The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान सर की अमित सिंग या फेमस युट्युब टीचरचं नेमकं नाव काय आहे..?

by द पोस्टमन टीम
31 May 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


यांचे आर्टिकल तुम्हीही बघितले असतील. त्यावरून नोट्स काढून अभ्यासही केला असेल. आपण एखाद्या मित्राशी बोलावं अशा भाषेत व्हिडीओ करून समोरच्याला विषय समजावून सांगणाऱ्या त्यांच्या युट्युब चॅनलचे आज ९२ लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत.

या युट्युब चॅनलचं नाव आहे- “खान जीएस रिसर्च सेंटर”. आता तुम्हाला त्या नाव कळलंच असेल. तेच प्रसिद्ध “खान सर”.

खान सर हे नाव तसंही प्रसिद्धच आहे पण गेल्या काही दिवसांपासून तर हे नाव सोशल मिडीयावर फारच फिरतंय. कोण आहेत हे खान सर? आज जाणून घेऊया त्यांच्याचबद्दल.

तर, हे सर युट्युबवर एक चॅनल चालवतात. “खान जीएस रिसर्च सेंटर” ज्यात ते वेगवेगळ्या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे विषय शिकवतात. त्यांच्या बोलण्याची, शिकवण्याची पद्धत फारच वेगळी ज्यामुळे ते लवकरच विद्यार्थ्यांमधे फेमस झाले.



या शैक्षणिक व्हिडीओजमध्ये चालू घडामोडींवर पण व्हिडीओ आहेतच, मग रेमेडीसीव्हीरचा उपयोग असो इस्राईल-पॅलेस्टीनचा वाद असोवा अजून काही. “खान सर को सब पता है”

लोकांना पण त्यांचे व्हिडीओज आवडतात. त्यामुळेच तर आज एवढे सबस्क्रायबर्स आहेत ना!

अशा माणसाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं. कुठे राहतात? काय करतात? वगैरे वगैरे. पक्की तर माहिती नाही, पण गुगल बाबाच्या एका सर्चनुसार हे महाशय बिहारच्या पटना इथे कुठे तरी राहतात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे पण, याचं आता मधेच काय? तर, गेल्या काही दिवसांपासून या सरांच्या व्हिडीओजमधला काही भाग व्हायरल होतोय ज्यात ते मुस्लीम लोकांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने बोलले आहेत.

२४ एप्रिलच्या फ्रांस-पाकिस्तान संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या या व्हिडिओत पाकिस्तानमधील फ्रेंच राजदूतांच्या हकालपट्टीसाठी पाकिस्तानमधे झालेल्या आंदोलनाबद्दल ते बोलले. यात त्यांनी मुस्लिमांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे अनेक लोक त्यांच्यावर नाराज आहे. यामुळेच त्यांच्यावर आता विविध स्तरातून टीका होताना दिसतेय.

याच गोंधळात एकाने असा व्हिडीओ करून टाकला ज्यात त्या व्यक्तीने खान सरांवर प्रचंड टीका केली. एवढंच नाही तर, “खान सर” ही व्यक्ती खान नसून अमित सिंह आहे आणि इस्लामविरोधी अजेंडा चालवण्यासाठी तो हे नाव वापरतोय. त्याने खान सरच्याच एका व्हिडिओचा दाखला दिला ज्यात ते म्हणतायत की मला बँकेत वगैरे तर अमित सिंह म्हणून हाक मारतात.

झालं! याने तर या सगळ्या प्रकरणात अजूनच तेल ओतलं. अनेकांनी ट्वीटरवर खान सरांचे हिंदू सणांमधे सहभागी होतानाचे फोटो टाकून त्यांना बहिष्कृत करावं अशा मागण्या केल्या.

आता खान सरांना या सगळ्याची सफाई देणारा एक व्हिडीओ बनवावा लागला. यात त्यांनी स्पष्ट केलं की ते अमित सिंह नाही आणि त्या व्हिडिओमधे ते काहीतरी समजावून सांगताना गंमतीत आपल्याला अमित सिंह म्हणून हाक मारतात असं बोलले.

त्यांचं नाव खानच असून त्यांनी “खान सर” या नावाने अनेक पुस्तकं पण काढली आहेत. त्यांचे पॅन कार्ड आणि बाकी कागदपत्रं पण याच नावानी असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

आता प्रश्न आला मुस्लिम लोकांबद्दलच्या वक्तव्यांचा तर “ते आपण कोणाच्याही भावना दुखवायच्या उद्देशाने बोललो नव्हतो आणि ते केवळ पाकिस्तानातील मुस्लिमांबद्दल बोललो होतो, सगळ्या नाही” असे स्पष्टीकरण देऊन त्यांनी विषय संपवला.

आजकालच्या युगात सगळंच ऑनलाईन झालं आहे त्यामुळे सोशल मिडीया एक चांगलं टूल बनलंय. पण शेवटी प्रत्येक गोष्टीच्या चांगली आणि वाईट दोन बाजू या असतातच. आता या खान सरांच्या प्रकरणावरून हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसतंय.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

टाटा नॅनोच्या आधी फोर्डने मध्यमवर्गाला परवडणारी पीपल्स कार बाजारात आणली होती

Next Post

चारमिनारकडे पाहून मार्लबोरोला त्यांची जाहिरात स्ट्रॅटेजी बदलायला लागली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

चारमिनारकडे पाहून मार्लबोरोला त्यांची जाहिरात स्ट्रॅटेजी बदलायला लागली होती

'फॅमिली मॅन सीजन २' बघून अमेझॉन प्राईमच्या वर्षभराच्या सब्स्क्रिप्शनचे पैसे सार्थकी लागले..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.