The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरजालावरील काळी दुनिया ‘डार्क वेब’ काय आहे जाणून घ्या..!

by Shripad Kulkarni
28 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


इंटरनेटद्वारे आज काहीच अशक्य असे नाही. आजच्या आपल्या जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्य घटक बनला आहे असं आपण म्हणालो तरी हे वावगं ठरणार नाही. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार या महत्त्वाच्या इंटरनेटच्या गोष्टी तर आपल्याला सर्वांना माहितीच असतील पण याच इंटरनेटवर एक असंही जग आहे की जिथे बऱ्याच प्रकारचे बेकायदेशीर व्यापार केले जातात. 

या डार्क वेबद्वारे कित्येक सायबर गुन्हे घडत असतात. अगदी लोकांच्या महितीपासून ते ड्र*ग्सपर्यंत सर्व गोष्टी या डार्क वेबवर विक्रीसाठी असून डार्क वेब ही एक अशी गोष्ट बनली आहे की त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.

एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की सर्वसामान्य लोक केवळ ४ ते १०% इतकंच इंटरनेट वापरत असून बाकीचे इंटरनेट विश्व हे डार्क वेबने व्यापलेलं आहे. 

एका माहितीनुसार जगात १० लाखांहून अधिक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. यात विकिपीडिया, गुगल यांसारख्या साईट्सचा समावेश होतो. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या साईट्स या अनैतिक साईट्स आहेत किंवा किंवा त्या अन्यूजड आहेत, पण या साईट्स अशा असतात की काही माहीती गोपनीय ठेवण्याकरितासुद्धा यांचा वापर होतो.

डार्क वेब म्हणजे नेमकं काय? किंवा या डार्क वेबमुळे आपल्याला काही नुकसान होऊ शकते का?

सायबर क्राईमसाठी वापरल्या जाणार्‍या डार्क वेबद्वारे कोट्यवधी भारतीयांचा डेटा चोरीला गेला असून त्यांची स्कॅन केलेली कॉपी गुप्तपणे विकली जात आहे असा खुलासा सायबर इंटेलिजन्स एजन्सी (Cyble) यांनी केला होता. या घटनेनंतर भारतीय लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.



डार्क वेब म्हणजे काय तर या अशा काही वेबसाइट्स आहेत ज्या लोकांना सहजपणे दिसत नाहीत कारण त्यांचे आयपी अ‍ॅड्रेस जाणूनबुजून लपविलेले असतात. या वेबसाइट्स योग्य साधने वापरूनच पाहिल्या जाऊ शकतात, इतकेच काय तर त्यांचे सर्व्हर शोधणेसुद्धा अशक्य असते. त्यांचा संपूर्ण मागोवा घेणे देखील तितकेच कठीण आहे.

डार्क वेबवर प्रवेश करण्यासाठी, आपण बरीच अनामिक साधने वापरू शकता. या साधनांपैकी Tor आणि I2P हे लोकप्रिय साधने आहेत. डार्क वेब हे काळा बाजार करणाऱ्यांसाठी तसेच वापरकर्त्यांसाठीसुद्धा, दोन्ही बाजूंनी सुरक्षित असलेल्या लोकांसाठी खूप लोकप्रिय आहे म्हणून त्यांच्यात देखील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

इंटरनेटच्या काही गुप्त साइटवर वेगवेगळ्या ओळखपत्रांच्या लाखों स्कॅन केलेल्या प्रती Cyble या कंपनीच्या निदर्शनास आल्या असून त्यात पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅनकार्ड यांसारख्या गोष्टी आहेत. 

सदर कागदपत्रे इंटरनेटवर गुप्तपणे विकले जात होते. या गोष्टीची तपासणी करताना असे आढळून आले की डार्क वेबवर लाखो भारतीयांचा डेटा असून त्यात १ लाखाहून अधिक आयडी आहेत आणि याच ओळखपत्रांची विक्री चालू आहे. 

या प्रकरणात सायबलने डार्क नेटमधून डेटा विक्री करणारे सुमारे १००० आयडी काढले असून त्यांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार सायबेलच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की सदर कागदपत्रांचा डेटा हा सरकारकडून चोरी झाला नसून अन्य पक्षाने तो लीक केल्याचे दिसत आहे. हा चोरी झालेला डेटा एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रोफाइलवरून विकला जात आहे. 

या तपासात असे आढळले आहे की सदर अभिनेत्याकडे देशाच्या विविध भागातील १ लाखाहून अधिक आयडी ओळखपत्रे आहेत. या ओळखपत्रांचा वापर गुन्हेगारांमध्ये सामील होण्यासाठी तसेच स्वत:ला सामान्य व्यक्ती म्हणून घोषित करून सर्वांचा विश्वास मिळवण्यासाठी केला जातो.

या माहिती चोरीच्या गुन्ह्यात असे म्हटले जाते की आयडीची स्कॅन केलेली एक प्रत कंपनीच्या ‘Know Your Customer’ (केवायसी) कडून चोरी झाली आहे. गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार, केवायसी आणि बँकिंग हे दोन्ही घोटाळे अलीकडच्या काळात वाढले आहेत. 

सदर सायबर एजन्सीचा असा दावा आहे की तृतीय पक्ष या आयडी बँकांकडून चोरी करीत आहे आणि त्या डार्क वेबच्या माध्यमातून मोठ्या किंमतीवर सायबर गुन्हेगारांना विकत आहेत. मे महिन्यातही गुप्तचर संस्थेने डेटा चोरीच्या प्रकारणापासून धोक्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ७.६५ पेक्षा जास्त भारतीयांची वैयक्तिक माहिती डार्क नेटवर विकली जात होती. 

तपासणीत असे आढळले की यातील ४.७५ लोक असे आहेत जे True Caller सारखे अँप आपल्या मोबाईलमध्ये वापरतात. बऱ्याच जॉब वेबसाइटवरून देखील कोट्यवधी लोकांचा डेटा चोरीला गेला आहे.

इंटरनेटच्या गुप्त जगाचे नाव या दिवसांत बरेच वाढले आहे. अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत ज्यामध्ये डार्क वेबवर गुन्हेगार कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णाचे रक्त तसेच मास्क, व्हेंटिलेटर यासारख्या अत्यावश्यक वस्तू विकताना दिसले आहेत. ऑस्ट्रेलियन क्राइमोलॉजी संस्थेने डार्क वेबवर या रक्ताची बेकायदेशीर विक्री केल्याचा खुलासा केला आहे. श्रीमंत लोक ते विकत घेत आहेत जेणेकरुन ते कोरोनाचा प्रतिकारक करू शकतात.

डार्क वेब इंटरनेट हे जगातील एक गुप्त जग आहे. या जगात प्रवेश करण्यासाठी मोजक्याच ब्राउझरद्वारे प्रवेश करता येऊ शकतो आणि तो शोध सर्च इंजिनमध्ये देखील येत नाही. नेटची हे इंटेलिजेंस वर्ल्ड बरेच पसरले आहे. 

२०१५मध्ये लंडनच्या किंग युनिव्हर्सिटीने ५ आठवड्यांपर्यंत यावर संशोधन केले. त्यावेळेस त्यांना तब्बल २७२३ डार्क वेबसाइट्स आढळल्या होत्या. बदलत्या काळानुसार इंटरनेटवरच्या घटना वाईट होत चालल्या आहेत. 

सर्व्हे विद्यापीठाचे डॉ. मायकेल मॅकगर्व्ह्स यांनी केलेलं २०१९ मध्ये केलेल्या एका संशोधनात बर्‍याच गोष्टी त्यांच्या समोर आल्या. सायबर गुन्हेगारांची वेगाने वाढणारी संख्या आणि चुकीच्या गोष्टींकडे तरूणांचा वाढता कल. 

गुन्हेगार डार्क नेटवर क्रेडिट कार्ड खरेदी करतात आणि लाखो लोकांची फसवणूक करतात. इतकेच नाही तर इथे जगातील कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ मिळू शकतात. 

संगणक आणि अनेक प्रकारची खाती येथे हॅक केली जाऊ शकतात. हॅकर्सदेखील येथे आढळतात. या वेबद्वारे तुम्हाला लाइफटाइम नेटफ्लिक्स प्रीमियम खातेदेखील खरेदी करता येऊ शकते, जे येथे चोरीच्या मार्गाने उपलब्ध आहे.

डार्क वेबचे जग खूपच रहस्यमय असून याचा उपयोग बेकायदेशीर नाही, याचं कारण म्हणजे निनावीपणानंतरही आपल्याकडे एनक्रिप्शन असते, परंतु आपण डार्क वेबद्वारे कनेक्ट होऊन केलेले काम बेकायदेशीर असू शकते. जसे की एखाद्याचा क्रेडिट कार्ड पासवर्ड घेणे, किंवा ड्र*ग्स खरेदीमध्ये किंवा पो*र्नोग्राफीमध्ये सामील होणे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मागील दोन दशकांपासून सर्वच भयानक रोगांचा उगम चीनमध्येच का होत आहे..?

Next Post

‘ग्रीन टी’चे फायदे सर्वांना माहित आहेत, आता इतिहास वाचा

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

'ग्रीन टी'चे फायदे सर्वांना माहित आहेत, आता इतिहास वाचा

काय आहे भारत आणि चीनमधला अक्साई चीन वाद?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.