The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंटरनॅशनल चॅम्पियन बनायला घर सोडून गेलेला विक्की गौंडर पंजाबचा मोस्ट वॉन्टेड गुंड बनला होता

by द पोस्टमन टीम
16 December 2025
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जेलच्या बाहेर एक फॉर्च्युनर येऊन थांबते. यातून दोन पोलीस अधिकारी उतरतात, ते जेलचे गेट उघडतात आणि एका अपराध्याला आत टाकतात. त्याचवेळी जेलच्या बाहेर १००० राउंड गोळ्या चालवल्या जातात. एक एक करत पंजाबच्या सर्वांत जास्त सुरक्षा असलेल्या नाभा जेलमधून फुटीरतावादी खलिस्तानी नेता आणि चार कुख्यात गुंड पळ काढतात. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रकार २७ नोव्हेंबर २०१६ रोजी घडला. जे अपराधी त्यावेळी जेलमधून फरार झाले होते, त्यापैकी एकाचे नाव होते विकी गौंडर !

ज्या पंजाब पोलिसांच्या तावडीतून गौंडरने पळ काढला होता, त्याच पंजाब राज्यासाठी एकेकाळी या गौंडरने पदकं जिंकली होती. सैन्यात त्याला शिपाई म्हणून नोकरी मिळणार होती पण तो गुन्हेगार बनला. हे कसे घडले हे जाणून घेऊयात…

२७ तारखेला घडलेल्या घटनेने गौंडरचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले होते. प्रत्येक वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल, वेब पोर्टलवर त्याचेच नाव होते. त्याच्या घरच्यांना देखील तो गुन्हेगारी मार्गाकडे का वळला याचे रहस्य उलगडले नव्हते.

विक्की १९ वर्षांचा होता, त्यावेळी त्याचे नाव हरजिंदरसिंह भुल्लर असे होते. हे नाव त्याला त्याच्या बापाने दिले होते. लहानपणापासूनच विक्कीला खेळ खेळण्यात अधिक रस होता. तो पूर्ण दिवस मैदानात खेळत रहायचा. अभ्यास फक्त पास होण्यासाठी करत होता.



हरजिंदर पूर्णवेळ ग्राउंडवर खेळण्यात घालवायचा त्यामुळे त्याला गौंडर या टोपणनावाने हाक मारली जात असे. आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जलंधरला गेला.

जलंधरच्या स्पोर्ट्स स्कुलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. अशाप्रकारे विकीचा खेळाच्या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. तो एक सज्जन मुलगा होता. त्याला फक्त देशासाठी मेडल आणण्याची महत्त्वाकांक्षा होती. याच दिशेने तो पुढील प्रवास करत होता.

विक्की जलंधरला घरच्यांचे नाव मोठे करायचे स्वप्न घेऊन आला होता. त्याच्या डोळ्यात देशासाठी पदक जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होती. विक्की त्याच्या गावचा एक स्टार खेळाडू होता. त्याने राष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्ण आणि दोन रजत पदक जिंकले होते. त्या वेळेपर्यंत विक्कीने गुन्हेगारीच्या जगात पाऊल देखील ठेवले नव्हते. स्पोर्ट्स क्लबमध्ये विक्कीची लहानमोठी भांडणे होत असत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पोलिसांच्या मते विक्की २००८ साली गुन्हेगारी जगताच्या संपर्कात आला होता. विक्कीला त्याच्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नवप्रीत सिंह उर्फ लवली बाबा भेटला. लवली बाबाने विक्कीशी घट्ट मैत्री केली. तो त्या स्पोर्ट्स अकॅडमीचा कोच असल्यामुळे त्यांची मैत्री बहरत गेली. लवली बाबाने विक्कीची कुख्यात गँगस्टर प्रेम लाहोरियाशी भेट घालून दिली. यातून विक्की सुक्खा काहलवा या एका अजून कुख्यात गॅंगस्टरच्या संपर्कात आला. हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि विक्कीची यांच्याशी असलेली मैत्री बहरत गेली. पुढे तिघेही एकमेकांचे पार्टनर बनले.

विक्कीने स्पोर्ट्स खेळणे सोडून दिले आणि आता तो शस्त्र चालवू लागला. या काळात त्याला सैन्यदलात नोकरीची संधी चालून आली होती, पण गँगस्टरची मैत्री त्याला इतकी भावली होती की त्याने या नोकरीचा प्रस्ताव देखील स्वीकारला नाही.

एकेकाळी ज्या विक्कीला देशासाठी काहीतरी करायचे होते, तो आता देशाचाच शत्रू बनू पाहत होता. त्याने गुन्हेगारीच्या मार्गावर त्याचा प्रवास सुरु केला. याबरोबरच त्याच्यातील एक देशभक्त खेळाडू नष्ट झाला होता व गँगस्टरचा उदय झाला होता. २०१० साली सुक्खा काहलवाने लवली बाबाचा खू*न केला. लवली बाबा विक्कीचा कोच होता आणि मित्र होता, तो प्रेम लाहोरियाच्या देखील एकदम जवळचा होता. लवलीच्या म*र्डरने संतप्त झालेल्या विक्कीने त्याच्या खु*नाचा बदल घेण्याचा निर्णय घेतला. प्रेम देखील यात त्याला साथ देत होता. लवलीच्या खुनानंतर सुक्खा पंजाबमधील सर्वांत ताकदवान गँगस्टर बनला होता. त्याला मारणे इतके सोपे नव्हते. त्यांनी व्यवस्थित नियोजन करण्यास सुरुवात केली.

सुक्खा हा पंजाबमधील सर्वांत मोठा गुंड बनल्यामुळे पोलीस देखील त्याच्या मागावर होते. काही काळात पोलिसांनी सुक्खाला बेड्या ठोकल्या.

सुक्खाला पोलीस व्हॅनमध्ये नाभा जेलच्या दिशेने घेऊन जाण्यात येत होते. तो जलंदर कोर्टात सुनावणीसाठी आला होता. भर रस्त्यात विक्की आणि प्रेम यांनी पोलिसांची गाडी आडवली आणि सुक्खावर ह*ल्ला चढवला. ज्या गाडीत सुक्खा जात होता त्यावर सरळ ह*ल्ला करून त्यांनी त्या गाडीची चाळणी केली. तब्बल १ हजार गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. या गोळीबारात सुक्खा मेला. तो मेल्यानंतर विक्की इतका खुश झाला की त्याच्या प्रेताच्या शेजारी त्याने चक्क भांगडा केला आणि त्याचा व्हिडीओ देखील काढला.

या घटनेनंतर विक्की हा पंजाबमधील कुख्यात गँगस्टर म्हणून प्रसिद्ध झाला. आता पोलीस त्याच्या मागे लागले. २०१५ साली त्याने सुक्खाचा खू*न केला, त्याच वर्षी पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला नाभा जेलमध्ये पाठवण्यात आले.

२०१६ साली अत्यंत फिल्मी पद्धतीने नाभा जेलमधून तो पसार झाला, त्याचा दोस्त प्रेम लाहोरियाने त्याला पळून जाण्यास मदत केली होती. आता तो पोलिसांच्या हिटलिस्टवर आला होता. मोजून फक्त एकच वर्ष त्याने जेलमधे काढले होते. पोलीस त्याचा पाठलाग करत होते. २७ जानेवारी २०१८ रोजी विक्की पोलिसांच्या तावडीत सापडला. पंजाबचे सर्वांत खतरनाक गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेम लाहोरिया आणि विक्की गौंडरला पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या. त्याला राजस्थानच्या एका छोट्या खेड्यात मारून टाकण्यात आले होते.

एकेकाळी छातीवर पदके मिरवणाऱ्या विक्कीच्या छातीवर पोलिसांच्या गोळ्या लागतील, हे कोणाच्या ध्यानी मनी देखील नव्हते. विक्कीचे नशिब एका क्षणात पालटले होते.

गुन्हेगारीचा मार्ग सुरुवातीच्या काळात कितीही चांगला वाटत असला तरी शेवटी त्यावर काटेच पांघरलेले असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

महाराजा रणजितसिंहाच्या बॅटींगपुढे इंग्रज गोलंदाज अक्षरशः नांग्या टाकायचे

Next Post

राजस्थानमधील या गावात आहे चक्क ‘बुलेट’चे मंदिर!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

राजस्थानमधील या गावात आहे चक्क 'बुलेट'चे मंदिर!

या माणसाने भारतात अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मांडायची सुरुवात केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.