The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुत्रा, मांजर, उंदीर ओल्ड फॅशन झाली, या माणसाने एक मगर पाळली आहे..!

by द पोस्टमन टीम
17 July 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पाळीव प्राणी माणसाला भावनिक आधार देत असतात. परदेशात पाळीव प्राण्यांना अगदी पोटच्या मुलासारखं सांभाळलं जातं, त्यांचे लाड केले जातात. लोक प्रामुख्यानं विविध जातींची मांजरं किंवा कुत्रे पाळण्यास प्राधान्य देत असले तरीही काहीजण मात्र जगावेगळे प्राणी पाळून लक्ष वेधून घेतात.

पाळीव प्राणी म्हणून कुत्रा, मांजर, ससे, माकड, पक्षी फ़ार फ़ार तर खार वगैरे पाळल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र जर का कोणी एखादी सुसर पेट म्हणून घरी आणून ठेवलं असेल तर? ज्या प्राण्यापासून आपण सहसा चार हात लांब राहतो, ज्याचं भक्ष्य होण्याच्या भितीनं आपण दुरूनच प्राणीसंग्रहालयात दर्शन घेतो अशी सुसर घरात पाळण्याचं अचाट काम कोणी करू शकेल यावर विश्वास बसत नाही ना? मात्र असं जगावेगळं अचाट साहस केलं आहे अमेरिकेतील जोई हेन्ने यानं. या सुसरीचं नाव विली असून तो जोईचा “emotional supporter animal” असल्याचं जोईचं म्हणणं आहे.

ज्या प्राण्याला बघून आपल्याला भावना गोठतात, भितीनं हातपाय गारठतात तो प्राणी जोईला भावनिक आधार देतो.

साडेचार फ़ूट सुसर जोईच्या घरात अगदी सराईतपणे फ़िरत असते. कुत्रे किंवा मांजर ज्याप्रमाणे मालकाच्या पायात घुटमळतात, किचनमधे ट्रॉलीशी खेळतात, ट्रॉलीवर चढायचा प्रयत्न करतात तसाच विलीही जोईच्या घरात वावर असतो.

दंगा करत असतो. ऐकायला विचित्र वाटत असलं किंवा बघायला भयावह असलं तरीही विली आणि जोई म्हणजे तेरा मुझसे है पहले का नाता कोई अशी जोडगोळी बनली आहे.



कुत्र्यांना जसा गळ्यात पट्टा बांधून फ़िरायला नेतात तसाच विलीच्याही गळ्यात पट्टा अडकवून जेंव्हा जोई त्याला बाहेर नेतो तेंव्हा बघणार्‍यांची भितीनं गाळण उडते आणि त्यांना या एकूणच प्रकाराबद्दल कुतुहलंही वाटत असतं. जोई त्यांना समजावून सांगतो की विलीसाठी आजूबाजूला दिसणारी माणसं ही जोईसारखी त्याच्याशी खेळणारी दोस्तमंडळी आहेत. तो मनुष्यप्राण्याकडे त्याचं अन्न म्हणून पहात नाही.

जोईनं कितीही समजावलं तरीही सुसर पाळीव प्राणी म्हणुन बघायची सवय नसल्यानं लोक दुरूनच सुरक्षित अंतर ठेवून विलीचं कौतुक करतात. जोई मात्र लोकांनी विलीशी दोस्ती करावी, त्याच्याशी खेळावं म्हणून लोकांना सांगत असतो. कुत्र्याच्या डोक्यावर थोपटल्यावर जसा तो डोळे बंद करून लाड करवून घेतो तसाच विलीही डोक्यावर थोपटलं असता डोळे मिटून घेते. तीन वर्षाच्या विलीला खेळायला आणि लाड करवून घ्यायला आवडतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

जगावेगळ्य़ा प्राण्याच्या पेट मालक होण्याचा जोईचा प्रवास त्याच्या उत्तर यॉर्क येथे असलेल्या कौटुंबिक शेतात सुरू झाला. जोईचं कुटूंब शेती करत असल्यानं प्राण्यांच्या सहवास काही त्याला नविन नव्हता. मात्र एकूणच जोईला सरपटणार्‍या प्राण्यांविषयी लहानपणापासूनच विशेष ममत्व होतं. त्याच्याकडे एक महाविशारी साप देखील चुपचाप शहाण्या बाळासारखा पडून होता. तो रहायचा त्या यॉर्क काऊण्टीमधे सुसर पाळणं काही नवीन नव्हतं. लोक छोट्या छोट्या सुसरी हौसेनं पाळत असत मात्र त्यांच्या हे लक्षात येत नसे की आज ना उद्या या छोट्या सुसरी मोठ्या झाल्या की त्यांचं काय करायचं?

जोई आणि त्याचा एक मित्र मिळून ‘गेटर रेस्क्यु’ चालवत असत. मोठ्या झालेल्या, नको असलेल्या अशा सुसरींना निसर्गात योग्य त्या ठिकाणी सोडण्याचं काम ते करत असत.

एक दिवस जोइला त्याच्या या मित्राचा फ़ोन आला कि तुला सुसर पेट म्हणून हवी आहे का? जोईचं प्राणी प्रेम त्याला गप्प बसू देतच नव्हतं. त्यानं ही १४ महिन्याची सुसर घरी आणली आणि तिचा सांभाळ केला. हीच ती विली. जोई पेशानं सुतार आहे. त्याचं सुतारकाम चालू असताना विली त्याच्या अवतीभवती घुटमळत असते.

विली जेंव्हा घरी आली तेंव्हा पहिल्या पहिल्यांदा ती सतत प्रचंड घाबरलेली असे. कुत्र्याला किंवा मांजराला ट्रेनिंग देण्याइतकं सुसरीला हाताळणं सोपं नसतं. जोई हळूहळू विलीला हाताळायला शिकला, खाण्यापिण्याच्या सवयी वगैरे त्यानं निरिक्षणातून शिकल्या आणि विलीही जोईसोबत घरात रुळली. विलीनं फ़िरण्याच्या आणि मालकी असणार्‍या जागा निश्चित केलेल्या आहेत. किचनमधील एक कपाट तिनं आपल्या मालकीचं घोषीत करून टाकलं आहे. तिचा वावर त्या कपाटात असतो. तिला बेडवर किंवा कोचवर लोळत पडायला आवडतं. इतकंच नाही तर ती टिव्हीही आवडीनं बघते.

अशी ही जगावेगळी जोडगोळी जेंव्हा फ़िरायला बाहेर पडते लोक कुतुहल मिश्रीत भितीनं पहात असतात. आणि विली त्यांचं बघणंही एन्जॉय करत असते!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पुनर्जन्म घेतल्याचा दावा केलेल्या या स्त्रीमुळे प्राचीन इजिप्तच्या अनेक रहस्यांचा उलगडा झालाय

Next Post

सबंध युरोपला धडकी भरवणारा ‘अत्तिला हूण’ आजवरच्या सर्वात क्रू*र शासकांपैकी एक होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सबंध युरोपला धडकी भरवणारा 'अत्तिला हूण' आजवरच्या सर्वात क्रू*र शासकांपैकी एक होता

'आयबीएम’ नसतं तर हि*टल*रच्या तावडीतून लाखो ज्यूंचा जीव वाचला असता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.