The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि म्हणून त्या दिवशी रशियातल्या लोकांनी सगळी व्होडका संपवली होती

by द पोस्टमन टीम
28 March 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


रशिया म्हटलं की डोळ्यासमोर तीनच गोष्टी उभा राहतात. रशियन, कम्युनिझम आणि दारू.

रशियन लोक त्यांच्या मद्यापानावरील प्रेमासाठी जगप्रसिद्ध आहेत. विशेषकरून “व्होडका” या प्रकाराशी तर त्यांचे फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुठलाही सणवार किंवा बेसिकली कुठलाही दिवस असो, तो “बाटली”शिवाय पूर्णच होत नाही.

८ मे १९४५ हा दिवस कुठलाच रशियन विसरू शकत नाही. याच दिवशी अथक प्रयत्नानंतर रशियाच्या “रेड आर्मी”ने जर्मन आर्मीचा पाडाव करून जर्मन साम्राज्याला मित्रपक्षासमोर झुकवलं होतं. आजही हा दिवस रशियामध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर रशियामध्ये हा दिवस उगवला होता. ना*झींनी रशियावर केलेल्या अ*त्याचारांना परिसीमाच नव्हती. मॉस्कोजवळील गावांमध्ये तर माणुसकी वगैरे गुंडाळून ठेवत ना*झींचे अत्याचार सुरु होते.

या विजयाचा जेवढा आनंद रेड आर्मीला झाला होता तेवढाच आनंद या गावांमधल्या रहिवाशांनाही झाला होता, कारण ते बऱ्याच वर्षांपासून या जाचापासून मुक्ती मिळण्याची वाट बघत होते.



२२ जून १९४१ रोजी जनरल जॉर्गी झुकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली एक ऑपरेशन राबवण्यात आलं. ऑपरेशन उरेनस. इथेच उलटी गंगा वाहायला सुरुवात झाली. हळूहळू रशियाने जर्मनीला कमजोर करायला सुरुवात केली. जर्मन आर्मी मागे सरकू लागली. सरतेशेवटी रशियाने बर्लिनचा पाडाव केलाच.

जर्मनीचा हुकुमशाह ॲडॉल्फ हि*टल*रला याच्या परिणामांना सामोरं जायचं नव्हतं की काय म्हणून बर्लिनचा पाडाव झाल्या झाल्या त्याने आत्मह*त्या केली.

बर्लिन एकदा हाती लागल्यानंतर संपूर्ण जर्मन साम्राज्य पाडणं हे काही फार कठीण काम नव्हतं. साम्राज्याचे प्रमुख कार्ल डॉन्टीस यांनी शांतता करारावर स्वाक्षरी करून दोन्ही देशातली धगधगणारी आग शांत केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

रशियाने जर्मनीचा पाडाव केला, हि*टल*रला हरवलं ही बातमी वाऱ्यासोबत युरोपच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. हि*टल*र संपल्यामुळे सगळ्यांना झालेला आनंद तर तुम्ही समजूच शकता. सगळ्या युरोपमध्ये जल्लोषात हा आनंद साजरा होत होता.

पण मॉस्कोच्या तर आनंदाला सीमाच नव्हती. इतकी वर्ष लोक ज्याची वाट बघत होते ते घडलं होतं. जर्मनीच्या अ*त्याचारांमुळे सोव्हिएतची जवळपास २० लाखांहून अधिक लोकसंख्या नष्ट झाली होती. चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा दिवस उगवला होता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

एखादी गोष्ट साजरी करायची म्हणजे सगळ्यात पहिले रशियन लोकांसमोर एकच गोष्ट येते. व्होडका!

८ मे रोजी रात्री उशिरा (म्हणजेच ९ तारखेला) विजयाची खबर मॉस्कोला पोहचली आणि लोक कसलाही विचार न करता जल्लोष साजरा करायला रस्त्यांवर उतरले.

ही “पार्टी” तब्बल २२ तास चालू होती. त्यानंतर जोसेफ स्टालिनने सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी भाषण दिलं. अर्थात तोपर्यंत सगळा देश हँगओव्हरमध्ये होता. पण ना*झींच्या अ*त्याचारापासून मिळालेल्या मुक्तीपुढे हे “सेलिब्रेशन” फारच छोटं होतं.

नौदलात नेव्हिगेटर राहिलेले निकोलाई क्रुश्चेव्ह सांगतात की त्या दिवशी त्याच्या घरचे, शेजारीपाजारी सगळेच हा विजय साजरा करत होते. जे हा आनंदाचा दिवस बघू शकले नाही त्यांच्यासाठी आणि हे असे अमानवी अ*त्याचार पुन्हा कधीच कोणाला भोगायला लागू नये यासाठी ते पीत होते.

त्या दिवशी लोकांनी इतका व्होडका विकत घेतला की १० मेला एक बाटली मिळणं देखील अवघड झालं होतं. यावरूनच त्यांनी या दिवसाची किती वाट बघितली असेल आणि त्यासाठी काय काय सहन केलं असेल याची आपल्याला कल्पना येते.

रशियन आहे म्हणजे व्होडका पिणारच अशी एक समजूत असते. याचं कारण मद्य खासकरून व्होडकाचा आणि रशियाचा संबंध फारच जुना आहे. मद्यपान हा पूर्वीपासूनच रशियन समाजाचा एक अविभाज्य घटक बनून राहिला आहे.

झारच्या राज्यात मद्य निर्मितीमधून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत होता. इथूनच कदाचित मद्यपान एक सांस्कृतिक घटक बनला असावा.

पण पुढे सोव्हिएतमध्ये बरेचदा हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. खासकरून ब्रेझनेव्हच्या काळात. बऱ्याच जनजागृतीनंतर थोडासा का होईना बदल दिसून येत होता. काही काळासाठी तर सोव्हिएतमध्ये दारूबंदी देखील करण्यात आली होती. 

पण याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला. कारण झारप्रमाणेच आत्ताची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणात मद्य व्यापारावर अवलंबून होती. शेवटी गोर्बाचेव्हने मद्यनिर्मिती कायद्याचा अखत्यारीत आणली.

पण आजही मद्यपान हे रशियन संस्कृतीचं प्रतिक आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन…

Next Post

महात्मा गांधीजींच्या मुलांनीच नथुराम गोडसेंची फाशी रद्द करण्याची मागणी केली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

महात्मा गांधीजींच्या मुलांनीच नथुराम गोडसेंची फाशी रद्द करण्याची मागणी केली होती

राजीव गांधींच्या विरोधात गेल्याने व्हीपी सिंग यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.