The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इजिप्तच्या या वाळवंटात व्हेलचे शेकडो सांगाडे सापडले आहेत

by द पोस्टमन टीम
19 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


वाळवंट म्हटलं की उष्ण कोरडी हवा, समुद्राप्रमाणं विस्तीर्ण परसलेली वाळू आणि त्या वाळूवर दूर कुठेतरी होणारे मृगजळाचे भास आपल्या डोळ्यासमोर येतात. तुम्ही जर कधी इजिप्तच्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळवंटाला भेट दिली तर नजर जाईल तिथपर्यंत फक्त वाळूचे ढिगारेच ढिगारे दिसतात. या वाळवंटात साधं ओंजळभर पाणी देखील लवकर पहायला मिळणार नाही, तर अशा ठिकाणी महासागराची कल्पनाच नको करायला, नाही का? पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की, एकेकाळी या वाळूच्या जागी पाणीच पाणी होतं तर..? हो! लाखो वर्षांपूर्वी आता ओसाड दिसणाऱ्या वाळवंटाच्या जागी अथांग महासागर होता. प्रागैतिहासिक काळातील प्राणी त्यात वास्तव्याला होते. काही वर्षांपूर्वी अभ्यासकांना याठिकाणी जीवाश्म सापडले आहेत.

इजिप्तमधील हा परिसर आता ‘वादी-अल-हेतान’ म्हणजेच ‘व्हेल व्हॅली’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सापडलेल्या आर्कीओसेटी (प्रागैतिहासिक काळातील व्हेल) जीवाश्मांमुळं त्याला हे नाव पडलं आहे. या भागाचं ऐतिहासिक महत्त्व पाहता युनेस्कोनं व्हॅलीला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’ म्हणून घोषित केलं आहे.

जगभरातील उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हे ठिकाण म्हणजे ‘जन्नत’च. इथे सापडत असलेले जीवाश्म हे उत्क्रांतीच्या सिद्धांतामधील एक महत्त्वाचा दुवा आहेत. या जीवाश्मांचा अभ्यास केला की, व्हेल मासे जमिनीवरून महासागरात चालत जात असल्याचा भास तर नक्कीच होतो. भू-आधारित प्राण्यांपासून सागरी सस्तन प्राणी म्हणून व्हेलचं रुपांतर झालं याचे हे जीवाश्म पुरावे आहेत.

लाखो वर्षांपूर्वी वादी अल हेतानचं वाळवंट ‘टेथिस समुद्राचा’ भाग होती. काळाच्या ओघात भूगर्भीय हालचाली होऊन टेथिस समुद्र नामशेष झाला आणि इजिप्तमध्ये वाळवंट तयार झालं. भारताच्या डोक्यावर हिमालयाची निर्मिती झाली. आफ्रिकेत मानवाच्या पहिल्या वंशजानं आपल्या दोन पायांवर तोल सांभाळला, फॅरोंनी पिरॅमिड्स बांधले, रोमचा उदयास्त झाला, औद्योगीक क्रांती झाली, मानवानं प्रचंड प्रगती केली. मात्र, या सर्व घडामोडी होत असताना टेथिस समुद्रातील जीवांचे अवशेष निवांत आराम करत होते.

एक दिवस फिलीप गिंगरीच नावाच्या व्यक्तीचे पाय इजिप्तच्या वाळवंटात पडले आणि हे निपचित पडलेले व्हेल जगाच्या समोर आले. पृष्ठवंशीय प्राण्यांचा अभ्यास करणारे, मिशिगन विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ फिलीप गिंगरीच आणि त्यांचे सहाय्यक गेल्या २७ वर्षांपासून ‘वादी अल हेतान’मध्ये तळ ठोकून आहेत. 



आतापर्यंत त्यांनी याठिकाणी शेकडो व्हेल, शार्क आणि इतर समुद्री प्राण्यांचे जीवाश्म शोधून काढले आहेत. व्हेल आणि इतर सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा पूर्वज म्हणून सॅलमॅन्डर या टेट्रापॉडकडं (चतु:षपाद) पाहिलं जातं. सुमारे ३६ करोड वर्षांपूर्वी तो समुद्रातून जमिनीवरील चिखलात आला. पुढे त्याच्या वंशजांच्या फुफ्फुसांचं कार्य सुधारलं. त्यांचे पंखरुपी पाय मजबूत झाले, असं मानलं जातं. जमिनीवर टिकाव धरण्यात सस्तन प्राणी सर्वात जास्त यशस्वी ठरले.

६ करोड वर्षांपूर्वी त्यांनी पृथ्वीवर आपलं अधिराज्य गाजवलं होतं. व्हेल देखील या मूठभर सस्तन प्राण्यांपैकी एक होते. 

मात्र, काही काळानंतर त्यांनी पुन्हा स्वत:ला समुद्राच्या अनुकुल केलं. आजतागायात ते याच अवस्थेत आहेत. त्यामुळेच जॉर्ज ग्लेयार्ड सिम्पसनसारख्या अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञांना प्रश्न पडला होता की, त्यांची वर्गवारी नेमकी कोणत्या गटात करावी.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गिंगरीच यांना देखील हा प्रश्न पडला होता. १९७० साली फिलीप गिंगरीच यांनी येल विद्यापीठातून पीएच. डी. मिळवली. त्यानंतर लगेच त्यांनी वायोमिंग क्लार्क्स फोर्कच्या पात्रात उत्खनन करण्यास सुरुवात केली. दहा कोटी वर्षांपूर्वी उल्कावर्षावामुळं डायनासोर नामशेष झाले. या सिद्धांताचा ते अभ्यास करत होते. सुरुवातीच्या काही अभ्यासावरून त्यांनी अंदाज बांधला की, प्राचीन काळी आशियातून सस्तन प्राण्यांनी उत्तर अमेरिकेत स्थलांतर केलं असावं.

आपला अंदाज पडताळून पाहण्यासाठी फिलीपनं पंजाब आणि पाकिस्तानच्या वायव्य (ज्याला आता खैबर पख्तूनख्वा म्हणतात) प्रांतात उत्खनन करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, एकेकाळी तिथे टेथिस समुद्राचा पूर्व भाग होता. १९७७ साली त्याठिकाणी त्यांना एका प्राण्याच्या ओटीपोटीचे जीवाश्म सापडले. १९७९ साली पुन्हा त्यांना काही जिवाश्म सापडले. त्यात लहानसा मेंदू आणि जबड्याचा भाग होता. त्याचा अभ्यास केल्यानंतर ते व्हेलसारख्या एखाद्या प्राण्याचे असावेत, अशी शक्यता तयार झाली. तोपर्यंत सर्वांचा समज होता की, आता ज्या अवस्थेत व्हेल आहेत तीच त्यांची पूर्वीपासूनची अवस्था आहे. मात्र, फिलीप यांच्या संशोधनानं या समजाला तडा दिला.

आपल्याला सापडलेले जीवाश्म हे एकेकाळच्या व्हेलचेच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी १९८०च्या दशकात इजिप्तमधील वादी अल हेतानकडं आपला मोर्चा वळवला. पत्नी, बी. होली स्मिथ आणि मिशिगनमधील सहकारी विल्यम सँडर्स यांच्यासह फिलीपनं उत्खननं सुरू केलं. या त्रिकुटाला बॅसिलोसोरससारख्या दिसणाऱ्या आणि पूर्णपणे जलचर असलेल्या व्हेलचे अर्धवट सांगाडे सापडले. पुढील काही काळात त्यांना शेकडो व्हेल्सचे अखंड सांगाडे सापडले. मात्र, त्यामध्ये दोन प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काही व्हेल्सच्या सांगाड्यांमध्ये गुडघ्यांचा विकास झालेले पाय देखील सापडले. त्यामुळे हे सिद्ध झालं की, एकेकाळी व्हेल पायांवर चालत होते.

याशिवाय वादी अल हेतानमध्ये सध्या वाळवंटातील झाडं, उत्तर आफ्रिकन लांडगा, लाल कोल्हा, इजिप्शियन मुंगूस, आफ्रिकन वाइल्डकॅट यासारखे १५ प्रकारचे सस्तन प्राण्यांचा निवास आहे. 

फेनेक कोल्हे तर अगदी सहज दिसतात. तसेच, जवळच असलेल्या तलावांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १९ प्रजाती आणि पक्ष्यांच्या ३६ प्रजाती नोंदविल्या गेल्या आहेत.

वर्षाकाठी हजारपेक्षा जास्त लोक याठिकाणाला भेट देतात. यात अभ्यासकांची आणि परदेशी पर्यटकांची संख्या जास्त असते. वादी अल हेतानचा काही भाग पर्यटनस्थळ बनविल्यामुळे मुख्य जीवाश्मांसाठी वॉकवे तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी छोटे-छोटे केबिन देखील तयार केलेले आहेत. युनेस्कोनं जवळचं कॅम्पसाठी देखील जागा उपलब्ध करून दिलेली आहे. कधी काळी समुद्र असलेल्या या वाळवंटात सजीवांच्या उत्क्रांतीबद्दल किती रहस्य दडलेली आहेत, याचा शोध संशोधक घेत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेची नाराजी पत्करून भारताने जपान सोबत शांतता करार केला होता

Next Post

या भावंडांच्या आयुष्यातील खऱ्या घटनेवरून स्पीलबर्गने ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ बनवलाय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या भावंडांच्या आयुष्यातील खऱ्या घटनेवरून स्पीलबर्गने 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' बनवलाय

१८व्या शतकातच टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून एका गुन्हेगाराला अटक केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.