The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून ‘किम जोंग’ सारखा नेता कुठल्याच देशाला मिळू नये..!

by Heramb
22 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


नॉर्थ कोरिया आणि किम जोंग-उन ही नावं आपल्या परिचयाची आहेत. ही नावं उच्चारल्यानंतर समोर येते ती किम जॉन्गची बटूमूर्ती आणि त्याची आक्र*मकता. नॉर्थ कोरिया ‘वेप*न्स ऑफ मास डि*स्ट्रक्शन’ आणि तत्सम शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेण्यासाठी प्रसिद्ध आणि आघाडीवर आहे. पण ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ हे अधिकृत नाव असलेल्या या ‘पीपल्स रिपब्लिक’मध्ये जगातील कोणताही व्यक्ती फार काळ टिकू शकत नाही. कारण तिथल्या लोकांवर अमर्याद निर्बंध आहेत. तिथलं आयुष्य नेमकं कसं असतं याचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न..

थोडक्यात इतिहास:

१९१० साली जपानने कोरियाचे राज्य पादाक्रांत केले आणि १९४५ साली, दुसरे महायु*द्ध संपताना जपानच्या शरणागतीनंतर थर्टीएठथ् पॅरेललवर कोरियाची फाळणी झाली. कोरियाच्या उत्तरेकडील भाग सोव्हिएट युनियनने आणि कोरियाच्या दक्षिणेकडील भाग अमेरिकेने ताब्यात घेतला. पुनर्विचार करून कोरियाच्या एकीकरणाचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि १९४८ साली उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये स्वतंत्र सरकारे स्थापन झाली.

थर्टीएठथ् पॅरेललच्या उत्तरेकडील भागाला ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ असे नाव देण्यात आले आणि तिथे साम्यवादी सरकारची स्थापना झाली, यालाच ‘नॉर्थ कोरिया’ म्हणूनही संबोधतात. तर थर्टीएठथ् पॅरेललच्या दक्षिणेकडील भागाला ‘रिपब्लिक ऑफ कोरिया’ असे नाव देण्यात आले आणि तिथे भांडवलशाही प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले यालाच ‘साऊथ कोरिया’ म्हणूनही संबोधतात.

दोन वर्षांनी १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्र*मण केले आणि कोरियन यु*द्धाची सुरुवात झाली. हे यु*द्ध ३ वर्षं सुरूच होते, अखेरीस १९५३ साली कोरियन यु*द्धविराम कराराने यु*द्धाची समाप्ती होऊन ‘डिमिलिटराइज्ड झोन’ स्थापन झाला. पण आजतागायत कोणत्याही औपचारिक शांतता करारावर स्वाक्षरी झाली नाही. आजही या दोन देशांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असते.

विचित्र आणि निर्बंधांचा देश:

उत्तर कोरियाला “विलग देश” देखील म्हटले जाते. हा जगातील सर्वात वेगळा पडलेला आणि कित्येक गुपितं राखणारा देश आहे. या देशात राहणाऱ्या नागरिकांना पाळीव प्राणी ठेवण्यासाठी, निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यासाठी, केस लांब ठेवण्यासाठी आणि अगदी गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी देखील सरकारी परवानगी घेणे आवश्यक असते.



कळस म्हणजे २०२० साली देशातील रेस्टॉरंटमध्ये पुरेसे मांस मिळावे यासाठी उत्तर कोरियाचा नेता किम जॉन्ग उन याने देशातील नागरिकांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांना सोडून देण्यास सांगितले होते. हा देश साम्यवाद, हुकूमशाही, जुलूमशाही आणि राजेशाही यांचे गोंधळात टाकणारे मिश्रण आहे. या पूर्व आशियात असणाऱ्या या ‘विचित्र’ देशाच्या सीमा चीन आणि रशियाला लागून आहेत.

आग लगी है बस्ती में, ‘नवाब’ अपनी मस्ती में:

जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असूनही नॉर्थ कोरियाच्या संसाधनांचा मोठा भाग अ*ण्वस्त्रे आणि बॅलिस्टिक मिसाईल्स तयार करण्यासाठी वापरला जातो. नॉर्थ कोरियाची लोकसंख्या सुमारे २ कोटी ५० लाख आहे. ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’च्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामधील तब्बल १ कोटी लोक कुपोषित आहेत. उत्तर कोरियाचा जीडीपी जगात २०८ व्या क्रमांकावर आहे

उत्तर कोरियातील बहुसंख्य लोकांकडे दोन वेळचं अन्न मिळेल इतके पैसे नसताना किम जोंग-उन त्याचे कपडे धुण्यासाठी ३५ लाख डॉलर्स खर्च करतो. त्याच्याकडे ८० लाख डॉलर्स  किमतीचे आलिशान जहाज आणि १ कोटी १७ लाख डॉलर्स किमतीच्या १०० मर्सिडीज बेंझचा ताफा देखील आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

सरकार-नियंत्रित किंमतीची धोरणे ही देशातील सामाजिक कल्याणासाठी असलेला धोका आहे. नागरी हक्क आणि जाचक सरकारी नियम यांमुळे सामान्य नागरिकांसाठी उत्तर कोरिया अत्यंत असुरक्षित देश आहे. अनेक मोठे देश आणि संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांमुळे देशातील आर्थिक स्थिती तर बिघडत चाललीच आहे पण इतर देशांबरोबर असलेलं शत्रुत्वही वाढत आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, उत्तर कोरिया हा एक विलग देश असून अमेरिकेने पर्यटनाच्या दृष्टीने नॉर्थ कोरियाला ‘लिस्ट फेवरेबल नेशन’चा दर्जा दिला आहे.

सरकारशी असहमत असल्या कारणाने उत्तर कोरियातील हजारो लोक तुरुंगात डांबले जातात किंवा त्यांना लेबर कॅम्प्समध्ये पाठवले जाते. उत्पादनात वैविध्य नसल्याने आणि अत्यंत जुने तंत्रज्ञान वापरल्याने उत्तर कोरिया अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण नाही. या देशाच्या अत्यंत कमी दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे जागतिक स्पर्धा आणि समकालीन जगाबरोबर ते स्पर्धा करू शकत नाही. नॉर्थ कोरियाने रशियाकडून बसेस आणि विमाने, जपानमधून कार, जर्मनीहून बस आणि चीनमधून टेलिफोन आयात केले आहेत.

नॉर्थ कोरिया – जगावरची टांगती तलवार:

१९०५ साली पोर्ट्समाउथच्या कराराने जपानला कोरियाचे संरक्षण राज्य म्हणून मान्यता दिली होती. १९४५ साली कोरियाची फाळणी झाली आणि उत्तरेकडीकल युएसएसआर समर्थक बनला तर दक्षिणेकडील भाग अमेरिकेचा समर्थक. नॉर्थ कोरियामध्ये कम्युनिस्ट नेता आणि हुकूमशहा किम इल-सुंग सत्तेवर आला. कोरियन युद्धापूर्वी ‘जुचे’ म्हणजेच ‘स्वावलंबन’ हे ब्रीदवाक्य त्याने स्वीकारले.

किम इल-सुंगच्या कार्यकाळात राज्य-नियंत्रित बाजार धोरण स्वीकारण्यात आले, त्यामुळे अल्पकालीन आर्थिक भरभराट झाली. नॉर्थ कोरियाने सुरुवातीपासूनच कौटुंबिक हुकूमशाहीचे राज्य असलेल्या एक-विचारप्रणालीच्या दहा तत्त्वांचे पालन केले आहे. किम जोंग-इलने स्वावलंबनाच्या धोरणात बदल करून लष्करी विकासाचे धोरण स्वीकारल्याने देशात राहणाऱ्या सामान्य लोकांकडे दुर्लक्ष झाले. १९९० च्या दशकात देशात साथीचा रोग आला, यात ३० लाख लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी नॉर्थ कोरियाने परदेशातून मिळणारी सर्व मदत नाकारली.

उत्तर कोरियाने ‘न्यूक्लिअर प्रोलिफेरेशन ट्रीटी’ (एनपीटी) या करारातून माघार घेतली, कारण या करारामुळे आण्विक शस्त्रास्त्र स्पर्धेवर मर्यादा येतात आणि २००६ साली नॉर्थ कोरियाने पहिली भूमिगत अणुचाचणी घेतली. पाच वर्षांनंतर किम जोंग-इलचाही वडिलांप्रमाणेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सध्या किम जोंग-उन नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा आहे. त्याने आपल्या काकांना त्याची आज्ञा न पाळण्यासाठी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दोनला ट्रम्प यांना किमच्या मृत्यूची खोटी बातमी दिल्याबद्दल जीवे मारले.

२०१६ ते २०१८ या काळात उत्तर कोरियाने तीन न्यूक्लिअर टेस्ट्स केल्या. तर याच काळात ३० लांब आणि कमी पल्ल्याच्या ‘इंटर-कॉन्टिनेन्टल’ बॅलिस्टिक मिसाईल्ससुद्धा नॉर्थ कोरियाने टेस्ट केल्या आहेत. आतापर्यंत तीन हुकूमशहा, ७४ वर्षांचे किम घराण्याचे शासन यांमुळे हा देश दिवसेंदिवस जगापासून भिन्न होत चालला आहे. 

आज नॉर्थ कोरियामध्ये साम्यवादी हुकूमशाही राजवट असूनही इतक्या समस्या आहेत. तर साऊथ कोरिया आर्थिकदृष्ट्या संपन्न असून सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, ह्युंदाई मोटर्स, पॉस्को अशा बड्या कंपन्या साऊथ कोरियामध्ये आहेत. साऊथ कोरिया गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत सुलभ देश असून तेथील नागरिकांवर निर्बंधांचा असा भडीमार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतीय संघातील खेळाडूंना BCCIने ‘हलाल’ मांस कंपल्सरी केलंय..!

Next Post

आपल्याकडे बिटकॉइनला अजून मान्यता नाही, आणि तिकडे बिटकॉइन सिटी तयार होतेय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आपल्याकडे बिटकॉइनला अजून मान्यता नाही, आणि तिकडे बिटकॉइन सिटी तयार होतेय

भटकंती - महड येथील श्री वरदविनायक मंदिर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.