The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्रायलमधील मुलांना १००० वर्ष जुनी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची नाणी सापडली आहेत..

by Heramb
14 October 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं सगळ्यांनाच एक विशेष आकर्षण असतं. कदाचित उन्हाळ्याची आणि दिवाळीच्या सुट्टीचं सुख शालेय जीवनानंतर पुन्हा कधीही मिळत नाही. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांमध्ये खेळाबरोबरच काहीतरी भन्नाट उपद्व्याप करण्याची प्रत्येक मुलाची इच्छा असते.

प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार काहीतरी वेगळं करतो, विशेषतः ज्यावेळी मोबाईल आणि कम्प्युटर्स उपलब्ध नसायचे त्यावेळी खेळण्याव्यतिरिक्त अशी बरीच ‘कांड’ होत असत. बहुधा जगभरात उन्हाळ्याची सुट्टी अशाच प्रकारे साजरी होत असावी. पण इस्रायलमध्ये दोन मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक मौल्यवान गोष्टी सापडल्या. 

इस्रायलमधील दोन किशोरवयीन मुले उन्हाळ्याच्या सुट्टीवर असताना त्यांना नवव्या शतकातील शेकडो सोन्याची नाणी सापडली. हा खजिना इस्रायलच्या ‘यवने’ जिल्ह्यातील पुरातत्व खणनात सापडला आहे, असे इस्रायल पुरातन वास्तू प्राधिकरणाने (आय.ए.ए.)  सांगितले. जेव्हा हा प्रदेश अब्बासीद खलीफाच्या इस्लामिक नियंत्रणाखाली होता, त्या काळापासूनची ही नाणी होती असे आय.ए.ए. बरोबर काम करणाऱ्या रॉबर्ट कूल या ऐतिहासिक नाणेतज्ज्ञाने सांगितले.

इतिहासातील शिलालेखाप्रमाणेच आणि त्यांच्या इतकीच नाणी महत्त्वाची असतात. साहित्यातून आणि इतर ऐतिहासिक अभ्यासातून मिळवलेल्या ऐतिहासिक माहितीची निश्चिती करण्याचे काम ही नाणी करत असतात. अशी नाणी विविध धातूंची असतात – सोने, चांदी, तांबे किंवा मिश्रधातू. प्राचीन इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. पुरातत्व स्त्रोतांचा नाणी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. नाण्याच्या धातूची शुद्धता तत्कालीन साम्राज्याची आर्थिक परिस्थिती दर्शवते.

नवव्या शतकात आधुनिक काळातील अल्जेरियापासून अफगाणिस्तानपर्यंत अब्बासीदांचे नियंत्रण होते. यावेळी इस्रायलमध्ये एकूण ४२५ नाणी सापडली आणि ती सर्व शुद्ध २४-कॅरेट सोन्याची होती. या नाण्यांचे वजन ८४५ ग्रॅम होते. रॉबर्ट कूलच्या मते, एवढ्या रकमेने एखादी व्यक्ती त्या काळात इजिप्तच्या श्रीमंत राजधानी, फुस्टाटमधील एका सर्वोत्तम ठिकाणी आलिशान घर खरेदी करू शकत होती.



ज्या किशोरवयीन विद्यार्थ्यांना ही नाणी सापडली ते त्यावेळी लष्करीपूर्व राष्ट्रीय सेवेत सहभागी होते. एका बरणीत काही पाने सापडली आहेत असे त्यांना सुरुवातीला वाटले, पण त्यांनी ते भांडं उघडल्यानंतर त्यामध्ये ही ऐतिहासिक सोन्याची नाणी होती. असा विशेष आणि प्राचीन खजिना शोधणे त्यांच्यासाठी खरोखर रोमांचक होते. शुद्ध सोन्याच्या नाण्यांचा एवढा मोठा साठा सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे.

सोने बहुतेक वेळा वितळवले जाते आणि नंतरच्या सभ्यतेच्या लोकांकरवी पुन्हा पुन्हा वापरले जाते. शुद्ध सोन्याची बनलेली ही नाणी हवेत ऑक्सिडाइझ होत नाहीत, ती उत्कृष्ट स्थितीत सापडली आहेत जणू काही काल-परवाच ही नाणी येथे दफन करण्यात आली. नवव्या शतकात या भागातून मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार झाला असावा असा निष्कर्ष नाण्यांचा शोधावरून काढण्यात आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ज्या व्यक्तीने सुमारे ११०० वर्षांपूर्वी हा खजिना दफन केला होता त्याने तो परत मिळवावा अशी अपेक्षा केली असावी, म्हणूनच ही नाणी एका बंद भांड्यात सुरक्षित रीतीने ठेवण्यात आली आहेत. हा खजिना गोळा करण्यासाठी त्या व्यक्तीला परत येण्यापासून कशाने रोखले याचा आय.ए.ए. फक्त अंदाज लावू शकत होते.

सापडलेल्या भांड्यामध्ये सोन्याचे संपूर्ण दिनार तर सोन्याच्या नाण्यांचे लहान तुकडे होते. हे तुकडे त्याकाळात कदाचित ‘सुटे पैसे’ म्हणून वापरण्यात येत असत. सापडलेल्या काही तुकड्यांपैकी एक अत्यंत दुर्मिळ तुकडा होता आणि तो प्रसिद्ध बायझंटाईन सम्राट थियोफिलोसचा तुकडा होता. तो तुकडा शेजारच्या साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपलमध्ये काढला गेला असावा, असा त्याचा अर्थ होतो. एका ख्रिश्चन शासकाचा तुकडा इस्लामिक नाण्यांमध्ये सापडावा ही वस्तुस्थिती आपल्याला या साम्राज्यांच्या शांतता आणि यु*द्ध या दोन्ही काळात असलेल्या संबंधांबद्दल सांगते.

अशाच प्रकारे २०१६ साली एका गिर्यारोहकाला पूर्व गलीलमध्ये २००० वर्षं जुने सोन्याचे नाणे सापडले होते. त्यामध्ये रोमन सम्राटाचा चेहरा होता. संपूर्ण जगात अस्तित्वात असणारे आणखी एकच समान नाणे आहे इतके हे नाणे दुर्मिळ होते. शिवाय, २०१५ साली डायव्हर्सच्या एका गटाला सिझेरियाच्या प्राचीन भूमध्य बंदरातून सुमारे २ हजार सोन्याची नाणी सापडली. ही नाणी एक हजार वर्षं जुनी असल्याचे सांगण्यात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

डॉक्टर होता आलं नाही म्हणून सँडविच विकायला चालू केले, आणि तिथेच सबवेची सुरुवात झाली

Next Post

खिशात रुपया नसताना BCCIने १९८७ चा विश्वकप भारतात आणला आणि जुगाड करून यशस्वी देखील केला

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

खिशात रुपया नसताना BCCIने १९८७ चा विश्वकप भारतात आणला आणि जुगाड करून यशस्वी देखील केला

'ऐन जलूत'च्या लढाईमुळे मंगोल साम्राज्याचा अस्त होऊन इस्लामचा उदय झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.