The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन देशांना जेरीस आणणारी सौंदर्यवती; जिच्यामुळे ५० हजारांहून अधिक सैनिकांचा जीव गेला..

by द पोस्टमन टीम
12 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आपण आतापर्यंत अनेक गुप्तहेरांबाबत ऐकत आलो आहोत. मग ते जेम्स बॉंडप्रमाणे काल्पनिक गुप्तहेर असो, वा ‘रॉ’ किंवा एफबीआयसारख्या संस्थांसाठी काम करणारे खरे गुप्तहेर असोत. जगाच्या पाठीवर असे कित्येक गुप्तहेर झाले आहेत, जे मरतानाही आपल्याकडील गुपितं सोबत घेऊन गेले. अर्थात, त्यामुळेच ते आज महान गुप्तहेर म्हटले जातात. आज आपण अशाच एका गुप्तहेराबाबत वाचणार आहोत, जी जगातील प्रसिद्ध नृत्यांगणाही होती. तिच्या कार्यक्रमांना बरेच मोठ्या हुद्द्यांवरचे लोक उपस्थित रहायचे. या मोठमोठ्या लोकांकडून अलगदपणे गुपितं काढून घेण्याची कला तिला चांगलीच जमत होती.

तिचं एकूणच आयुष्य एवढं रंजक राहिलं, की त्यावर आतापर्यंत पाच सिनेमे, काही डॉक्युमेंटरीज, पाच गाणी आणि एक टीव्ही सीरीजही तयार करण्यात आलीये. कोण होती ती? आणि एवढं काय खास होतं तिचं आयुष्य?

मार्गारेट गीरट्रुईदा मॅक्लीऑड झेल्ले असं या महिलेचं नाव होतं. तिच्या घरचे तिला ‘मग्रेट’ म्हणत. मात्र, संपूर्ण जग तिला आणखी वेगळ्या नावाने ओळखत होतं. तिचं स्टेजवरचं नाव – माता हारी! 

१८७६ साली नेदरलँडमध्ये तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचा बिझनेस आणि तेल कंपन्यांमधील शेअर्स यामुळे तिचं बालपण बऱ्यापैकी श्रीमंतीत गेलं. मात्र, १८८९ साली तिचे वडील अ‌ॅडम झेल्ले कर्जबाजारी झाले. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षांमध्ये तिच्या आईचाही मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे तिला आपले गॉडफादर विस्सेर यांच्याकडे रहायला जावं लागलं. त्यानंतर तिने एका अंगणवाडीमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. मात्र, तिथल्या मुख्याध्यापकच तिच्यासोबत फ्लर्ट करु लागल्यामुळे तिला ती नोकरी सोडावी लागली.

लहानपणापासून ऐशोआरामात रहायची सवय लागलेल्या झेल्लेने वयाच्या १८व्या वर्षीच आपल्याहून दुप्पट वय असणाऱ्या रुडॉल्फ या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न केलं. तिचं स्वप्न होतं की ती संपूर्ण जग फिरेल, आणि त्यासाठी तिला अशाच पैसेवाल्या माणसाशी लग्न करणं भाग होतं. या लग्नामुळे तिची ऐशोआरामाची इच्छा पूर्ण झाली. मात्र, रुडॉल्फच्या वागण्यामुळे तिचं जगणं कठीण झालं होतं. कारण, रुडॉल्फ श्रीमंत तर होताच पण दारुडा आणि अय्याशही होता. तो मार्गारेटला दररोज मारहाण करत. एवढंच नाही तर त्याने घरीच एक बाईही आणून ठेवली होती.



त्याच्या सगळ्या त्रासाला कंटाळून शेवटी झेल्लेने त्याला सोडून दिलं, आणि दुसऱ्या एका डच अधिकाऱ्यासोबत राहू लागली. त्यानंतर तिने काही महिने इंडोनेशियन संस्कृतीचा अभ्यास केला, आणि १८९७ साली एका स्थानिक नृत्यसंस्थेमध्ये ती दाखल झाली. याठिकाणीच तिला ‘माता हारी’ हे नाव मिळालं.

१९०३ साली झेल्ले पॅरिसमध्ये दाखल झाली. याठिकाणी तिने ‘लेडी मॅक्लीऑड’ या नावाने सर्कस हॉर्स रायडर म्हणून काम केलं. पुढे दोन वर्षांमध्ये एक एक्झॉटिक डान्सर म्हणून तिने पॅरिसमध्ये चांगलंच नाव कमावलं. १३ मार्च १९०५ रोजी म्यूसे ग्वेमेट याठिकाणी झालेल्या डान्स परफॉर्मन्सने तर तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. माता हरीचं सौंदर्य, तिचं नृत्यकौशल्य, आकर्षक शरीर आणि त्याचं प्रदर्शन करण्याचा कॉन्फिडन्स या बळावर ती प्रसिद्ध होत होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

तिच्या कार्यक्रमांमधील खास आकर्षण म्हणजे, कित्येक वेळा ती डान्स करता करता आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून टाकत असे. सुरुवातीला कित्येक कार्यक्रमांमध्ये ती स्किन कलरचे स्टॉकिंग्स (बॉडी सूट) वापरत होती. मात्र, नंतर तिने तेही वापरणं बंद केलं. अनेक उच्चपदस्थ व्यक्ती तिच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत.

तिला एकदा हात लावायला मिळाला तरी स्वर्ग प्राप्त झाला, असं लोकांमध्ये म्हटलं जायचं. कित्येक बडे अधिकारी तिच्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी म्हणेल ती रक्कम मोजण्यासाठी तयार होते – आणि माता हारीलाही तेच तर हवं होतं!

या सगळ्यातच तिची ओळख कॅप्टन ‘वादिम मास्लोव्ह’सोबत झाली. तो २३ वर्षांचा पायलट होता, जो यु*द्धामध्ये फ्रान्ससोबत असणाऱ्या रशियाच्या आर्मीमध्ये होता. या दोघांमधील जवळीक चांगलीच वाढली होती. आपलं त्याच्यावर प्रेम असल्याचंही माता हारीने सांगितलं होतं. मात्र, १९१६ साली यु*द्धात वादिमला जबरदस्त मार बसला, ज्यामुळे त्याची दृष्टी गेली. यावेळी दवाखान्यात दाखल असलेल्या वादिमला भेटण्यासाठी माता हारीने प्रयत्न केले. या यु*द्धामध्ये नेदरलँड तटस्थ असल्यामुळे तिला एका देशातून दुसऱ्या देशात जाणे कठीण नव्हतं. मात्र, तटस्थ देशाची नागरिक असल्यामुळेच तिला यु*द्धभूमीजवळ जाण्यापासून अडवण्यात आलं.

पण, आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. इथंच फ्रान्सच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी केवळ एका अटीवर तिला वादिमला भेटण्याची परवानगी दिली; ती म्हणजे फ्रान्ससाठी जर्मनीची हेरगिरी!

यानंतर सुरू झालं माता हारीच्या आयुष्यातलं एक नवं पर्व. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी माता हारीचं पूर्ण बॅकग्रांऊंड तपासलं. यामध्ये त्यांना समजलं, की महायु*द्ध सुरू होण्यापूर्वी माता हारीने जर्मनीचा युवराज विल्हेमसमोर कितीतरी वेळा आपला कार्यक्रम सादर केला होता. जर्मनीचा तेव्हाचा शासक विल्हेम दुसरा याचा हा मोठा मुलगा. हा युवराज माता हारीचा चाहता असल्यामुळे, तिच्या मदतीने त्याला जाळ्यात अडकवायचं आणि जर्मनीची गुप्त माहिती मिळवायची अशी योजना फ्रान्सने रचली. यासाठी माता हारीला दहा लाख फ्रँक (फ्रेंच चलन) देण्यात येणार होते. एवढी मोठी रक्कम तिची सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे तिनेही आपलं काम चोखपणे सुरू ठेवलं.

युवराज विल्हेमपर्यंत पोहोचण्यासाठी तिला कित्येक अधिकाऱ्यांना खुश करत पुढे जावं लागलं. १९१६ साली ती हेरगिरीच्या कामासाठीच माद्रिदला गेली. याठिकाणी जर्मन लष्करी अधिकारी मेजर अर्नाल्ड याला तिने युवराजाची भेट घालून देण्याची विनंती केली. याबदल्यात तिनं चक्क फ्रान्सची माहिती जर्मनीला देण्याचं वचन दिलं. आता हे तिनं युवराजापर्यंत पोहोचण्यासाठी केलं, की पैशांसाठी हे आजपर्यंत एक गुपितच आहे.

काही काळानंतर मोठमोठ्या अधिकाऱ्यांमध्ये उठ-बस असणारी ही नृत्यांगणा नेमकी कोणत्या देशासाठी हेरगिरी करत आहे, हेच कळणं अवघड झालं होतं. ती फ्रान्सला जर्मनीची गुप्त माहिती तर देत होतीच, मात्र जर्मनीच्या अधिकाऱ्यांनाही ती फ्रान्सची गुप्त माहिती देत होती असं बोललं जातं.

जानेवारी १९१७ मध्ये जर्मन मेजर अर्नाल्डने बर्लिनला एक रेडिओ मेसेज पाठवला होता.

यात त्यानं म्हटलं होतं, की एच-२१ नावाची एक जर्मन हेर आपल्याला फ्रान्सची माहिती पुरवून मोठी मदत करत आहे. यामध्ये त्याने या गुप्तहेराचं केलेलं वर्णन माता हारीशी जुळणारं होतं. तिच्या दुर्दैवाने बर्लिनला पाठवलेला हा संदेश फ्रान्स सैन्यालाही मिळाला. 

त्यातील वर्णनावरुन त्यांना समजलं, की तो माता हारीबद्दल बोलतोय. यानंतर फेब्रुवारीमध्येच तिला पॅरिसच्या एका हॉटेलातून अटक करण्यात आली. इथे ऑक्टोबरपर्यंत तिच्यावर खटला चालला. यादरम्यान तिने कित्येक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न केला, की आपण फ्रान्ससोबतच आहोत. तिने एका जर्मन अधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याचे कबूल केले. मात्र, जर्मन अधिकाऱ्यांकडून माहिती काढून घेण्यासाठीच आपण हे केल्याचं ती सांगत होती. मात्र, संपूर्ण चौकशी समिती जणू तिला जर्मनीचा हेर ठरवून मोकळीच झाली होती.

आपल्याला एक वेश्या म्हटलं तरी चालेल, मात्र आपण गद्दार नाही असं तिचं म्हणणं होतं. संपूर्ण फ्रेंच सैन्य तिच्याविरोधात असतानाही ती खंबीरपणे सगळ्याला तोंड देत होती. मात्र, तिचा प्रियकर वादिमनेही तिच्या बाजूने बोलण्यास नकार दिल्यावर ती कोसळलीच. 

तिने जर्मनीला माहिती पुरवल्यामुळे फ्रान्सच्या ५० हजार सैनिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्यावर होता. याला शिक्षा अर्थातच मृत्यूदंड होती. १५ ऑक्टोबर १९१७ रोजी पहाटे तिला शिक्षा देण्यात आली. १२ फ्रेंच सैनिकांच्या एका पथकाने तिच्यावर गोळ्या झाडल्या. अशा प्रकारची शिक्षा देताना आरोपी पळून जाऊ नये म्हणून त्याला बांधलं जातं. तसेच त्याचे डोळेही बांधण्यात येत असत. मात्र, माता हारीने या दोन्ही गोष्टींसाठी नकार दिला.

या दिवशी तिने एखाद्या समारंभाच्या दिवशी वापरायचा उंची पोषाख, आणि पांढरे हातमोजे परिधान केले होते. एवढंच नाही, तर तिच्यावर गोळी झाडण्याच्या तयारीत असलेल्या सैनिकांना तिने चक्क ‘फ्लाईंग किस’ही दिला. मृत्यूपश्चात नेदरलँडच्या संग्रहालयात तिच्यासाठी एक स्वतंत्र रुम तयार करण्यात आली आहे. ज्यात तिच्या दोन खासगी डायऱ्या, आणि एक ओरिएंटल रग ठेवण्यात आली आहे.

तिच्या मृत्यूनंतरही ती फ्रान्ससाठी काम करत होती, की जर्मनीसाठी हे कोणीही निश्चितपणे सांगू शकले नाही. कित्येकांच्या मते ती खरोखरच जर्मनीसाठी काम करत होती. मात्र, कित्येक लोकांना असं वाटतं, की फ्रान्स सरकारने आपल्या सैनिकांच्या मृत्यूचे खापर कुणावर तरी फोडायचं म्हणून तिला समोर केलं होतं. यातच असंही म्हटलं जातं, की जर्मनीने मुद्दाम आपल्या संदेशामध्ये हेर म्हणून तिचं वर्णन केलं; कारण त्यांना अपेक्षित माहितीऐवजी दुसरीच माहिती ती देत असल्यामुळे त्यांना तिचा संशय आणि कंटाळाही आला होता. यातलं काहीही खरं असलं, तरी एक गोष्ट मात्र नक्की, की आयुष्यभर ऐटीत आणि बेफिकीरपणे जगलेली माता हारी मृत्यूलाही तितक्याच मोकळेपणाने आणि निडरपणे सामोरी गेली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ज्या स्पर्धेत लहान दिसतो म्हणून प्रवेश नाकारला तिथेच गामा पैलवानाने सगळ्यांना अस्मान दाखवलं

Next Post

पद्मावतीसाठी राडा करणाऱ्या खिलजीचा खरा जीव तर मलिक काफूरवरच होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पद्मावतीसाठी राडा करणाऱ्या खिलजीचा खरा जीव तर मलिक काफूरवरच होता

करोडो डॉलर्स खर्चून उभारलेल्या दुबईतील ‘पाम आयलंड्स’चा प्रोजेक्ट का बारगळला..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.