The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शक्तिमान नाही तर नागराज भारताचा पहिला सुपरहिरो होता

by द पोस्टमन टीम
19 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शक्तिमान १९९७ साली दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना भेटायला आला खरा, पण तो भारताचा पहिला सुपरहिरो नाही. त्याच्या आधी एक भारतीय सुपरहिरो होता. त्याचे नाव आहे नागराज!

सुपरहिरो ही कल्पना तशी गेल्या ७०-८० वर्षांपासून कॉमिक्सच्या माध्यमातून जगभरात राज्य करतेय. आता खरं तर अमेरिकेचे पिक्चर जगभरात प्रदर्शित होत असल्यामुळे अमेरिकन सुपरहिरो सगळ्या जगाला माहित आहेत पण प्रत्येक देशाचे त्यांच्या त्यांच्या मातीतले सुपर हिरो असतात. कदाचित भाषेचा अडसर असल्यामुळे आणि इंग्लिश ही एकच आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे आपल्याला जितके इंग्लिश भाषेतले सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वूमन, अव्हेन्जर्स असे सुपर हिरोज माहिती आहेत तसे इतर देशातील क्वचितच माहिती असतात. अगदी आपल्या अस्सल भारतीय सुपरहिरोबद्दल देखील फार कमी लोकांना माहिती असते.

भारतातला पहिला सुपरहिरो कोण असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे “शक्तिमान”.

इंग्रजी सुपरहिरो “सुपरमॅन”वर आधारित शक्तिमान ही मालिका भारतात १९९७ साली पहिल्यांदा टीव्हीवर दाखवण्यात आली. मुकेश खन्ना यांच्या “भीष्म इंटरनॅशनल” या प्रोडक्शन हाउसने या मालिकेची निर्मिती केली होती. शक्तिमानची भूमिका साकारली होती मुकेश खन्ना यांनी. शक्तिमान दूरदर्शनवरील सगळ्यात आवडीने बघितली जाणारी मालिका ठरली. या मालिकेने लोकप्रियतेचे नवनवीन उच्चांक गाठले. भारताचा पहिला सुपरहिरो म्हणून या मालिकेची आणि मुकेश खन्नाची प्रचंड तारीफ झाली. आजही शक्तिमानचे एपिसोड युट्यूबवर शोधून शोधून पाहिले जातात.

आता या मालिकेने जो दावा केला होता “शक्तिमान हा भारताचा पहिला सुपरहिरो आहे” तो खरा होता का? खरंच शक्तिमान भारताचा पहिला सुपरहिरो होता का? तर, नाही!

शक्तिमान १९९७ साली दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना भेटायला आला खरा, पण तो भारताचा पहिला सुपरहिरो नाही. त्याच्या आधी एक भारतीय सुपरहिरो होता. त्याचे नाव आहे नागराज!



नागराज हे पात्र दिल्लीवरून प्रकाशित होणाऱ्या राज कॉमिक्सने पहिल्यांदा १९८६ मध्ये भारतीय वाचकांच्या भेटीस आणले. अर्थात हे कॉमिक्स हिंदी भाषेतून प्रकाशित होत असे त्यामुळे हिंदी भाषिक राज्यातील बहुसंख्य लोकांना या सुपरहिरोची ओळख आहे.

नागराज हा नागलोकाचा राजा असतो. दुष्ट प्रोफेसर नागमणी याने नागराज याला मानवी ह*त्यार बनवून अत्यंत मौल्यवान अशी हिमालयातील एक देवीची मूर्ती चोरून आणण्याच्या कामगिरीवर पाठवलेले असते. ही मूर्ती अत्यंत गुप्त ठिकाणी ठेवलेली असते आणि तिचे संरक्षण ३०० वर्षांहून जास्त काळ जिवंत असलेले “गोरखबाबा” करत असतात.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

गोरखबाबा हे पात्र सिद्ध गोरक्षनाथ यांच्यावरून प्रेरणा घेऊन निर्माण केलेले आहे.

नागराज गोरखबाबाच्या ताब्यातील मूर्ती घेऊन पळून जाण्यात यशस्वी तर होतो पण नंतर गोरखबाबाचे हस्तक त्याला पकडतात आणि जेरबंद करून गोरखबाबाकडे घेऊन येतात. प्रो. नागमणी याने काही रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात. गोरखबाबा त्याला बंधमुक्त करतात. त्यानंतर तो गोरखबाबाच्या मार्गदर्शनाखाली तयार होतो. एवढंच नाही तर, ३ वेळा विश्वदौरा करून आ*तंक*वाद्यांचा नायनाट करतो.

ही झाली अगदी सर्वसाधारण रूपरेखा. परंतु नागराजच्या माध्यमातून राज कॉमिक्सने नागलोक आणि नागप्रजातीचे जे काही भव्यदिव्य विश्व उभे केले आहे, ते वाचता वाचता कोणीही थक्क होईल.

फक्त नागराजच नाही तर त्याचे आईवडील, त्यांचे पुरातन नाग साम्राज्य, कालाजयी, वासुकी, शेष अशा नागांना आव्हान देऊन सुरु झालेला नागराजचा प्रवास या सगळ्याचे वर्णन अत्यंत रोचक पद्धतीने या कॉमिक्समध्ये होते. यामुळेच अनेक लोक नागराजचे फॅन झाले होते.

नागराज एक इच्छाधारी नाग असतो. त्याचं विष त्याच्या शत्रूसाठी भयंकर असलं तरी त्यात मोठेमोठे रोग बरे करण्याची ताकद देखील असते. त्याच्या शरीरावर कितीही आघात झाले तरी ते लगेच भरून येत असतात. इतकेच नव्हे तर नागराजच्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे शक्ती असलेले नाग राहतात. उदा. शीतनाग कुमार- हा नाग बर्फाचे हत्यार तयार करू शकतो, सौदंगी- हा मुळचा इजिप्शियन नाग असून इंद्रजाल आणि जादू टोण्यामध्ये पारंगत आहे, मणीधारी नागू- मणीधारी नाग ज्याच्याकडे भ्रम निर्माण करून हल्ला करण्याची क्षमता आहे. हे नाग लढाईच्या वेळी नागराजच्या शरीरातून बाहेर निघून त्याला मदत करून पुन्हा त्याच्या शरीरामध्ये विलीन होतात.

नागरुपात आणि मनुष्य रुपात नागराज आपल्या अलौकिक शक्तीसह शत्रुबरोबर लढतो आणि त्यांचा पराभव करतो. यातल्या सगळ्याच कहाण्या फारच रोचक आहेत.

नागराजने गेली अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन केले पण नागराज विस्मृतीमध्ये जाण्याचे कारण काय?

तर झाले असे की, भारतात नंतर परदेशी कॉमिक्स यायला लागले, परदेशी चॅनेल देखील दिसू लागले. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन अशा चकचकीत इंग्लिश सुपरहिरोच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली.

ज्याप्रमाणे या इंग्लिश हिरोवर मालिका, सिरीज, पिक्चर आले, ते भाग्य आपल्या मातीत जन्माला आलेल्या सुपर हिरोंना लाभले नाही.

मागे राज कॉमिक्सबरोबर करण जोहरने नागराजवर सिनेमा बनवण्यासाठी बोलणी सुरु केली होती. नागराजच्या मुख्य भूमिकेत रणवीर सिंग झळकणार अशा गोष्टीही मीडियामध्ये आल्या होत्या, मात्र त्यानंतर यावर पुढची कुठलीच बातमी नाही. पण नागराजवर हिंदी चित्रपट बनला तर आपल्या देशातील आपले सुपरहिरो किती भव्यदिव्य होते याची प्रचिती मोठ्या पडद्यावरून आताची पिढी नक्की अनुभवू शकेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतीय रेल्वेने तीन मालगाड्या जोडून महाकाय अ‍ॅनाकोंडा बनवलीये

Next Post

या बारा वर्षाच्या फुटबाॅल प्लेअरचा ‘मेस्सी’ सुद्धा फॅन आहे

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

या बारा वर्षाच्या फुटबाॅल प्लेअरचा 'मेस्सी' सुद्धा फॅन आहे

या कॅमेऱ्यामुळे फोटोस्टुडिओत न जाता फोटो काढायची सोय झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.