The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किम जोंगच्या वडिलांनी चित्रपटांच्या छंदापायी चक्क एका अभिनेत्रीचं अपहरण केलं होतं

by द पोस्टमन टीम
29 August 2024
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


उत्तर कोरियाचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर चित्र येते ते उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम-जोंग-उनचे. किम जोंग हा विक्षिप्त आणि सनकी हुकुमशहा तर आहेच पण, त्याचे वडीलही अगदी तसेच किंबहुना थोडे जास्तच विक्षिप्त होते. त्याचे नाव होते किम-जोंग-इल.

या किम जोंग इलला चित्रपट पाहण्याचा वाईट नाद होता. चित्रपट पाहण्याचा छंद असण्यात वाईट काय आहे? असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. पण, किम-जोंग-इलच्या या छंदाने विक्षिप्तपणाचा कळस गाठला होता. तो केवळ चित्रपटाचा शौकीनच नव्हता तर त्याला चित्रपटाचे व्यसन होते असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती अजिबात ठरणार नाही. उलट, व्यसन हा शब्दही त्यांच्या विक्षिप्तपणा समोर तोकडाच आहे.

किम-जोंग-उन आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय, त्याची कडक आणि कठोर निगराणी तर जगप्रसिद्धच आहे. या विवादास्पद हुकुमशाहाचे वडीलही तितकेच विवादास्पद होते. ते जितके कठोर, निर्दयी होते तितकेच रंगीन आणि शौकीन. त्यांच्या या रंगीन किस्से ऐकले तर डोके चक्रावून जाईल.

त्याला सुंदर आणि तरुण मुलींच्या घोळक्यात राहणे फार आवडत असे. यासाठी त्यांनी एक प्लेज स्क्वॉड तयार केला होता. ज्यात सुंदर आणि तरुण ललनांची भरती होती. या मुलींना फक्त किम-जोंग-इल याची ताबियत खुश करण्याचे काम करायचे.

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, या हुकुमशहाला चित्रपट पाहण्याचा शौक होता. हा शौक पूर्ण करण्यासाठी त्याने तब्बल १३ हजार चित्रफितींचा संग्रह केला होता. यात काही अश्लील चित्रफितीही होत्या.



आपल्या देशात चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट तयार होत नाहीत याचे त्यांना खूप दुःख होते. यासाठी खरे तर त्यांनी आपल्या देशातील तरुणांमध्ये कल्पकता रुजावी म्हणून किंवा आपल्या देशातील तरुणांच्या कल्पक योजना प्रत्यक्षात उतरण्यासाठी खटपट करायला हवी होती. पण, हुकुमशहा व्यक्तीच्या डोक्यात सर्जनशील आणि सर्वसमावेशक कल्याणाच्या कल्पना कुठून सुचणार?! त्यांना सुचते ती फक्त क्रू*रता, दडपशाही आणि द*हश*त.

याचवेळी दक्षिण कोरियात मात्र चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरु होता. याचे तर किम-जोंग-इलला अतीव दुःख होते. दक्षिण कोरियाच्या चित्रपटांना त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही खूप नावाजले जायचे. ही गोष्ट आहे १९७८ सालची, जेंव्हा दक्षिण कोरियाची चित्रपट सृष्टीने जागतिक पटलावरही आपला खोल ठसा उमटवला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

यावेळी चोई-उन-ही ही दक्षिण कोरियातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. साठ ते सत्तरच्या दशकात तिचे स्थान सर्वोच्च कलाकारांच्या यादीत होते. तिचे पती शिन ज्योंग-ग्युं चित्रपट दिग्दर्शक होते. दोघांचेही करिअर यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते. नंतर दोघांमध्ये एका दुसऱ्या अभिनेत्रीमुळे फुट पडली.

चोई-उन हिला हॉंगकॉंगमध्ये एका नव्या बिझनेस डीलसाठी बोलावणे आले. पुढ्यात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा जराही अंदाज नसलेली चोई उन जेंव्हा हॉंगकॉंगमध्ये पोहोचली तेंव्हा तिथे आधीच हजर असलेल्या एका उत्तर कोरियन एजंटने तिचे अपहरण केले.

स्पीडबोटच्या सहाय्याने तिला उत्तर कोरियात आणण्यात आले. त्या लोकांनी तिला किम जोंग-इल समोर आणले. तेंव्हा कुठे चोईला घटनेच्या गांभीर्याची जाणीव झाली आणि बिझनेस डील वैगेरे तिला फसवण्यासाठी आखलेली योजना होती याचा खुलासा झाला.

परंतु उत्तर कोरियात चोई-उनला कसलीही झळ पोहोचू दिली जात नसे. जणू काही तिचे अपहरण झालेच नाही. जोंग-इल चोई-उन सोबत फोटोशूट करत तेंव्हा आवर्जून तिचा हात हातात घेऊन तिचे आभार मानत असत. किम-जोंग-इल यांच्या तावडीतून सुटल्यानंतर स्वतः चोईने द लव्हर्स अँड द डेस्पॉट या डॉक्युमेंटरीला मुलाखत देताना या गोष्टी सांगितल्या आहेत.

त्यावेळी किम-जोंग-इल यांचे वडील उत्तर कोरियाचे अध्यक्ष होते आणि इल प्रपोगंडा अँड एजीटेशन विभाग सांभाळत होते. आपल्या देशात दक्षिण कोरियाच्या दर्जाचे चित्रपट निर्माण झाले पाहिजेत, अशी किम-इल यांची जिद्द होती. यासाठी त्यांनी दक्षिण कोरिया या शत्रू राष्ट्रातील अभिनेत्रीचेच अपहरण केले होते.

किम इल यांची इच्छा होती की, उत्तर कोरियामध्ये निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कौतुक झाले पाहिजे. चोईचे अपहरण केल्यानंतर तिच्या पतीचेही अपहरण करण्यात आले. चोईला आणि चोईच्या नवऱ्यालाही याची अजिबात कल्पना नव्हती की एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या दोघांचे अपहरण झाले असून, ते दोघे एकाच देशात राहत आहेत.

त्या दोघांना अत्यंत गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यांना कुणाला भेटण्याची, बोलण्याची किंवा वर्तमानपत्र वाचण्याचीही परवानगी नव्हती. त्यांच्यावर कडक निगराणी ठेवण्यात आली होती. त्याच्यावर चोवीस तास पहारा लावलेला असे. अगदी त्यांच्या रूममध्येही एक पहारेकरी तैनात असे.

शिन-ज्योंग-ग्युं यांनी सुरुवातीला विरोध केला. त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांना कैद्यांच्या छावणीत डांबण्यात आले. पाच वर्षे दिग्दर्शकाला कैद छावणीत ठेवण्यात आले. त्यानंतर उत्तर कोरीयासाठी ते चित्रपट दिग्दर्शनाचे काम करतील याच एका अटीवर त त्यांची या छावणीतून सुटका झाली.

चोई-उनने मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार २ वर्षे ३ महिन्यात त्या दोघांनी मिळून १७ चित्रपटांसाठी काम केले होते. किम यांच्या आदेशानुसार त्यांना रात्री झोपण्यासाठी फक्त तीन तासच दिले होते. शिवाय, या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात प्रणय असलेल्या सिन्सवर जास्ती भर देण्यात आला होता.

१९८६ साली युरोपियन फिल्म फेस्टिवलमध्ये किमने या दोघांना उत्तर कोरियाचे प्रतिनिधी म्हणून पाठवले. सोबत पहारेकरी होतेच. नेहमी पहारेकऱ्यांच्या गराड्यात असूनही त्या दोघांनी कशीबशी किम जोंग इल या विक्षिप्त माणसाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

उत्तर कोरियातून निसटल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला. १९९८ साली ते आपल्या मायदेशी पुन्हा परतले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या अमेरिकन राजदूतामुळे चीनसोबत झालेल्या यु*द्धात भारताला अमेरिकेची मदत मिळाली होती

Next Post

हिटलरच्या तावडीतून निसटून या माणसाने एक अवाढव्य साम्राज्य उभं केलंय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

हिटलरच्या तावडीतून निसटून या माणसाने एक अवाढव्य साम्राज्य उभं केलंय

लिरील, हमाम, पिअर्स, संतूर की लाईफबॉय, भारतीयांचं ऑल टाईम फेवरेट साबण कोणतं?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.