The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

by द पोस्टमन टीम
11 April 2021
in राजकीय, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दोन देशांच्या दरम्यान झालेल्या आक्रमक युद्धांबद्दल तुम्ही ऐकले असेल. युद्ध जरी काही दिवस चालतं तरी त्यासाठीची पूर्वतयारी कित्येक वर्षांपासून चालू असते. आज आपण एका अशा युद्धाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात चिमुकल्या इस्राइलने बलाढ्य अमेरिकेला हादरवून सोडले होते. यावेळी इस्त्राइलने अमेरिकन नौदलाच्या एका जहाजावर हल्ला केला होता, ज्यात अनेक अमेरिकन लोक मारले गेले होते. हा हल्ला केल्यानंतर इस्त्राइलने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की हल्ला नजरचुकीने करण्यात आला होता.

गंमत आहे की नाही एक छोटासा देश एका बलाढ्य महासत्तेवर नजरचुकीने हल्ला करतो. पण हे सत्य आहे. चला या घटनेबद्दल जाणून घेऊया…

अमेरिकेने युएसएस लिबर्टी या जहाजाला भूमध्य समुद्रात तैनात केले होते. सात हजार टन वजनाच्या या जहाजाला अमेरिकन सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात समुद्रात उतरवले होते. या जहाजाचा वापर अमेरिकेकडून रसद पुरवण्यासाठी करण्यात येत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या जहाजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता, तेव्हापासून हे जहाज त्याच ठिकाणी अमेरिकेने तैनात केले होते. इजिप्त आणि गाझा-पट्टी दरम्यानचे युद्ध भडकल्यानंतर अमेरिकेने हे जहाज पुन्हा समुद्रात उतरवले.

अमेरिकेने मालवाहतूक करणाऱ्या जहाजाला आपल्या सैनिकी जहाज म्हणून वापरण्यास सुरुवात केली. लिबर्टी जहाजाला आफ्रिकेच्या पश्चिम तटावर देखील तैनात करण्यात आले.

१९६७ साली इस्त्राइल आणि अरब राष्ट्रांच्या दरम्यान युद्ध छेडले. १९५० साली इजिप्तकडून इस्त्राइलला पाणी पुरवठा करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्यात आले. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आले. इजिप्त आणि इस्त्राइल यांच्यातील तणाव अरब युद्धावेळी वाढतच गेला, याचा परिणामस्वरूप अरबी देश इजिप्तच्या पाठीशी उभे राहिले. जॉर्डन आणि आणि सीरिया या दोन इस्त्राइलच्या शेजारी राष्ट्रांनी देखील इजिप्तची बाजू घेतली. १९६७ पर्यंत दोन्ही देशातील संबंध इतके ताणले गेले की त्यांनी एकमेकांवर आक्रमण करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली.



अरबी राष्ट्रांशी असलेले संबंध बिघडत असल्याचे पाहून इस्त्राइलने अरबी राष्ट्रांच्या विरोधात मोर्चा उघडला. इजिप्तने इस्राइलच्या जहाजांना अरबी समुद्रात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला, यामुळे समुद्रात मोठ्या युद्धाचे शिंग फुंकले गेले. इस्त्राइलच्या वायुसेनेच्या निशाण्यावर त्यावेळी इतर देशांचे पाण्याचे जहाज होते. हे सर्व पाण्याचे जहाज भूमध्य सागरात होते, या पाण्याच्या जहाजांमध्ये अमेरिकेची युएसएस लिबर्टी ही नौका देखील होती.

अमेरिकेने लिबर्टी जहाजाला एका खास लष्करी कारवाईसाठी तैनात केले होते. या जहाजाच्या मदतीने या प्रदेशावर लक्ष ठेवण्याचे काम अमेरिका करत होती. या भागात आपले वर्चस्व कायम रहावे, हा उद्देश अमेरिकेचा हे जहाज तैनात करण्यामागे होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इस्त्राइल आणि इतर अरब राष्ट्रातील परिस्थिती चिघळली. अरबी राष्ट्रांनी इस्त्राइलच्या विरोधात मोर्चा उघडला. यामुळे इस्त्राईलने अरबी समुद्रातील जहाजांवर नजर ठेवायला सुरुवात केली. ८ जून १९६७ मध्ये इस्त्राईलच्या सैन्याला अमेरिकेचे लिबर्टी जहाज नजरेस पडले. इस्त्राइलच्या सैन्याने लगेचच कारवाई करण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

इस्राइलच्या सैन्याने लगेचच त्यांना एक जहाज नजरेस पडल्याची सूचना आपल्या वायुसेनेला केली. सूचना मिळताच इस्राइलचे विमान त्या जहाजाच्या दिशेने झेपावले. त्यांनी लगेचच त्या जहाजावर हल्ला चढवला. इस्राइलच्या वायुसेनेने तत्काळ एक मिसाईल त्या जहाजावर डागली. इस्राइलने आपल्या जहाजांच्या मदतीने त्या जहाजावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. इस्राइलच्या एकाएकी हल्ल्याने सर्वत्र खळबळ माजली. अमेरिकन सैन्य यामुळे प्रचंड हैराण होते.

इस्राइल हवाई आणि जलमार्गातून हल्ले करते आहे, हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. बघता बघता थोड्या वेळातच संपूर्ण जहाज अचानक गायब झाले. या हल्ल्यात तब्बल ३४ अमेरिकन सैनिक मारले गेले.

युएसएस लिबर्टीवरील हल्ल्याची बातमी अमेरिकेपर्यंत पोहचली, इकडे इस्राइलला देखील त्यांनी चुकून अमेरिकन जहाजावर हल्ला केल्याचे लक्षात आले होते. पण आता खूप उशीर झाला होता. 

इस्राइलच्या या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रात चर्चा सुरु झाली होती. चारही बाजूने इस्राइलवर दबाव वाढत चालला होता. या दबावामुळे इस्राइलकडून अनेक स्टेटमेंट देण्यात आले. त्यांनी आपल्या सैन्याने चुकून लिबर्टीवर हल्ला केल्याचे कबूल केले. इस्राइलने स्पष्टीकरण देताना असे देखील म्हटले होते की त्यांनी लिबर्टी जहाजाला मागे जाण्याची सूचना चेतावणी दिली होती, पण जहाजावरील कर्मचारी वर्गाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला करण्यात आला.

इस्राइलने एका पत्रकात अमेरिकन जहाजावर ते अमेरिकेचे आहे, हे दर्शविणारे चिन्ह नसल्याचे देखील म्हटले होते. ते जहाज वारंवार इस्राइलच्या हद्दीत प्रवेश करत होते, त्यामुळे इस्राइलच्या सैन्याच्या रडारवर ते जहाज आले असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले होते. इस्राइलने सुरक्षेच्या दृष्टीने त्या जहाजावर हल्ला केला असे स्पष्ट केले.

युएसएस लिबर्टीवर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी इस्राइलने अमेरिकेची जाहीर माफी मागितली आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या परिवाराला अनुदान देण्याचे देखील मान्य केले होते. इस्राइलने तब्बल ६.९ दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई अमेरिकेला देऊ केली होती.

इस्राइलने इजिप्तचे जहाज समजून चुकून हल्ला केल्याचे म्हटले होते. लिबर्टीवर उपस्थित असलेल्या काही जिवंत अधिकाऱ्यांनी मात्र हा हल्ला एका ठरवून केलेल्या कटाचा भाग असल्याचे म्हटले होते. जहाजावर हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्याला इस्राइलने पदक दिल्याचे देखील अनेकांनी म्हटले होते.

आजही अनेक अमेरिकन लोकांना हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे वाटते. पण इस्राइल मात्र अजूनही हल्ला नजरचुकीने झाला असल्याचे म्हणतो, त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे की नाही, हा मात्र आता वादाचा विषय आहे. पण इस्राइलच्या माफीनाम्यामुळे हे प्रकरण थोडक्यात आवरले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

Next Post

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

विश्वास बसणार नाही पण हा माणूस अठरा वर्षे विमानतळावर अडकून पडला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.