The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेने एकदा ब्रिटनवर ह*ल्ला केला होता पण ब्रिटनने एवढं सिरियसली घेतलं नाही

by द पोस्टमन टीम
24 June 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हा कारनामा जॉन पॉल जोन्स या अमेरिकन अधिकार्‍यानं एकहाती करून दाखवला होता. ब्रिटिश बेटांवर त्यानं केलेला हा ह*ल्ला ब्रिटननं समुद्री चाचांचा ह*ल्ला असा शेलका शेरा देत त्याला फ़ार ऐतिहासिक महत्त्व न देत हद्दपार केला असला तरिही अमेरिकेच्या दृष्टीनं जॉन पॉल जोन्स अमेरिकन नौदलाचा पितामह समजला जात होता.

अमेरिकन कॉंग्रेसला जॉनची ही समुद्री मार्गानं ब्रिटिश बेटांवरची ह*ल्याची योजना भलतीच आवडली होती. १७७९च्या ब्रिटिश समुद्र तटावरील शहरांवरच्या यशस्वी ह*ल्ल्यांचा अनुभव जॉनच्या पाठीशी असल्यानं अमेरिकन कॉंग्रेसचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. थोडी थोडकी नाही तर तब्बल सोळा जहाजं त्याच्या दिमतीला होती आणि ब्रिटिशांचा विश्वासच बसत नव्हता की एक समुद्री चाचा त्यांच्यावर अशा पध्दतीनं ह*ल्ले करत त्यांना जेरीस आणेल.

सुरवातीला समुद्री चाचांचे लुटारू ह*ल्ले असतील म्हणून ब्रिटिशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असलं तरीही अखेरीस त्याच्या या कारवायांना जेरबंद करण्याची वेळ आली आणि ब्रिटननं त्यात अजिबातच हयगय न करता जॉनला एकदाच पण सणसणीत उत्तर दिलं.

जॉन पॉल जोन्सच्या नेतृत्वाखाली मध्यरात्रीनंतर तीस माणसांनी किनार्‍यावर जाण्यासाठी दोन मैलांचा समुद्री प्रवास सुरू केला. मात्र वाटेतच वारा थंडावला आणि त्यांचे कष्ट आणखीनच वाढले. मार्त जॉन माघार घेणार्‍यांपैकी नव्हता. सूर्य उगवून फ़टफ़टण्याच्या अगदी थोडावेळ आधी पहाटेच्या वेळेस अखेर जॉनच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यानं आणखी एकदा व्हाईटहेवनवर पाय ठेवला.

ब्रिटिश बेटांवर ह*ल्ला करण्याची अमेरिकन सैन्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी त्यांनी कधीही ब्रिटनच्या भूमीला आपलं लक्ष्य बनवलं नव्हतं. जोन्सच्या नेतृत्वाखाली ही घटना इतिहासात प्रथमच घडत होती.



इंग्लंडच्या पश्चिम किनार्‍यावर लहानाचा मोठा झालेला जॉन वयाच्या तेराव्या वर्षापासून समुद्र सफरीवर जाऊ लागला होता. समुद्राशी त्याची विशेष जवळीक होती. लाटांवर तरंगणार्‍या जहाजांवर तो रमत असे. त्याच्या या आवडीनंच त्याला वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी व्यापारी जहाजाचा कॅप्टन बनवलं. वयाच्या तेविसाव्या वर्षी तो फरार झाला कारण ब्रिटिश अधिकार्‍यांना तो एका खून प्रकरणात हवा होता. पलायन करून गेलेला जॉन पुढे वयाच्या तिशीतच द रेंजरचा कमांडर बनला आणि त्याच्या हाताखाली १४० अमेरिकन सेलर्स आले.

एकूणच जॉन हे एक उपद्रवी व्यक्तिमत्त्वच होतं. कधी त्यानं बारली, ओट्स आणि बियरनं भरलेलं डब्लिनचं जहाज बुडवलं तर कधी आयरिश समुद्रधुनीत ह*ल्ले केले. हे ह*ल्ले करत असतानाच त्याच्या सुपिक डोक्यात अमेरिकन क्रांती आणि त्यासाठी ब्रिटिश समुद्रपट्टीवर ह*ल्ले करण्याची योजना घोळू लागली. ब्रिटीशांना विरोध आणि ह*ल्ला हा एकमेव उद्देश ठेवून त्याच्या कारवाया चालू असत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अंधाराचा फ़ायदा घेत रेंजर समुद्रात नांगर टाकत असे आणि दोन छोट्या नावा व्हाईटहेव्हनमध्ये सोडत असे, जिथे दोनशेच्या जवळपास जहाजं ओहोटीच्या वेळी उभी असत.

दोन नावांपैकी एक दल हे बिटिश सैन्यावर तोफ़ांनी ह*ल्ले चढवत होते, तर दुसरे दल जहाज आणि शहराला आग लावत होते. या दोन्ही बोटी सुर्योदयापूर्वी पुन्हा समुद्रात सटकल्या.

त्यावेळेस ब्रिटिश त्यांची घरगुती लढाई लढण्यात व्यस्त असल्यानं हे ह*ल्लेदेखील त्याचाच एक भाग भासविण्याची जॉनची योजना होती. मात्र या योजनेला जॉनच्याच वरिष्ठांनी विरोध दर्शविला. गरीब लोकांची संपत्ती, घरं जाळून आपल्याला काहीही साध्य होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

अमेरिकन नेव्हल कॅम्प्समध्ये जॉन फ़ारसा कोणाला आवडत नसे. याचं कारण त्याचा कमालीचा क्रू*र स्वभाव. त्यानं एकदा एका खलाशाला इतकं क्रू*रपणे मारलं की तो खलाशी त्यानंतर काही आठवड्यातच मरण पावला. १७७२ साली टोबॅगोमध्ये बंड करणार्‍यालाही त्यानं असंच निर्दयीपणे ठार मारलं होतं आणि चौकशी तसेच कारवाई होऊ नये म्हणून पळून गेला होता. तो दिवस त्यानं रेंजवर काढला आणि बोटीवरील तीस जणांना हल्ला करणं कसं गरजेचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

२३ एप्रिल १७७८ या दिवशी पहाटे तीन वाजता बोटी सोडल्या, ज्या पाच वाजता पोहोचल्या. समुद्रकिनार्‍यावर पहिलं पाऊल जर कोणाचं पडेल तर ते जोन्सचं असायला हवं याबाबत तो आग्रही होता. अमेरिकन नेव्हीच्या नावावर त्यानं त्याच्याच गावावर (होमटाऊन) ह*ल्ला चढविला. जोन्सच्या चमूनं फ़ारसे प्रयत्न न करताच ब्रिटिश किल्ला ताब्यात घेतला.

त्यानंतर मात्र जे घडलं ते जॉननंही कल्पना केलेलं नव्हतं. जॉनच्या दोन होड्यांपैकी एक चक्क बारमध्ये घुसली. त्या होडीतील कर्मचारी डॅनियल फ़्रिमॅन स्वत:ला कसाबसा वाचवून पळाला आणि अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यासाठी धावला. गावातील रहिवाशांनी धक्क्याला घेराव घातला. ज्याठिकाणी कोळसा वाहतूक करणारं जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं.

जोन्सनं थोडे सुरक्षारक्षक धक्क्याच्या एका टोकाला तैनात केले. त्यानं त्याच्याजवळील जास्तीच्या जास्तीच्या मेणबत्त्या आणि पाईन कोन्सना कॅनव्हास गुंडाळून त्या ब्रिमस्टोनमधे बुडवून कार्गोमधे टाकल्या. जर कोळशानं आग पकडली असती तर ती जास्तच पसरली असती असं जोन्सनं त्याच्या जर्नलमध्ये नमूद करून ठेवलं आहे. त्यानं त्याची पिस्तूल सज्ज करून धक्क्याकडे नेम धरला. या दरम्यान त्याचे सहकारी होडीत बसून दिवसाच्या उजेडात समुद्रात निघून गेले आणि या सगळ्या गोंधळात रेंजर फ़ायरींग करतच होती.

आग लवकरच विझवली गेली आणि इतर कोणत्याही जहाजाला सुदैवानं हानी पोहोचली नाही. अशा रीतीने अख्ख्या बंदराला आग लावण्याचा कट एका जहाजाच्या आगीवर निपटवला गेला. हे अपयश जोन्सला सहन न होणारं होतं.

शहरवासींनी जोन्सला ओळखलं होतं. रहिवासी वस्त्यांमधे जोन्स त्याचं येणं जाणं असल्यानं त्याला ओळखणं कठीण नव्हतंच. तो बेंजमिन फ़्रॅन्कलिनचा लाडका होता. ब्रिटीशांच्या दृष्टिनं तो शीघ्रकोपी आणि निम्नस्तरीय कर्मचारीच होता.

जोन्सनं आता रेंजर सेल्कर्ककडे वळविली आणि ज्याठिकाणी स्थानिक देवतासमान असणारी व्यक्ती किडनॅप करण्याचा त्याचा कट होता. मात्र ओळखण्यात गल्लत झाल्यानं हा कटही सपशेल आपटला.

एकूणच जोन्सला या कारवाईत अपयशांच्या मालिकेला सामोरं जावं लागलं. या अनावश्यक यु*ध्दामुळे जनमत त्याच्या विरोधात झालं हे वेगळंच. त्याच्या या कारवायांनी त्याची प्रतिमा एक पायरट म्हणून चितारली गेली आणि यु*ध्दाचं रणशिंग वाजण्याऐवजी ते संपुष्टात आणण्यासाठीच मदत झाली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या गावातले लोक एकमेकांशी चक्क पक्षांच्या भाषेत संवाद साधतात

Next Post

फेरारीने अपमान केला म्हणून जगातली सगळ्यात लॅव्हिश कार जन्माला आली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

फेरारीने अपमान केला म्हणून जगातली सगळ्यात लॅव्हिश कार जन्माला आली

दुसऱ्या महायु*द्धात पराक्रम गाजवून व्हिक्टोरिया क्रॉसचे मानकरी ठरलेले 'नामदेव जाधव'..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.