The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा पठ्ठ्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही अ*णुबॉ*म्ब ह*ल्ल्यातून वाचलाय

by द पोस्टमन टीम
7 February 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण लहाणपणी सगळ्यांनीच वाचलेली असते. खूप कमी लोकांच्या आयुष्यात ही म्हण लागू होते. साध्या अपघातातून वाचलो तरीही आपल्याकडे ही म्हण सर्रास वापरली जाते. नशीब बलवत्तर असणेसुध्दा अशा वेळी महत्त्वाचे असते. कितीही नशीब बलवत्तर असले तरीही २ अ*णुबॉं*ब ह*ल्ल्यातून कोणी व्यक्ती वाचू शकेल यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे.

परंतु दोन अ*णुबॉं*ब ह*ल्ल्यातून वाचलेली व्यक्ती आहे- त्सुतोमु यामागूची.

१९४५ साली अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अ*णुबॉं*ब टाकले. यावेळी दोन्ही ठिकाणी मिळून २,६०,००० व्यक्तींना आपले प्राण वाचवण्यात यश आले.

परंतु दोन्ही अ*णुबॉं*ब ह*ल्ले अनुभवणारी आणि दोन्ही ह*ल्ल्यांतून आपले प्राण वाचवण्यात यशस्वी झालेली एकमेव व्यक्ती म्हणजे त्सुतोमु यामागूची.

२९ वर्ष वय असलेले, जपानी नौदलात अभियंता असलेले त्सुतोमु यामागूची हे १९४५ साली जपानच्या हिरोशिमा शहरात देशासाठी जहाज आणि तेलाच्या टाक्या बनवण्यात व्यस्त होते.



तीन महिन्यांचा आपला प्रकल्प पूर्ण करून ६ ऑगस्ट, १९४५ रोजी घरी आपली बायको ‘हिसाको’ आणि मुल ‘कात्सुतोशी’ यांना भेटण्यासाठी जाणार होते. जहाजावर शेवटची पाहणी करत असतानाच त्यांना वर आकाशात एक विमान दिसले. पॅरशुटमधून काहीतरी खाली फेकले गेले. खाली फेकली गेलेली ती वस्तू दुसरं-तिसरं काही नसुन अ*णुबॉं*ब होता.

बॉं*बचा हवेत स्फो*ट झाल्याने यामागूची यांनी जवळच्या पाण्यात उडी घेतली. ज्या हवाई विमानाने अ*णुबॉं*ब शहरावर टाकला होता त्याचे नाव होते ‘द इनोला गे’. त्सुतोमु यामागूची जिथे काम करत होते तिथून फक्त २ किमी अंतरावर हिरोशिमा शहराच्या मध्यभागी अ*णुबॉं*ब टाकण्यात आला होता. या स्फो*टात यामागूची हवेत उडाले आणि लांब फेकले गेले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे होता तो फक्त अंधकार. सगळ्या शहरात धुराचे लोळ उडत होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

“काय झाले याची मला काहीच कल्पना नव्हती. थोडा वेळ मी बेशुध्द होतो. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा फक्त अंधार दिसत होता. सिनेमाच्या सुरुवातीला जसा अंधार दाखवला जातो अगदी तसाच. सकाळचा सूर्यसुध्दा झाकोळला गेला होता.” असे ते ‘द टाइम्स’ या ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.

स्फो*टाने त्यांच्या डोळ्यांना कसलीही हानी झाली नाही. काही वेळ हवेत असणाऱ्या धुराच्या साम्राज्याकडे बघून त्यांच्या डोळ्यांसमोर पुर्णपणे अंध:कार दिसत होता. तसेच त्यांचा हात आणि कान मोठ्या प्रमाणात जळले होते.

स्फोटात जवळ जवळ ८०,००० लोकांचा बळी गेला होता. कसे बसे वाचल्यानंतर तिथे असलेल्या बाकी लोकांच्या चर्चेतुन त्सुतोमु यामागूची यांना कळाले की रेल्वे यंत्रणा कशी बशी का असेना पण चालू आहे. तिथेच त्यांना त्यांचे साथीदार, ‘अकिरा इवान्गा’ आणि ‘कूनीयोशी सातो’ भेटले.

रेल्वे स्थानक सुरु असल्याची बातमी कळताच जीवाची बाजी लावत ते रेल्वे स्थानकावर पोहचण्यासाठी निघाले. जखमी अवस्थेत असताना, आसपासच्या इमारती एकापाठोपाठ एक ढासळत असताना, त्यांनी मृतदेहांनी भरलेली नदी पार केली. गर्दीने गच्च भरलेल्या स्थानकात त्यांनी घरी जाण्यासाठी रेल्वे पकडली आणि शेवटी ते घराबाहेर येऊन पोहचले.

त्सुतोमु यामागूची यांच्या गावाचे नाव होते नागासाकी. घरी पोहचल्यावर त्यांच्या बायको आणि मुलगी दोघींनीही त्यांना ओळखण्यास नकार दिला. आपले पती तर हिरोशिमामध्ये आहेत असे त्यांची पत्नी म्हणत होती.

जखमी अवस्थेतील त्सुतोमु यामागूची यांना बघून तर हे त्यांचं भूत तर नाही ना असे त्यांची आई विचारत होती. शेवटी वैद्यकीय मदत घेतल्यानंतर, जखमांची साफसफाई केल्यानंतर त्यांना आराम करण्यास सांगण्यात आले.

दुसऱ्याच दिवशी त्सुतोमु यामागूची आपल्या कामासाठी कंपनीच्या नागासाकीच्या कार्यालयात हजर झाले. कामावर जाताच त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना घडलेल्या घटनेची माहिती सांगण्यासाठी बोलावून घेतले. सगळी घटना सांगितल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तिळमात्रही विश्वास ठेवला नाही. एका अ*णुबॉं*बने एवढे मोठे नुकसान होऊ शकते यावर त्यांचा विश्वासच नव्हता.

स्फो*टाच्या १६ तासानंतर अमेरिकन राष्ट्रपती हॅरी ट्रूमैन यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदा अ*णुबॉं*बचा उल्लेख केला. या अ*णुबॉं*बला ‘लिटल बॉय’ असे नाव देण्यात आले. याच भाषणात त्यांनी जपानला माघार घेण्यास सांगितले आणि माघार न घेतल्यास हवाई मार्गाने असाच ह*ल्ला परत करण्याची धमकी दिली.

अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतानाच आकाशात अजुन एक स्फो*ट झाला. इमारत पूर्णपणे ढासळली. त्सुतोमु यामागूची यांनी कालच केलेली मलमपट्टी या स्फो*टाच्या आवाजाने निघून गेली.

नागासाकीमध्ये टाकलेला अ*णुबॉं*ब अधिक शक्तीशाली होता. अशावेळी घरच्यांच्या काळजीपोटी ते लगेच घरी पळाले. पडलेल्या घरांचे अवशेष आणि मृतदेह ओलांडत त्यांनी घर गाठले. घराजवळ जाताच घर जमीनदोस्त झालेले बघुन त्यांचा धीर खचला. परंतु थोड्याच वेळात त्यांना कळाले की त्यांच्या कुटूंबियांनी एका बोगद्यात आश्रय घेतला आहे.

दुसऱ्या महायु*ध्दातील या जगाला हादरवुन सोडणारया या दोन्ही अ*णुबॉं*ब ह*ल्ल्यात वाचणारे त्सुतोमु यामागूची एकुलते एक व्यक्ती असले तरी त्यावेळी १६५ लोकांनी हा भयानक अनुभव अनुभवला होता.

विकरणांचा प्रभाव त्यांच्या शरीरावर जाणवण्यास आता सुरुवात झाली होती. केसगळती सुरु झाली. हाताला झालेल्या जखमांनी होणारा त्रास वाढतच होता, तसेच सारख्या उलट्या व्हायला सुरुवात झाली होती. ते अजुनही बॉं*ब ह*ल्ल्यातून वाचलेल्या लोकांसाठी असलेल्या सरकारी निवाऱ्यातच थांबले होते.

१५ ऑगस्ट, १९४५ रोजी जपानचा सम्राट ‘हिरोहिटो’ याने शरणागती पत्करली.

“मला त्याबद्दल काहीच वाटले नाही. मी खुशही नव्हतो आणि दु:खीही नाही” असे त्सुतोमु यामागूची या निर्णयाबद्दल बोलताना सांगतात.

हळुहळु विकरणांचा प्रभाव कमी झाला आणि त्सुतोमु यामागूची यांनी एक सामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात केली. शाळेत शिक्षक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर परत ते आपल्या जहाज निर्मितीच्या कामाला लागले. त्यांना आणखी दोन मुलीसुध्दा झाल्या.

हिरोशिमा आणि नागासाकीच्या जखमा भरुन काढण्यासाठी त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली.

२०००पर्यंत आपले वैयक्तिक अनुभव सांगण्यास ते टाळाटाळ करत असत. नंतर २००६ मध्ये न्यूयॉर्कला जाउन त्यांनी आण्विक शस्त्रांच्या विरोधात भाषण दिले. “स्वतः आण्विक शस्त्रांचा परिणाम अनुभव असल्यामुळे मला त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे”, असे ते त्यांच्या भाषणात बोलले.

२००९ मध्ये जपानी सरकारने त्यांना “निज्जायू हिबाकुशा” म्हणजेच ” दोनदा बॉं*ब अनुभवलेला व्यक्ती” असा आगळावेगळा किताब दिला.

एवढ्या मोठ्या ह*ल्ल्यातून वाचलेले त्सुतोमु यामागूची हे २०१० पर्यंत जिवंत होते. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आण्विक शक्तीच्या विरोधात चळवळ लढली. स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवलेल्या या भयानक मानवी कृतीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आण्विक शास्त्रांच्या विरोधातील या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भटकंती : डोंगरदऱ्यांत लपलेलं जर्षेश्वराचं मंदिर

Next Post

या वकिलाने गेली ४० वर्षे सगळे खटले संस्कृतमधूनच लढवले आहेत

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

या वकिलाने गेली ४० वर्षे सगळे खटले संस्कृतमधूनच लढवले आहेत

शिंग असलेल्या टकल्या शैतानाने हा टीव्ही घराघरात पोहोचवला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.