The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवामानबदल – ९० वर्षात पहिल्यांदाच या डेथ व्हॅलीचं तापमान एवढं वाढलं होतं

by द पोस्टमन टीम
9 January 2026
in विश्लेषण, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. या ठिकाणाला डेथ व्हॅली असे नाव पडलेले आहे, ही एक प्रकारची खचदरी आहे आणि मान्यता अशी आहे की सुमारे साडेचार करोड वर्षांपूर्वी हिचा उगम झाला. तेव्हापासून हा भाग भूगर्भामध्ये खचत चाललेला आहे.

अठराव्या शतकात अमेरिकेमध्ये एक मोठी अफवा पसरली होती ती म्हणजे या दरीमध्ये सोन्याचे साठे सापडत आहेत. संपूर्ण अमेरिकेतून त्यासाठी लोकांच्या रांगा या दरीच्या पलीकडे जाण्यासाठी लागलेल्या होत्या. परंतु या ठिकाणचे तापमान प्रचंड उष्ण स्वरूपाचे आहे.

त्यामुळे जे जे लोक या ठिकाणी सोन्याचा शोध घेण्यासाठी गेले होते ते आपला सोन्यासारखा बहुमोल जीव मात्र गमावून बसले. त्या प्रसंगानंतरच या ठिकाणाला डेथ व्हॅली असे नाव पडले.

ही खचदरी पॅनामिंट आणि ॲमार्गोसा पर्वतश्रेणीं दरम्यानच्या भागात वसलेली आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी कार्टून नेटवर्कवर ‘द रोड रनर शो’ नावाचे कार्टून नेहमी बघत असाल. त्याच्यामध्ये रोड रनर नावाचा एक वेगाने धावणारा पक्षी आणि त्या पक्षाला मारून खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या रचणारा, कोल्ह्यासारखा दिसणारा कायोटी नावाचा प्राणी तुमच्यापैकी अनेक जणांच्या ओळखीचा असेल.

आता डेथ व्हॅली आणि या कार्टूनचा काय संबंध? तर हे जे दोन कार्टून दाखवले गेले होते त्याच्या पाठीमागचा सगळा जो प्रदेश आहे तो डेथ व्हॅलीवरूनच इन्स्पायर्ड होता.



अर्थात संपूर्ण परिसर हा काही वैराण वाळवंट नाही. अकरा हजार फूट उंच अशा पर्वत रांगा आणि त्याखाली तीनशे फूट खोल अशी पाण्याची तळी इतकी विपुल जैवविविधता या परिसरामध्ये आढळते. एकीकडे इथे ओसाड वाळवंट आहे. दुसरीकडे पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या नद्या देखील आहेत.

एकीकडे काही काही भाग बर्फाच्छादित दिसतो. तर दुसरीकडे फक्त मिठामुळे क्षारयुक्त झालेली, भेगाळलेली जमीन हजारो मैलाच्या टापूमध्ये पसरलेली आहे. अशा प्रकारची संपन्न जैवविविधता क्वचितच जगातल्या दुसऱ्या कुठल्या भागांमध्ये आढळत असेल, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी प्रचंड पर्वणीचे ठिकाण असते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या डेथ व्हॅलीच्या अगदी उत्तर दिशेला जवळपास ८०० फूट उंच वाळूच्या टेकड्या आहेत. सुमारे दोन मैल भागांमध्ये हा पट्टा पसरलेला आहे.

फक्त वाळूच्या टेकड्या इतकीच याची खासियत नाही. उन्हाळ्यात जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा अगदी या टेकड्यांच्या उंच भागातील वाळूचे कण खाली खाली घसरून येतात आणि घसरण होत असताना ते एकमेकांवर आदळले जातात. आदळल्या नंतर विशिष्ट प्रकारची कंपने त्यातून निर्माण होतात आणि एक वेगळ्याच प्रकारचे संगीत त्यातून ऐकू येते. ही अशा प्रकारची गाणारी वाळू बघण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक उन्हाळ्यामध्ये या परिसराला भेट देत असतात.

या डेथ व्हॅलीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथला रेस्ट्रॅक पाया. पायाचा अर्थ होतो सरोवर. या ठिकाणी जे सरोवर आहे ते सरोवर पाण्याचे नाही तर चक्क दगडांचे आहे. ही भूमी वर्षानुवर्षे कोरडी ठक्कर होती. अधेमध्ये तुरळक पाऊस पडत होता, परंतु इतर वेळी तापमान प्रचंड कोरडे. त्यामुळे या सरोवरामध्ये पाणी कधीही शिल्लक राहिलेच नाही.

या सरोवरामध्ये फक्त दगड आहेत आणि हे दगड एका ठराविक मार्गावरून अगदी सरकत सरकत पुढे निघून जातात जिवंत पाण्याच्या प्रवाहासारखे! इतक्या वजनदार दगडांना खेचून नेणारी कुठली शक्ती आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधक या सरोवरावर लक्ष ठेवून आहेत.

अगदी आखीव रेखीव ठरलेल्या मार्गाने प्रचंड वजनाचे दगड पाण्यासारखे सरकत पुढे जात राहतात हा नजारा बघण्यासारखा असतो.

इथे वाहणाऱ्या नद्या भूगर्भातले मीठ पृष्ठभागावर घेऊन येत असल्यामुळे पांढर्‍याशुभ्र अशा दिसतात. संपूर्ण डेथ व्हॅलीमध्ये बॅड वॉटर बेसिन या एकाच भागामध्ये फक्त पाऊस पडतो. हे एक पाण्याचे तळे आहे. आता या भागामध्ये पाऊस जरी पडत असला तरी अत्यंत उष्णतेमुळे पाणी आटून जाते आणि शेवटी बाष्पीभवनामुळे उरते ते मीठ त्यामुळे हे संपूर्ण तळे हे मिठाचे तळे म्हणून ओळखले जाते.

इथले मीठ खाण्यासाठी योग्य असले तरी पाणी मात्र पिण्यासाठी योग्य नाही म्हणूनच याला बॅड वॉटर बेसिन असे नाव पडलेले आहे.

या डेथ व्हॅलीचे जैवविविधतेच्या दृष्टीने असणारे महत्व लक्षात घेऊन १९९४ साली अमेरिकन सरकारने कॅलिफोर्निया डेझर्ट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा पास केला. या कायद्याअंतर्गत हा संपूर्ण परिसर नॅशनल पार्क म्हणून घोषित करून टाकला.

हा परिसर जगातील सगळ्यात उष्ण परिसर म्हणून ओळखला जातो. जगातील सगळ्यात जास्त तापमानाची नोंद याच परिसरामध्ये झालेली आहे.

२०२० मध्ये डेथ व्हॅली पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली. ऑगस्ट महिन्यात या परिसरामध्ये उच्चांकी ५४.४४ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली. हे गेल्या ९० वर्षातील उच्चांकी तापमान होते. पृथ्वीवर तिसऱ्यांदा तापमानाचा पारा इतक्या उंचावर गेला. या परिसरामध्ये अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे संपूर्ण अमेरिका चिंतेत आहे. याचाच एक अर्थ म्हणजे पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढत आहे. क्लायमेट चेंज ही गोष्ट आपण आता गंभीरतेने घेतली पाहिजे हे यातून सूचित होते.

यापूर्वी १९१३ साली याच परिसरात ५६.१९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली होती. परंतु त्या काळात तापमान मोजण्याची साधने आजच्या इतकी प्रगत नव्हती. खरोखर ५६अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले असेल का याविषयी आजच्या संशोधकांना शंका वाटते.

१९१३ साली नोंदवल्या गेलेल्या ५६ अंश सेल्सिअस तापमानाची प्रमाणता आता कोणी वापरत नाही. परंतु त्यानंतर अगदी ५५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणारे तापमान ऑगस्ट २०२० मध्ये नोंदले गेले.

तापमान वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेली आग. या आगीमध्ये संपूर्ण पृथ्वीवरचे सुमारे ३५ टक्के जैववैविध्य नष्ट झाले असा अंदाज वर्तवण्यात येतो. या आगीमुळे यावर्षी डेथ व्हॅलीमध्ये इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली असे शास्त्रज्ञ मानतात.

ही घटना पाहता २०२० वर्ष खर्‍या अर्थाने संपूर्ण मानवजातीसाठी प्रलयंकारी वर्ष ठरले असे म्हणायला हरकत नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग असेल त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेली आग असेल, कोरोना असेल, तापमानवाढीच्या घटना असतील हा सगळा नजारा भविष्यकाळाची चाहूल तर देत नाहीत ना?

आतातरी मानवाने स्वतःचा हावरेपणा सोडून निसर्गाशी मैत्री केली पाहिजे, निसर्गाकडे परत वळले पाहिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीची जपणूक केली पाहिजे हा मोठा संदेश आपल्याला हे डेथ व्हॅलीचे वाढलेले तापमान देत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

विदेशी गाड्यांना टक्कर देण्यासाठी हिंदुस्थान मोटर्सने ही कार बनवली होती

Next Post

नुसतं मेकअपचं सामान विकून ही बाई करोडोच्या कंपनीची मालकीण बनली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

नुसतं मेकअपचं सामान विकून ही बाई करोडोच्या कंपनीची मालकीण बनली होती

टाटा कंपनीचं ओके साबण भारतीय मार्केटमध्ये अपयशी का ठरलं?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.