The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘झिमरमन टेलिग्राम’ लीक झाला आणि अमेरिका पहिल्या महायु*द्धात सहभागी झाला..!

by द पोस्टमन टीम
16 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


युनायटेड स्टेट्सनं पहिल्या महायु*द्धाची पहिली अडीच वर्षे बाजूला राहून काढली. अमेरिकन राजकारणात यु*द्धापासून दूर राहण्याची अलगाववादी भावना उच्च राहिली होती. राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी ‘He Kept Us Out of War’ या घोषणेच्या बळावर पुन्हा निवडणूक जिंकली होती. परंतु अटलांटिकमधील आरएसएम लुसिटानिया आणि इतर पाणबुडींच्या ह*ल्ल्यांमुळे युद्ध-समर्थक गटांना मदत झाली. परिणामी १९१७च्या दरम्यान महायु*द्धाच्या संघर्षात अमेरिकन सहभाग वाढण्याची शक्यता तीव्र झाली.

१ फेब्रुवारी, १९१७ रोजी जेव्हा जर्मन सैन्याने प्रतिबंधित पाणबुडी यु*द्ध पुन्हा सुरू केली तेव्हा अमेरिकेत अचानक तणाव वाढला. अमेरिकन वृत्तपत्रांनी जर्मनीच्या या आक्र*मक कारवाईचा निषेध केला. न्यूयॉर्क टाइम्सनं या घटनेला ‘व्यापारी हक्क आणि सर्व तटस्थ राष्ट्रांच्या सार्वभौमत्त्वावर आक्र*मण’, असं संबोधलं. या प्रकरणामुळं अमेरिकेनं पहिल्या महायु*द्धात उडी घेतल्याची माहिती सर्वांना आहे. मात्र, तर फक्त वरकरणी दिसणार कारण होतं. या कारणाच्या खाली अनेक खळबळजनक गोष्टी दडलेल्या होत्या. ‘झिमरमन टेलिग्राम’ हे एक असंच कारण होतं.

हा ‘झिमरमन टेलिग्राम’ नेमका काय प्रकार होता ज्याच्यामुळं अमेरिकेला यु*द्धात येण्याची गरज पडली?

जानेवारी १९१७ मध्ये, जर्मनीचे परराष्ट्र सचिव आर्थर झिमरमन यांनी मेक्सिकोत असलेला जर्मन मंत्री हेनरिक वॉन एकार्ड यांना एक गुप्त पत्र पाठवलं. जर युनायटेड स्टेट्सनं मित्र राष्ट्रांच्या बाजूने यु*द्धात प्रवेश केला तर मेक्सिकन लोकांशी लष्करी भागीदारीसाठी वाटाघाटी सुरू करण्याच्या सुचना एकार्डला त्या पत्रात देण्यात आल्या होत्या. युनायटेड स्टेट्सवर ह*ल्ला करण्याच्या बदल्यात, मेक्सिकोला नैऋत्य अमेरिकेतील काही भाग मिळवून देण्याचं आश्वासन जर्मनी देणार होती.



‘आमचा १ फेब्रुवारीला अनिर्बंध पाणबुडी यु*द्ध सुरू करण्याचा मानस आहे. तरी देखील युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला तटस्थ ठेवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यात यश न आल्यास, मेक्सिकोला मदतीसाठी घ्यावे लागेल. मेक्सिकोला एकत्र यु*द्ध, एकत्र शांती, आर्थिक पाठबळ आणि टेक्सास, न्यू मेक्सिको अरिझोनाचा प्रदेश मिळवून देण्याचं आश्वासन द्यावं लागेल,’

असा मजकूर या पत्रात लिहिलेला होता. याशिवाय, जर्मन-मेक्सिकन भागीदारीवर शिक्कामोर्तब करण्याबरोबरच, जपानला मध्यवर्ती शक्तींच्या बाजूनं ढकलण्यासाठी मेक्सिकन अध्यक्षांना मध्यस्थ म्हणून वापरण्याच्या सूचना देखील एकार्डला देण्यात आल्या होत्या.

या टेलिग्राममधील मजकूर खळबळजनक तर होताच मात्र, तो ज्या पद्धतीने ट्रान्समिट झाला होता, त्यानं सर्व जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं होतं. जर्मन लोकांनी तो प्रसारित करण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरली होती कारण यापूर्वी यु*द्धात, ब्रिटिश रॉयल नेव्हीनं जर्मन लोकांच्या ट्रान्सअटलांटिक टेलीग्राफ केबल्स तोडण्यात यश मिळवलं होतं. परिणामी जर्मनीकडं बर्लिन ते उत्तर अमेरिकेदरम्यान कोणताही खासगी संप्रेषण दुवा शिल्लक राहिला नव्हता. परंतु शांततेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं तटस्थ युनायटेड स्टेट्सनं जर्मनीला अमेरिकन यंत्रणा वापरून एनक्रिप्टेड संदेश पाठविण्याची परवानगी दिली. ही परवानगी देऊन आपण जर्मनी नावाच्या विषारी सापाला दूध पाजत असल्याची अमेरिकेला तेव्हा कल्पनाही नव्हती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१६ जानेवारी १९१७ रोजी झिमरमनच्या कार्यालयानं कोड केलेला एक टेलिग्राम जर्मनीतील अमेरिकेचे राजदूत जेम्स जेरार्ड यांना दिला. आपण आपल्याच देशाच्या पायावर कुऱ्हाड मारत असल्यापासून अनभिज्ञ जेम्सनं तो टेलिग्राम कोपनहेगनला पोहचवला. तिथून, तो लंडन आणि नंतर वॉशिंग्टन, डीसीमधील जर्मन दूतावासात पाठवला गेला.

१९ जानेवारीला मेक्सिको सिटीमध्ये असलेल्या एकार्डला मिळाला. मात्र, खरी गंमत तर ट्रान्समिशनच्या दरम्यान घडली! झिमरमनचा टेलिग्राम वाचणारा फक्त एकार्ड नव्हता! जर्मनीचा गुप्त संदेश ब्रिटन नावाच्या ‘घारी’नं मध्येच पकडला होता. ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा महायु*द्धाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या ट्रान्सअटलांटिक केबल्स गुप्तपणे टॅप करत होती. इतर संदेशांप्रमाणं झिमरमनचा टेलिग्रामसुद्धा प्रसारित होताना एडमिरल्टीच्या ‘रूम ४०’ मध्ये बसलेल्या ब्रिटिशांनी पकडला होता. ‘रूम ४०’ ही जर्मन कोड डिकोड करणाऱ्या क्रिप्टोग्राफर, गणितज्ञ आणि भाषा तज्ज्ञांचं कार्यालय होतं.

१७ जानेवारी रोजी टेलिग्राम वॉशिंग्टनमध्ये येण्याच्या अगोदरच निगेल डी ग्रे नावाच्या ब्रिटिश क्रिप्टॅनालिस्टनं तो डीकोड करण्यात यश मिळवलं होतं. टेलिग्रामचं धोरणात्मक मूल्य ओळखून, निगेल तत्काळ ‘रुम ४०’ चे प्रमुख कॅप्टन विल्यम रेजिनाल्ड ‘ब्लिंकर’ हॉलच्या कार्यालयात गेला. निगेलनं कॅप्टन विल्यमला एक सरळ प्रश्न केला, ‘अमेरिकेला युद्धात आणायचं का’? वास्तविक पाहता नियमांनुसार कॅप्टन विल्यमनं तो टेलिग्राम तत्काळ ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयाकडं सोपवणं गरजेचं होतं मात्र, त्याने तसं न करता तो कित्येक आठवडे आपल्याकडेच ठेवला. यामागे त्याची दूरदृष्टी होती. हा टेलिग्राम लगेच जाहीर केला असता तर, ब्रिटिश अमेरिकेच्या ट्रान्समिशन्सवर लक्ष ठेवत असल्याचं देखील समोर आलं असतं.

ब्रिटीशांना आशा होती की, जर्मन लोकांनी पुन्हा सुरू केलेलं प्रतिबंधित पाणबुडी युद्ध अमेरिकेला यु*द्धात ओढण्यासाठी पुरेसे असेल. परंतु, प्रत्यक्षात तसं झालं नाही. शांतताप्रिय विल्सन यांनी फक्त जर्मनीशी राजनैतिक संबंध तोडण्यापुरती ही गोष्ट मर्यादित ठेवली.

अमेरिका यु*द्धात आली नाही हे पाहून कॅप्टन विल्यमनं आपल्या ताब्यात असलेला हुकमी इक्का अतिशय हुशारीनं बाहेर काढला. टेलिग्राम मिळाल्याचा खरा स्त्रोत लपवण्यासाठी, ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयानं झिमरमनच्या टेलिग्रामची दुसरी प्रत जाहिर केली. ही प्रत वॉशिंग्टन डीसी आणि मेक्सिको सिटी दरम्यानच्या ट्रान्समिशनची होती. ही प्रत त्यांनी लंडनमधील अमेरिकन दूतावासाला दिली. दूतावासानं ती वुड्रो विल्सनपर्यंत पोहोचवली.

१ मार्च १९१७ रोजी टेलिग्राममधील संपूर्ण मजकूर अमेरिकन वर्तमानपत्रांमध्ये जशाच्या तसा प्रकाशित झाला आणि मोठा गोंधळ उडाला. ३ मार्चला आर्थर झिमरमननं टेलिग्राम लिहिल्याचं कबुल केलं. त्यानंतर मात्र, जागतिक राजकारणात आणखी गोंधळ उडाला. जर्मन लोकांनी अशी गंभीर चूक केलीचं कशी, असा प्रश्न अनेकांना पडला होता. टेलीग्राम सार्वजनिक होईपर्यंत, मेक्सिको आणि जपान या दोघांनीही जर्मनीची लष्करी भागीदारीची ऑफर फेटाळून लावलेली होती. दरम्यान, वुड्रो विल्सन यांनी यु*द्धात उतरण्याचा निर्णय घेतला. २ एप्रिल १९१७ रोजी अमेरिकेनं जर्मनीविरूद्ध यु*द्धाची घोषणा केली.

अशा प्रकारे ‘झिमरमन टेलिग्राम’ जर्मनीसाठी धोकादायक ठरला. त्यातून त्याचा हेतू तर साध्य झाला नाही उलट अमेरिकेचा रोष पत्करावा लागला. तटस्थपणे दुरून यु*द्ध पाहणाऱ्या अमेरिकेला डिवचण्याचं काम जर्मनीच्या या एका टेलिग्रामनं केलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सुरुवातीला ‘कोका कोला’मध्येही को*केन असायचं, पुढे त्याचं प्रमाण कमी करत काढून टाकलं

Next Post

डुकराचा चेहरा असलेली एक महिला लंडनमध्ये राहत असल्याची अफवा परसली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

डुकराचा चेहरा असलेली एक महिला लंडनमध्ये राहत असल्याची अफवा परसली होती

या महिलेला देव माशाने शार्कच्या तावडीतून वाचवलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.