The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्तमानपत्रातल्या खोट्या बातमीमुळे अमेरिका आणि स्पेनमध्ये यु*द्ध झालं होतं

by द पोस्टमन टीम
7 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगातील सर्व देशांमध्ये माध्यमांचं एक महत्त्वाचं स्थान आहे. समाजात घडणाऱ्या घटनांची माहिती देण्याबरोबरच आपल्या लेखणीतून समाजमनावर माध्यमं प्रभाव टाकत असतात. पत्रकारितेच्या चष्मातून सरकारवर माध्यमं नजर ठेवून असतात. मात्र, या पेशाच्या मूलभूत मूल्यांचे विसर्जन करून चटपटीत मसाला हेडलाईन्स जेव्हा दोन देशांमध्ये तणाव निर्माण करतात तेव्हा हा प्रकार फार गंभीर होऊन बसतो. ‘यलो जर्नलिझम’ असं या प्रकाराचं नाव.

१८९८ साली ‘युएसएस मैने’ ही अमेरिकेची यु*द्धनौका क्युबामध्ये बुडाली. हे प्रकरण उचलून धरताना माध्यमांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या. ‘मैनेला कुणी उद्ध्व*स्त केलं? सांगणाऱ्यास ५० हजार डॉलर्सचं बक्षिस’, ‘स्पॅनिश विश्वासघात’, ‘आक्र*मण’, अशा हेडलाईन्स ठोस पुरावा नसताना माध्यमांमध्ये झळकल्या.

या यलो जर्नलिझममुळे पुढे अमेरिका आणि स्पेनमध्ये यु*द्धाची ठिणगी पडली.

एका मोठ्या स्फो*टात क्युबाच्या हवाना बंदरात उभ्या असलेल्या अमेरिकेच्या युएसएस मैने या यु*द्धनौकेला १५ फेब्रुवारी १८९८ साली जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत २६० अमेरिकेन सैनिकांचा मृत्यू झाला. या यु*द्धनौकेचं वजन तब्बल ६ हजार टन होतं. त्याच्या निर्मितीसाठी २० लाख डॉलर्सचा खर्च आला होता.

क्यूबाध्ये स्पॅनिश राजवटीविरोधात बंड सुरु झाल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या रक्षणासाठी ही यु*द्धनौका तैनात करण्यात आली होती. स्पेनवर थेट आरोप न करता ही यु*द्धनौका एका स्फो*टामुळे बुडाल्याचं पुढे अमेरिकेच्या नेव्हल कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र, तत्कालीन काँग्रेस आणि अमेरिकन नागरिकांना या स्फो*टात स्पेनचा सहभाग असल्याचा दाट संशय होता.



हे प्रकरण सांभाळण्यात राज्यकर्त्यांना आलेलं अपयश, क्युबातील नागरिकांवर स्पेनकडून वाढते अत्या*चार, क्युबातील गुंतवणुकीत अमेरिकेला झालेलं मोठं नुकसान या सर्व घटनांची परिणीती पुढे १८९८ साली अमेरिका-स्पेन यु*द्धात झाली.

३ महिने चाललेल्या या यु*द्धात स्पेनचा पराभव झाला. १२ डिसेंबर १८९८ रोजी पॅरिस तहानुसार अमेरिका आणि स्पेनमधील यु*द्ध औपचारिकरित्या संपलं. या तहानुसार पोर्तो रिको हा स्पॅनिश सागरी प्रदेश, ग्वाम आणि फिलीपीन्सवर अमेरिकेचं वर्चस्व निर्माण झालं.

१९व्या शतकाच्या शेवटी अमेरिकेन माध्यमांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. त्या काळात टॅबलॉईडचं चलन असल्यानं हेडलाईनचं फार महत्त्व होतं. जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ आणि विलियम रँन्डोल्फ हर्स्ट यांचं ‘न्यूयॉर्क जर्नल’ या दोन वृत्तपत्रांच्या स्पर्धेतून यलो जर्नलिझमचा उदय झाला. १८९५ साली पुलित्झर यांनी त्यांच्या वृत्तपत्रात पिवळ्या रंगाचं नाईट शर्ट घातलेल्या मुलाचा फोटा छापला आणि त्याला कॅप्शन दिलं ‘यलो कीड’. या कार्टूनला हर्स्ट यांनी त्यांच्या वृत्तपत्रात ‘यलो कीड जर्नलिझम’ म्हणत प्रत्यूत्तर दिलं. पुढे हा शब्द ‘यलो जर्नलिझम’ नावाने पुढे आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

पुलित्झर आणि हर्स्ट या दोघांनीही त्यांच्या वृत्तपत्रांमार्फत क्युबाचं स्वातंत्र्ययु*द्ध मोठ्या प्रमाणात लावून धरलं. क्युबावर असलेली स्पॅनिश जुलमी राजवट आणि या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांवर अनेक लेख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. या संघर्षाविषयी काही खोट्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्याचं नंतर उघडकीस आलं.

यु*द्धनौकेत स्फो*ट झाल्यानं ती बुडाल्याचं स्थानिक प्रशासनानं आपल्या अहवालात स्पष्ट केलं होतं. मात्र, ही नौका षडयंत्र करुन बुडवण्यात आल्याच्या खोट्या बातम्या हर्स्ट आणि पुलित्झर आपल्या वृत्तपत्रांमध्ये वारंवार छापत राहिले. अशा खोट्या बातम्यांमुळे या वृत्तपत्रांचा खप वाढत होता. पण त्याच बरोबर स्पॅनिश लोकांविरोधात अमेरिकन नागरिकांच्या मनात चीडदेखील वाढत होती.

अमेरिका आणि स्पेनमध्ये झालेल्या यु*द्धाची अनेक कारणं होती. मात्र, जनतेची दिशाभूल करणाऱ्या या पत्रकारितेमुळे हा संघर्ष आणखी तीव्र होत गेला. काल्पनिक कथा, सनसनाटी हेडलाईन्स देऊन पुलित्झर आणि हर्स्ट या अमेरिकेच्या दोन्ही पत्रकारांनी आपआपला व्यावसायिक स्वार्थ साधला. यासाठी पत्रकारितेची नितीमूल्य पायदळी तुडवली गेली.

क्युबातून येणाऱ्या बातम्यांना चुकीच्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळाल्यानं अमेरिकन नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. या सर्व घटनाक्रमात पुलित्झर आणि हर्स्ट यांच्या वृत्तपत्रांचा नफा नवनवा टप्पा गाठत होता. अमेरिकेच्या इतिहासातला हा किस्सा “पत्रकारिता कशी करु नये”, याचं उदाहरण आहे.

जोसेफ पुलित्झर न्यूयॉर्क वर्ल्डचे संपादक म्हणूनच नव्हे तर अमेरिकेच्या डेमोक्रॅटीक पक्षाचे मोठे नेतेही होते. सैन्यात दाखल होण्याचं स्वप्न पाहणारे जोसेफ पत्रकारितेकडे कसे वळले याची कहाणीही फार वेगळी आहे. ग्रंथालयाच्या एका खोलीत जर्मन वृत्तपत्राचे संपादक चेस खेळत होते. त्यांच्या खेळाकडे जोसेफ बारकाईनं नजर ठेवून होते. हे बघत असताना प्यादांच्या चालीवर ते टीका करत होते. त्यांचं हे निरीक्षण आणि संवाद कौशल्य पाहून त्यांना या चेसरुममध्येच पत्रकारितेतली पहिली जॉब ऑफर मिळाली. या खोलीतून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासानं पुढे मोठा पल्ला गाठला. त्यांच्या नावानं दिला जाणाऱ्या ‘पुलित्झर’ पुरस्काराला पत्रकारितेत मोठा मान आहे. अमेरिकेत वृत्तपत्रं, मासिकं, ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य, संगीत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो.

पत्रकारांनी प्रवाहात वाहून न जाता निर्भिडपणे सत्य जगासमोर मांडलं पाहिजे. राजकारण, समाजातील घडामोडींवर तटस्थ राहून भाष्य करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यांनी समाजाला डोळस करावं. मात्र, सध्याच्या काळात पत्रकारांची राजकीय भूमिका चिंतेचा विषय आहे. पत्रकारिता मनोरंजनाचं साधन नाही.

राजकारण करणंही पत्रकाराचं काम नाही. तथ्यांच्या आधारावर सरकारला सत्याचा आरसा दाखवण्याचं काम पत्रकारांचं आहे. सरकारच्या दबावापुढे झुकून किंवा काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी पत्रकारितेच्या नीतीमूल्यांशी बेईमानी केली जात असल्याचं अनेकदा पुढं आलं आहे. मात्र, आजही काही पत्रकार आपला निष्पक्ष बाणा टिकवून आहे. अशा लोकांमुळेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अजूनतरी तडा गेला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

महासत्ता असलेल्या ब्रिटनला अफगाणिस्तानातून पळता भुई थोडी झाली होती

Next Post

या बालकलाकाराला त्याच्या आईनेच करोडो डॉलर्सचा चुना लावला होता..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या बालकलाकाराला त्याच्या आईनेच करोडो डॉलर्सचा चुना लावला होता..!

सर्वांना छळणारा गणितातला X नेमका कुठून आला..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.