The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेन्री फोर्डने ‘लवासा’पेक्षा भारी सिटी उभारली होती जी लवासापेक्षा जास्त फ्लॉप गेली

by द पोस्टमन टीम
24 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगातील यशस्वी लोकांच्या यादीत हेन्री फोर्ड हे नाव बरेच वर आहे. फोर्ड कंपनीचे संस्थापक असलेल्या हेन्री फोर्ड यांच्यासारखे असामान्य यश फार थोड्या लोकांना मिळते. आजही व्यावसायिक होण्याची स्वप्ने पाहणारी अनेक तरुण हेन्री फोर्ड यांच्या जीवन चरित्रापासून प्रेरणा घेतात.

हेन्री फोर्ड यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात स्थापन केलेली कंपनी आज एकविसाव्या शतकातही एक टॉपची कंपनी आहे. यामागे हेन्री फोर्ड यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची दूरदृष्टी आहे, यात दुमत नाहीच. पण, याच हेन्री फोर्ड यांनी फोर्डलँडिया नावाचे एक गाव वसवण्याचा चंग बांधला होता, जो सपशेल अयशस्वी ठरला. हेन्रींनी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही त्यांना हवे तसे त्यांच्या स्वप्नातील आदर्श गाव वसवण्यात ते अपयशी का ठरले? जाणून घेऊया या लेखातून.

फोर्ड यांना ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या जंगलात एक नवे शहर वसवायचे होते. यासाठी त्यांनी तिथे कामगार पाठवून काम सुरु केले. १९२८ साली त्यांनी ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात फोर्डलँडिया हे शहर उभे केले पण, त्यात ते पूर्णतः अपयशी ठरले.

या गावात त्यांना रबराची शेती करायची होती. ब्राझीलच्या जंगलात रबराची झाडे उगवून त्यापासून रबर उत्पादन करण्याचे त्यांचे नियोजन होते.



फोर्ड मोटार कंपनीच्या गाड्यांसाठी रबराची गरज होतीच. हे रबर बाहेरून मागवण्यापेक्षा आपणच रबराचे उत्पादन केल्यास कंपनीलाही फायदा होईल आणि ब्राझीलच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना उत्पन्नाचे ठोस साधन निर्माण होईल असा त्यांचा विचार होता.

त्यांच्या कल्पनेतील हे शहर अगदी १९३० च्या दशकातील नॉर्थर्न मिशिगनसारखेच होते. हे शहर उभारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण, त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

रिओ टपाझो नदीच्या काठावरील २५ लाख एकराची जमीन त्यांनी विकत घेतली. अमेरिकेतील कनेक्टिकट किंवा डेलावेर ही छोटी राज्येच एवढ्या आकाराची आहेत. फोर्ड यांच्या या कल्पनेतील नगराची नेहमीच टेनेसीशी तुलना केली जात असे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ॲमेझॉनच्या जंगलात शेती आणि उद्योगाशी संबधित काही नवे प्रयोग करता येतील का याची चाचपणी म्हणून फोर्ड यांच्या या प्रयोगाकडे पहिले जात होते. ब्राझिलच्या जंगलातील हवामान, तिथल्या लोकांची संस्कृती, त्यांचे राहणीमान आणि जीवनशैली यांचा विचार न करताच त्याच्यावर अमेरिकेतील प्रगत नागरी जीवनशैली थोपवण्याच्या नादात फोर्ड यांची ही एक चांगली कल्पना बासनात गुंडाळून ठेवावी लागली.

फोर्ड यांनी केलेली पहिली चूक म्हणजे, ॲमेझॉनच्या या जंगलात रबराची शेती करण्यापूर्वी त्यांनी एकाही जीवशास्त्रज्ञाचा सल्ला घेतला नाही.

ज्याठिकाणी फोर्ड रबराची शेती करणार होती तिथल्या जमिनीचा पोत, हवामान याचा काही एक विचार न करता त्यांनी त्या क्षेत्रात दाटीवाटीने रोपांची पेरणी केली. यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. जमिनीत मुंग्या लागणे, विंचू, विषारी साप, पाने खाणारी कीटक यांची बेसुमार वाढ झाली.

आशियामधे जी रबराची शेती केली जाते, तिथे ब्राझीलमधूनच रबर नेण्यात आला पण तिथे अशा समस्या भेडसावत नाहीत. त्यामुळे तिथे रबराचे उत्पादन चांगले निघते.

फोर्डलँडिया शहर वसवण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा तिथे लोकांनी अमाप गर्दी केली. हॉटेल्स, ग्रंथालय, गोल्फ कोर्स, अशा अनेक सुविधा या शहरात निर्माण केल्या गेल्या. शहराची लोकसंख्या वाढत गेली तसतसे सगळ्या प्रकारचे व्यवसाय टेलरिंग, छोटी दुकाने, बेकरी, चपला शिवणारे, अशा सगळ्यांची रेलचेल वाढली. त्या वसवण्यात आलेल्या शहराला लोकवस्तीचे रूप आले. इथल्या लोकांच्या सर्व गरजा भागवल्या जाऊ लागल्या.

इतर ठिकाणपेक्षा इथल्या कामगारांना दुप्पट पगार दिला जाऊ लागला. त्यामुळे ब्राझीलच्या त्या परिसरातील स्थानिक कामगार फोर्डलँडियाकडे आकर्षित होऊ लागले.

अल्पावधीतच हे शहर एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. फोर्ड यांच्यासोबत काम करणाऱ्या, डिस्नी लँड बनवणाऱ्यांना देखील या शहराबद्दल कुतूहल वाटू लागले. त्यांनी वॉल्ट डिस्ने यांनीही या शहराला भेट दिली. गंमत म्हणजे स्वतःच वसवलेल्या या शहराला फोर्ड यांनी कधीच भेट दिली नाही. या शहरात काय झाले पाहिजे आणि काय नाही याचे निर्णय त्यांनी आपल्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये बसूनच घेतले.

फोर्डलँडियाचा प्रयोग अयशस्वी झाला, पण डिस्नेलँडने इथल्याच काही कल्पना उचलून त्याची कॉपी केली. जसे की रिव्हर बोट राईड असेल किंवा स्टीम शिप राईड असेल.

इतके सगळे चांगले चालत असतानाही फोर्ड यांच्या दोन चुका इतक्या महागात पडल्या की मुद्दामहून वसवलेले हे शहर पुन्हा एकदा ओसाड पडले. यातील पहिली चूक होती फोर्डलँडियामधील कामगारांवर हेल्दी लाइफस्टाइलच्या नावाखाली अमेरिकन जीवनशैली लादणे.

ब्राझीलियन कामगारांवर अमेरिकी जीवनशैली लादण्याचा प्रयत्न केल्याने इथे एक नवा सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला. ब्राझीलच्या उष्ण दमट प्रदेशात लोक सकाळी लवकर उठतात आणि कामाला लागतात. मधल्या काळात जेव्हा उन्हाची तीव्रता वाढते तेव्हा ते विश्रांती घेतात आणि उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर पुन्हा उठून कामाला लागतात. ही त्यांची जीवनशैली त्यांच्या हवामानाला अनुसरून योग्य अशीच होती.

फोर्ड यांनी त्यांच्यावर अमेरिकी जीवनशैलीनुसार ९ ते ५ यावेळेतच काम करण्याची सक्ती केली. या वेळेच्या बंधनामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला.

अमेरिकन सणवार साजरे करण्याची सक्ती करण्यात आली. त्यांना राहण्यासाठी जी घरे बांधून दिली होती ती सुद्धा अमेरिकन पद्धतीची होती. स्थानिक कामगारांच्या जीवनशैलीतील या हस्तक्षेपामुळे कामगार वर्गात नाराजी पसरली त्यांना सगळ्या सुविधा तर दिल्या होत्या पण त्या त्यांच्या मनासारख्या नव्हत्या.

डोंगराळ भागात लावलेल्या रबराच्या रोपांची वाढ खुंटली, पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने ही झाडे कोमेजून गेली. या पिकातून अपेक्षित उत्पन्न आले नाहीच उलट यासाठी केलेला सगळा खर्चही वाया गेला. फोर्ड यांनी ज्या लोकांवर या पिकाच्या निगराणीचे काम सोपवले होते त्यांना फलोत्पादन आणि बागकाम यातील काहीच ज्ञान नव्हते. त्या लोकांनी अनेक उपाय योजले तरीही ते पिक वाचवू शकले नाहीत.

फोर्ड स्वतः आयुष्यभर जी जीवनशैली अनुसरली तीच जीवनशैली त्यांनी कामगारांवरही थोपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रथा रूढी सणवार यांचे पालन करायचे नाही, असा नियम घालण्यात आला. इतकेच नाही तर, स्वतः फोर्ड यांना मद्यपान आणि स्त्रिया या दोन गोष्टीत अजिबात रस नव्हता म्हणून त्यांनी कामगारांनाही या गोष्टी वर्ज्य करण्यास सांगितल्या. कामगारांच्या घरातही बायका चालणार नाहीत, या नियमाने तर कामगारांना आणखीनच उद्युक्त केले.

फोर्ड त्यांना आवश्यक त्या सगळ्या बाबी पुरवत असतानाच स्वतःची जीवनदृष्टी त्यांच्यावर लादत होते. या सगळ्याच्या बदल्यात कामगारांना जास्त पगाराचे आमिष देत होते. पगाराच्या बदल्यात कामगारांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे ही फोर्ड यांची दुसरी मोठी चूक ठरली.

१९३० मध्ये फोर्डलँडियामधील सगळ्या कामगारांनी संप पुकारला. ३६५ दिवस आम्हाला मशीनप्रमाणे राबवून घेतले जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला. या संपाने फोर्डलँडियाच्या विनाशाचा पाया घातला.

हळूहळू कामगारांनी हे शहर सोडले. पण फोर्ड यांनी आपले शहर वसवण्याचे आणि स्वतःची रबराची शेती करण्याचे स्वप्न मात्र सोडले नाही. त्यांनी अमेझॉनमधेच आणखी जमीन खरेदी केली. इथेही त्यांनी तेच प्रयोग सुरु केले. मात्र फोर्डलँडिया पुन्हा उभे राहू शकले नाही.

अमेझॉनच्या जंगलात या अपयशी प्रकल्पाचे अवशेष आजही पाहायला मिळतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘तूतनखामेन’च्या शापित थडग्याचा शोध घेणाऱ्या सर्वांचाच रहस्यमय मृत्यू झाला होता

Next Post

मीर कमरुद्दीन – मुघलांसोबत बंड करणारा पहिला निझाम

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मीर कमरुद्दीन - मुघलांसोबत बंड करणारा पहिला निझाम

अनेकांना माहिती नाही पण अमेरिकेलासुद्धा एक सम्राट होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.