The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने रिस्क घेतली आणि होलोकॉस्टपासून पळालेल्या ज्यूंना त्याच्या ‘झू’मध्ये आश्रय दिला

by Heramb
4 January 2022
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगाच्या इतिहासातील सर्वांत क्रूर राजवट म्हणजे नाझी. नाझी राजवटीमध्ये अनेक सुखसुविधा असल्याचे दावे केले जातात. पण त्या सोयींपैकी एकही सोय ‘ज्यूं’साठी नव्हती. पळून गेलेल्या शेकडो यहुद्यांसह ज्या लोकांना भयानक नाझी अत्याचारांचा सामना करावा लागला असता, त्यांना ‘वॉर्सा प्राणीसंग्रहालया’ने बहुमूल्य आश्रय दिला. वॉर्सा प्राणीसंग्रहालय हे एक पॉलिश प्राणिसंग्रहालय आहे. पण हे प्राणिसंग्रहालय दुसऱ्या महायुद्धातील नाझींपासून वाचलेल्या ज्यू आणि इतर लोकांसाठी एक आश्रयस्थान होतं.

वॉर्सा प्राणीसंग्रहालय आणि त्याचे संचालक:

जॅन झॅबिंस्की आणि त्यांची पत्नी, अँटोनिना १९२९ साली ‘वॉर्सा प्राणीसंग्रहालया’चे संचालक बनले. प्राण्यांच्या प्रचंड वैविध्यपूर्ण संग्रहासह, प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनाने एक ‘प्राणी प्रजनन’ कार्यक्रम देखील आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे अनेक लोकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेटी दिल्या होत्या.

पण हे प्राणिसंग्रहालय फक्त प्राण्यांचे निवासस्थान नव्हते तर एक उत्तम कलेचे संग्रहालयही होते. याचे विशेष कारण म्हणजे प्राणिसंग्रहालयाचे संचालक कलाप्रेमी होते. त्यांनी कलाकार आणि संगीतकारांसाठी मैफिली, कला प्रदर्शने आयोजित करण्यासाठीच उघडले होते.

या जागेवरील कलेचे विविध रंग, प्राणी-वैविध्य आणि सर्जनशीलता यामुळे काहीच काळात या जागेला ‘द हाऊस अंडर अ वॅकी स्टार’ हे नाव पडले. जॅन आणि अँटोनिना हे दोघेही मानवतावादी होते, हे अनेक कारणांमुळे सिद्ध होते, पुढे याचा उल्लेख येईलच. त्यांनी अनेक जखमी प्राण्यांवर वेळीच उपचार करून त्यांना पूर्ववत केले. काही वेळा, त्यांनी इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.



१९३९ – जर्मनीचे आक्रमण:

१९३९ पर्यंत सर्वकाही सुरळीत चालले होते. पण १९३९ साली जर्मनीने पोलंडवर अघोषित आक्रमण केले आणि १ सप्टेंबर १९३९ हा दिवस वॉर्सा प्राणीसंग्रहालयासाठी अतिशय दुर्दैवी ठरला. त्यादिवशी एका हवाई बॉम्बिंगमध्ये ‘वॉर्सा प्राणीसंग्रहालया’चा बराचसा भाग जळून खाक झाला. या बॉम्बिंगमध्ये अनेक प्राणी मारले गेले. याशिवाय जे शिकार करणारे प्राणी या संकटातून वाचले होते, त्यांनाही जीवे मारण्यात आले, कारण प्राणिसंग्रहालयाच्या बाहेर पडून त्या प्राण्यांनी सामान्य जनतेला प्रचंड त्रास दिला असता. काही प्राणी मात्र यातून वाचले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

काही दिवसांनीच जर्मन सैन्याने छापा टाकून जवळ जवळ प्रत्येक प्राण्याची हत्या केली. जे काही प्राणी नाझींसाठी मौल्यवान होते त्यांना मात्र जिवंत ठेवण्यात आले होते. हे जिवंत ठेवलेले प्राणी ‘नाझी नेचर रिजर्व्ह’मध्ये नेण्यात आले. पोलंडमधील हे सर्वोत्तम प्राणिसंग्रहालय आता नाझींसाठी खाजगी शिकारीची जागा बनली होती. 

जॅन आणि अँटोनिनाची मनःस्थिती:

ज्या प्राण्यांचे जॅन आणि अँटोनिना यांनी अपत्यवत पालनपोषण केले आणि त्यांच्यावर तितकेच प्रेम केले त्या प्राण्यांना अशा क्रूरतेचा सामना करावा लागत होता, हे पाहून जॅन आणि अँटोनिनाला बराच मानसिक त्रास होत होता. एवढ्या अवघड परिस्थितीतही ते दोघे प्रचंड आशावादी होते. अँटोनिनाच्या डायरीतील नोंदीवरून हे सिद्ध होते. “सगळीकडे ही उदास, निर्जीव शांतता होती. ‘मृत्यूचे आणि नामशेषाचे स्वप्न नाही, तर फक्त ‘हिवाळी झोप’ आहे’ असं मी स्वतःला सांगत राहिले!!”

नाझी आक्रमणामुळे नाझी ज्यांना अमानुषपणे वागणूक देत होते अशा ज्यू समुदायाला शक्य असेल त्या मार्गाने जॅन झोबिन्स्कीने मदत करण्याची योजना आखली. जर्मन सैन्याने त्याला सार्वजनिक उद्यानांची जबाबदारी सोपवल्यापासून जॅनला त्याच्या या कामात फायदा झालाच होता. आपल्या नोकरीचे निमित्त करून त्याने ज्यूंच्या छळछावण्यांमध्ये झाडांना पाणी देण्याच्या बहाण्याने प्रवेश मिळवला.

जॅनची ज्यू छळ-छावण्यांमध्ये एंट्री:

छळ-छावण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला तेथील परिस्थिती पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. त्या छळ-छावण्यांमध्ये उपासमार, शारीरिक छळ, रोग, हत्या आणि निर्वासितांचा आक्रोश याशिवाय आणखी काहीही नव्हते. त्याने लवकरच ज्यूंच्या वस्त्यांमध्ये मैत्री वाढवली आणि बाहेरून त्याच्या ज्यू मित्रांसाठी त्याने अनेक संदेश आणले. त्याने गुप्तपणे डुकरांची पैदास करवून छावणीतील कैद्यांना मांस पुरवण्यापर्यंत मजल मारली.

त्याने हळू हळू जर्मन अधिकाऱ्यांचा विश्वास संपादित केला आणि त्याच्या ज्यू मित्रांना पळून जाता येईल यासाठी कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली. ज्या भल्यामोठ्या अभयारण्यरुपी पिंजऱ्यांमध्ये आधी प्राण्यांना ठेवले जात होते, त्यांच्यामध्येच आता जॅनच्या आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने नाझींच्या तावडीतून सुटून आलेल्या ज्यूंची व्यवस्था करण्यात आली होती. 

झू-कम-रेफ्युजी कॅम्प:

जॅन आणि अँटोनिना यांनी कोणत्याही गरजूला कधीही नकार दिला नाही. गरज असलेल्या सर्वांसाठी त्यांनी आपल्या घराचे आणि प्राणिसंग्रहालयाचे दरवाजे सतत उघडे ठेवले होते. त्यांचे प्राणिसंग्रहालय काहीच दिवसांमध्ये ‘ज्यूंचे अभयारण्य’ बनले असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही.

त्यांनी ज्यूंना जागा देण्याबरोबरच त्यांचे रक्षणही तितक्याच जागरूकतेने केले. या जोडप्याने त्यांचा पोटमाळा, बेबंद कोठडी, तळघर अशा ठिकाणी सुरक्षित लपण्याची जागा तयार केली आणि तळघराला इमारतीच्या बाहेरील भागाशी जोडणारा एक भूमिगत बोगदा देखील तयार केला.

धोक्याचा इशारा:

या दाम्पत्याच्या घरी, लिव्हिंग रूममध्ये एक भव्य पियानो होता. एखाद्या धोक्याची चाहूल लागली की अँटोनिना पियानोवर वादनासाठी बसून संगीताचे विविध भाग वाजवत असे, यामुळे या अवैध रहिवाशांना विशिष्ट माहिती मिळणे सोपे झाले. बहुतेकदा घरात किंवा तळघरात बसलेल्यांना हा धोक्याचा इशारा असत आणि या इशाऱ्यानंतर ते आता गायब झाले पाहिजेत असा संकेत होता.

सर्वांत मोठा धोका होता तो नाझी सैनिकांचा किंवा अधिकाऱ्यांचा. फक्त संगीत हे एकच गुप्त संवादाचे साधन नव्हते. कोणलाही संशय येऊ नये यासाठी या जोडप्याने आपल्या घरातील आणि आजूबाजूच्या पाहुण्यांसाठी टोपणनाव द्यायचे ठरवले. 

वॉर्सा प्राणीसंग्रहालयाचा आणि त्याच्या मालकांचा इतिहास क्वचितच पुस्तकांमधून शिकवला जातो, परंतु जे लोक द्वितीय विश्वयुद्धाच्या प्रचंड प्रलयातून जगले त्यांच्यासाठी, जॅन आणि अँटोनिना यांना नेहमीच ‘राष्ट्रांमध्ये नीतिमान’ म्हणून स्मरणात ठेवले जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बॉ*म्बस्फो*टात ११५ लोकांचा मृत्यू झाला आणि तरीही आरोपीला माफी देण्यात आली!!

Next Post

अल्काट्रेझ जेल आता बंद झालंय पण तिथले किस्से आजही जगभर प्रसिद्ध आहेत…!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अल्काट्रेझ जेल आता बंद झालंय पण तिथले किस्से आजही जगभर प्रसिद्ध आहेत...!

जगभरात वाढणारी बालगुन्हेगारांची संख्या आपल्या चिंतेचा विषय बनलीय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.