The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या डाकूवरून शोलेतला गब्बर बनवलाय

by द पोस्टमन टीम
29 March 2025
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


“यहां से पचास पचास कोस दूर गांव में जब कोई बच्चा रोता है तो माँ कहती है चूप हो जा बेटे नही तो गब्बर सिंग आ जायेगा,” शोलेमधल्या अमजद खानच्या आवाजातील या डायलॉगची जादू आजही कायम आहे. जेव्हा घरोघरी टीव्ही नव्हते तेव्हा एखाद्याच्या घरातील रेडीओवर या चित्रपटाची ऑडीओ कॅसेट ऐकली जायची. ही ऑडीओ ऐकण्यासाठीही लोग गर्दी करून बसायचे. या चित्रपटाची जादूच निराळी होती.

शोले चित्रपटातील ही डाकू गब्बर सिंगची व्यक्तिरेखा ज्या खऱ्याखुऱ्या गब्बरवर आधारलेली होती, जो या फिल्मी गब्बरपेक्षाही अधिक क्रू*र होता. या खऱ्याखुऱ्या गब्बरच्या म्हणजेच डाकू मोहर सिंहच्या आयुष्यातील एकेक किस्से ऐकल्यास तुम्हाला हा फिल्मी गब्बरही यापुढे फिका वाटेल.

१९६०च्या दशकात चंबळचे खोरे त्याच्या बंदुकीच्या फैरी एकून हादरून जात असे. या क्रू*र डाकूला पकडण्यासाठी सरकारने २ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.

या डाकूच्या गँगवर बारा लाखाचे बक्षीस होते. चंबळच्या खोऱ्यातील हा सर्वांत खतरनाक डाकू होता.

चंबळच्या खोऱ्यातील डाकूंचे साम्राज्य ही काही नवी बाब नाही. पण मोहर सिंगचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटत असे. मोहर सिंह म्हणजे द*हश*तीचे दुसरे नाव असा त्याचा धाक होता. १९५८ साली मोहर सिंह पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आला.



एका गावात हाणामारी सुरु असताना याने एकाचा खू*न केला आणि चंबळच्या खोऱ्यात लपून बसला. यानंतर १९७२ पर्यंत या परिसरात त्याची द*हश*त वाढत राहिली. १९६० च्या दशकात तर त्याच्या कर्तुकीने दिल्लीसुद्धा हादरून गेली होती. चंबळच्या खोऱ्यातील इतर गँगनी देखील मोहरच्या ताकदीपुढे नांगी टाकली होती. त्याला सगळ्यात महागडा आणि सगळ्यात जास्त खतरनाक डाकू मानले जाई.

मोहर सिंहची द*हश*त इतकी होती की, त्याने चंबळच्या खोऱ्यात बसून दिल्लीतील एका मूर्ती तस्कराचे अपहरण केले होते. अशी हिंमत त्याच्यापूर्वी कुठल्याच डाकूने केली नव्हती. दिल्लीतून एक मूर्ती तस्कराला दिल्लीहून ग्वाल्हेरला बोलावले आणि मग ग्वाल्हेरवरून चंबळच्या खोऱ्यात बोलावून घेऊन त्याला बंदी बनवून ठेवले. या घटनेने दिल्ली सरकारलाही घाम फुटला होता. त्या बंदी बनवून ठेवण्यात आलेल्या तस्कराकडून डाकू मोहोरने २६ लाख रुपयांची खंडणी उकळली होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

मोहर सिंह डाकू असला तरी त्याने स्त्रियांशी कधीही दुरवर्तन केले नाही. महिलांशी दूरवर्तन न करण्याची शपथ त्याच्या गँगमधील सर्वच डाकूंना दिली होती. मोहरच्या दबंगपणाचे आणि दिलेरपणाचे असे कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत.

जेलमध्ये असताना त्याने सर्वांसमक्ष चिकन आणि मटण खाल्ले होते.

न्यायालयात जेंव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेंव्हा त्याने न्यायाधीशांनाही खडे बोल सुनावले होते. जेलमध्येच एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली होती.

जेल परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना आव्हान देण्याची भाषा वापरली होती. असे कित्येक किस्से खुद्द त्याचा हवाला देऊनच ऐकवल्या जातात.

अखेर १९७२ साली मोहर सिंहने जेपी आणि मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश चंद्र सेठी यांच्या आवाहनावर मोहर सिंह हे आपल्या सोबतच्या डाकूंना घेऊन आत्मसमर्पण केले होते. परंतु डाकूगिरी करत असताना त्याने ४०० खू*न आणि ६५० अपहरण केले होते. त्याला वीस वर्षांची शिक्षा देण्यात आली पण, आठ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यावरच त्याला जेलमधून सोडण्यात आले.

मोहर सिंह जेलमधून सुटल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्याप्रमाणे जीवन जगू लागाला. आत्मसमर्पण केल्याने सरकारने त्याला ३५ एकर शेती बक्षीस दिली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून राजकारणात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला.

पण, दात तुटलेल्या वाघाप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. फक्त एकदा त्यांना नगरसेवकपद मिळाले होते. यापुढे राजकारणातही त्यांचा जास्त काळ टिकाव लागला नाही. राजकीय महत्वाकांक्षा अपूर्ण राहिलेल्या मोहर सिंह यांनी अखेर हे वास्तव स्वीकारले आणि सामान्य माणसाप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत केले.

चंबळच्या खोऱ्यात तेव्हा डाकू कमलाच्या नावाची जास्त चर्चा होती. कमला दिसायला इतकी सुंदर होती, की दस्यू सुंदरी ही बिरुदावली तिला खरोखरच शोभून दिसे. चंबळच्या खोऱ्यात महिला डाकू असणे हे काही आता नवीन राहिले नव्हते.

पण, कमलच्या बाबतीत एक अपवाद म्हणजे ती इतर डाकूंप्रमाणे मागास जातीतून आली नव्हती, तर उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण जातीतून आली होती.

महिला डाकूला कोणत्याही परिस्थितीत जिवंत पकडण्याचे आदेश असल्याने पोलिसांनी कमलचा अक्षरश: पिच्छा पुरवला होता. भिंड जिल्ह्यात पोलीस आणि डाकूच्या टोळीत झालेल्या हाणामारीत कमलला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी तिला पकडून जेंव्हा पोलीस ठाण्यात बंद करण्यात आले तेंव्हा तिला पाहायला प्रचंड गर्दी जमली होती. इतकी गर्दी यापूर्वी कुठल्याच डाकूला पाहण्यासाठी जमली नव्हती. खुद्द मोहर सिंह देखील डाकू कमलला पाहण्यासाठी आला होता.

माझ्या नावाचा इतका दरारा असूनही मला पाहण्यासाठी इतकी गर्दी जमली नाही, पण ज्या डाकू कमलला पाहण्यासाठी इतकी गर्दी जमली आहे, ती नेमकी आहे तरी कोण ही उत्सुकतेने त्यालाही राहवले नाही. त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते की, ही मुलगी आहे तरी कोण, जिच्या नावाची इतकी चर्चा सुरु आहे.

१९७५ मध्ये आलेला चित्रपट शोलेमधील गब्बर सिंहचे पात्र जरी मोहर सिंहवर आधारलेले असले तरी, मोहर सिंह याने एका चित्रपटात स्वतः डाकूची भूमिका केली होती.

१९८२ साली आलेल्या ‘चंबल के डाकू’ या चित्रपटात मोहर सिंह आणि माधो सिंह यांनी डाकूची भूमिका निभावली आहे.

एस. अझर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा प्रचारही तसा खास करण्यात आला होता. डाकूच्या भूमिकेत असली डाकू पडद्यावर असे म्हणत या चित्रपटाचा प्रचार करण्यात आला.

अखेर ६ मे २०२० रोजी या धगधगत्या आयुष्याची अखेर झाली. वयाच्या ९३व्या वर्षी डाकू मोहर सिंहने अखेरचा श्वास घेतला.

तारुण्याच्या काळातील ऐन उमेदीचे दिवस चंबळच्या खोऱ्यात द*हश*त माजवण्यात घालवलेल्या या डाकूने जेलमधून सुटून आल्यानंतर मात्र शांततेचे सर्वसामान्य जीवन व्यतीत केले. शेती करणे आणि गावकऱ्यांना, नातवंडांना, मित्र परिवाराला आपल्या जीवनातील दाबंग आयुष्याचे किस्से सांगणे यातच उर्वरित आयुष्य सरले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा नवाब १४ अब्ज रुपये किंमतीचा हिरा पेपरवेट म्हणून वापरत होता

Next Post

एकसंघ भारतासाठी झटणाऱ्या अन्सारींचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कायमच दुर्लक्षित राहिलं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एकसंघ भारतासाठी झटणाऱ्या अन्सारींचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कायमच दुर्लक्षित राहिलं

या टीव्ही सीरिअलमधून पुढे आलेला शाहरुख पुढे बॉलीवूडचा बादशाह बनला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.