The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेटर व्हायचं स्वप्न बघितलेला पोरगा जगातला सर्वोत्तम धावपटू बनला होता

by द पोस्टमन टीम
11 May 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जमैका म्हटल्यावर आठवतो तो तिथला समुद्र किनारा, उष्ण हवामान, जमैकाची स्पेशल रम, बॉब मार्ले!

पण या सगळ्याच्याही जमैका म्हटल्यावर डोळ्यासमोर चटकन उभी राहते ती उसेन बोल्टची आकृती. कॅरेबियन देशांच्या समूहातील जमैका हा एक एकदम गरीब देश मानला जातो. याच देशातील उसेनने संपूर्ण जगाला आपल्या वेगाने वेड लावून टाकले.

२०१७ साली जेव्हा किंग्स्टनच्या नॅशनल स्टेडियमवर तो शेवटची शर्यत पळला तेव्हा त्याला पाहण्यासाठी ३० हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

उसेनने इतक्या लवकर निवृत्त होण्याचा निर्णय ऐकून अनेक जण नाराज झाले होते. अजून थोडा काळ उसेन मैदानात थांबला असता तर काय बिघडलं असतं अशाही अनेकांच्या भावना होत्या, पण शेवटी निसर्गाने प्रत्येकालाच काही तरी मर्यादा घालून दिलेली आहे. त्या मर्यादेच्या बाहेर तर कुणी जाऊ शकत नाहीत.

जमैकासारख्या गरीब आणि मागास देशातील उसेनने जे यश मिळवले ते पाहून कोणाचेही डोळे दिपतील. जमैकातील अनेक सामान्य कुटुंबांप्रमाणेच बोल्टचे कुटुंबही हलाखीतच जगत होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी उसेन पडेल ते काम करत होता. किराणा दुकानात रम आणि सिगरेट विकण्याचेही काम त्याने केले.



‘फास्टर दॅन लाईटनिंग: माय स्टोरी’ या आपल्या आत्मचरित्रात त्याने कुटुंबाच्या या हालाखीच्या पार्श्वभूमीचा उल्लेख केला आहे. आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची त्याला पूर्णत: जाणीव होती म्हणूनच तो कधीच आपल्या ध्येयापासून भरकटला नाही. खेळाडू होणे हेच त्याचे अंतिम ध्येय होते. अगदी सुरुवातीलाच त्याने कोणत्या खेळात जायचे हे जरी ठरवले नसले तरी खेळाडू व्हायचे त्याचे ध्येय मात्र पक्के होते

क्रिकेटचे गारुड सर्वांनाच मोहवून टाकते. तशीच क्रिकेटची जादू उसेनवरही होतीच. त्यालाही क्रिकेटमध्ये येण्याची इच्छा होती, पण नंतर तो ॲथलीट बनला. त्याने जे ॲथलेटिक्समध्ये येऊन मिळवले ते पाहता त्याचा निर्णय योग्यच होता असे म्हणावे लागेल. उसेनने फक्त स्वप्ने पहिली नाहीत तर त्यांना सत्यातही उतरवले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

अमेरिका, ब्रिटनसारख्या देशातील खेळाडूला मिळालेले यश आणि जमैकातील उसेनला मिळालेले यश यात जमीन-अस्मानचे अंतर आहे.

त्याने ज्या सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत हे मिळवले ते पाहिल्यास उसेनचे आयुष्य म्हणजे एखादी जादूची पोतडीच आहे असे वाटेल.

अगदी निवृत्तीनंतर त्याने हे जाहीर केले की, मी खेळणार नसलो तरी या क्षेत्रात काही तरी भरीव काम निर्माण व्हावे यासाठी मी माझ्या परीने नक्कीच योगदान देईन. यशाच्या या टप्प्यावर पोहोचेपर्यंत त्याने किती अडथळे पार केलेत आणि यात तो किती आणि कसा जखमी झाला हे त्याचे त्यालाच माहिती. म्हणूनच तर भावी पिढीच्या वाट्याला चांगले दिवस कसे येतील हे पाहणे हेच आपले ध्येय आहे असे तो मानतो.

उसेन बोल्टची धावण्याची गती पाहिल्यास आपल्याला पापण्यांची उघडझाप करण्यास जितका वेळ लागतो अगदी तितक्याच वेळेत उसेनने काही मीटरचे अंतर पार केलेले असते. उसेनचा हा वेग संशोधकांनाही थक्क करणारा आहे. म्हणूनच तर त्याच्या या वेगाने धावण्यामागचे कारण काय असावे या प्रश्नही वैज्ञानिकांना पडला आणि त्यांनी उसेनचा अभ्यास करून यावर काही निष्कर्षही काढले आहेत. यासाठी त्यांनी ‘मॅथेमॅटिक्स मॉडेल’ची पद्धती अवलंबली. ‘द युरोपियन जर्नल ऑफ फिजिक्स’ या एका नियतकालिकेत त्यांचा हा अभ्यास प्रसिद्ध झाला होता.

बोल्टची उंची आणि त्याचे मजबूत स्नायू यामुळेच बोल्ट इतक्या वेगाने पळू शकतो असा हा अभ्यास सांगतो.

पळताना वाऱ्याच्या वेगामुळे आपल्याला प्रतिरोध होतो हे तर माहितीच आहे. वाऱ्याचा हा प्रतिरोध जर कमी झाला तर बोल्ट आणखी वेगाने पळेल असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

बोल्टच्या सुरुवातीला ज्या वेगाने पळतो त्याच्यापेक्षा नंतरचा वेग अधिक असतो. वैज्ञानिक कारणे काहीही असली तरी, बोल्टची इच्छाशक्ती आणि मानसिक शक्ती यांचाही यात असाधारण वाटा आहे. शेवटी त्याला धावण्याची आणि चपळतेची एक नैसर्गिक देणगी मिळालेली आहे.

उसेन बोल्ट हा आज लाखो तरुणांसाठी आणि मुलांसाठी प्रेरणा आहे. विशेष म्हणजे त्याच्या प्रसिद्धीने देश, प्रदेश, भाषा, वर्ण या साऱ्या सीमा पुसून टाकल्यात. आज अनेकांना आपणही उसेनसारखे व्हावे असे वाटते. त्याचे चाहते संपूर्ण जगभर पसरले आहेत.

इतर देश ऑलिम्पिकचे एक तरी पदक मिळावे म्हणून धडपडत असतात. किमान रौप्य किंवा कांस्य तरी मिळावे याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले असते. मात्र एकट्या उसेनने ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदक मिळवलेत. तसे तर उसेनने ९ पदके जिंकली होती. पण त्याच्या सहकारी खेळाडूने प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याने याचे पदक काढून घेण्यात आले. ऑलिम्पिकची आठ सुवर्ण पदके जिंकणे म्हणजे काही गंमत नाही.

‘लॉरीयस स्पोर्ट्समॅन ऑफ द इअर’ हा पुरस्कारही त्याने चार वेळा पटकावला आहे. हा पुरस्कार म्हणजे खेळातील ऑस्कर समजला जातो. रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स आणि केली स्लेटर या जगज्जेत्या स्पर्धकांशी त्याने बरोबरी साधली आहे. १०० मीटर, २०० मीटर आणि ४X१०० मीटर स्पर्धेत सर्वाधिक वेळा सहभागी होण्याचा विश्व विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

त्याला मिळालेले पुरस्कार आणि त्याने स्थापन केलेले विक्रम यांची यादी खूप मोठी आहे. त्याच्याकडे पाहून जमैकातील कित्येक तरूण क्रीडाविश्वाकडे वळू लागले आहेत.

फोर्ब्ज मासिकाच्या मते उसेनकडे ३४ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांसाठी तो ब्रँड अंबॅसिडर म्हणून काम करतो. यातूनच त्याने एवढी मोठी संपत्ती जमवलेली आहे. पुमा ही स्पोर्ट्ससाठी लागणारी साधने बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. उसेनने या कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून उसेनला दरवर्षी १० लाख डॉलर इतके मानधन दिले जाते.

बोल्टने धावपट्टीवरून संन्यास घेतला असला तरी कमी वेळेत त्याने क्रीडा जगतात जी प्रेरणा निर्माण केली आहे आणि जो मानसन्मान कमावला आहे त्याला तोड नाही. विजेच्या गतीची उपमा मिळवणं आणि ती मिरवणं दोन्हीही अद्भुतच आणि उसेनने ही किमया साध्य केली आहे, जी जगात इतर कुणालाही साधलेली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्या घरचा बल्ब वर्षभर टिकत नाही पण हा बल्ब शंभर वर्षे सलग चालू आहे

Next Post

अमेरिकेत लोक आपल्या पोरांना पोस्टाने मामाच्या गावाला पाठवायचे..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

अमेरिकेत लोक आपल्या पोरांना पोस्टाने मामाच्या गावाला पाठवायचे..!

मंगळावर अतिक्रमण केलं म्हणून तीन कार्यकर्त्यांनी 'नासा'वरच केस ठोकली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.