The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तर कोरियाचे लोक ज्या पर्वताला पवित्र मानतात तिथेच त्यांच्या डोकेदुखीचा जन्म झालाय

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


उत्तर कोरिया भोवती असलेल्या एका गुढतेच्या वलयामुळे या देशाबद्दल थोडीशी जरी माहिती मिळाली तरी, संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडेच लागून राहिलेले असते. कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असले तरी कोरोनाला रोखण्यात उत्तर कोरिया यशस्वी झाला असल्याचा दावा या देशाने केला होता.

उत्तर कोरियाच्या सीमावर्ती भागात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते, लोकांना जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याचेही यावेळी समोर आले होते. त्यावेळी उत्तर कोरियात मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला होता. लोकांनी मास्क घातल्याशिवाय कामावर हजर राहू नये असा हुकुम या देशात काढण्यात आला.

कोरोनामुळे जगाचे लक्ष पुन्हा एकदा उत्तर कोरियाकडे वेधले गेले होते. तसेही इथे अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत, ज्यांची जगाला अजूनही माहिती नाही.

उदाहरणच द्यायचे तर इथले शासक आणि इथल्या पेकटू नावाच्या एका पर्वतामध्ये काही विशेष संबंध आहे. ही माहिती आजही कुणाला फारशी माहिती नाही. पण, उत्तर कोरियाची जनता या पर्वताची पूजा करते आणि हा पर्वतच आपला रक्षणकर्ता असल्याचे मानते.

उत्तर कोरिया आणि तिथली हुकुमशाही राजवट नेहमीच औत्सुक्याचा आणि कुतुहलाचा विषय ठरली आहे. उत्तर कोरियामध्ये पेकटू नावाच्या एका पर्वताची श्रद्धेने पूजा केली जाते. पेकटू हा एक ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला पर्वत आहे. हा पर्वत आणि उत्तर कोरियाचे शासक यांचा खूपच घनिष्ठ संबंध आहे.



किम घराण्याचा जन्म या पेकटू पर्वतातून फुटणाऱ्या ज्वालामुखीतून झाला आहे असे मानले जाते. किम घराण्याचे पूर्वज हे ज्वालामुखीतून निर्माण झाले होते. त्यामुळे उत्तर कोरियावर या वंशाचे लोकच राज्य करू शकतात, अशी धारणा तिथल्या सामान्य माणसांत रुजली आहे.

आजही अनेकदा किम जोंग उननंतर उत्तर कोरियावर कोण शासन करेल अशी चर्चा रंगते तेंव्हा सरळ एकच उत्तर दिले जाते. किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग याच त्याच्या उत्तराधिकारी असतील. म्हणजे परिवारातील व्यक्तीव्यतिरिक्त इथे दुसरे कोणीच राज्य करू शकत नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

उत्तर कोरियातील लोक या पेकटू पर्वताला खूप पवित्र स्थान मानतात. याच स्थानावरून या वंशाचे लोक उत्तर कोरियात आले. म्हणूनच किम यांचा वंशही पवित्र मनाला जातो.

२०१९ साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरिया या सरकारी वृत्तसंस्थेने या पर्वताचा फोटो छापला होता. या फोटोत किम जोंग आपल्या घोड्यावर बसलेले दिसतात. किम जेव्हा जेव्हा या पर्वताला भेट देऊन परत येतात तेव्हा ते एखादा महत्वाचा निर्णय जाहीर करतात.

असे म्हटले जाते किम परिवार या पर्वताला भेटण्यापूर्वी या पवित्र पर्वतानेच त्यांना अनामिक प्रेरणा दिलेली असते या प्रेरणेतूनच शाही परिवार आपले निर्णय जाहीर करतो. जेंव्हा शाही परिवार या पर्वतावर जाईल तेव्हा उत्तर कोरियात नक्कीच कोणतातरी नवा निर्णय जाहीर होणार याची लोकांना कल्पना असते.

पेकटू पर्वत एका ज्वालामुखीपासून बनला आहे. हजारो वर्षांपूर्वी या पर्वताची निर्मिती एका ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली होती. हा पर्वत चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर आहे. चीनमधील लोकही या पर्वताला पवित्र मानतात. चीनमध्येही या पर्वताची पूजा केली जाते.

किम संग यांनी या पर्वतावरूनच जपानविरोधात यु*द्धाची घोषणा केली होती. त्यांचा मुलगा किम जोंग दुसरा याचा जन्म याच पर्वतावर झाला होता. या पर्वताच्या नावावरून त्यांच्या वंशाला पेकटू वंश म्हणूनही ओळखले जाते.

किम परिवारही आपण पेकटू वशांचे असल्याचे मानतो. या पेकटू वंशाच्या लोकांनीच उत्तर कोरियाचा सांभाळ करायचा आहे, असा समज उत्तर कोरियात प्रचलित आहे.

फक्त उत्तर कोरिया आणि चीनमध्येच नाही तर, दक्षिण कोरियातही या पर्वताबद्दल तीच भावना आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांसाठी हा पर्वत महत्वाचा आहे.

२०१८ साली उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष जेव्हा एकमेकांना भेटले होते, तेव्हा त्यांच्यातील चर्चेत या पर्वताचा उल्लेख आला होता. यावरून दोन्ही देशांसाठी हा पर्वत किती महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, हे समजून येते.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी या पर्वताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु या पर्वतावर जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने त्यांना या पर्वतावर जाण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही.

चीनच्या सीमेला लागूनच हा पर्वत आहे. चीनी लोक याला चंगबाई म्हणतात. या पर्वताच्या मुद्द्यावरूनही चीन आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु १९६२ साली, या प्रश्नावर दोन्ही देशादरम्यान करार करण्यात आला.

उत्तर कोरियाच्या कोड ऑफ आर्म्समध्येही या पर्वताचा उल्लेख आढळतो. तिथल्या राष्ट्रगीतातही या पर्वताचा उल्लेख केला गेला आहे. देशातील लोकांमध्ये या पर्वताबद्दल श्रद्धेची भावना आहे. म्हणून कोरियन राजवंश स्वत:ला या पर्वताशी जोडू पाहतो असेही म्हटले जाते.

उत्तर कोरियाचा अभ्यास करणारे तज्ञ मायकल मेदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, किम इल सुंग यांनी या बेकडू/पेकटू पर्वतावरूनच जपान विरोधात यु*द्ध पुकारले होते. जपानच्या साम्राज्यवादी शक्तींवर मात करण्यासाठी त्यांनी याच पर्वतावरून गोरिला यु*द्धास आरंभ केला होता.

त्याकाळी कोरिया जपानच्या ताब्यात होता. या यु*द्धानंतर किम वंश आणि या पर्वताचा संबंध जोडून वेगवेगळ्या कथा तयार करण्यात आल्या. किम वंश या ज्वालामुखीतून जन्मला ही देखील अशीच एक दंतकथा.

किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल, यांनी डियर लीडर नावाने आपले आत्मकथन लिहिले आहे. त्यांच्या या आत्मकथनातही या बेकडू/पेकटू पर्वताचा उल्लेख आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिल्यानुसार त्यांचा जन्म बेकडू पर्वतावर लावण्यात आलेल्या सैनिकी छावणीत झाला होता.

यावर दक्षिण कोरियातील तज्ञांचे मत काही वेगळेच आहे. त्यांच्या मते किम जोंग इल यांचा जन्म सायबेरियाच्या लष्करी छावणीत झाला होता. या छावणीतून त्यांनी कोरियन लोकांचे अपहारण केले होते. त्यांनी मुद्दामहून अशा प्रकारची अफवा सामान्य लोकांमध्ये पसरवली आहे.

उत्तर कोरिया आणि त्याच्या भोवतालचे हे गूढ वातावरणात नेहमीच नवनव्या प्रकारे भर पडत असते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एका चोरीने मोना लिसाच्या चित्राला जगप्रसिद्ध केलं

Next Post

गुगल न्यूजच्या मागे या भारतीयाचं डोकं आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गुगल न्यूजच्या मागे या भारतीयाचं डोकं आहे

ही चकाचक दिसणारी इमारत कॉर्पोरेट ऑफिस नसून एक ग्रामपंचायत कार्यालय आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.