपीस खोचल्याचे नेहमी दाखवले जाते. कृष्णाचा कुठलाही फोटो, प्रतिमा पाहिल्यास हे लक्षात येईलच.

यझिदी लोकांमध्येही मोर आणि मोरपिसाला पवित्र मानले जाते. तिथल्या मंदिरात मोरपिसांची पूजाही केली जाते.

जगात अनेक प्रकारचे धर्म आहेत. यातही दोन भाग करता येतात, एक अब्राहामिक प्रकारचे आणि दुसरे धार्मिक प्रकारचे. ख्रिश्चन, यझिदी आणि मुसलमान हे अब्राहामिक धर्म आहेत तर, हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध हे धार्मिक प्रकारचे धर्म आहेत.



हे प्रमुख धर्म सोडून पृथ्वीच्या पाठीवर अजुनही बरेच धर्म आणि संप्रदाय अस्तित्वात आहेत. या धर्मांबद्दल फारशी कुणाला काही माहिती नाही. शिवाय, या धर्मांचा कुठलाही विशिष्ट अजेंडा नाही, त्यामुळे हे धर्म फारसे चर्चेतही नसतात. या धर्मांची कुणीही चर्चा करत नाही. अशाच धर्मांपैकी एक आहे यझिदी धर्म!

जिथे इस्लामने जन्म घेतला आणि जिथे आज इस्लामने अशांतता पसरवली आहे, त्या प्रदेशाला युद्धभूमीचे स्वरूप दिले आहे. त्याच प्रदेशात मोरपिसाला पवित्र मानणारा आणि मोरपिसाची पूजा करणारा एक समाज आहे. हे ऐकूनच कितीतरी आश्चर्य वाटते! या धर्माची लोकसंख्या कमी असणे आणि कुठल्याही राजकारणावर त्यांचा प्रभाव नसल्याने यझिदीसारखे धर्म नेहमीच अपरिचित राहतात.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

लालिश येथील मंदिर हे यझिदी लोकांचे पवित्रस्थळ मानले जाते. या मंदिराच्या आतल्या एका भिंतीवर दिवे लावणाऱ्या एका स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या चित्राचा फोटो खूपच व्हायरल झाला होता. या चित्रात दाखवण्यात आलेल्या महिलेचा पोशाख आणि वेशभूषा ही अगदी तंतोतंत दक्षिण भारतीय महिलेसारखीच आहे. शिवाय तिचा चेहराही एखाद्या दक्षिण भारतीय महिलेच्या चेहऱ्याशी साधर्म्य साधणारा आहे. तिने हिरव्या रंगाची साडी आणि नारंगी रंगाचा ब्लाउज घातला आहे.

या चित्राचा हवाला देऊनच हा दावा करण्यात येत होता की यझिदी धर्म हा हिंदू धर्माचीच एक शाखा आहे. अर्थात हा दावा संपूर्ण खरा किंवा खोटा आहे याबाबत सध्या तरी बरेच मतभेद आहेत.

त्यानंतर काही दिवसांनी यझिदी महिलांचा दिवाळी सण साजरा करत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरूनही बरीच चर्चा रंगली होती.

यझिदी लोक आपल्या देवाला यजदान म्हणतात. त्यांच्यातही अशीच मान्यता आढळते की, यजदानचे सात अवतार झालेत. यातील एक अवतार हा मयूर अवतार होता. ज्याला ते ‘मलक ताउस’ म्हणतात. इतर सर्व अवतारांपैकी हा अवतार अधिक शक्तिशाली होता असा यहुदींचा विश्वास आहे.

त्यांच्या धर्म मान्यतेनुसार यजदान देवाने या सृष्टीची आणि साऱ्या मानवजातीची रचना केली. ते ईश्वराला इतके पवित्र मानतात की, ते थेट ईश्वराची पूजाही करत नाहीत.

ईश्वराच्या मयूर अवताराचे प्रतिक म्हणून ते मोरपिसाची पूजा करतात.

हिंदू धर्मातही मोरपीस आणि मोराला विशेष आदराचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात जसे मोर पीस असते त्याचप्रमाणे शिवपुत्र कार्तिकेयाचे वाहनही मोर आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयालाच मुरुगन म्हटले जाते.

यझिदींचा ‘मलक ताउस’ आणि दक्षिण भारतातील ‘मुरुगन’ हे एकाच देवाची दोन नावे असल्याचे म्हटले जाते.

यझिदी धर्मातील रीतीरिवाज आणि परंपरा हिंदू धर्माशी खूपच जुळतात. म्हणूनच असा दावा केला जातो हा धर्म सनातन धर्माच्या प्रभावाने निर्माण झालेला आहे. हा समुदाय प्रामुख्याने वायव्य इराक, वायव्य सिरीया आणि आग्नेय तुर्कीमध्ये आढळणारा हा समुदाय अगदी अल्पसंख्य आहे.

परंतु यझिदी धर्म सर्वात जुना धर्म असल्याचे त्यांच्या धर्मग्रंथात सांगितले जाते. त्यांच्या धर्मग्रंथानुसार हा धर्म सहा हजारवर्षे जुना आहे. यझिदीचा अर्थ होतो, ‘ईश्वराची पूजा करणारा’. हा शब्द पारशी भाषेतील आहे.

हिंदू धर्माप्रमाणेच स्वर्ग आणि नरक या संकल्पनाही या धर्मात मानल्या जातात. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होते. मुंडन, निरंकारी व्रत, मंदिरात लग्न लावण्याची परंपरा अशा कितीतरी, परंपरा हिंदू धर्मातील परंपरेशी तंतोतंत जुळणाऱ्या आहेत.

हिंदू धर्माप्रामाणेच त्यांच्यातही जत्रा भारावल्या जातात. अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याची समाधी बांधण्याचीही परंपरा या धर्मात आहे. यांची धार्मिक भाषा कुरामांजी आहे. ही प्राचीन इराणी भाषेची एक उपशाखा आहे.

हिंदुप्रमाणेच या धर्मातही जल, पृथ्वी आणि अग्नी यांना पवित्र मानले जाते. अग्नीत थुंकणे यझिदींच्या मते पाप समजले जाते.

हे लोक देखील हिंदू धर्मियांप्रमाणे पाप-पुण्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. धर्मातून बहिष्कृत करणे ही यझिदींसाठी एक मोठी शिक्षा मानली जाते. ज्याला धर्मबहिष्कृत केले असेल त्याला कधीच मोक्ष मिळत नाही, अशीही समजूत या समुदायामध्ये आहे.

या समुदायाची लोकसंख्या जेमतेम पाच लाखांवर आहे. परंतु, सिरिया, इराक आणि तुर्कीच्या या प्रदेशात इसीसचा प्रभाव मोठा आहे. इसीसच्या निशाण्यावर हे लोक कायम असतात. म्हणूनच यांची लोकसंख्याही कमी आहे. इसीसने गेली कित्येक वर्षे जो नरसंहार चालवला आहे, त्यात या लोकांचा नाहक बळी जात राहिला आहे.

यझिदी लोक धर्मांतर करत नाहीत. या धर्मातील व्यक्ती धर्मानंतर करून दुसऱ्या धर्मात जाऊ शकत नाही आणि दुसऱ्या धर्मातील व्यक्तीही या धर्मात येऊ शकत नाही. ज्याने या धर्मात जन्म घेतला आहे, तो मरेपर्यंत याच धर्मात राहील. अशी या धर्माचे नियम आहेत. परधर्मीय व्यक्तीला काही झाले तरी या धर्माची दीक्षा दिली जात नाही.

या धर्मातही अनेक कर्मकांड आहेत. हे सर्व कर्मकांड बहुधा जुन्या सनातन धर्माशी सुसंगत आहेत. त्यांच्या मंदिरातही हिंदुंप्रमाणेच दिवे लावले जातात आणि कोनाठाही धार्मिक विधी करताना अग्निकुंड पेटवला जातो आणि त्याची पूजा केली जाते.

मोसुल शहराच्या बाहेर लालेश हे यझिदींचे एक धार्मिक स्थळ आहे. इथे त्याच्या सर्वश्रेष्ठ धर्मगुरूची समाधी आहे. या समाधीच्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर एका नदीच्या काठाला आहे.

दरवर्षी १५-२० सप्टेंबर दरम्यान या ठिकाणी यझिदी लोक मोठ्या संख्येने जमा होतात आणि धार्मिक उत्सव साजरा करतात.

सगळे यझिदी आधी नदीत अंघोळ करतात आणि मग मंदिरात जाऊन पूजा करतात. त्यांच्यासाठी ‘मलक ताउस’ हाच देव आहे, म्हणून मोराच्या रुपात त्याची पूजा बांधतात. यजिदी लोक फक्त यजदान देवालाच मानतात.

याच देवाचे सात अवतार होऊन गेले अशी त्यांची समजूत आहे. जसे हिंदू धर्मात विष्णूला मानतात आणि त्याचे दहा अवतार होऊन गेल्याचे सांगण्यात येते.

ईश्वर एकच आहे, पण ईश्वराची असंख्य रूपे आहेत, हे हिंदू धर्मातील तत्वज्ञान यझिदी धर्मातही आढळते. हिंदूंप्रमाणेच तेही निसर्गाची पूजा करतात. त्याच्या अनेक कर्मकांडामध्ये निसर्गाला स्थान दिलेले आढळेल.

हिंदूंच्या सनातन परंपरेशी आणि रूढींशी साधर्म्य साधणाऱ्या अनेक रूढी या धर्मातही मिळतात. अग्नीची पूजा करण्याचे, होमहवन करण्याचे कर्मकांड हे त्याचेच एक उदाहरण म्हणून पाहता येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या कारणांमुळे जैन लोक कांदा खात नाहीत

Next Post

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना निवडणूकीचं तिकीट मिळतंच कसं…?

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना निवडणूकीचं तिकीट मिळतंच कसं...?

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चिमणभाईंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.