The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून क्रिकेटर्स चेहऱ्यावर पांढरं क्रीम लावतात..!

by Heramb
18 September 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेट, प्रत्येकाच्याच आवडीचा विषय. ज्यांचं वय झालं असे वृद्धसुद्धा या खेळाबद्दल बोलत असतात, मॅचेस पाहत असतात. आपणही अगदी लहान वयापासून क्रिकेट मॅचेस पाहत आलो आहोत. आंतरराष्ट्रीय मॅचेस किंवा राष्ट्रीय मॅचेस बघायची मजा काही औरच असते. खेळाबरोबरच अनेक रंजक गोष्टी मॅचमध्ये असतात. मॅचमधील अनेक गोष्टी आपल्या परिचयाच्या नसल्याने निश्चितच काही प्रश्न आपल्या मनात उद्भवत असतील.

अनेक उत्साही क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच आम्ही सुद्धा एकत्र येऊन मॅच ‘एन्जॉय’ करत होतो. अनेक मित्र मॅच बघण्यासाठी बसले की वेगळीच वातावरण निर्मिती होते. गप्पा रंगणे , प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक विकेटवर, आपल्या चौकार आणि षटकारांवर जल्लोष होणे, आपल्या विकेटवर किंवा मिस्ड कॅचवर हळहळ व्यक्त करणे या गोष्टी तर होतच राहतात. याशिवाय काही प्रश्नही आम्हाला पडत असत. त्यांपैकी एक मोठा आणि गंभीर प्रश्न म्हणजे खेळाडूंच्या चेहऱ्यावर लावलेलं पांढरं क्रीम. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाने आपले बिनकामाचे तर्क-वितर्क द्यायला सुरुवात केली. पण त्यामागचं खरं कारण जाणून घेण्यासाठी हा लहानसा प्रयत्न..

क्रिकेटपटू आपल्या चेहऱ्यावर जे पांढरं क्रीम वापरतात ते ‘झिंक ऑक्साईडपासून’ तयार केलेलं विशेष सनस्क्रीन असतं. हे विशेष सनस्क्रिन खेळाडूंना सूर्याच्या यु.व्ही.ए. आणि यु.व्ही.बी. या हानिकारक किरणांपासून अतिरिक्त संरक्षण प्रदान करते. क्रिकेटपटूंना तासन्तास थेट सूर्यप्रकाशात खेळावे लागते आणि खेळाडू हे क्रीम आपल्या चेहऱ्याच्या संवेदनशील भागावर वापरतात.

क्रिकेटपटू त्वचेच्या संरक्षणासाठी वापरत असलेलं पांढरं क्रीम म्हणजे झिंक ऑक्साईडपासून तयार केलेली “भौतिक सनस्क्रीन”. क्रिकेट खेळाडूंनी वापरलेल्या कोणत्याही सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड हा मुख्य घटक असतो. ही पावडर एक प्रकारचे खनिज असून याचा वापर हानिकारक सूर्य किरणांपासून मानवी शरीराचे रक्षण व्हावे यासाठी होतो. याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. झिंक ऑक्साईड व्हाईट क्रीम ही इतर सनस्क्रीन्सप्रमाणे सामान्य सनस्क्रीन नाही. यामध्ये सामान्य सनस्क्रीनपेक्षा जास्त संरक्षण देण्याची क्षमता आहे.

आपण रोज वापरतो ते सनस्क्रीन “रासायनिक सनस्क्रीन” असतात. त्वचेवरील लहान छिद्रांद्वारे ते शरीरामध्ये शोषून घेतले जातात तर झिंक ऑक्साईडपासून तयार केलेलं सनस्क्रीन शरीरावरच राहते, ते त्वचेतून आत शोषून घेतले जात नाही. रोजच्या वापरातील सनस्क्रीनमुळे त्वचेला यु.व्ही.ए. आणि यु.व्ही.बी. या तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचेला हानी होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे रासायनिक सनस्क्रिन्स क्रिकेटपटू तसेच कोणत्याही खेळाडूसाठी उपयोगाचे ठरत नाहीत. 



झिंक ऑक्साईडपासून तयार केलेल्या स्किन प्रोटेक्टंट जेनेरिक क्रीमला प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. झिंक ऑक्साईडची प्राथमिक वैशिष्ट्ये म्हणजे त्याची ‘हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स’ (किंवा उच्च अपवर्तक निर्देशांक). यामुळे सूर्यकिरणे या झिंक ऑक्साईडच्या सनस्क्रीनच्या थरावर आदळून रिफ्लेक्ट होतात. तसेच बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अतिनील किरणांपासून (यु.व्ही. रेज) होणारे संरक्षण अशी काही याची वैशिष्ट्ये आहेत.

अशा प्रकारचे क्रीम वापरण्याचे कारण म्हणजे सौर अतिनील किरणांपासून (सोलर अल्ट्राव्हॉयलेट रेज) ते त्वचेचे संरक्षण करते. अतिनील किरणांमुळे त्वचेच्या पेशींमधील डी.एन.ए.चे नुकसान होते आणि या अतिनील किरणांचा मुख्य स्रोत सूर्यच आहे. सूर्यप्रकाशात अल्ट्राव्हायलेट ए (यूव्हीए), अल्ट्राव्हायोलेट बी (यूव्हीबी) आणि अल्ट्राव्हायोलेट सी (यूव्हीसी) किरणे असतात. यांपैकी अल्ट्राव्हायोलेट सी किरणे पृथ्वीच्या वातावरणाच्या संरक्षणामुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण रखरखत्या उन्हात आपल्या त्वचेवर यूव्हीए आणि  यूव्हीबी किरणे पडतात.

यूव्हीए किरण त्वचेच्या सर्वात खोल थरात प्रवेश करू शकतात आणि अकाली वृद्धत्व येण्याची शक्यता वाढते. हे अतिशय धोकादायक आहे. कारण याचा प्रभाव सुरुवातीला आपल्या लक्षात येत नाही. तर यूव्हीबी किरणांमुळे त्वचेच्या बाहेरील थराला धोका निर्माण होऊ शकतो आणि तो भाग काळा-निळा पडण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

क्रिकेटपटू आधी सराव सत्रादरम्यान आणि नंतर प्रत्यक्ष सामन्यादरम्यान कडक उन्हात मैदानावर बराच वेळ घालवतात. म्हणूनच, सनग्लासेस आणि टोपी किंवा हॅट व्यतिरिक्त, एक त्वचा संरक्षक सनस्क्रीन त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वापरले जातात. क्रिकेटपटू साधारणपणे पूर्ण लांबीची पँट आणि पूर्ण बाहीचा (फुल स्लीव्ह) टी-शर्ट वापरतात, काही सामन्याच्या वेळी कॉम्प्रेशन आर्म स्लीव्ह्स वापरतात. अनेकदा याच पेहरावात ते उन्हातही सराव करतात त्यामुळे त्वचेची काळजी घेणे हे मुख्यतः चेहऱ्यासाठी आवश्यक असते. हे सनस्क्रीन क्रीडापटूंसाठी बाहेर जास्त वेळ घालवण्यासाठी तयार केलेले आहेत.

झिंक ऑक्साईड सनस्क्रीन आपला परिणाम त्वरित दाखवते. याचा अर्थ, ज्या क्षणी ते त्वचेवर लावले जाते, त्या क्षणापासूनच ते आपल्या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण द्यायला सुरवात करते. झिंक ऑक्साईड सनस्क्रीन संवेदनशील त्वचेसाठी चांगले आहे कारण त्यामुळे क्वचितच त्वचेवर जळजळ होते.

झिंक ऑक्साईड व्हाईट क्रीम क्रिकेट बॉल चमकवू शकते. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडेच बऱ्याच प्रसंगी चेंडू असतो. यावेळी चुकून चेंडूवर काही क्रीम चोळले जाऊ शकते. हे क्रीम बॉलला अतिरिक्त चमक देते. यामुळे सगळा खेळ गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने पलटू शकतो,म्हणूनच बॉलवर क्रीम लावायला परवानगी नसते. जर क्रिकेट बॉलवर झिंक ऑक्साईड व्हाईट क्रीम वापरली आहे हे एखाद्या पंचाच्या  लक्षात आले तर संबंधित संघाला आयसीसीच्या “बॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा विपरीत परिणाम पाडण्यासाठी बाह्य पदार्थांचा वापर केला” या अपराधासाठी दंड आकारला जाऊ शकतो.

अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू उदाहरर्णार्थ मायकेल हसी, अँड्र्यू सायमंड्स आणि शेन वॉर्न हे क्रिकेटपटू क्रिकेट खेळताना त्यांच्या चेहऱ्यावर सातत्याने व्हाईट क्रीमच्या वापराबद्दल प्रसिद्ध आहेत.

चेहऱ्यावर लालसरपणा येणे आणि चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या दृश्यमान होणे यांसारख्या समस्या असलेल्या लोकांना देखील झिंक ऑक्साईड सनस्क्रीन हा एक उत्तम उपाय आहे. साधारणतः रूम टेम्परेचरला साठवल्यास ते खराब होत नाही. असे अनेक फायदे असले तरी गरज नसल्यास त्वचेला कोणत्याही क्रीमपासून दूर ठेवणे चांगले आहे. सनस्क्रीन केवळ पाण्याने चेहरा धुवून पूर्णपणे काढून टाकता येत नाही. तर त्यासाठी तेलाचा वापर करावा लागतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से वाचाच..!

Next Post

या भारतीय राजाला खुद्द हि*टल*रने कस्टम मेड मेबॅक कार भेट दिली होती

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

या भारतीय राजाला खुद्द हि*टल*रने कस्टम मेड मेबॅक कार भेट दिली होती

१६०० कोटींचा व्यवसाय उभा केला पण आता देश सोडून पळून जावं लागलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.