The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गव्हाचे भाव कमी करण्यासाठी अमेरिकेत ‘स्लाइस ब्रेड’वर बंदी घालण्यात आली होती!

by द पोस्टमन टीम
16 May 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लोकशाही राज्यात देखील एकदा सरकारने एखादा अध्यादेश काढला की बहुसंख्य जनतेला ते मान्य करावेच लागते. अशा नियमांमुळे होणारा त्रास किंवा असुविधाही सहन करावी लागते. अनेकदा राज्यकर्त्यांना उगीचच काही तरी करून दाखवण्याची हौस म्हणून नवनवे अध्यादेश काढायचे असतात. ज्याला देशासाठी त्याग, देशाच्या भल्यासाठी मोजावी लागणारी किंमत असे गोंडस शब्द वापरून जनतेला मूर्ख बनवले जाते.

जेव्हा लोकशाही मार्गाने हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक सत्तेचा सोपान चढतात तेव्हा जनतेला त्याची झळ पोहोचणे अपरिहार्यच नाही का? दुसऱ्या महायु*द्धाच्या काळातही अमेरिकन जनतेने काहीसा असाच अनुभव घेतला.

१९२० च्या दरम्यान अमेरिकेत ब्रेडची निर्मिती होऊ लागली. ब्रेडपासून वेगेवेगळ्या प्रकारचे, चटपटीत आणि झटपट पदार्थ तयार करता येत असल्याने अमेरिकेत लवकरच घराघरात या पदार्थाला आहारातील मुख्य स्थान मिळाले. सुरुवातीला मिळणारी ब्रेडची लादी नंतर कट केलेल्या तुकड्याच्या स्वरुपात मिळू लागली. त्यामुळे तर ब्रेड कट करण्याचाही वेळ वाचू लागला. १९३० साली रोवेडर मशीन आले ज्यामुळे ब्रेडचे एक समान तुकडे करणे अधिक सोपे झाले.

दशकभरातच संपूर्ण जगभर यु*द्धाचे वारे वाहू लागले ज्यामुळे देशातील अधिकतर संसाधने यु*द्धासाठीच वापरली जाऊ लागली.



लोकांना मटण, चीज किंवा साखर यांसारख्या अत्यावश्यक वस्तू जरी घ्यायच्या असतील तर त्यासाठी आधी सरकारी टोकन घ्यावे लागे. सरकारी टोकन असल्याशिवाय अशा वस्तूंची खरेदी करता येत नव्हती. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात अमेरिकन सरकारने अनेक सेवांचा दर आणि त्यांची सुविधा नियंत्रित केली होती.

१९४३ साली शेती सचिव क्लॉड आर. विकार्ड यांनी तर एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांच्या कार्यालयाने १८ जानेवारी, १९४३ रोजी प्री-स्लाईस्ड ब्रेडवरच बंदी घातल्याची घोषणा केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे तीन गोष्टींची मोठ्या प्रमाणावर बचत होणार होती, वॅक्स पेपर, गहू आणि स्टील. परंतु, अशा प्रकारच्या बंदीतून कुठलाच मोठा फरक जाणवला नाही.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

यु*द्ध अन्न प्रशासन विभागानेही अशा बंदीचे समर्थन करताना एक हास्यास्पद कारण दिले होते. त्यांच्या मते कट केलेल्या ब्रेडला गुंडाळण्यासाठी जास्ती वॅक्स पेपर लागतो. मात्र प्रत्यक्षात यामुळे काही खूप मोठा फरक पडला नाही. बरं याकाळात वॅक्स पेपर्सचा तुटवडा जाणवत होता असेही काही नव्हते. तरीही प्रशासनाने सक्तीने हा निर्णय राबवला.

उलट त्याकाळात अनेक कंपन्या वॅक्स पेपरची निर्मिती करत होत्या आणि आपल्याकडील वॅक्स पेपरला कधी मागणी याची वाटच पाहत होत्या. कित्येक ब्रेड कंपन्यांकडे देखील वक्स पेपरचा मुबलक साठा होता. अगदी महिनोंमहिने पुरेल इतका. तरीही ही बंदी उठवण्यात आली नाही.

त्यानंतर कारण दिले गेले ते मोठ्या प्रमाणावर ब्रेड कट करण्यासाठी मशीन्सची गरज असते आणि अशा मशीन्स बनवण्यात भरपूर स्टील खर्ची पडते. स्टीलची गरज ब्रेड कंपन्यांपेक्षा यु*द्धभूमीवर जास्त आहे. खरे तर ब्रेड बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांना आवश्यक तितक्या मशीन्स आधीच खरेदी केल्या होत्या. आणि एकदा खरेदी केलेली मशीन वर्षानुवर्षे वापरता येत असल्याने त्यांना पुन्हा पुन्हा त्या मशीन्स खरेदी करणाचीही गरज नव्हती. त्यामुळे या मशीन्सच्या निर्मितीत जास्त स्टील खर्च झाले असते, असे म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. यातून जरी थोडेफार स्टील वाचले असले तरी त्यामुळे काही फार मोठा फायदा झाला असेही नाही. म्हणजे हेही कारण तकलादूच ठरले.

आणखी एक कारण म्हणजे असे केल्याने ब्रेडच्या आणि गव्हाच्या किमती कमी होतील. किंमत नियामक धोरणाने पिठाच्या किमतीत १०%नी वाढ केली. ज्यामुळे आपसूकच ब्रेडच्या किंमतीही वाढल्याच.

कट केलेल्या ब्रेडवर बंदी घातल्याने ब्रेड आणि गव्हाची मागणी कमी होईल असा सरकारचा अंदाज होता. ज्यामुळे याचा जास्तीत जास्त साठा करून ठेवता येईल. 

खरे तर याचीही काहीच गरज नव्हती. कारण तेव्हा अमेरिकेत टनांनी गव्हाचा साठा करता येईल इतकी मोठमोठे बुशेल्स भरलेले होते. या काळात पिक घेतले नसते तरी किमान वर्षभर प्रत्येक घरासाठी पुरेल इतका गव्हाचा साठा अमेरिकेत पडून होता.

अशा प्रकारची बंदी काहीच कामाची नव्हती. उलट लोकांच्या दैनंदिन कामात एक अडथळाच निर्माण झाला होता. साहजिकच हा निर्णय मागे घ्यावा म्हणून सगळीकडूनच मागणी होऊ लागली.

एका गृहिणीने तर न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात आपली व्यथा मांडली होती. तिने लिहिले होते, “माझ्या घरात माझा नवरा, मी आणि माझी चार मुले, एकूण सहा व्यक्ती राहतो. सगळ्यांच्या नाश्त्याला दोन दोन सँडविच जरी पकडले तरी त्या पाच जणांच्याच सँडविचसाठी मला ब्रेडचे दहा तुकडे करावे लागतात. नंतर लंचसाठी दहा तुकडे करावे लागतात आणि पुन्हा मला स्वतःला नास्त्यासाठी दोन तुकडे करावे लागतात. घाईगडबडीतही फक्त ब्रेडचे बावीस तुकडे करण्यातच माझा किती तरी वेळ खर्च होतो. हेच जर मी आधीच कट केलेले ब्रेड आणले तर माझा कितीतरी वेळ वाचू शकतो.” प्रत्येक गृहिणीची अशीच काहीतरी गोष्ट होती.

अन्न प्रशासानाने तरीही पुढची तीन महिने तरी किमान ही बंदी उठवली नाही. तीन महिन्यानंतर मात्र अमेरिकन लोकांना त्यांचे आवडते कट केलेले ब्रेड मिळू लागले.

पण, या तीन महिन्यांत त्यांना फक्त सन्की अधिकाऱ्यांच्या फतव्यामुळे असुविधा सहन करावी लागली. अशा भोंगळ कारभारामुळे सामान्य अमेरिकन लोकांना मात्र त्रास सहन करावा लागला. खरे तर यु*द्ध आणि कट केलेला ब्रेड यांचा तसा काहीही थेट संबंध नव्हता. तरीही अमेरिकन अन्न प्रशासानाने असा विचित्र निर्णय लादून असंख्य नागरिकांची गैरसोय करून ठेवली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आपल्या कीबोर्डवर ABCD अशी क्रमाने बटणं का नाहीत..?

Next Post

लाछिमान गुरूंग – २०० सैनिकांना एकट्याने अंगावर घेतलेला गोरखा लेजेंड

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

लाछिमान गुरूंग - २०० सैनिकांना एकट्याने अंगावर घेतलेला गोरखा लेजेंड

कर्णन - असा चित्रपट बनवायला बॉलिवूडला अजून किती वर्ष लागतील माहित नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.