The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या महिलेने फ्रान्सच्या जनतेत स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली होती !

by द पोस्टमन टीम
29 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तिचा असा दावा होता की, तिला देववाणी ऐकू येत असून, फ्रान्सला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच तिचा जन्म झाला आहे. पण, सुरुवातीला तरी तिच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तिची मस्करी आणि हेटाळणीच केली जात होती. पण, तिने आपल्या राजाला भेटून त्याच्यासमोर आपले म्हणणे मांडले. फ्रेंच धर्मगुरुंनी देखील तिच्या बोलण्यात तथ्य असल्याचे मान्य केले आणि ती वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी इंग्रज सैन्याविरोधात लढू लागली. शंभर वर्षांपासून फ्रेंचांना गुलाम बनवून ठेवलेल्या इंग्रजांना तिने सळो की पळो करून सोडले.

फ्रेंचांच्या हातून आपला पराभव स्पष्ट दिसत असताना इंग्रजांनी तिला पकडले आणि तिच्यावर खोटेनाटे आरोप करून तिला देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. ज्या फ्रेंच जनतेसाठी तिने हातात शस्त्रे घेतली त्याच फ्रेंच जनतेसमोर तिला जाळून मारण्यात आले.

ही कहाणी आहे जॉन ऑफ आर्कची. जॉन ऑफ आर्कची ही गोष्ट एखाद्या मिथककथेपेक्षा वेगळी नाही. पण, हे मिथक नाही तर सत्य आहे. जॉनचा जन्म १४१२ साली डोम्रेमी या गावी झाला. याच काळात फ्रान्स आणि इंग्लंड दरम्यान इतिहास प्रसिद्ध १०० वर्षांचे यु*द्ध सुरु होते. या यु*द्धात फ्रान्सच्या जनतेचे अतोनात हाल झाले होते. इंग्लंडचा राजा पाचवा हेन्रीने फ्रान्सच्या शासकाचा पराभव केला आणि त्याच्या मुलाला फ्रान्सचा राजा घोषित केले.

संपूर्ण उत्तर फ्रान्सवर इंग्रजांनी ताबा मिळवला होता. या भागातील फ्रेंच जनतेला गाव सोडून जाण्यासाठी सक्ती केली जात होती. या गावांमध्ये जॉनच्या गावाचाही समावेश होता.

जॉन गरिब कुटुंबातील होती, तिला शिक्षण घेणे शक्य नव्हते. तेराव्या वर्षापर्यंत तर तिचे जीवन एखाद्या सामान्य मुलीसारखेच होते. तेराव्या वर्षी तिला काही भास होऊ लागले. तिच्या म्हणण्यानुसार तिला सेंट मार्गारेट, सेंट कॅथरीन आणि सेंट मायकेल यांचे संदेश ऐकू येत होते. ते तिला सांगत आहेत की, तिच्यामुळे फ्रान्स इंग्लंडच्या ताब्यातून मुक्त होऊ शकतो. तिच्या हातूनच फ्रान्सला स्वातंत्र्य मिळू शकते. ती हे सर्वांना सांगत होती पण, तिच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते.



काहीही करून फ्रान्सचा राजपुत्र ड्युफॉनला भेटायचेच असे ठरवून ती एक दिवस घरातून निघाली आणि तिने रॉबर्ट डे बॉड्रीकोर्ट या स्थानिक किल्लेदाराला तिची ड्यूफॉनशी भेट घडवून आणण्याची विनंती केली. एवढीशी मुलगी राजपुत्राला भेटण्याची विनंती करते म्हणजे काय, बॉड्रीकोर्टला तिच्या या दुस्साहासाचे हसूच आले आणि त्याने तिची विनंती नाकारली. पण ती पुन्हा पुन्हा जाऊन त्याला हेच सांगत राहिली की, तिने फ्रान्सच्या स्वातंत्र्य यु*द्धात भाग घ्यावा ही देवाज्ञा आहे. शेवटी बॉड्रीकोर्टला तिच्या या सततच्या विनवणीसमोर झुकावेच लागले. त्याने तिला एक घोडा आणि सोबत काही घोडेस्वार दिले. इंग्रज शिपायांची पर्वा न करता ती चीनॉ येथे राजपुत्र ड्यूफॉन पाशी पोहोचली.

ड्यूफॉनच्या दरबारातही तिने आपली सर्व हकीगत सांगितली. पण, सगळ्यांनी तिला वेड्यातच काढले. शेवटी धर्मगुरूंकरवी तिच्या म्हणण्यात खरेच काही तथ्य आहे का याची चौकशी करायला लावली. धर्मगुरूंनी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिल्यानंतर तिला थेट यु*द्धभूमीवर पाठवण्याची तयारी करण्यात आली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याचवेळी इंग्रजांनी ऑर्लिन्सला वेढा दिला होता. ऑर्लिन्सचा पाडाव फ्रेंचांसाठी अगदीच नामुष्कीजनक ठरला असता. ऑर्लिन्स जिंकण्याची मोठी जबाबदारी जॉनवर सोपवण्यात आली. अवघ्या चार हजार सैन्यानिशी १४२९ साली जॉनने ऑर्लिन्सकडे कूच केली. फ्रेंच सैनिकांमध्ये तिने स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. फ्रेंच सैनिकांनी सर्वशक्तीनिशी इंग्रज सैन्यावर ह*ल्ला चढवला. पाहता पाहता इंग्रजांना ऑर्लिन्स भोवतीचा वेढा उठवणे भाग पडले. तिने इंग्रजांचा पाठलाग करून त्यांना पाळता भुई थोडी केली. इंग्रजांनी फ्रान्सचा जो काही भाग आपल्या ताब्यात घेतला होता त्यावरही तिने ह*ल्ले सुरु केले.

हळूहळू फ्रान्सचा एकेक भाग इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होऊ लागला. पटायच्या मैदानावर तिने इंग्रजांचा जो पराभव केला तो इंग्रजांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

१७ जुलै १४२९ रोजी तिने रेहर्स कॅथेड्रल येथे चार्ल्सचा राज्याभिषेक केला आणि त्याला फ्रान्सचा राजा घोषित केले.

जॉनचा पराक्रम दिवसेंदिवस वाढतच होता आणि जॉन इंग्रजांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली होती. ज्यांना चार्ल्सचे नेतृत्व मान्य नव्हते असे काही फ्रेंच सरदार इंग्रजांना जाऊन मिळाले होते. तेही जॉनला पाण्यात पाहत होते. अशाच काही फितूर सैनिकांनी पैशाच्या आणि संपत्तीच्या आमिषाने जॉनला पकडून इंग्रजांच्या हवाली केले.

२३ मे १४३० रोजी तिला पकडण्यात आले. इंग्रजांनी तिला थेट शिक्षा दिली असती किंवा मारून टाकले असते. तर फ्रेंच जनतेत इंग्रजांविरोधात रोष वाढला असता. म्हणून इंग्रजांनी तिला धर्मविरोधी कृत्ये करणारी पापाचारिणी म्हणून दोषी ठरवले. तिच्यावर अनेक खोटेनाटे आरोप करण्यात आले.

इंग्लंडच्या धर्मगुरुंनी तिला धर्मद्रोही ठरवून तिच्या विरोधात खटला सुरु केला. जॉन आपली बाजू समर्थपणे मांडत होती. तिला विचारलेल्या प्रश्नांची तिने दिलेली उत्तरे अगदी तर्कशुद्ध असत. ती थोडीही घाबरलेली नव्हती. तिला पूर्ण दोषी ठरवणे देखील शक्य नव्हते. म्हणून तिला चेटकीण घोषित केले गेले. ती आजपर्यंत देवाची आज्ञा नाही तर सैतानाची आज्ञा पाळत आल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या.

एक स्त्री असूनही तिने यु*द्धात भाग घेतला. त्यासाठी पुरुषी वेश धारण केला. तिची ही सगळी कृत्ये धर्मविरोधी असल्याचे सांगण्यात आले.

अशाने फ्रेंच जनतेच्या मनात तिच्याबद्दलची सहानुभूती कमी होईल असा त्यांचा प्रयत्न होता. ती सैतानाची दूत असल्याचे ठरवले गेले. शेवटी तिच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे घोषित करून, ३० मे १४३१ रोजी तिला जिवंत जाळण्याची शिक्षा देण्यात आली.

ज्या फ्रान्सच्या जनतेसाठी ती शूरवीराप्रमाणे लढली त्याच फ्रान्सच्या जनतेसमोर तिला जिवंत जाळण्यात आले. फ्रान्सची जनता तिचा मृत्यू हताशपणे पाहत होती. एका साध्वीला सैतानाची दूत ठरवण्यात आले आणि ज्यांच्यासाठी तिने स्वतःचे प्राण हातावर घेऊन पराक्रम गाजवला तेच तिला जिवंत जळताना फक्त बघे बनून राहिले.

तिच्या मृत्युनंतर १४५६ साली राजा चार्ल्सने पुन्हा एकदा तिच्यावरील खटल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. तेव्हा ती निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. नंतर पोप कॅलिक्टस यांनी दिला निर्दोष घोषित करून तिला शहीद जाहीर केले. १६ मे १९२० रोजी जॉनला संत घोषित करण्यात आले.

फ्रान्सच्या जनतेसाठी आजही ती एक महनीय आणि पूजनीय व्यक्ती आहे. फ्रान्सच्या जनतेत स्वातंत्र्याची चेतना जागवणाऱ्या या वीरांगनेबद्दल फ्रान्सची जनता आजही कृतज्ञ आहे. जिथे जिथे पराक्रमाची चर्चा केली जाईल तिथे तिथे जॉन ऑफ आर्कचे नाव घेतले जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

…म्हणून भारतात दुसरा राहुल द्रविड होणं शक्य नाही!

Next Post

संघाचे स्वयंसेवक दसऱ्याला शस्त्रपूजन का करतात ? जाणून घ्या विशेष कारण !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

संघाचे स्वयंसेवक दसऱ्याला शस्त्रपूजन का करतात ? जाणून घ्या विशेष कारण !

ब्रिटनच्या लायब्ररीत ठेवण्यात आले आहेत जगातील सर्वात खतरनाक बॅक्टेरिया !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.