The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एवढे आधुनिकीकरण झाले तरीही अजून कच्च्या तेलाचे सर्व व्यवहार ‘बॅरेल’मधेच होतात

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


देशातील महागाई मोजण्याचे एकक बनलेले पेट्रोल-डिझेलचे दर आज शिगेला पोहोचलेत. कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल नेहमीच सगळे उत्सुक असतात.

कच्चे तेल म्हणजे नक्की काय.? हा विचार तुम्ही कधी केलाय का.? कच्चे तेल मोजण्यासाठी वापरण्यात येणारे गॅलन हे एकक नेमके काय आहे.? एक गॅलन म्हणजे किती लिटर.? तेल वाहुन नेण्यासाठी बॅरेलचा वापर होत नसला तरी आजही तेलाचे दर बॅरेलनुसार का ठरवला जातो.? असे काही रंजक पण बऱ्याचदा अनुत्तरीत राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कच्च्या तेलाला ‘काळे सोने’ असंही म्हणतात. या नावात कच्च्या तेलाचा रंग आणि त्याची किंमत या दोन्हीचाही अंदाज आपल्याला येतो.

कच्च्या तेलापासुन मिळवल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल यांचा इंधन म्हणून वापर करुन रस्त्यावर गाड्या धावतात. परंतु कच्च्या तेलातुन फक्त पेट्रोल आणि डिझेलच मिळते असं नाही.

आधी आपण तेलाचे प्रकार जाणून घेऊयात.



कच्च्या तेलाला ‘हलके’ आणि ‘जड’ या दोन मुख्य प्रकारात विभागले जाते. हलक्या तेलाची विस्मयकारकता कमी असते म्हणजेच वाहण्याची क्षमता जास्त असते. तर रंग फिकट असतो. सल्फरचे प्रमाणही कमी असते. तेच जड तेलाची विस्मयकारकता जास्त असते म्हणजेच वाहण्याची क्षमता कमी असते. रंग अगदी गडद आणि सल्फरचे प्रमाणही जास्त असते. जड तेलाला तापवून त्याची विस्मयकारकता कमी केली जाते. जड तेल बहुतेकदा स्वस्त आणि खालच्या दर्जाचे म्हणून ओळखले जाते.

कच्च्या तेलाचे सल्फरच्या प्रमाणावरुन अजुन २ प्रकार पडतात. ते म्हणजे गोड आणि आंबट. गोड तेलात सल्फरच्या संयुगांचे प्रमाण कमी असते तर तेच आंबट तेलात सल्फरची संयुगे मोठ्या प्रमाणात आढळतात. तेलाचे एवढेच प्रकार पडतात असे नक्कीच नाही. ज्या ज्या ठिकाणी तेल भुगर्भातुन बाहेर काढले जाते त्या प्रत्येक ठिकाणी तेलाचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे परिमाण वापरले जातात.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

जगात कच्च्या तेलाचे २८० वेगवेगळे नाव आणि प्रकार आहेत. प्रत्येक ठिकाणच्या तेलात सापडणारे गुणधर्म त्या तेलाला वेगळं आणि विशेष बनवतात.

कच्च्या तेलाचा त्याच्या मुळ रुपात काहीही उपयोग नसतो. शुद्धीकरण करून त्यातून वेगवेगळे उपयोगी तेल मिळवले जातात. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला ऊर्ध्वपातन असे म्हणतात. त्यासाठी कच्चे तेल उच्च तापमानात तापवले जातात. कच्च्या तेलात असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा उत्कलनांक वेगवेगळा असल्याने ते वेगवेगळ्या तापमानास उकळून वाफेच्या रुपात बाहेर पडतात. पुढे संक्षेपण प्रक्रियेचा वापर करून त्यांना पुन्हा द्रव रुपात मिळवले जाते.

काही मुलद्रव्ये मिळवण्यासाठी क्रॅकिंग प्रक्रियेचा वापर केला जातो. तेलातील जड मुलद्रव्यांना तोडुन छोट्या गैसोलिनच्या मुलद्रव्यात रुपांतरीत केले जाते.

एका बॅरेलमध्ये ४२ गॅलन तेल सामावलेले असते. तर एक गॅलन म्हणजे ३.७८ लिटर एवढे कच्चे तेल असते. आता आपण कच्च्या तेलाच्या एका बॅरेलमध्ये नेमके कोणते घटक किती प्रमाणात आढळतात हे जाणून घेऊया.

तर ४२ गॅलन कच्चे तेल असलेल्या एका बॅरेलमध्ये ४५ गॅलनचे पेट्रोलियम पदार्थ सापडतात. हो, ३ गॅलन जास्त. त्यात गैसोलिन ४० ٪ म्हणजेच जवळपास १८-१९ गॅलन, डिझेल १२ गॅलन, जेट इंधन ४ गॅलन, तर ६ गॅलनचे घटक हे जड इंधन तेल, एलपीजी यांसारखे असतात. पेट्रोलियमचा उपयोग वेगवगळ्या उत्पादनांत केला जातो. रंग, टायर्स, पेनची इंक, कॉस्मेटिक्स इत्यादी गोष्टी बनवण्यासाठी पेट्रोलियमचा उपयोग केला जातो.

कच्चे तेल मोजण्यासाठी आजही बॅरेलचा वापर केला जातो. यामागे तेलाचा रंजक इतिहास दडलेला आहे.

सुरुवातीला जेव्हा तेल शोधले गेले तेव्हा ते साठवून ठेवण्यासाठी विशेष असे काही साधन नव्हते. पुढे जाऊन जेव्हा तेलाचे उत्पादन वाढत गेले तेल वाहुन नेण्यासाठी चांगले पर्याय शोधले जात होते. त्याच वेळी व्हिस्की साठवून ठेवण्यासाठी बॅरेलचा वापर केला जात असे. तेल उद्योगात हीच संकल्पना वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात तेल गळतीची भरपाई म्हणुन ४० ऐवजी ४२ गॅलन तेल भरण्याचे ठरवले गेले.

आज मात्र तेल वाहुन नेण्यासाठी मोठमोठी वाहने वापरली जातात. नलिकेद्वारेसुद्धा आता तेल थेट वाहून नेले जाते. तेलाची किंमतसुद्धा बॅरेलमध्येच मोजली जाते.

कच्च्या तेलाचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही आजपण कच्च्या तेलाचे महत्त्व वाढतेच आहे. कच्च्या तेलांचे बक्कळ साठे असलेले देश आजही जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये गणले जातात. एवढेच नव्हे तर जगातील इंधनाच्या किंमती सुद्धा या देशांतील घडामोडींवर आधारित असतात. यावरुन त्याला ‘काळे सोने’ म्हणणे काही चुकीचे नाही एवढं मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

Next Post

मार्व्हलचा थॉर या लढवय्या जमातीचा देव आहे

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

मार्व्हलचा थॉर या लढवय्या जमातीचा देव आहे

ही आहेत जगाच्या इतिहासातील माहित नसलेली महत्त्वाची यु*द्धं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.