The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फोन केल्यावर किंवा उचलल्यावर आपण ‘हॅलो’च का म्हणतो?

by Heramb
7 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“फोन उचलल्यानंतर ‘हॅलो’ म्हणणे हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे. पण इथे मात्र दुपारच्या वामकुक्षीतून जागे झाल्यासारखं दाखवून तुसडेपणाने ‘कोणे?’ असं म्हणायचं!” पुलंच्या शैलीतील या अजरामर वाक्याने ‘हॅलो’ म्हणणे हा जागतिक शिष्टाचार आहे हे समजले. सहसा अशा बारीक-सारीक गोष्टींवर आपण लक्ष देत नाही. पण कलाकार मात्र बरोबर त्या गोष्टी हेरून माणसाला एकप्रकारे त्याबद्दल जाणीव करून देतात. परंतु ‘हॅलो’ म्हणणे हे फोन उचलल्यानंतर किंवा केल्यानंतर कम्पलसरी का होऊन बसलं असेल?, हे जाणून घेण्यासाठीच हा प्रपंच..

एकेकाळी दूरध्वनी आणि टेलिग्राफचा वापर देखील एका आश्चर्यासारखा होता. या शोधांनी जगातील संदेशांची देवाणघेवाण सुलभ केली. तेव्हापासून आजपर्यंत दूरसंचार क्षेत्रात एक मोठी क्रांतीच झाली आहे. एकोणिसाव्या शतकात टेलिफोन, टेलिग्राफ इत्यादी यंत्रांद्वारे प्रथमच काम सुरु झाले. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवले गेले तसेच पहिल्यांदाच टेलिफोनही वाजला. आता दूरसंचार क्षेत्रात मोठे आधुनिकीकरण झाले आहे. टेलिफोनवर “हॅलो” हा शब्द प्रथम कसा वापरला गेला हे जाणून घेणे देखील मनोरंजक ठरेल. हॅलो आणि टेलिफोनचे नाते यानंतर कायमचे जोडले गेले.

अलेक्झांडर ग्राहम बेलने २ जून १८७५ रोजी टेलिफोनचा शोध लावला. मात्र, त्याच्या पेटंटसाठीही त्याला खूप कष्ट घ्यावे लागले. त्याला ७ मार्च १८७६ रोजी दूरध्वनीचे पेटंट मिळाले. आज, जेव्हा आपण टेलिफोन किंवा मोबाईलवर फोन करतो, तेव्हा सर्वप्रथम आपण ‘हॅलो’ म्हणूनच बोलायला सुरुवात करतो. ग्राहम बेलने त्याची मैत्रीण ‘मार्गारेट हॅलो’मुळे फोनवर हॅलो म्हटले आणि तेच प्रत्यक्षात पुढे सुरु झाले असे म्हटले जाते.

ग्रॅहम बेल वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पदवीधर झाले. यानंतर, वयाच्या १६ व्या वर्षी ते एक महान संगीत शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. ग्राहम बेलच्या आईला ऐकायला त्रास होत होता. ग्राहम बेल आपल्या आईच्या या समस्येमुळे खूप दुःखी आणि निराश असायचे. यामुळेच त्याला श्रवणदोष असलेल्यांना मदत करण्यासाठी एक विशेष उपकरण बनवायचे होते. कर्णबधिर लोकांसाठी वरदान ठरलेले असे उपकरण बनवण्यात तो यशस्वी झालाच, पण या प्रयत्नात त्याने टेलिफोनचा शोधही लावला.

ग्रॅहम बेलच्या पत्नीलाही ऐकायला त्रास होत होता. टेलिफोननंतर ग्रॅहम बेलने १८८० साली फोटोफोन तयार केला. हे तंत्र प्रकाश-किरणांद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आवाज पाठवण्यासाठी वापरले जाते. लोकांना हे फोटोफोन्स फारसे आवडले नाहीत, परंतु आजचे  ‘ऑप्टिकल फायबर केबल’ तंत्रज्ञान ग्राहम बेलच्या तत्त्वांवर कार्य करते. याच तंत्रज्ञानावर आज आपल्याला इंटरनेट वापरता येत आहे.



टेलिफोनवर संभाषण सुरू होताच ‘हॅलो’ म्हणण्याच्या जागतिक प्रथेविषयी एक कथा आहे. बेलच्या मैत्रिणीचे नाव मार्गारेट हॅलो होते असे म्हटले जाते. त्यामुळे फोनवर बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी बेल प्रत्येक वेळी हॅलो म्हणू लागला. पण, ही कथा एक मिथक असल्याचे दिसून येते, कारण त्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.

बेलने त्याच्या मैत्रिणीशीच लग्न केले होते. त्याच्या पत्नीचे नाव ‘मॅबेल गार्डिनर हबर्ड’ होते. त्याने १८७७ साली मॅबेलशी लग्न केले. ग्राहम बेल हॅलो कधीच वापरत नव्हते असे अमेरिकन टेलिग्राफ आणि टेलिफोन कंपनीचे दस्तऐवज सिद्ध करतात. त्याने प्रथम आपल्या सहाय्यकाला फोनवर सांगितले, ‘कम हिअर, आय वॉन्ट टू सी यू’ बेलने दूरध्वनीवर बोलत असताना “अहोय”चा वापर केल्याचे मानले जाते.

जर बेलने हॅलोचा ट्रेंड सुरू केला नाही, तर त्याचा वापर कोणी सुरू केला असा प्रश्न आता उद्भवतो. वास्तविक, दूरध्वनीवर संभाषण सुरू करण्यापूर्वी, ‘आर यू देअर किंवा आर यू रेडी टू टॉक’ अर्थात ‘तुम्ही तिथे आहात? किंवा तुम्ही बोलण्यास तयार आहात?’ सारखी वाक्ये अनेकदा बोलली गेली. अमेरिकन टेलिग्राफ आणि टेलिफोन कंपनीच्या कागदपत्रांनुसार, अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसनला इतके लांब वाक्य आवडले नाही. जेव्हा त्याने पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्याने चुकून ‘हॅलो’ वापरला आणि हा शब्द अंमलात आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

१८७७ साली त्यांनी पिट्सबर्गच्या ‘सेंट्रल डिस्ट्रिक्ट अँड प्रिंटिंग टेलीग्राफ कंपनी’चे अध्यक्ष टीबीए स्मिथ यांना एक पत्र लिहून म्हटले की, ‘हॅलो ही पहिली गोष्ट टेलिफोनवर बोलली पाहिजे’. हॅलो हा शब्द १८८० साली पूर्णतः स्वीकारला गेला. एटी अँड टीचे अध्यक्ष फ्रेडरिक पेरी फिश यांनी १९०७ साली फोनवर हॅलो म्हणण्याच्या प्रथेचे श्रेय एडिसनला दिले.

ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार ‘हॅलो’ हा शब्द जुन्या जर्मन शब्द हल्ला, होला या शब्दातून आला आहे. हे शब्द खलाशांनी वापरले होते. याचा अर्थ तुम्ही कसे आहात किंवा तुम्ही तेथे आहात किंवा तुम्ही ऐकत आहात. रात्रीच्या वेळी खलाशी एकमेकांशी संपर्क साधत असत आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असत तेव्हा ‘अहो! ‘होय’ हे शब्दही वापरले गेले. हॅलोचा वापर सर्वप्रथम १८२७ साली झाला. हा शब्द जुन्या फ्रेंच किंवा जर्मन शब्द ‘होला’ वरून आला आहे, याचाच अर्थ ‘कसे आहात?’ असा होतो.

१८३० च्या दशकात लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हॅलोचा वापर करण्यात आला. हॅलो हा शब्द सर्वप्रथम १८३३ साली लेखनात वापरला गेला. हा शब्द १८८३ साली नोहा वेबस्टर डिक्शनरीमध्ये घेण्यात आला. १८६० सालापासून हॅलो शब्द सामान्यतः सगळीकडे वापरला गेला.

तर अशी होती हॅलोची कहाणी. अशाच मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचत राहा “द पोस्टमन“!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मेलेला राजा साधू बनून परत आला, प्रकरण लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलपर्यंत गेलं..!

Next Post

तिला ‘फाशीची शिक्षा’ भोगून झाल्यानंतर, उर्वरित आयुष्य जगण्याची परवानगी देण्यात आली होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

तिला ‘फाशीची शिक्षा’ भोगून झाल्यानंतर, उर्वरित आयुष्य जगण्याची परवानगी देण्यात आली होती

विश्वास बसणार नाही, पण हे अदृश्य शिल्प एका माणसाने १८ हजार डॉलर्सला खरेदी केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.