The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकाच झाडापासून तयार होतात तरी भारतात ‘भांग’ विक्रीला सूट आणि ‘गां*जा’ विक्रीला बंदी का आहे ?

by द पोस्टमन टीम
18 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या संशयास्पद आत्मह*त्येनंतर या प्रकरणाने देशभरात वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणात ड्र*ग्ज आणि बॉलिवूड यांचे संबंध पुन्हा चर्चेत आले होते. ‘गां*जा‘ची यावेळी सर्वाधिक चर्चा करण्यात आली होती.

कित्येक हजार वर्षांपासून भारतीय लोक भांग सेवन करतात. गां*जाचा देखील यातच समावेश होतो. भारतात गां*जा आणि हा*शिश यांच्या वापरावर बंदी आहे पण भांग पिण्यावर कुठलीच बंदी नाही. तिन्ही एकाच वनस्पती प्रजातीपासून उत्पादित केले जातात, असं असलं तरी दोघांवर बंदी आहे तर एकाच्या वापराला व विक्रीला सूट देण्यात आली आहे.

होळीच्या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराचा प्रसाद म्हणून भारतात भांग प्राशन केली जाते. भांग विक्री करण्याची आणि खाण्या-पिण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. ठंडाईमध्ये टाकून भांग पिण्याची पद्धत प्राचीन काळापासून अविरतपणे चालत आली आहे.

परंतु याच भांगेच्या झाडापासून बनवण्यात येणाऱ्या इतर पदार्थांना जवळ बाळगले तर १० हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

गां*जा आणि भांग दोन्ही एकाच झाडापासून उत्पन्न होतात. ओखली आणि मुसळीच्या या झाडांच्या पानांना कुटून त्यांचे जे चूर्ण बनवण्यात येते त्याला भांग म्हटले जाते. तर याच झाडाच्या मादा भागाला वाळवून त्यापासून गां*जा बनवण्यात येतो. भांग खाण्यापिण्याचा गोष्टीत एकत्र करून प्राशन करण्यात येते, तर गां*जा तंबाखूसारखा चिलीममध्ये भरून ओढला जातो. च*रस देखील याच झाडापासून तयार करण्यात येतो.



१९८५ साली भारताने नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्सच्या यादीत गां*जाच्या रोपाचा अर्थात कॅन*बिसच्या फुलांचा व फळांचा समावेश केला व त्याच्या वापराला गुन्हेगारी कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद केली. परंतु याच झाडाच्या पानांना मात्र खुली सूट देण्यात आली, यातूनच भांग तयार करण्यात येते.

खरंतर १९६१ साली जेव्हा सर्वप्रथम गां*जाला हार्ड ड्र*ग्जच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता तेव्हा भारताने त्याचा विरोध केला होता. परंतु नन्तर अमेरिकेच्या दबावाला भारत बळी पडला आणि गां*जाचा वापरावर निर्बंध घालण्यात आले.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

भारताच्या काही राज्यात भांग पिणे देखील अवैध आहे. आसाममध्ये भांग जवळ बाळगणे कायद्याने गुन्हा आहे, तर महाराष्ट्रात त्याच्या उत्पादन, वापर आणि विक्रीवर देखील बंदी आहे. भांग विक्री फक्त विशेष लायसन्स असणाऱ्या लोकांपुरता मर्यादित करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये २००७ साली भांग पिण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली.

गां*जावर कायदेशीर बंदी असली तरी आज बेकायदेशीरपणे गां*जाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. भारतात ३.१ कोटी लोकांनी, म्हणजेच एकूण लोकसंख्येचा ३% लोकांनी २०१८ साली गां*जाचे प्राशन केले होते. इस्त्रायलच्या सीडो या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की २०१८ साली एकट्या दिल्लीत ३२.३८ मेट्रिक टन गां*जाची विक्री करण्यात आली. गां*जाच्या वैधतेवर अभ्यास करणाऱ्या एका अभ्यासगटाच्या रिपोर्टनुसार जर गां*जा वैध करण्यात आला तर त्यातून भारत सरकारला ७२५ कोटी रुपये महसूल मिळणार आहे.

भांग हे एक स्वदेशी वनस्पती आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भांग उत्पादित करण्यात येते. भारतात धार्मिक आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत या झाडाचे विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात या वनस्पतीच्या प्रत्येक भागाचे महत्त्व आहे. याला भारताच्या प्राचीन ग्रंथांत “विजया” असे नाव आहे. या झाडाचे व्यापारीदृष्ट्या देखील महत्त्व अधिक आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीत या झाडाचा वापर करण्यात येतो. परंतु जेव्हापासून कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे, त्यावेळेपासून याच्या उत्पादनाला कोणी धजावत नाही.

भांग कायदेशीर असताना त्याच वनस्पतिच्या दुसऱ्या भागावर बंदी घालणे योग्य नसल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. मेनका गांधी, तथागत सतपती आणि शशी थरूर यांनी वी*ड, च*रस आणि हा*शिश या पदार्थांच्या वापरावरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील तशी मागणी केली आहे.

भारताने त्यावेळी अमेरिकेच्या दबावात बंदी घातली होती पण आता परिस्थिती पालटली आहे. अमेरिकेत गां*जावर बंदी घालण्यात आली होती. अमेरिकेसोबत काही महत्त्वपूर्ण करार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने अमेरिकेच्या दबावात येऊन भारतात देखील बंदी घातली होती. भारतात गां*जाचा त्याच्या प्राचीन संस्कृतीशी असलेला संबंध लक्षात घेऊन त्याला पुन्हा कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी मोठी मोहीम छेडली गेली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकेकाळी भारतात वेगवेगळी वेळ दाखवणारे चार घड्याळ वापरले जायचे !

Next Post

सीबीआयचे अधिकारीसुद्धा ज्याला घाबरतात, तो ‘CVC रिपोर्ट’ नेमका काय असतो ?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सीबीआयचे अधिकारीसुद्धा ज्याला घाबरतात, तो 'CVC रिपोर्ट' नेमका काय असतो ?

एका वृद्ध जोडप्याच्या करुण प्रेमकथेवर बेतला होता ऑस्कर विजेता टायटॅनिक सिनेमा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.