The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिटलरच्या तावडीतून निसटून या माणसाने एक अवाढव्य साम्राज्य उभं केलंय

by द पोस्टमन टीम
12 August 2020
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


बालपण म्हणजे स्वच्छंदपणे उनाडण्याचे दिवस, हसण्याचे, ओरडण्याचे आणि अराडण्याचे दिवस, रडण्याचे-चिडण्याचे दिवस. पण, हेच दिवस जर तुम्हाला तोंडबंद करून कसलीही हालचाल न करता, कुठेही बाहेर न जाता-येता, कुणाशीही न बोलता, एका छोट्याशा, जिथे पुरेसा उजेडही येत नाही अशा खोल डबऱ्यात काढावे लागले तर? तर, मात्र जीवनाकडे पाहण्याची तुमचा दृष्टीकोन निश्चितच काळवंडून गेला असता.

पण अशाही परिस्थितीतून तग धरून स्वतःच्याच नव्हे तर अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकणारे डॉ. फेलिक्स झांडमन यांची कहाणी तुम्हाला माहित आहे का? नसेल तर हा लेख नक्की वाचा.

थोर संशोधक, वैज्ञानिक आणि विशे या आंतरराष्ट्रीय कंपनीची स्थापना करणारे डॉ. फेलिक्स झांडमन यांचा जन्म १९२७ साली पोलंडमधील ग्रेनोडो येथे झाला. त्यांचे वडील रसायनशास्त्रातील संशोधक होते आणि त्यांची आई फ्रेडोविश या ज्युईश उद्योगपती घराण्यातील होती. ज्यांनी फेलिक्सच्या वडिलांना आपल्या कंपनीत नोकरी देऊन पुढे आपल्या कुटुंबात सामावून घेतले होते.

फेलिक्स पोलंडचे रहिवासी होते आणि ते ज्यू होते. बस्स! एवढ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्याला एक अत्यंत क्रूर वळण देऊन गेल्या.

फ्रेडोविश कुटुंबात घरकाम करणारे एक पोलिश जोडपे होते जॅन आणि जनोव्हा पुचाल्स्की. एके दिवशी दारूच्या नशेत जॅनने जिनोव्हाला मारहाण केली आणि तिला घरातून हाकलून दिले. त्या रात्री जीनोव्हा आसऱ्यासाठी फ्रेडोविश कुटुंबीयांकडे आली.



फेलिक्सच्या आजीने तिला आसराही दिला आणि तिची सुखरूप डिलिव्हरी होईपर्यंत त्यांच्या  दवाखान्यात तिची सारी सोय केली. कॅथोलिक जीनोव्हाच्या बाळंतपणाचा खर्चही फेलिक्सच्या कुटुंबीयांनीच केला.

दुसरे महायुद्ध सुरु होईपर्यंततरी सगळे काही ठीकठाक सुरु होते. नंतर १९३९ साली जर्मन आणि रशियाने पोलंडचे दोन हिस्से करून दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरवले. काही आठवड्यातच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले आणि नाझी सैन्य पोलंडमध्ये घुसले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

तेंव्हा फेलिक्स फक्त १२ वर्षांचे होते. नाझी सैनिक ज्यूंना पकडत होते, त्यांना गोळ्या घालत होते. हे फेलिक्सने स्वतः पाहिले.

त्यानंतर तर परिस्थिती आणखी बिघडत गेली. १९४१ मध्ये नाझींनी सर्व ज्यूंना एके ठिकाणी आणून कैद केले आणि त्यांना घेट्टोमध्ये बंदिस्त केले. या ठिकाणी अनेक कुटुंबे एकमेकांना खेटून राहत होती. अगदी दोन व्यक्तींमध्ये फक्त हातभार अंतर राहील इतकीच जागा होती. कोणालाही पुरेसे अन्न मिळत नव्हते. आजारी पडून आणि अशक्तपणा यामुळे अनेक ज्यू तर या कोंडवाड्यातच कोंडून मरून गेले.

१९४३ पासून तर नाझींनी ज्यू लोकांना जहाजातून जर्मनीत नेऊन त्यांना समूहाने मारून टाकण्याची योजना तयार केली होती. अशाप्रकारे हजारो नव्हे लाखो निरपराध ज्यूंना नाझी सैन्याने हालहाल करून मारून टाकले.

दुसऱ्या महायुद्धातील माणुसकीला लाजवणारी ही घटना नुसती ऐकली तरीही अनेकांच्या मनाचा थरकाप उडतो. पंधरा वर्षांचा फेलिक्स तेंव्हा गुलाम म्हणून घेट्टोच्या बाहेर राहून काम करत होता.

फेलिक्सने जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. जॅन आणि जीनोव्हा पुचाल्स्की यांच्या घराशिवाय त्यांना कुणाचाच आधार नव्हता. फेलिक्सला जर्मन सैन्यापासून लपवून घरात आश्रय देणे म्हणजे संपूर्ण घराला धोक्यात घालण्यासारखे होते. नाझींना जर यांचा शोध लागला तर ते सर्वांनाच एका रांगेत उभे करून गोळ्या घालतील. परंतु, फेलिक्सची आजी टेमा हिने केलेल्या उपकारांची जाणीव ठेऊन जीनोव्हाने फेलिक्सला आपल्या सोबत ठेवून घेतले.

ती फेलिक्सला म्हणाली, “तू आमच्या सोबतच राहा. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. देवाने तुला मझ्याकडे जणू एक भेट म्हणून पाठवलं आहे. आम्ही तुझी काळजी घेऊ. तुझं काही बरं वाईट झालं तर आमचंही होईल.”

फेलिक्स पाठोपाठ त्याचा मामा सेंडरही तिथे आला. त्याच्यासोबत आणखी एक ज्यू जोडपे होते. जीनोव्हाने त्यांनाही घरात ठेवून घेतले. नाझी सैन्याचे सैनिक त्यांना कधीही शोधत येतील हे माहित असल्याने सेंडरने स्वतःला, फेलिक्सला आणि त्या ज्यू जोडप्याला लपण्यासाठी घरात एक छोटा खंदक खणला. ज्यामुळे त्यांना शोधता येणार नाही. हा खंदक फक्त पाच फुट रुंद पाच फुट लांब आणि चार फुट खोल होता.

जणू काही एक छोटी कबरच परंतु त्यात राहणार होती ती जिवंत माणसे!

जवळपास १७ महिने हे चारही लोक त्या कबरीतच राहिले. इतके दिवस त्यांना अंघोळ नव्हती की बाहेरच्या खुल्या हवेचा स्पर्श नव्हता. डोक्यातील उवा आणि जमिनीत बीळ करून राहणार उंदीर यांचीच त्यांना सोबत होती.

आपले स्वतःचे कुटुंब आणि वरून ही चार माणसे यामुळे जीनोव्हाची परिस्थितीही अगदी घायकुतीला आली. जीनोव्हा कधीच एकाच दुकानातून खरेदी करत नसे. कुणालाही शंका येऊ नये म्हणून ती नेहमी वेगवेगळ्या दुकानात जाई. शिवाय तिची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती.

पुलचास्की परिवारातीलच मुलांना पुरेसे अन्न मिळत नव्हते. तिच्या घरात आश्रयाला आलेल्या त्या ज्यूंनी आपल्याकडील सगळे सोन्याचे दागिने जीनोव्हाच्या हवाली केले. पण तेही पुरेसे नव्हते. पूलचास्की कुटुंबातील लहानग्या मुलांसह प्रत्येक जण अगदी सुकून गेला होता.

जर्मन आणि त्यांची ती वासाडी कुत्री कधी माग काढत येतील याचा काही नेम नाही. त्यामुळे जीनोव्हाने घरातच खोदलेल्या त्या छोट्या कबरीवर एक मोठा काळा कागद अंथरला होता. परंतु जर्मनने रशिया विरुद्धचे युद्ध अगदी टोकला न्यायचे ठरवले त्यांनी पोलचास्की कुटुंबाला घर रिकामे करण्यास सांगितले.

नाईलाजाने पुलचास्की कुटुंब घर सोडून गेले आणि त्या घरात त्या कबरी खाली राहणाऱ्या माणसाना अन्न-पाणी मिळणेही बंद झाले. शेवटी एक दिवस त्या चारही लोकांनी त्या कबरीतून बाहेर येऊन थोड्या अंतरावर असणाऱ्या जंगलात जाऊन राहण्याचे ठरवले.

एके दिवशी ते चारही जण कबरीतून बाहेर पडले आणि जंगलाच्या दिशेने निघाले. इतक्यात त्यांना कुणीतरी आवाज दिला. एक जर्मन सैनिक त्यांच्याच दिशेने येत असल्याचे त्यांना दिसले आणि चौघांचाही जीव गर्भगळीत झाला.

तब्बल १७ महिने त्या नरकासारख्या कबरीत काढल्यानंतर अशक्त झालेले, खंगलेले, मळलेले शरीर आणि तशात साक्षात मूत्यू समोर उभा. त्या जर्मन सैन्याला त्यांनी काहीबाही कारण सांगून त्याच्यापासून सुटका करून घेतली.

या १७ महिन्यात एक चांगली गोष्ट झाली होती. फेलिक्सला त्याचा मामा सेंडरकडून उच्च पातळीवरचे गणित आणि भौतिकशास्त्र शिकायला मिळाले. त्याचा मामा इंजिनियर होता. याच गोष्टी त्याला पुढील आयुष्यात यशस्वी होण्यास उपयोगी पडल्या.

१९४५ साली मात्र फेलिक्सची जिद्द मोडून पडली. कारण, ज्यूंच्या कत्तलीत त्याचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. शिवाय, युद्धानंतर जे अराजक माजले होते त्यामुळे पुरेसे खाण्यापिण्याचीही सोय होत नव्हती. पोलंडमध्ये फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके ज्यू उरले होते. कॅथोलिक देशात मात्र त्यांना अजिबात स्थान नव्हते, कारण स्वतःच हे देश युद्धात बसलेल्या झळातून  सावरण्याचा प्रयत्न करत होते.

परंतु त्या कबरीत त्याला जे गणित आणि भौतिकशास्त्राचे शिक्षण मिळाले त्याच्या आधारावर त्याला पोलंडच्या इकोल पॉलीटेक्निकममध्ये प्रवेश घेता आला. त्याचा मामा सेंडर खाद्यपदार्थ, बंदुका, आणि इतर मौल्यवान वस्तूंचा काळाबाजार करून पैसे कमवू लागला आणि फेलिक्सच्या शिक्षणासाठी मदत करू लागला.

पोलंडमधील ज्युंचे हे हाल पाहून फ्रेंच ज्यूंनी ज्यू विद्यार्थ्यांसाठी ६० विझांची सोय करून दिली आणि त्यांना पॅरीस कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी दिली. फेलिक्स आणि इतर ज्यू विद्यार्थ्यांनी ते विझा घेतले आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत कायमचे पोलंड सोडले. फेलिक्स देखील आपल्या मामा सोबत निघाला.

शालेय शिक्षण घेतले नसतानाही फेलिक्सने प्रतिष्ठित सर्बोन्ने येथून भौतिकशास्त्रात पीएचडी पूर्ण केली. फ्रांसच्या टॉपच्या वैज्ञानिकांत त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. लवकरच त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. जिथे त्यांना शास्त्रज्ञ अजून चांगली प्रसिद्धी मिळाली.

इथेच त्यांनी विशे या मल्टीनॅशनल कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून केलेले अर्थार्जन ते अज्ञातपणे इतर लोकांच्या भल्यासाठी दान करून सोडत. कारण, लहानपणी त्यांच्या आजीने त्यांना शिकवले होते, आपण जे मिळवू ते कधीच आपले नसते, तर आपण जे इतरांना देऊ आणि जे पुण्याई आपल्या गाठीशी येईल फक्त तीच आपली असते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

किम जोंगच्या वडिलांनी चित्रपटांच्या छंदापायी चक्क एका अभिनेत्रीचं अपहरण केलं होतं

Next Post

लिरील, हमाम, पिअर्स, संतूर की लाईफबॉय, भारतीयांचं ऑल टाईम फेवरेट साबण कोणतं?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

लिरील, हमाम, पिअर्स, संतूर की लाईफबॉय, भारतीयांचं ऑल टाईम फेवरेट साबण कोणतं?

मोदींनी अयोध्येत पारिजातकाचे झाड का लावले? काय आहे त्याचे हिंदुधर्मातील महत्व?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.