The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने जगाला बेफिकिरीच्या हिप्पी लाइफस्टाइलचं वेड लावलं होतं..!

by द पोस्टमन टीम
13 July 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘There was a boy. A very strange enchanted boy.’

या ‘नेचर बॉय’ नावाच्या गाण्याच्या ओळी आहेत. ५०च्या दशकात हे गाणं फारच प्रसिद्ध झालं होतं. हे गाणं एडन अहबेझ या अमेरिकन गीतकारानं लिहिलं होतं. या गीतकाराची जीवनशैली कॅलिफोर्नियामधील हिप्पी चळवळीपासून प्रभावीत होती. पांढरा झगा, चप्पल, लांब केस आणि लांब दाढी असाच त्याचा वेश असायचा. अमेरिकेत हॉलिवूडमध्ये डोंगरावर मोठ्या आकारात ‘HOLLYWOOD’ अशी अक्षरं असलेलं शिल्प आहे. या शिल्पाच्या पहिल्या ‘L’ खाली एडन कितीतरी दिवस राहिला होता. त्यानं गूढवादाचा अभ्यास केला होता.

‘Nature Boy’ हे गाणं त्याने स्वतःच्या जीवशैलीवरच लिहिलं असल्याचं म्हटलं जातं. मात्र, हे अमान्य करणारे बरेच लोक आहेत. कित्येक लोकांना असा विश्वास आहे, की ‘नेचर बॉय’ हे गाणं कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्जमध्ये राहणाऱ्या विल्यम पेस्टर याच्या आयुष्यावरुन प्रेरणा घेऊन लिहिलं आहे. पेस्टर हा नैसर्गिक जीवनशैली जगत होता. अनेक पर्यटक आणि सेलिब्रिटी त्याच्या शोधत पाम स्प्रिंगमध्ये येत असत. प्रसिद्ध लेखक झेन ग्रे आणि सिनेस्टार रुडोल्फ व्हॅलेंटिनो यांनी त्याची सर्वात जास्त छायाचित्रे मिळवली होती.

कोण होता हा पेस्टर ज्याला भेटण्यासाठी सेलिब्रिटीही उत्सुक होते?

विल्यम फ्रेडरिक पेस्टर हा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅलिफोर्नियामध्ये राहत होता. अमेरिकन हिप्पी जीवनशैलीचा प्रणेता म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याला ‘हर्मिट ऑफ पाम’ (पाममधील संन्यासी) म्हणूनही ओळखलं जातं.

पेस्टर हा मूळचा जर्मन होता. जर्मनीतील बोर्ना या ठिकाणी १८ जुलै १८८५रोजी त्याचा जन्म झाला. आई मारियाच्या निधनानंतर त्यानं काही दिवस दगडी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम केलं. सैन्य सेवा टाळण्यासाठी १९०६ मध्ये त्याने जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतर केलं.



तो ‘लेबेन्स्रेफॉर्म’ या तत्त्वज्ञानाचा अनुयायी होता. लेबेन्स्रेफॉर्म ही जर्मनीमध्ये सुरू झालेली सामाजिक चळवळ! यामध्ये पर्यावरणवाद, सेंद्रीय शेती, शाकाहारी जीवनशैली आणि न्यूड सोसायटी अशा विविध विचारांचं मिश्रण होतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव निसर्गापासून अधिक दूर चालला असल्याचे या चळवळीतील लोकांचं म्हणणं होतं. त्यामुळेच निसर्गाच्या अधिक जवळ कसं जाता येईल याबाबत हे लोक प्रयत्नशील होते. यासोबतच मूळ अमेरिकन लोकांबद्दल कार्ल मे यांनी लिहिलेल्या लोकप्रिय कादंबऱ्यांचासुद्धा त्याच्यावर प्रभाव होता.

अमेरिकेत आल्यानंतर पेस्टरनं पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये प्रवास केला. तो जवळपास एक वर्ष हवाईमध्ये राहिला. त्यानंतर १९१६ साली कॅहुलिया लोकांचं वस्तीस्थान असलेल्या पाम स्प्रिंग्जजवळील ताहक्विट्झ कॅनॉन येथे तो स्थायिक झाला. स्थानिक लोकांनीही त्याला स्वीकारलं. त्यानं एका नदीकिनारी पामच्या बेटाशेजारी झोपडी बांधली होती. त्यानं आपला बराचसा वेळ आसपासचा प्रदेश फिरण्यात आणि वाचन-लेखनात घालवला, असं लेखक गॉर्डन केनेडी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून समजतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

‘लेबेन्स्रेफॉर्म’च्या हेल्थ टिप्स देऊन, पोस्टकार्ड विकून आणि खगोलशास्त्रावर व्याख्यानं देऊन पेस्टर थोडेफार पैसे कमवत. त्यातूनच त्याचं आयुष्य चाललेलं. त्याच्याकडं मातीची भांडी आणि कलाकृतींचा एक अद्भुत संग्रह होता. स्वत:कडे असलेल्या दुर्बिणीतून तो लोकांना तारे दाखवत असे आणि त्यासाठी १० सेंट्स (आताचे सहा रुपये) आकारत असे.

त्याला स्लाइड गिटार वाजवता येत होती; आणि तो स्वतःच्या चपलाही स्वतःच शिवायचा. खाण्यासाठी तो कच्च्या फळांचा आणि भाज्यांचा वापर करायचा. भाज्या किंवा फळं शिजवण्याची गरज नसल्यामुळे त्याला भांड्यांची वा स्वयंपाकाच्या साधनांचीही गरज नव्हती. शिवाय त्याला अर्धनग्न अवस्थेतच राहणं आवडायचं, म्हणजेच कपड्यांवरही त्याचा फारसा खर्च होत नव्हता. अशा विचित्र गोष्टींमुळं अल्पावधीतच तो लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आणि प्रसिद्धही झाला. त्याच्या राहणीमानाच्या कुतुहलामुळे प्रसिद्ध व्यक्तीही त्याला भेटण्यासाठी येत होत्या.

१९४० साली मात्र त्याला कॅलिफोर्निया दंड संहिता ‘२८८-अ’ अंतर्गत अटक करण्यात आली. एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता. यासोबतच पेस्टर जर्मन गुप्तहेर असून, सॅन जेकिन्टो पर्वताच्या शिखरावरुन जर्मनीला रेडिओ मेसेजेस पाठवल्याचा आरोपही त्याच्यावर होता. ‘लैंगिक विकृती’च्या दहा आरोपांसाठी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्याला सॅन क्वेंटीन कारागृह आणि नंतर फॉल्सम जेलमध्ये टाकलं गेलं. पुढे १९४६मध्ये जामिनावर त्याची सुटका झाली.

१९४८च्या दरम्यान पेस्टर लॉस एंजेलिसमध्ये वास्तव्याला आला. पाम स्प्रिंग्ज विकसित होत असल्यानं त्याठिकाणी लोकवस्ती वाढली होती. असं म्हटलं जातं, की लोकांचा त्रास नको म्हणून एक नौका विकत घेऊन एखाद्या दुर्गम बेटावर राहण्यासाठी जाण्याचा त्याचा विचार होता. मात्र, नंतर त्यानं लग्न केलं. १९६३ साली वयाच्या ७८व्यावर्षी ॲरिझोना येथे त्याचं निधन झालं. अ‌ॅरिझोनातील प्रेस्कॉट काउंटी स्मशानभूमीत त्याचा दफनविधी पार पडला.

पेस्टर राहत असलेला पाम स्प्रिंगमधील जागा नंतर व्यापारी संकुल म्हणून विकसित करण्यात आली. सध्या ती ‘हर्मिट्ज बेंच’ म्हणून ओळखली जाते. १९८५ साली मिली फिशर यांनी पाम कॅनॉन विषयी एक पुस्तिका प्रकाशित केली. त्यात पेस्टरबाबत एक प्रकरण त्यांनी लिहिलं आहे. २००८ साली पीटर वाइल्ड यांनी ‘विल्यम पेस्टर : द हर्मिट ऑफ पाल स्प्रिंग्ज’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. विशेष म्हणजे, पेस्टरनंतरही अनेक दशकं दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये ‘लेर्ब्न्सफार्म’ तत्त्वज्ञान आणणारी जर्मन स्थलांतरितांची लाट कायम होती.

निसर्गोपचार चिकित्सक अर्नोल्ड एहरेट आणि औषध उद्योजक हर्मन सेक्सॉयर, जॉन व वेरा रिश्टर हे त्यापैकीच आहेत. तसेच, हिप्पी कल्चरबाबत बोलायचं झाल्यास, हॉलिवूडमधील सिनेमांमध्ये ते मोठ्या प्रमाणात दाखवलं गेलं. पुढे हॉलिवूडच्या प्रभावाने बॉलिवूडमध्येही ते दाखवलं गेलं. ७०च्या दशकामध्ये गोवा आणि दक्षिणेकडील समुद्रकिनारी काही भागांमध्ये हे कल्चर फॉलो करणारे लोक बऱ्याच प्रमाणात दिसून येत होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बकार्डीने क्युबात बंडखोरांना सत्तेत यायला मदत केली, त्यांनीच बकार्डीला देशाबाहेर काढलं

Next Post

इजिप्तमधील या जुळ्या मंदिरांना वाचवण्यासाठी सगळं जग एकवटलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

इजिप्तमधील या जुळ्या मंदिरांना वाचवण्यासाठी सगळं जग एकवटलं होतं

या चिनी खलाशाने कोलंबसच्या दुप्पट समुद्री प्रवास करून चिनी माल जगभर पसरवला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.