कोरोनासाठी केली जाणारी न्यूक्लिक एसिड टेस्ट काय आहे..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


वुहाननंतर चीनच्या बीजिंगमध्ये ६७ कोरोना बाधित आढळून आल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या शिनफादी मार्केटमधून कोरोनाचा प्रसार झाला, जिथून बीजिंग शहराच्या कानाकोपऱ्यात भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. तिथे एका मासे कापणाऱ्याच्या दुकानात कोरोना आढळून आला आहे. तिथून तो शहरभर पसरण्याची भीती लक्षात घेता बीजिंग शहरात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि लोकांची टेस्टिंग सुरू केली गेली.

त्या मार्केटच्या आसपासच्या भागात न्यूक्लिक एसिड टेस्टचा वापर केला जातोय. ही टेस्ट आधुनिक स्वरूपाची असून पारंपरिक कोरोना टेस्टपेक्षा वेगळी आहे. चीनच्या फूड अँड ड्रग एडमिनीस्ट्रेशनने ज्या दोन टेस्टला मान्यता दिली आहे, त्यात ह्या न्यूक्लिक ऍसिड टेस्टचा देखिल समावेश करण्यात आला आहे. या टेस्टला मॉलिक्युलर टेस्ट, जेनेरिक टेस्ट देखील म्हटले जाते. दुसऱ्या टेस्टच्या प्रकाराला अँटी बॉडी टेस्ट म्हणतात. परंतु चीनमध्ये पहिल्या प्रकारच्या टेस्टला प्राधान्य देण्यात येत आहे.

न्यूक्लिक ऍसिड टेस्टमध्ये संशयीत व्यक्तीचा रेस्परेटरी सँपलला घेतले जाते. ज्यात नेफ्रॉलॉजिकल स्वॅबच्या माध्यमातून नाक आणि गळ्यातील नमुने घेतले जातात. यात गळ्यातील खालच्या भागातील द्रव्य सॅम्पल म्हणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही पद्धत न्यूमोनियाच्या रुग्णांच्या चाचणीसाठी देखील वापरण्यात येते.

नमुने घेतल्यानंतर त्यांच्यातून RNA काढला जातो, त्यांचे DNA मध्ये रूपांतर करण्यात येते आणि मग त्यांची चाचणी करण्यात येते. यात रुग्ण कोरोना संक्रमित तर नाही हे देखील तपासले जाते. जेनेटिक मटेरीयल बघितल्यावर लक्षात येते की व्यक्तीचा RNA व्हायरसग्रस्त आहे की नाही. त्यातून बाधा लक्षात येते. 

न्यूक्लिक ऍसिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर आयसोलेशन आणि उपचाराला सुरुवात केली जाते. ज्या रुग्णांना हलके लक्षण असतात त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येतात. जर स्थिती गंभीर असेल तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात येते.

बऱ्याच वेळा न्यूक्लिअर ऍसिड टेस्टचे परिणाम चुकीचे येतात. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने लोक निगेटिव्ह दाखवले जातात. हे तेव्हा होत जेव्हा रुग्णात व्हायरसचे प्रमाण कमी असते. याचाच अर्थ आजार हा प्राथमिक अवस्थेत असतो. 

बऱ्याचदा टेस्ट व्यवस्थित न केल्याने फॉल्स निगेटिव्ह येतात. पण व्यक्ती पॉझिटिव्ह असतात. याच कारणामुळे अमेरिकन सोसायटी फॉर मॉलिक्युलर बायोलॉजीने याचा स्टेप्स अत्यंत काळजीपूर्वक करायला सांगितल्या आहेत.

टेस्टचा दुसऱ्या प्रकारात म्हणजे अँटी बॉडी टेस्टमध्ये संशयित व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले जातात. जर व्यक्ती कुठल्या कोरोना बधिताचा संपर्कात आला असेल आणि बरा झाला असेल तर त्याचा शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडी घेतल्या जातात आणि कोरोना बधिताच्या शरीरातील अँटीजनशी ती मेळ खाते की नाही हे तपासले जाते. 

अँटिबॉडी अँटीजन जोडले आणि सॅम्पलचा रंग बदलायला सुरुवात झाली तर व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा निर्वाळा देण्यात येतो. या टेस्टचा अर्थ असा नसतो की व्यक्ती कायम पॉझिटिव्ह असेल, असं मानलं जातं की तो कोरोना बाधित असावा आणि त्याचा शरीरात अँटी बॉडी तयार झाली असावी.

रुग्ण तपासण्यासाठी अँटीबॉडी टेस्टला इतके महत्व दिले जात नाही कारण अँटीबॉडी बनायला १ ते २ आठवड्याचा कालावधी लागतो. या दरम्यान रुग्ण अधिक आजारी पडण्याचा धोका असतो. कोरोनाच्या बाबतीत अँटीबॉडी किती वेळात तयार होईल याची शाश्वती नाही. रुग्ण पुन्हा आजारी पडण्याचा आणि त्याच्या माध्यमातून कोरोना पसरण्याचा धोका देखील कायम असतो.

जेव्हा पासून मार्केटमध्ये कोरोना आढळून आला आहे, तेव्हापासून आतापर्यंत बीजिंग सरकारने २९,३८६ जणांची टेस्टिंग केली आहे. दोन दिवसात ९० हजार पार आकडा जाण्याची शक्यता आहे. 

हा बाजार जिथे कोरोना उद्रेक झाला तो ११२ हेक्टरमध्ये पसरलेला आहे. यात तब्बल २ लाख लोकांचा वावर ३० मे नंतर झाला आहे, यामुळे चीन सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ह्याला चीनमधील कोरोनाची सेकंड व्हेव म्हटले जात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!