The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील सगळ्यात जुनं खेळण्यांचं दुकानसुद्धा आता अंबानीच्या मालकीचं झालंय

by द पोस्टमन टीम
14 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हॅम्ले कंपनीची खेळणी जगभरातील अनेक लोकांच्या घरामध्ये असतात. तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा कुठल्याही ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या वेबसाइटवर गेलात आणि तिथे हॅम्ले टॉईज असं सर्च केलं तर तुम्हाला खेळण्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात. भारतातील तसेच जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये हॅम्लेचे स्वतःचे स्टोअर्ससुद्धा आहेत.

हॅम्ले स्टोअर हे जगातील सगळ्यात मोठे आणि सर्वांत जुने खेळण्यांचे दुकान म्हणून ओळखले जाते. लंडनमध्ये सुरु झालेले हे दुकान बघायला गेलं तर प्रत्येक इंग्रज माणसाच्या अभिमानाचा विषय. आज तेच दुकान एका भारतीय कंपनीच्या मालकीचे झाले आहे.

मे २०१९ मध्ये आपल्या रिलायन्स रिटेल इंडस्ट्रीने लंडनमधील हॅम्ले स्टोअर विकत घेतले. ही डील ६२० करोड रूपयांना झाली आणि संपूर्ण रक्कम कॅशमध्ये दिली गेली.

१७६० साली विल्ल्यम हॅम्ले या माणसाने लंडनमध्ये या कंपनीची स्थापना केली. लंडनमधील प्रसिद्ध रीजंट रोडवर हे दुकान वसले होते. जेव्हा या स्टोअरची स्थापना करण्यात आली तेव्हा त्याचे नाव हॅम्ले नव्हते.



सुरुवातीला हे स्टोअर “नोहाज आर्क” या नावाने ओळखले जात होते. हे बायबलमधील एका प्रसंगावरून ठेवलेले नाव होते. बायबलमध्ये जेनेसिस नावाच्या भागामध्ये एक प्रसंग असा येतो जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर प्रलय येणार असतो, तेव्हा नोहा नावाचा राजा आपल्या एका जहाजामध्ये सगळ्या प्रकारच्या सृष्टीमधील घटकांना एकत्र करतो.

प्रलयामध्ये बाकी सगळे नष्ट होते आणि फक्त नोहाचे जहाज वाचते. या संकल्पनेवरून या दुकानाला नोहाज आर्क असे नाव दिले होते.

नंतर मूळ मालकाला आदरांजली म्हणून या स्टोअरचे नाव हॅम्ले असे पडले. १८३७ पर्यंत हे लंडनमधील सगळ्यात प्रसिद्ध खेळण्याचे दुकान बनले. आज जी इमारत उभी आहे तिचे बांधकाम १८८१ साली झाले. मूळचे दोन मजली दुकान भव्य सात मजली दुकानामध्ये रूपांतरित करण्यात आले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लंडनमधील रीजंट रोड हा सगळ्यात प्रसिद्ध रोड आहे. पर्यटकांचे हे आवडते ठिकाण. दरवर्षी जवळपास पन्नास लाख लोक रीजंट स्ट्रीटवरच्या या हॅम्लेच्या खेळण्याच्या दुकानाला भेट देतात.

हॅम्लेच्या दुकानात जवळपास एक लाखाहून विविध प्रकारची खेळणी आहेत. मूळ रीजंट स्ट्रीट लंडन इथले दुकान प्रचंड भव्य प्रमाणात सजवलेले आहे. फक्त खेळण्यासाठी असलेली ही सात मजली अशी भव्य इमारत इतर दुसऱ्या कुठल्या शहरांमध्ये नाही.

अनेक कंपन्या सुरु होतात आणि त्यानंतर थोडी वर्षे चालून बंद पडतात परंतु १७६० सालापासून अव्याहतपणे चालू असणारी हॅम्ले ही जगातील काही जुन्या कंपन्यांपैकी एक मानली जाते.

जन्माला आल्यापासून या कंपनीने जगभरात आपले जाळे पसरलेले होते. त्याकाळी इंग्रज अनेक देशांमध्ये व्यापारासाठी जात होते त्याचा फायदाही या कंपनीला मिळाला.

खेळण्यांमध्ये जास्त काही विविधता असू शकते ही गोष्ट कदाचित आपल्या मनाला स्पर्श करणार नाही. खूप जणांनी खेळणे म्हणजे घरकामाचा सेट, बाहुल्या आणि मोटारगाड्या इतकेच प्रकार बघितलेले असतात त्यापलीकडे खेळणी काय काय असू शकतात त्याची आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला कल्पना असू शकत नाही.

या अगोदर अनेक अमेरिकन कंपन्यांनी या स्टोअरला विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यांना यात यश मिळू शकले नाही.

लंडनच्या रीजंट स्ट्रीटवर असलेल्या हॅम्लेच्या सगळ्यात जुन्या स्टोअरमध्ये दरवर्षी नवनवीन खेळणी येत राहतात. या खेळण्यांचे प्रत्येक वेळी नवनवीन प्रकार येत राहतात.

या सात मजली बिल्डिंगमध्ये प्रत्येक मजले विशिष्ट प्रकारच्या खेळण्यांसाठी राखून ठेवलेले आहेत.

उदाहरणार्थ या प्ले स्टोअरच्या पहिल्या मजल्यावर तुम्हाला फक्त स्टफ टॉईज बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकारातील मऊ लोकरीच्या कापडापासून बनवलेले टेडीबियर कुत्रे, मांजर, अगदी माणसाच्या उंची इतके जिराफ वाघ आणि इतर स्टफ टॉईज या विभागामध्ये पाहायला मिळतात.

दुसरा मजला हा विविध प्रकारच्या बोर्ड गेम्ससाठी राखून ठेवलेला आहे. तिसरा मजला आर्ट अँड क्राफ्ट म्हणून ओळखला जातो. इथे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये विकसित करणारी खेळणी उपलब्ध असतात. या विभागांमध्ये लोकांची आणि लहान मुलांची नेहमी गर्दी पाहायला मिळते.

चौथ्या मजल्यावर खास मुलींसाठी बनवलेली खेळणी मिळतात, पाचव्या मजल्यावर लेगो ब्रिक्स या खेळण्यातल्या विटांपासून बनवलेले इंग्लंडचा रॉयल फॅमिलीचे भव्य चित्र पाहायला मिळते.

सहाव्या मजल्यावर फक्त मुलांसाठी असलेली खेळणी आहेत तर सातव्या मजल्यावर प्रीस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी बनवण्यात आलेली खेळणी ठेवण्यात येतात.

खेळण्याच्या बाबतीत इतका बारीक विचार करणारे हे कदाचित पहिलेच स्टोअर असावे.

हे अठराव्या शतकात स्थापन झालेले स्टोअर असल्यामुळे इंग्लंडच्या दोन शतकातील घडामोडींचा साक्षीदार म्हणून याला ओळखले जाते.

दुसऱ्या महायु*द्धामध्ये या रिजंट स्ट्रीटवरच्या स्टोअरवर पाच बॉ*म्ब पडलेले होते. परंतु त्यानंतरसुद्धा स्टोअर बंद झाले नाही.

हॅम्लेनंतर इंग्लंडमध्ये खेळण्याची विक्री करणाऱ्या अनेक रिटेल चेन निघाल्या परंतु त्यातील एकालासुद्धा हॅम्लेची सर येऊ शकली नाही. आज हे स्टोअर रिलायन्स रिटेलच्या मालकीचे झालेले आहे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असली पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

ShareTweet
Previous Post

गांधीजींच्या सांगण्यावरून मोतीलाल नेहरूंनी आपली सगळी संपत्ती कॉंग्रेसला दान केली होती

Next Post

नथुराम गोडसेसोबत ही व्यक्तीसुद्धा “त्या” कटात सामील होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

नथुराम गोडसेसोबत ही व्यक्तीसुद्धा "त्या" कटात सामील होती

काश्मीरचा मुद्दा चिघळण्यासाठी नेहरू आणि पटेल जबाबदार आहेत का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.