The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चुकून क्रिस्टल मेथच्या ३० गोळ्या खाल्ल्या आणि हा सैनिक न थांबता ४०० किलोमीटर धावला

by द पोस्टमन टीम
28 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सुपरफास्ट वेगाने पळणारे, एका इमारतीवरून थेट दुसऱ्या इमारतीवर उडी मारणारे, शत्रूचे घाव झेलूनही त्यांना नामोहरम करणारे, सुपरहिरो आपण अनेक चित्रपटात पहिले आहे. पण, एक खराखुरा सुपरहिरो दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात होऊन गेला हे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

सोव्हिएत आणि जर्मन यांच्या कचाट्यात सापडलेल्या फिनलँडच्या सैनिकाची ही गोष्ट जर तुम्ही वाचलीत तर तुमचाही या सुपरहीरोवर विश्वास बसेल.

सकाळचे सुमारे दहा वाजले असतील. सैनिकांची तुकडी कडाक्याच्या थंडीत बर्फातून वाट काढत चालत होती. गेले दोन दिवस ते न थांबता असेच चालत होते. दोन दिवस त्यांना झोप नव्हती, की अन्नपाणी. सर्वजण अक्षरश: पार थकून गेले होते. तापमान १५ डिग्रीच्या खाली होते.

शेवटी सर्वजण थोडी विश्रांती घ्यावी आणि काहीतरी खाऊन पिऊन घ्यायचे म्हणून तंबू ठोकण्याची तयारी करत असतात. या सगळ्यामध्ये सत्तावीस वर्षांचा ऐमू देखील होता. त्याने चहासाठी भांड्यात बर्फ वितळवला होता, इतक्यात त्यांच्यावर फायरिंग सुरु झाली. रशियन सैन्यानी त्यांच्यावर ह*ल्ला केला होता. भांड्यातील पाणी धड उकळलेही नव्हते आणि तिकडून गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. सैनिकांनी पुन्हा आपल्या स्कीज चढवल्या आणि ते बर्फातून वाट काढत दूर कुठे तरी जंगलात लपता येते का ते पाहू लागले.



रशियन सैन्याच्या गो*ळीबाराला प्रत्युत्तर देत हे फिनलँडचे सैनिक कुठेतरी लपण्यासाठी जागा शोधत असतात. कारण गेले दोन दिवस कुणाच्याच पोटात अन्न गेले नव्हते आणि रशियन सैन्य काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हते.

शिवाय, त्यांच्याकडे अत्याधुनिक ह*त्यारांनी त्यांना आणखीनच बळ पुरवले होते. त्यांची संख्याही दुप्पट होती.

फिनलँड आणि रशियाचे हे यु*द्ध मुळात का जुंपले याची आधी करणे जाणून घेऊया.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९३९ सालीच सोव्हिएत युनियनने या युद्धाला सुरुवात केली होती. त्यांना फिनलँडसारख्या छोट्या देशावर कब्जा करायचा होता. १९४० मधे सोव्हिएतने फिनलँडवर दबाव आणला आणि त्यांना शांतता करार करण्यास भाग पाडले. बलाढ्य आणि आधुनिक ह*त्यारांनी सज्ज अशा रशियन फौजेसमोर फिनलँडचा निभाव लागणार नाही हे लक्षात आल्याने फिनलँडने या करारावर सह्या केल्या. या करारानुसार त्यांना फिनलँडचा १०% भूभाग रशियाला द्यावा लागला. अत्यंत नाखुशीनेच त्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

त्यानंतर एक वर्षांनी फिनलँड आणि जर्मनीची युती झाली. हि*टल*र आणि स्टालिन यांच्यातील बेबनावाचा फायदा घेऊन आपला भूभाग परत मिळवायचा फिनलँडचा मनसुबा होता. म्हणून त्यांनी हि*टल*रशी हातमिळवणी केली. फिनलँडचा भूभाग त्यांना परत मिळेपर्यंत त्यांनी जर्मन सैन्याला मदत करण्याचे वचन दिले.

१९४४ साली जर्मनीचा पाडाव होत होता. रशिया जर्मनीवर भारी पडत होता. यामुळे फिनलँडवर रशियाला पुन्हा ह*ल्ला करण्याची संधी मिळाली.

फिनिश सीमेवर रशियन आणि फिनिश सैन्य एकमेकांना भिडले होते. मात्र गलितगात्र झालेल्या फिनिश सैन्यात लढण्याची उर्मी राहिली नव्हती. रशियाचे सैन्य पाठलाग करत होते. त्यांचा मारा चुकवायचा तर वेगाने निसटणे गरजेचे होते. ऐमो आपला स्काय ट्रॅक बर्फातून वेगाने पुढे काढण्याचा प्रयत्न करत होता. पण तेही जमत नव्हते.  तो कुठल्याही क्षणी खाली कोसळेल की काय असे वाटल्याने त्याच्या सोबतच्या एका सैनिकाने त्याला सुनावले, “ऐमो झोपेवर नियंत्रण मिळव. आपण शत्रूच्या टप्प्यात आहोत. इथे थकून जाऊन चालणार नाही.”

ऐमोने आपला एका हातोपा वर केला. त्यामध्ये परव्हीटीनच्या गोळ्यांच्या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या. हे एक असे औषध होते ज्यामुळे झोप येत नाही आणि माणूस नेहमी सतर्क राहतो. जर्मन सैन्याला नेहमी या गोळ्या पुरवल्या जात. फिनिश सैन्यासाठीही या गोळ्यांचा वापर केला जात होता.

ऐमोकडे तर या गोळ्यांची अख्खी एक बाटलीच होती. त्यात तीस गोळ्या होत्या. खरे तर एकावेळी एका सैनिकासाठी एक गोळी पुरेशी होती. ऐमोने त्यातील एक गोळी काढण्याचा प्रयत्न केला पण, अख्खी बाटलीच त्याच्या हातात पालथी झाली.

आधीच झोपेने डोळे पेंगुळलेले, त्यात मागे रशियन सैन्य लागलेले. घाईघाईत त्याने त्या तीसच्या तीस गोळ्या तोंडात टाकल्या आणि तो पुढे जाऊ लागला.

झाले! तीस गोळ्यांनी आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. तो इतक्या वेगाने पळू लागला की त्याला थांबवणे अवघड झाले. ऐमोचा एकूण अवतारच बदलला. आता तो अजिबात थकलेला, दमलेला नव्हता. त्याच्यात अवाजवी उत्साह संचारला होता. आजूबाजूचे सगळेच धूसर दिसत होते इतक्या वेगाने तो स्कीईंग करत होता. मध्येच त्याची शुद्ध हरपत होती, मध्येच पुन्हा परत येत होती. दरम्यान त्याची बिघडलेली अवस्था पाहून त्याच्या तुकडीतील सहकाऱ्यांनी त्याच्याकडील सगळी शस्त्रे काढून घेतली होती. त्याला नेमकं काय होतंय हे त्याचे त्यालाच कळत नव्हते.

त्याला जाग आली तेंव्हा तो एकटाच कुठल्याशा अनोळखी प्रदेशात होता. त्याच्यासोबत न त्याचे साथीदार होते, ना त्याची शस्त्रं ना काही अन्न. आपण कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे हे ही त्याच्या लक्षात येईना. तो तिथे कसा पोहोचला, त्याचे सहकारी कुठे गेले, त्यांनी असे एकट्यालाच का सोडून दिले असेल? असे असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ लागले. परव्हटीनचा प्रभाव अजूनही होताच. तो दिसेल त्या दिशेने स्कीईंग करत निघाला.

बरेच अंतर गेल्यावर त्याला कुठेतरी एक शेकोटी पेटलेली दिसली. तिच्या भोवती काही सैनिक होते, त्याला वाटले आपण तिथे जाऊ. जर ते जर्मन सैनिक असले तर आपल्याला थोडी मदत होईल. निदान खायला तरी काही मिळेल. पण, जवळ जाताच त्याच्या लक्षात आले की, ते रशियन सैनिक आहेत. तो अजिबात न थांबता थेट पुढे निघाला. रशियन सैनिकांना तर कळले देखील नाही की त्यांच्याजवळून इतक्या वेगाने कोण गेले?

पुढचे काही दिवस तर तो फक्त पाणी, पाईन वृक्षाची सुईसारखी टोकदार पाने आणि मँथोडॉनच्या गोळ्या खाऊन जिवंत राहिला.

तो एके दिवशी जर्मन सैन्याच्या तळावर आला. तिथे पेरलेल्या सुरुंगाचे त्याने स्फो*ट केले. या स्फो*टात तो स्वतःच जखमी झाला. त्याच्या उजव्या पायाला यामुळे गंभीर दुखापत झाली. आता तर त्याच्या अंगावरचे कपडे देखील फाटले.

एकतर फिनिश सैनिक मदतीला येतील म्हणून तो आशा लावून बसत असे नाही तर रशियन सैन्याने तरी आपल्याला मारून टाकावे म्हणून झुरत असे. पण, यातील काहीच होत नसे. शिवाय, उगीचच होणारे भास. त्यामुळे कोणी मदतीला आले तरी त्याला ते खरे वाटत नव्हते. पोटात अन्न नसल्याने त्याने जंगलातील एक पक्षी मारला आणि त्याचे कच्चेच मांस खाल्ले.

काही दिवसांनी खरेच फिनिश सैनिक त्याला शोधत आले. हे खरे आहे की आभास हेही त्याला कळेना. त्याची अवस्था बघून त्यांनी त्याला आधी दवाखान्यात नेले. दवाखान्यात त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्या हृदयाचे मिनिटाला २०० ठोके पडत होते आणि वजन तर फक्त ४३ किलोग्राम झाले होते. पंधरा दिवस तो सैन्यापासून तुटला होता आणि या काळात त्याने एकट्याने ४०० किलोमीटरचे अंतर पार केले होते.

इतक्या गंभीर अवस्थेतूनही तो वाचला. फक्त वाचलाच नाही तर पुढे ७१ वर्षांचे सुखी आनंदी आयुष्यही जगला.

बर्फाच्छादित प्रदेशात, अन्नावाचून पंधरा दिवस काढणे, तशाही अवस्थेत रशियन सैन्याला गुंगारा देणे, जर्मन सैनिकांच्या पोस्टवरील बॉ*म्ब उडवणे अशा कितीतरी गोष्टी तो करत राहिला. याला सुपरहिरो म्हणणार नाही तर मग काय म्हणणार…!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सरकारविरोधात या बौध्द भिक्खूने तोंडातून चकार शब्दही न काढता आत्मदहन केलं होतं

Next Post

जिद्दीला पेटल्यावर माणूस काय करू शकतो..? या माणसाने डोंगर फोडला होता..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जिद्दीला पेटल्यावर माणूस काय करू शकतो..? या माणसाने डोंगर फोडला होता..!

पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरनेच आईनस्टाईचा मेंदू चोरला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.