The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

८०० विमानांनी एकत्रितपणे बॉ*म्बह*ल्ला करून जर्मनीचं एक अख्ख शहर बेचिराख केलं होतं

by द पोस्टमन टीम
4 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दुसऱ्या महायु*ध्दाचा शेवट झाला तो अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर केलेल्या बॉ*म्बह*ल्ल्याने. आण्विक तंत्रज्ञान नेमकेच शोधले गेले असतानाही त्याचा या दोन शहरांवर आणि दुसऱ्या महायु*द्धावर झालेला परिणाम अनाकलनीय होता. आण्विक आणि यु*द्ध क्षेत्रात तंत्रज्ञानाची झालेली भरभराट दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी खूप जास्त होती.

शस्त्रांची क्षमता कित्येक पटींनी अधिक होती, दळणवळणात झालेली प्रगती या सगळ्या घटकांमुळे दुसरे महायु*द्ध पहिल्या महायु*द्धाच्या कित्येक वरच्या पातळीवर लढले गेले. यु*द्धामुळे झालेला न*रसं*हार कित्येक पटींनी अधिक होता. आज आपण याच न*रसं*हारातील एका ह*ल्ल्याचा आढावा घेणार आहोत. “जर्मनीचे नागासाकी” म्हणून ओळखला जाणारा हा ह*ल्ला मानवी इतिहासातील सगळ्यात क्रू*र ह*ल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

२४ जुलै, १९४३ रोजी युरोपमधील मित्र राष्ट्रांच्या सैन्याने आतापर्यंतचा सगळ्यात तीव्र आणि विनाशक असा हवाई ह*ल्ला केला तो हॅम्बर्ग या जर्मन शहरावर. या ह*ल्ल्यात बरेचसे विमान चालक ब्रिटिश होते. या हल्ल्याला “ऑपरेशन गमोरा” म्हणून ओळखले जाते.

या ह*ल्ल्यासाठी हॅम्बर्ग हे शहर निवडण्यामागे काही विशेष कारणे होती. उत्तर जर्मनीत बंदराच्या काठी वसलेले हे शहर जर्मनीच्या नौदलाचे मुख्य केंद्र होते. जर्मनीच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक असलेले हे शहर जर्मनीसाठी महत्त्वपूर्ण होते. स्टॅलिनग्राड इथे जर्मनीचा पराभव झाला त्यानंतर ६ महिन्यांनी हॅम्बर्ग इथे हा हवाई ह*ल्ला करण्याची योजना तयार केली गेली.

जर्मनीचे औद्योगिक केंद्र उ*द्ध्वस्त झाले की जर्मनी आपोआप कोसळेल हे मित्र राष्ट्र ओळखून होते. अमेरिकन हवाई दल दिवसा, तर आरएएफची विमाने रात्री असे सतत हॅम्बर्ग शहरावर हवाई ह*ल्ले करण्यात येत होते.



काही वर्षांपूर्वी हॅम्बर्गसारख्या मोठ्या शहरावर एकाच वेळी ह*ल्ला करणे अवघड काम होते. परंतु, तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे हे शक्य आणि सोपे झाले होते. हॅम्बर्ग शहर हे जर्मनीच्या हद्दीत असून ब्रिटिश तळांपासून अगदी दूर होते. त्यामुळे बरेच ह*ल्ले हे चालकांसाठी अगदी धोकादायक होते असे म्हटले जाते.

अशा वेळी ‘विंडो’ नावाचे एक तंत्र वापरण्यात आले. जसेजसे बॉ*म्बर विमाने शहराच्या जवळ येत तसे ते हवेत ॲल्युमीनियमचे छोटे पातळ थर फेकत असत. जर्मनीच्या रडार यंत्रणेला फसवण्यासाठीत हे तंत्र यशस्वी झाले. बॉम्बर विमाने जर्मन रडारसाठी अगदी अदृश्य होते. याचा परिणाम खूप मोठा आणि फायदेशीर होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सुरुवातीला गेलेल्या ७९१ विमानांपैकी फक्त १२ विमाने कोसळली. १.५ टक्के एवढीच.

यु*द्धात होणाऱ्या हानीच्या मानाने हे नुकसान  खूप कमी होते. नेमकं काय घडतंय हे लक्षात आल्यावर पुढे हे नुकसान जरी वाढत गेले असले तरी या विंडोमुळे मित्र राष्ट्रांचे काही जीव वाचले एवढं नक्की.

ऑपरेशन गमोरा यशस्वी झालेच, परंतु त्याची मोठी मानसिक किंमत मित्र राष्ट्रांच्या विमानचालकांना चुकवावी लागली. सुरुवातीला धमाका करणारे बॉ*म्ब वापरत असलेले बॉम्बर आता आगीचे लोळ निर्माण करणारे बॉ*म्ब वापरत होते. संपूर्ण शहर आग ओकणाऱ्या एखाद्या मोठ्या शेगडीसारखे झाले होते. याचा परिणाम म्हणजे एक असा न*रसं*हार होता ज्याने जिवंत वाचलेल्या लोकांच्या मनावर कायमचा मानसिक परिणाम घडवून आणला.

रस्तेही जळून खाक होतील एवढे उच्च तापमान शहरात तयार झाले आणि या तापमानात अंदाजे २०,००० नागरिक जळून खाक झाले. विमानांनी २४०० टन वजनाचे बॉ*म्ब त्या दिवशी शहरावर टाकले होते. हा आतापर्यंत कोणताही यु*द्धात वापरल्या गेलेल्या बॉ*म्बच्या आकड्यापेक्षा मोठा आकडा होता.

या ह*ल्ल्याने शहराच्या औद्योगिक भागास झालेले नुकसान यु*द्ध लवकर संपण्यात महत्त्वाचे होते. परंतु त्यापेक्षाही तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या मनावर झालेला परिणाम जास्त विदारक होता. शेजारच्या शहरातील लोकही आपली घरे सोडून निघुन गेली. पुढचा निशाणा आपले शहर असू शकते या भितीने कित्येक लोक शहरे सोडून गावाकडे राहण्यास गेली.

या ह*ल्ल्याने उठणारे धुराचे लोळ हे हिरोशिमा आणि नागासाकीच्या ह*ल्ल्यावेळी उठलेल्या धुरांच्या लोळाएवढेच होते असं कित्येक तज्ञ सांगतात. हा ह*ल्ला संपूर्ण एक आठवडा सुरु होता. दिवस-रात्र सुरु असलेल्या या ह*ल्ल्यात १७,००० बॉ*म्ब ह*ल्ले करण्यात आले. काही काही वेळा ७००-८०० विमाने एकाच वेळी ह*ल्ला करत असत.

९००० टन एवढी विस्फो*टके शहराच्या वेगवेगळ्या भागात विमानांद्वारे टाकण्यात आली. २७ जुलैला तर एकाच दिवशी २४०० टन एवढी विस्फो*टके डागण्यात आली होती. या ह*ल्ल्यात २,८०,००० इमारती जळाल्या होत्या. एकूण ३०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असे म्हटले जात असले तरी खरा आकडा भरपूर मोठा असेल असे म्हटले जाते.

यु*द्ध महत्त्वाचे आहेत हा राज्यकर्त्यांचा समजच सामान्य जनतेच्या मुळावर उठतो. शांततेसाठी यु*द्धाची गरज नसते हे जेव्हा जगाला कळेल तेव्हाच खरा शांतताप्रिय समाज आणि जग निर्माण होइल हा संदेश आज जगाला देणे गरजेचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बंगाली लोकांनी सुरु केलेली सत्यनारायणाची पूजा महाराष्ट्रात लोकप्रिय कशी झाली ?

Next Post

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

नोकरी गेली, बायकोने सोडले, २० वर्षं पडेल ते काम केले, वयाच्या ८८ व्या वर्षी उभा केला स्वतःचा ब्रँड!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.