The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धोनी हेडनला म्हणाला, “काय म्हणशील ते देतो, पण ही ‘मंगूस बॅट’ नको वापरू..!”

by द पोस्टमन टीम
22 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुमच्यापैकी कुणी राहूल बोसचा ‘चैन कुली की मैन कुली’ हा सिनेमा पाहिलाय का? ज्यांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे अशांनी कदाचित पाहिला असेल. या सिनेमामध्ये एका किशोरवयीन अनाथ क्रिकेटरची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अनाथाश्रमात आलेल्या जुन्यापुरान्या खेळण्यांमध्ये त्या मुलाला १९८३ असे अंक कोरलेली एक बॅट सापडते. ती बॅट कपील देव यांनी ८३च्या वर्ल्डकपमध्ये वापरलेली आहे, असा त्या मुलाचा समज होतो. हाच विश्वास त्या मुलाला चांगले शॉट्स मारण्यास मदत करत असतो. त्या बॅटवर आलेला प्रत्येक बॉल थेट बाऊंड्रीपार जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

ही तर झाली सिनेमातील ‘रील स्टोरी’. मात्र, आयपीएल २०१०मध्ये मॅथ्यू हेडन अशीच एक रहस्यमयी दिसणारी बॅट हातात घेऊन फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीवर गेला होता. मुळचा ऑस्ट्रेलियन आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडननं या बॅटच्या सहाय्यानं क्रीजवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानं केवळ ४३ बॉलचा सामना करून धडाकेबाज ९३ रन फटकावले होते. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळलेली हेडनची ती सर्वात धडाकेबाज खेळी होती. ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते.

जेव्हा हेडन मैदानावर चौफेर आतिषबाजी करत होता, तेव्हा सर्वत्र त्याच्या बॅटची चर्चा रंगली होती. त्या बॅटचं नाव होतं ‘मंगूस बॅट’! मॅथ्यू हेडननं आयपीएलमध्ये पहिल्यांदाच या मंगूस बॅटचा वापर केला होता.

क्रिकेटमध्ये खेळाडू वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व असतं. क्रिकेट बॅट हे संपूर्ण खेळातील सर्वात महत्त्वाचं साधन आहे. जेव्हा क्रीजवर एखाद्या बॅटरची बॅट फिरते तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये होणार जल्लोष पाहण्यासारखा असतो. क्रिकेटचा इतिहास पाहिला असता, एकदम सुरुवातीच्या काळात बॅटचा वापर बचावासाठी आणि बॉलचा वापर अटॅक करण्यासाठी केला जात होता. पण, आता दोन्हींचा वापर प्रतिस्पर्धी टीमवर अटॅक करण्यासाठी होतो.

बहुतेक क्रिकेट फॅन्सला बॅटिंग अटॅक पाहण्यात जास्त आनंद मिळतो. ज्या बॅट्सचा वापर करून अनेक खेळाडू ‘दिग्गज’ झाले आहेत अशा बॅट्सचेही अनेक प्रकार आहेत. मंगूस बॅटदेखील अशाच प्रकरांपैकी एक होती. मंगूस बॅट ही साधारण बॅटचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. जिची निर्मिती विशेषतः टी 20 फॉरमॅटसाठी झाली होती. पूर्वी ‘न्यूबेरी उझी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या बॅटचं उत्पादन ‘मुंगूस’ या ब्रिटिश कंपनीनं सुरू केलं होतं. नंतर हीच बॅट MMi3 या नावानं लाँच केले गेली. मात्र, ही बॅट कायम वादात राहिली. सध्या तर या बॅटचा कुणीही वापर करत नाही.



क्रिकेट जगतामध्ये सर्वात वादग्रस्त ठरलेल्या या मंगूस बॅटमध्ये नेमकं असं काय होतं की, अटॅकसाठी चांगली असूनदेखील तिचा वापर थांबवण्यात आला.

मंगूस बॅट ही पारंपरिक क्रिकेट बॅटसारखी नव्हती. सामान्य क्रिकेट बॅटपेक्षा तिचे ब्लेड ३३ टक्क्यांनी लहान होते आणि हँडल ४३ टक्क्यांनी लांब होतं. या बॅटच्या स्वरुपामुळं होल्ड करण्यासाठी अधिक स्कोप मिळतं होता. परिणामी डिफेन्सिव्ह खेळण्याऐवजी फुल-ऑन अटॅकिंग शॉट्स मारण्यास मदत होत असे. ही मंगूस बॅट पूर्णपणे टी २० फॉरमॅटला अनुकूल होती. 

मॅथ्यू हेडननं आयपीएल २०१०मध्ये पहिल्यांदा या बॅटचा वापर केला होता. त्यानं संपूर्ण सिझनभर हीच बॅट वापरली होती. या बॅटवर माजी क्रिकेट स्टार्सकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. माजी ऑस्ट्रेलियन कसोटीपटू, स्टुअर्ट लॉनं ही बॅट म्हणजे एका काडीवर वीट ठेवल्यासारखी आहे, असं म्हटलं होतं. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसारख्या आधुनिक क्रिकेटपटूंनीसुद्धा ही बॅट वापरणं धोकादायक असल्याचं मान्य केलं होतं. कारण, मंगूस बॅटच्या मदतीनं अटॅक तर आरामात करता येत होता मात्र, जर डिफेन्सची वेळ आली तर तो करता येत नव्हता. मंगूस बॅटबाबत मॅथ्यू हेडन आणि धोनीचा एक किस्सादेखील समोर आला होता. ही बॅट न वापरण्याच्या बदल्यात आपण तुला काहीही देण्यास तयार असल्याचं धोनी हेडन म्हटला होता, असं सांगितलं जातं.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

असं म्हटलं जातं की, आयसीसीनं मंगूस बॅट बॅन केली आहे. मात्र, ही गोष्ट अफवा आहे, अशी माहिती मंगूसमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर असलेल्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. प्रायोजकत्वाच्या खर्चामुळं या बॅटचा वापर थांबला आहे. २०१०मध्ये कंपनीनं मॅथ्यू हेडनला आयपीएलमध्ये ही बॅट वापरण्यासाठी सहा आकडी रक्कम दिली होती. 

मात्र, आयपीएलमध्ये प्रसिद्धी मिळूनदेखील पुरेशा प्रमाणात बॅटची विक्री झाली नाही. युकेमध्ये काही प्रमाणात या बॅटला अटेंशन मिळालं. पण, वाढत्या प्रायोजकत्वाच्या खर्चाच्या तुलनेत बॅटच्या विक्रीतून मिळणारा नफा खूपच कमी होता. २०११ मध्ये, मंगूस क्रिकेट लिमिटेडमध्ये मोठे फेरबदल झाले. मात्र, त्यावेळी कंपनीकडे प्रमोशनसाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सुपरस्टार किंवा आयपीएल खेळाडू नव्हता. अपुऱ्या पब्लिक एक्सपोजरशिवाय मंगूस बॅट इतिहासजमा झाली. अनेकांनी या बॅटला एक फॅड म्हणून पाहिलं.

मॅथ्यू हेडनशिवाय अँड्र्यू सायमंड्स, स्टुअर्ट लॉ, प्रणित सिंग, सुरेश रैना आणि ड्वेन स्मिथ यांनीदेखील ही मंगूस बॅट वापरून पाहिली. मात्र, त्यांनी फार काळ तिचा वापर केला नाही. कारण या बॅटचे अनेक तोटे समोर आले होते. लहान असल्याने संरक्षणात्मक फलंदाजीसाठी तिचा काहीही उपयोग नव्हता. वन डे क्रिकेट किंवा टेस्ट क्रिकेटमधील लाँग इनिंग खेळण्यासाठी अजिबात चांगली नव्हती. म्हणून खेळाडूंना ही बॅट विशेष आकर्षित करू शकली नाही. काही दिवसांपूर्वी मॅथ्यू हेडनचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्यानं २०१०मधील आयपीएलच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे आपल्या या व्हिडिओमध्ये त्यानं मंगूस बॅटचा आवर्जून उल्लेख केला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

९ वर्षांचा हा नायजेरियन मुलगा जगातला सर्वात लहान अरबपती आहे..!

Next Post

जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या ‘किहनू’ बेटाबद्दल…!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या 'किहनू' बेटाबद्दल...!

खेरुका परिवाराने तेव्हा हार मानली असती तर आज बोरोसिल सारखा ब्रँड अस्तित्वात नसता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.