The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आणि हि*टल*रने स्वतःच जर्मनी बेचिराख करण्याचा आदेश दिला

by ऋजुता कावडकर
12 December 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


२० एप्रिल १८८१ रोजी ‘ब्राऊनाऊ अम इन’ या ऑस्ट्रिया आणि हंगेरीच्या बॉर्डरवर असलेल्या गावात एलोइस आणि क्लारा पोलझल यांच्या घरी जर्मनीच्या भावी हुकुमशहाचा जन्म झाला.

तो हुकुमशाह म्हणजे ॲडॉल्फ हि*टल*र.

ॲ*डॉल्फचे वडील ऑस्ट्रिया सरकारमध्ये एक सामान्य कर्मचारी होते आणि ॲ*डॉल्फनेपण आपल्यासारखे कामाला लागावे अशी त्यांची इच्छा होती. पण त्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकला आणि तो व्हिएन्नाला येऊन ठेपला.

त्याला चित्रकार व्हायचे होते त्यासाठी त्याने व्हिएन्नात असणाऱ्या जगप्रसिद्ध ‘Academy of Fine Arts’मध्ये प्रवेश मिळवण्याची धडपड चालू केली. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. १९१३ पर्यंत तो व्हिएन्नामध्येच होता आणि तिथेच त्याच्या मनात हुकुमशाहीबद्दल प्रेम निर्माण झाले.



लोकशाही म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे असे त्याचे हळूहळू मत बनत गेले.

हि*टल*रच्या आयुष्यावर पहिल्या महायु*द्धाचा खूप मोठा परिणाम झालेला दिसतो. बव्हेरियाच्या यु*द्धात त्याने मोठी कामगिरी बजावली होती. पण जखमी झाल्याने त्याला जर्मनीला परत बोलावण्यात आले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पहिल्या महायु*द्धात पराभवाचे कारण म्हणजे राजकारणी लोक आहेत असे त्याचे स्पष्ट मत होते.

१९१९ साली त्याने ना*झी पक्षात प्रवेश केला आणि पक्ष बळकट करण्याचे काम चालू केले. डिसेंबर १९२१ मध्ये प्रांतिक निवडणुकांत या पक्षाला घवघवीत यश मिळाले, त्यानंतर जागतिक मंदीच्या काळात ना*झी पक्षाची लोकप्रियता वाढत गेली.

१९३३ साली हि*टल*रला जर्मनीचे चान्सलरपद मिळाले आणि ना*झी राजवटीला सुरुवात झाली. ज्यूंना अधिकार नाकारण्यात आले, विरोधकांचा काटा काढण्यात आला. ऑगस्ट १९३४ मध्ये हि*टल*र जर्मनीचा अध्यक्ष बनला, त्याने संरक्षण खाते स्वतःकडे घेतले.

अध्यक्ष, चान्सेलर, सरसेनानी आणि ना*झी पक्षप्रमुख. आता हि*टल*र खऱ्या अर्थाने जर्मनीचा हुकुमशाह बनला होता.

लगेचच १९३९ साली दुसऱ्या महायु*द्धाला सुरुवात झाली. १९४५ च्या सुरुवातीलाच जर्मनीच्या पराभवाला सुरुवात झाली. पश्चिम युरोपमधील मित्रपक्षांना हरवण्यासाठी हि*टल*रने एक शेवटचा प्रयत्न केला, अरडेन्स ऑफेन्सिव्ह, पण तो देखील अयशस्वी ठरला.

दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीच्या काळात मिळवलेल्या देशांवर कब्जा करायला रशियाने सुरुवात केली होती. एका बाजूला अमेरिका आणि इंग्लंड, तर दुसरीकडे रशिया अशा परिस्थितीत आपल्याला विजय मिळणे शक्य नाही हे हि*टल*रच्या लक्षात आले. आणि यावर त्याने एक शेवटचा उपाय शोधून काढला.

मार्च १९४५ मध्ये हि*टल*र ने “Demolition of Reich Decree”, (निरो डिक्री) हा हुकूमनामा काढला. ज्याद्वारे दोस्त राष्ट्रांना जर्मन इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना जमीनदोस्त करण्याचे हि*टल*रच्या मनात होते.

“शत्रूने जे काही नष्ट केले आहे किंवा तात्पुरते बंद केले आहे जसं की, दळणवळणाच्या सुविधा, औद्योगिक आस्थापने, त्या हे सगळं संपल्यावर पुन्हा वापरात आणता येतील असा विचार करणे चुकीचे आहे. जेव्हा शत्रू इथून माघार घेईल त्यावेळी आपल्या जनतेला, त्यांच्या गरजांना लक्षात न घेता तो आपलेच शहर संपूर्ण नष्ट, भकास करुन सोडेल.”

यातून आपल्याला दुसऱ्या “Shame Of Versailles”ची भीती दिसून येते. “Shame Of Versailles” हा हि*टल*रच्या प्रचाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. पहिल्या महायु*द्धाच्या पराभवाचे कारण म्हणजे जर्मनीच्या नेत्यांची विजयी राज्यांशी योग्य वाटाघाटी करण्याची असमर्थता, असे त्याचे मत होते. त्याचा उदय होत असताना त्याने जर्मनीची अधोगती, १९२३चे ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन अशा घटनांना पहिल्या महायु*द्धाच्या विजयी देशांना कारणीभूत ठरवले. आणि Versaillesच्या तहासारखा तह पुन्हा होऊ नये म्हणून त्याने हा उपाय काढला.

“सैन्याची वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा, इतर औद्योगिक आस्थापना, Reich परिसरातील जे जे महत्वाचे आहे, किंबहुना जे शत्रू आपल्या विरोधात वापरू शकेल अशा सर्व गोष्टींना नष्ट करण्यात यावे.”

असा अध्यादेशच हि*टल*रने काढला.

रशियामध्ये यापूर्वी कमीतकमी दोन वेळा अशा प्रकारे सगळ्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या. फ्रांस आणि जर्मनीने या आधी दोन वेळा रशियावर विजय मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. (नेपोलियनची रशिया मोहीम आणि हि*टल*रचे ऑपरेशन बार्बारोसा.) या दोन्ही मोहिमांमध्ये अपयश हाती लागण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आपल्या पायाभूत सुविधा, सैन्य शिबिरे, शत्रूच्या कामाला येतील अशा कुठल्याही सुविधा पद्धतशीरपणे नष्ट करण्याची रशियाची क्षमता.

रशियाने आपल्या देशात शत्रूचा शिरकाव होऊ नये यासाठी सगळे नष्ट केले होते पण हि*टल*रने काढलेल्या आदेशात असे काही उद्दिष्ट दिसले नव्हते. काही इतिहासकारांच्या मते हि*टल*रचा आपल्या नागरिकांवर राग होता. हि*टल*रच्या मते, जर्मन लोकांनी त्याला, त्यांच्या देशाला यु*द्धात धोका दिला होता. त्यांनी शौर्याने न लढून त्याचा विश्वासघात तर केलाच पण त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा देखील अपमान केला होता आणि त्याचे परिणाम त्यांनी भोगलेच पाहिजे.

हि*टल*रच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम अल्बर्ट स्पिर याच्याकडे होते. त्यांनी हा आदेश धुडकावून लावला. त्यांचा आता हि*टल*रवरचा विश्वास उडाला होता आणि हि*टल*रचे मानसिक संतुलन ढासळले असल्याने त्याने हा आदेश दिला आहे असे त्यांचे मत होते.

हि*टल*रला मात्र याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्याला त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये स्पिरनी ही बातमी दिली. हि*टल*रला जेव्हा हे कळले त्यावेळी त्याच्या स्वभावानुसार तो स्पिरला मारण्याचे आदेश देईल असे वाटले होते पण असे घडले नाही.

शासक आणि नेता म्हणून हि*टल*र किती कुप्रसिद्ध असला तरी एक यो*द्धा म्हणून त्याची कर्तबगारी नाकारता येणे शक्य नाही. त्याने पहिल्या महायु*द्धाच्या हानीतून सावरून जर्मनीला उभे केले, प्रगत केले परंतु याचा जर्मनीला फारसा  उपयोग झाला नाही.

अखेर मित्र देशांपुढे जर्मनीचा पाडाव झाला. बर्लिन शहर रशियाच्या ताब्यात जात असताना त्याने त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्याशी लग्न केले. आणि ३० एप्रिल १९४५ रोजी आत्मह*त्या करून जगातील सगळ्यात मोठ्या हुकुमशहाने स्वतःला संपवले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्या प्राचीन हडप्पा संस्कृतीतील लोकांचा पेहराव कसा होता…?

Next Post

फातिमा इस्माईल – या महिलेने पोलियोमुक्त भारताचा पाया रचलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

फातिमा इस्माईल - या महिलेने पोलियोमुक्त भारताचा पाया रचलाय

मासिक पाळीबाबतचा टॅबू कधी संपणार...?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.