The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उघड्या डोळ्यांनी कितीही दूर पाहू शकणाऱ्या वेरोनिकाचे डोळे म्हणजे विज्ञानाला पडलेलं कोडंच होतं

by द पोस्टमन टीम
21 September 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते’…’बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील हा डायलॉग कमलीचा प्रसिद्ध झाला होता. त्याचा वापर करून टिकटॉक सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओज् अपलोड झाले होते. चित्ता आणि बाज म्हणजेच गरूड दोन्ही जीव अतिशय भेदक नजर आणि वेगासाठी ओळखले जातात. थोरल्या बाजीरावांची तलवारदेखील त्याच भेदकपणे आणि वेगानं फिरायची असं म्हटलं जातं.

चित्ता आणि गरूडाची तुलना केली तर नजरेच्या बाबतीत गरूड नक्कीच सरस ठरतो. माणसाची आणि गरूडाची तुलना केली तर, सामान्य माणसापेक्षा गरूडाची नजर ३ ते ४ पटीनं जास्त असते. आपण सर्वजण आपल्या सुंदर डोळ्यांनी सभोवतालचं जग पाहण्यास समर्थ आहोत.

एकूणच काय साधारणपणे सर्वांची नजर सारखीच असते. मात्र, पृथ्वीवर अशी एक व्यक्ती होती जिची नजर खरोखर ‘बाज की नजर’ होती! एखाद्या सुपरनॅचरल पॉवर असलेल्या ‘सुपरह्युमन’प्रमाणं ही व्यक्ती होती. वेरोनिका सीडर, असं या सुपरगर्लचं नाव होतं. वेरोनिकाच्या नजरेमध्ये असं काय खास होतं, ज्यामुळे तिला सुपरगर्ल म्हटलं जाई?

सामान्य माणसापेक्षा वेगळ्या शक्ती घेऊन, १९५१ साली पश्चिम जर्मनीतील एका शहरामध्ये वेरोनिकाचा जन्म झाला होता. तिचं बालपण इतर सामान्य मुलांप्रमाणेचं होतं. तीनं आपलं शालेय शिक्षण देखील इतर मुलांच्या बरोबरीनं पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी पश्चिम जर्मनीतील स्टटगार्ट विद्यापीठात प्रवेश घेतला.

तिनं दंतवैद्यकशास्त्रात पदवी घेतली होती. मात्र, तिचे डोळ्यांमुळे ती इतरांपेक्षा विशेष होती. तिच्या गरूडासारख्या डोळ्यांमुळे ती मानवी नजरेच्या पलीकडेही पाहू शकत होती. वेरोनिकाच्या डोळ्यांमध्ये इतरांच्या तुलनेत कमालीची क्षमता होती. ती एक ते दीड मैल अंतरावर असलेली व्यक्ती किंवा वस्तू देखील सहज ओळखत असे!



स्टटगार्ट विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना पहिल्यांदा तिच्या डोळ्यांचा हा असामान्यपणा समोर आला. ऑक्टोबर १९७२ मध्ये, स्टटगार्ट विद्यापीठातील ‘नेत्ररोग’ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करत होता. या प्रक्रियेत कुठला विद्यार्थी किती दूर पाहू शकतो हे देखील तपासलं जातं होतं.

जेव्हा या चाचण्यांचे अहवाल समोर आले तेव्हा विद्यापीठातील संपूर्ण वैद्यकीय विभागाचे ‘डोळे’ आश्चर्यानं विस्फारले गेले. विद्यापीठातील वेरोनिका नावाच्या विद्यार्थीनीची नजर असामान्य असून ती साधारण एक(एक मैल म्हणजे १.६ किलोमीटर) ते दीड मैल अंतरावर असलेली गोष्टी देखील सहज ओळखू शकत असल्याचं अहवालात समोर आलं. तिचं व्हिजन आतापर्यंतचं सर्वात जास्त क्षमतेचं ठरलं आहे.

जेव्हा विद्यापीठात तिची तपासणी झाली, तेव्हा ती २१ वर्षांची होती. कुठल्याही सामान्य व्यक्तीची नजर २०/२० असते मात्र, वेरोनिकाची नजर २०/२ होती. दूर अंतरावरील वस्तू ओळखण्याशिवाय ती त्या दरम्यानचं अंतर देखील सहज मोजू शकत होती! म्हणजे जसं ‘आयर्नमॅन’ जार्विसच्या मदतीनं डोळ्यांसमोर आकडेवारी करत होता तसचं काहीसं वेरोनिकाचं होतं! तिच्या अफाट क्षमतेमुळं १९७२ साली गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही तिच्या नावाची नोंद करण्यात आली. तिचा विक्रम आजपर्यंत कुणीही मोडू शकलेलं नाही किंबहुना कुणी जवळपास देखील पोहचू शकलेलं नाही.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

वेरोनिकाची दृष्टी दुर्बिणीशी तुलना करण्यायोग्य होती. अगदी रंगीत टेलिव्हिजन डिस्प्लेवर फ्रेम बनवणारे रंग पाहण्यास देखील सक्षम असल्याचा दावा तिनं केला होता. विज्ञानानुसार, कोणताही एक रंग हा लाल, निळा आणि हिरवा या मुख्य रंगांनी बनलेला असतो. सामान्य डोळ्यांमध्ये कॉन नावाचे प्रकारचे फोटोरिसेप्टर असतात. या लहान पेशी असातात ज्या रंग ओळखण्याचे काम करतात. म्हणजे समोर ज्या रंगाची गोष्ट असते ती आपल्याला आहे त्याच रंगामध्ये दिसते. मात्र, वेरोनिकाचं तसं नव्हतं. तिला ती विशिष्ट गोष्ट किती रंगांनी मिळून तयार झाली आहे ते सर्व रंग दिसत. तिची ही गोष्ट नक्कीच ‘सुपरनॅचरल’ होती.

वेरोनिका सीडरच्या दृष्टीच्या मागं नेमक काय कारण दडलेलं होतं? साधारण २५ सेंटीमीटरवर, मानवी डोळ्यांची क्षमता १०० मायक्रॉन किंवा ०.०००३ रेडियनवर येते. एक मायक्रॉन एक मिलीमीटरच्या एक हजाराव्या भागा इतका असतो. म्हणजेचं १०० मायक्रॉन एक मिलीमीटरचा दहावा भाग असतो. जो कागदावरील ठिपक्याइतका आकाराचा असतो. जर ती वस्तू पुरेश्या प्रकाशात असेल तर आपला डोळा इतक्या लहान वस्तू पाहण्याचं नियोजन करू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर आकाशातील तारे आपल्यापासून कोट्यवधी प्रकाश-वर्षे दूर आहेत. ते स्वयंप्रकाशित तारे आपल्या डोळ्यांना दिसतात मात्र, त्यांचा आकार लहान-मोठा दिसतो.

वेरोनिका सीडरची पाहण्याची क्षमता एक अलौकिक मानवी रहस्य मानली जाते. कारण, तिच्या शक्तिशाली दृष्टीमुळं तिला एका टपाल तिकिटाच्या मागे १० पानांचं पत्र लिहिता आणि वाचता येऊ शकत होतं! ही गोष्टीचं तिनं प्रात्यक्षिक देखील करून दाखवलं होतं. तिने हाताच्या नखांच्या आकाराच्या तुकड्यावर २० कडव्यांची एक कविता लिहून दाखवली होती.

आता विज्ञानानं कमालीची प्रगती केली आहे. प्रगत नेत्र शस्त्रक्रियेद्वारे वेरोनिका सीडरसारखी ‘अलौकिक’ दृष्टी मिळवणं शक्य आहे का? असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल. जर नैसर्गिकरित्या तिच्यासारखी नजर पाहिजे असेल तर ती नक्कीच मिळणार नाही. कारण वेरोनिकाला जन्मजातच निसर्गानं ती देणगी दिली होती. पण ‘Ocumetics Technology Corp’ नावाची एक कंपनी आहे. जी एक बायोनिक लेन्स विकसित करत आहे. त्याच्या मदतीनं वरोनिकासारखी नजर मिळू शकण्याची शक्यता आहे.

आपल्या डोळ्यांमध्ये अलौकिक क्षमता असूनही वेरोनिका सीडरनं कायम सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. दंतवैद्यकशास्त्रात शिक्षण पूर्ण करून तिनं व्यवसाय म्हणून क्लिनिक चालवलं. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी वयाच्या ६२व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. म्हातारपणातही वेरोनिकाची दृष्टी इतर व्यक्तींपेक्षा जास्तच होती. सुदैवानं तिच्या या अद्भूत क्षमतेचा कुणी गैरवापर करून घेण्याचा प्रयत्न केला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगभर मृत्यूचं तांडव घालणाऱ्या लंगड्या तैमूरबद्दल आजही कित्येक गोष्टी अज्ञात आहेत

Next Post

हि*टल*रच्या डॉक्टरने त्याच्या नकळत औषधांमधून ड्र*ग्ज देऊन त्याला व्यसन लावलं होतं..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

हि*टल*रच्या डॉक्टरने त्याच्या नकळत औषधांमधून ड्र*ग्ज देऊन त्याला व्यसन लावलं होतं..!

जुने आयफोन जाणीवपूर्वक स्लो केले म्हणून ॲपलला १३ कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.