The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ‘बिजनेस जेट’ने अमेरिकन यु*द्धनौकेवर ह*ल्ला केला होता

by Heramb
18 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इराण आणि इराक या देशांमध्ये अनेक वर्षं अनेक कारणांवरून संघर्ष सुरु आहे. इराण आणि इराक हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असले तरी यांच्यात संसाधनांसाठी आणि भौगोलिक वर्चस्वासाठी गेली कित्येक दशके संघर्ष सुरू आहे. जगातील कोणत्याही भागात संघर्ष सुरु असेल आणि अमेरिका त्या संघर्षातून आपला फायदा करवून घेणार नाही हे अशक्यच. त्यामुळे आखाती देशांतील या संघर्षातसुद्धा अमेरिकेने उडी घेतली.

आखाती आणि पश्चिम आशियातील अनेक देशांबरोबर असलेल्या संघर्षामध्ये अमेरिकेला मोठे नुकसान सहन करावे लागले. कदाचित महायु*द्धांपेक्षाही जास्त. कारण फक्त अफगाणिस्तानच्या भागात चाललेल्या प्रदीर्घ वीस वर्षांच्या लढाईमध्ये सुमारे अडीच हजार अमेरिकन सैनिक मारले गेले. तर सुमारे २० हजारपेक्षा जास्त जणं गंभीररीत्या जखमी झाले.

आखाती देशांत संघर्ष सुरु असतानाच अमेरिकेची ‘युएसएस स्टार्क’ ही यु*द्धनौका त्या प्रदेशात आपल्या पहिल्याच मोहिमेवर होती. तेव्हा फाल्कन-५० नावाच्या ‘बिजनेस जेट’ने या यु*द्धनौकेवर ह*ल्ला करून, ती जवळ जवळ बुडवलीच होती. या बिजनेस जेटचे रूपांतर लढाऊ विमानामध्ये करण्यात आले होते, जे काही अंशी इराकी ‘मिराज’ विमानासारखे दिसत असत.

१९७० ते १९९१ ही दोन दशके एकविसाव्या शतकातील जगासाठी अत्यंत महत्वपूर्ण दशके आहेत. याच काळात चीन उदयास येत होता, आखाती यु*द्ध सुरु झाले होते, अफगाणिस्तानमध्ये तालिबानी प्रभाव वाढत चालला होता आणि सबंध जगामध्ये राजकीय अस्थिरता होती असं म्हटलं तर फारसं चुकीचं वाटायला नको. याचदरम्यान, सप्टेंबर १९८० मध्ये इराण आणि इराकमध्ये यु*द्ध सुरु झालं होतं.

त्याआधी एक वर्ष, म्हणजेच १९७९ साली, एक महत्वपूर्ण आणि सबंध आखाती प्रदेशाला हदरवून टाकणारी घटना घडली होती, ती म्हणजे इराणमधील इस्लामिक क्रांती. ‘अयातुल्लाह खोमेनी’ इस्लामिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन सत्तेत आला तर ‘सद्दाम हुसेन’च्या नेतृत्वाखालील इराकला प्रबळ पर्शियन गल्फ राष्ट्र बनायचे होते.



याशिवाय इराकमधील शिया लोकसंख्येच्या मदतीने सद्दामच्या राजवटीला इराणी इस्लामी क्रांतीचा मोठा धोका आहे, हीसुद्धा धारणा होती. या धारणेने आगीत तेल ओतले. इराणच्या एका गटाने बगदादमध्ये इराकचा तत्कालीन उपपंतप्रधान तारिक अझीझच्या ह*त्येचा प्रयत्न केला आणि सद्दामला यु*द्धाच्या मैदानात उतरावे लागले.

या यु*द्धात रणभूमीच्या दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली होती. पण या यु*द्धातून निष्पन्न मात्र काहीही झाले नाही. कारण यु*द्धपूर्व रेषांवर सीमा निश्चित करण्यात आल्या. दुसऱ्या प्रयत्नांत दोन्ही बाजूंनी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीतील शांतता करारावर स्वाक्षरी केल्यावरच यु*द्ध संपुष्टात आले. आ*क्रमित देश म्हणून इराकला विविध देशांकडून मोठी आर्थिक आणि लष्करी मदत मिळाली. यामध्ये युनायटेड स्टेट्स, सोव्हिएट रशिया यांचाही सहभाग होता. त्या तुलनेत इराणला कमी मदत मिळाली. इराकला युनायटेड स्टेट्स, बहुतेक पाश्चात्य देश आणि सोव्हिएत युनियनचा पाठिंबा होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

युएसएस स्टार्क ही ‘गायडेड मिसाईल फ्रिगेट’ प्रकारची यु*द्धनौका होती. या फ्रिगेटची रचना अँटी-एअरक्राफ्ट आणि अँटी-सबमरीन कारवाया करण्यासाठी करण्यात आली होती. युएसएस स्टार्कला १९८४ साली मिडल-ईस्टमध्ये पाठवण्यात आले आणि १९८७ साली ग्लेन ब्रिन्डेलच्या नेतृत्वाखाली स्टार्क कार्यान्वित झाली. युएसएस स्टार्क ही यु*द्धनौका ‘मिडल ईस्ट टास्क फोर्स’चा एक भाग होता.

या यु*द्धनौकेचे उद्दिष्ट इराण-इराकच्या एक्सक्लूजीव म्हणजेच बहिष्कृत क्षेत्राच्या आसपास सौदी अरेबियाच्या किनारपट्टीवर गस्त घालणे हे होते. कारण त्यावेळी इराक इंधन वाहून नेणाऱ्या अनेक जहाजांना उ*ध्वस्त करीत होता. या ह*ल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणी सैन्याने इराकशी संबंधित जहाजांना लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली. परंतु, इराककडे कोणतेही विशेष मोठे अथवा लढाऊ जहाज नसल्याने इराणी सैन्य इराकच्या सहयोगी सैन्यावर अथवा त्यांच्या संसाधनांवर ह*ल्ला करीत होते. यामुळे आखाती समुद्रात मोठा गोंधळ उडाला.

इराकने इराणचे अनेक इंधन वाहून नेणारी अनेक जहाजे उ*ध्वस्त केली. यामुळे इराणला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत होते. यु*द्धामुळे आधीच आर्थिक दुष्काळ असलेल्या इराणमध्ये हा तेरावा महिना होता. इराणला यावर महत्त्वपूर्ण पावलं उचलावी लागली आणि काही कठोर निर्णय घ्यावे लागले.

त्यांनी आपल्या इंधन निर्यात व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सिरी बेटावर इंधन निर्यातीसाठी एक नवे टर्मिनल उभारण्यात आले. हे बेट इराकी एअरफोर्स बेसच्या जवळ असल्याने अत्यंत सुरक्षित होते. कारण कोणत्याही इराकी विमानाला यावर सहजासहजी ह*ल्ला करता आला नसता.

इराकला इराणच्या वाढत्या उत्पन्नाचा सुगावा लागल्याने त्यांनी लवकरच या नव्या टर्मिनलचाही शोध लावला. आता त्यांना या टर्मिनलवर ह*ल्ला करायचा होता. पण इराणी हवाईदलाकडे या टर्मिनलचे पुरेसे फोटोग्राफ्स नव्हते. असे फोटोग्राफ्स हवाई रेकी करून काढले जातात. रेकी म्हणजे शत्रूच्या भागात जाऊन एखाद्या भूप्रदेशाची किंवा स्थानाची माहिती/फोटो काढणे.

इराकच्या जनरल मिलिटरी इंटेलिजन्स डायरेक्टरेटने ‘सुझाना’ निकनेम असलेले ‘फाल्कन-50’ हे बिजनेस जेट इराणच्या टर्मिनलच्या रेकीसाठी पाठवण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. या विमानाला ‘लढाऊ विमान’ असंही कोणाला म्हणता आलं नसतं कारण हे एक व्यावसायिक विमान (बिजनेस जेट) होतं. शिवाय याची रेंजसुद्धा उत्तम होती.

फाल्कन 50 ने उड्डाण केले आणि इराकी हवाई मार्गाने जॉर्डनमार्गे तीन अनुभवी वैमानिकांना घेऊन मुंबईकडे निघाले. अचानक विमानाने आपला मार्ग बदलला आणि इराणच्या सिरी बेटाचे फोटो घेण्यासाठी त्यादिशेने वळाले. मुंबईहून परत येताना पुन्हा असेच करण्यात आले, पण यावेळी फक्त फोटोज काढण्यासाठी नव्हे तर ह*ल्ला करण्यासाठी फाल्कन-50 जेट सिरी बेटाकडे वळाले होते. इराणी सैन्याला इराकी फाल्कन 50 आपल्या टर्मिनलवरून उडत आहे हे लक्षात आल्यावर इराणी एअरफोर्सनेही आपली लढाऊ विमाने बाहेर काढली, पण तोवर फार उशीर झाला होता. इराकी फाल्कन-50 ने ते टर्मिनल उ*ध्वस्त केले.

या यशस्वी कारवाईमुळे फाल्कन 50 ची कार्यक्षमता सिद्ध झाली. यामुळे इराकने आपले फाल्कन 50 मॉडिफाय करण्याचा निर्णय घेतला. आणखी मोठ्या आकारातील फाल्कन 50 दोन एक्सोसेट मिसाईल्स आरामात घेऊन जाऊ शकते. तर इराकी मिराज विमानावर फक्त एकच एक्सोसेट मिसाईल नेता येत असे. यामुळे शत्रूंच्या यु*द्धनौका उ*द्ध्वस्त करणे इराकला अतिशय सोपे झाले होते. मिराज लढाऊ विमानाच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ आपण फाल्कन-50 मॉडिफाय करीत आहोत असा बनाव इराकने थेल्स एरोस्पेस कंपनीसमोर केला आणि त्यांना फाल्कन 50 विमान मॉडिफाय करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले.

फाल्कन 50 मध्ये आता रडार आणि मिराज एफ-1 या लढाऊ विमानांची शस्त्रव्यवस्था उपलब्ध होती. उजव्या बाजूचे कॉकपीट मिराजच्या कॉकपीटसारखे तयार करण्यात आले होते. विमानाचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी विमानाच्या डाव्या बाजूचा वापर केला गेला तर लक्ष्यावर मारा करण्यासाठी उजव्या बाजूचा वापर करण्यात आला.

मिडल-ईस्टमधील आपल्या दुसऱ्या मोहिमेदरम्यान, १७ मे १९८७ रोजी युएसएस स्टार्क पर्शियन गल्फमध्ये आपल्या रुटीन पॅट्रोलवर होते. ही यु*द्धनौका यु*द्धक्षेत्रापासून तीन किलोमीटर बाहेरच्या बाजूला होती. रात्री सुमारे १० वाजता, ‘युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड’ला हे विमान इराकी मिराज लढाऊ विमान असल्याचे समजले पण त्यांनी वेळीच या यु*द्धनौकेला आणि आजूबाजूच्या प्रदेशाला सावध केले नाही. खरं तर हे विमान फाल्कन 50 होते. इराणी इंधनाच्या जहाजावर ह*ल्ला करण्याच्या पहिल्या मोहिमेवर हे विमान पाठवले गेले होते.

फाल्कन 50च्या एअर-क्रूला ‘बाहरेनच्या’ समुद्रकिनाऱ्यांजवळ एक नौदल जहाज असल्याची माहिती मिळाली होती, पण त्या नौदल जहाजाबद्दल अधिक माहिती क्रूला मिळाली नाही किंवा त्यांना दिली गेली नाही. युएसएस स्टार्कवरील रडार ऑपरेटर्सना ते विमान आपल्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. १० वाजून ९ मिनिटांनी युएसएस स्टार्कवरील सदस्यांनी रेडिओ वॉर्निंग द्यायला सुरुवात केली पण त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. १० वाजून १० मिनिटांनी ३५ किलोमीटर्सच्या अंतरावरून युएसएस स्टार्कवर फ्रांस-निर्मित दोन अँटी-शिप एक्सोसेट मिसाईल्स डागण्यात आल्या.

दोन्ही एक्सोसेट मिसाईल्स जहाजाला धडकल्या होत्या. पहिल्या एक्सोसेटचा स्फो*ट नसला झाला तरी त्या मिसाईलच्या इंधनाने पेट घेतला आणि जहाजावर आग लागली. दुसऱ्या एक्सोसेट मिसाईलचा मात्र स्फो*ट झाला आणि जहाजावर सर्वत्र आग लागली. ही आग बघता बघता स्टोअररूम, कॉम्बॅट ऑपेरेशन सेंटरपर्यंत पसरली. त्यामुळे मिसाईल सिस्टीम आणि कम्युनिकेशन सिस्टीमसुद्धा निष्क्रिय झाली. ही आग इतकी विघातक होती की यु*द्धनौकेवरील स्टीलच्या रचनासुद्धा वितळल्या.

युनायटेड स्टेट्स एअरफोर्सचे ‘एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कन्ट्रोल सिस्टीम’ (एडब्लूएसीएस) विमान त्याच क्षेत्रात होतं आणि या ह*ल्ल्याचं साक्षीदारसुद्धा. एडब्लूएसीएसने जवळच्या सौदी एअरफोर्स बेसशी फाल्कन – 50 विमानाला इंटरसेप्ट करण्यासाठी पाठवण्याचे निर्देश दिले. पण सौदी एअरफोर्स बेसवर उपस्थित कर्मचाऱ्यांना इंटरसेप्शनसाठी लढाऊविमान पाठवण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे फाल्कन – 50 सुरक्षितरित्या या भागातून बाहेर पडले. काही इराकी तज्ज्ञांच्या मते, फाल्कन – 50ला दोन ‘एफ-14’ विमानांनी इंटरसेप्ट केले पण फाल्कन – 50 कमर्शियल विमान दिसत असल्याने तो धोका टळला.

पहिल्या मिसाईलच्या धडकेनंतर यूएसएस स्टार्कने त्वरीत आपल्या सहकाऱ्यांकडे ‘डिस्ट्रेस’ संदेश पाठवला. हे संदेश यूएसएस वडेल आणि यूएसएस कोनिंघम यांना मिळाले. यूएसएस वडेल आणि यूएसएस कोनिंघम लगेचच बचावकार्यासाठी यूएसएस स्टार्कजवळ पोहोचले. शिवाय, आग विझवण्यासाठी खासगी अग्निशमन टगबोटही रवाना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी यूएसएस स्टार्क बाहरेनला नेण्यात आले. बाहरेनमध्ये यूएसएस स्टार्कची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. त्यांनतर पूर्ण रिपेरिंगसाठी यूएसएस स्टार्कला त्याच्या मूळ ठिकाणी, फ्लोरीडाला नेण्यात आले.

या ह*ल्ल्यात एकूण ३७ क्रू-मेम्बर्स मारले गेले. यूएसएस स्टार्कने आपल्या बचावासाठी ह*ल्ला केला नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ‘नेव्हल बोर्ड ऑफ एन्क्वायरी’ची स्थापना करण्यात आली. कॅप्टन ब्रिंडेलची कोर्ट-मार्शलसाठी शिफारस करण्यात आली. पण, कॅप्टन ब्रिंडेल आणि टॅक्टिकल ॲक्शन ऑफिसर लेफ्टनंट बेसिल मोनक्रिफ यांनी नंतर राजीनामा दिला. फाल्कन 50 वर मारा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मोनक्रिफला दोषी ठरवण्यात आले.

यूएसएस स्टार्क हे यु*द्धक्षेत्रापासून सुमारे २ मैल लांब होते आणि विनाकारण यावर ह*ल्ला झाला होता हे तपासाअंती निष्पन्न झाले. शिवाय या हवाई ह*ल्ल्याला परिणामकारक प्रतिसाद देता आला असता आणि हा ह*ल्ला टाळताही आला असता पण यूएसएस स्टार्कवरील अनेक उपकरणे कुचकामी असल्याचे आढळून आले.

विमान इराकी असल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही अमेरिकेने या घटनेचा वापर इराणवर दबाव आणण्यासाठी केला आणि संपूर्ण परिस्थितीसाठी त्यांना जबाबदार धरले. या घटनेच्या उभय देशांच्या “जॉइंट चीफ ऑफ स्टाफ”च्या चौकशीने इराकला जबाबदार धरण्याची शिफारस केली. इराकने या ह*ल्ल्याबद्दल माफी देखील मागितली. फाल्कन – 50च्या वैमानिकांना यूएसएस स्टार्क हे इराणी इंधन वाहून नेणारे जहाज असल्याचा गैरसमज झाला, शिवाय त्यांनी फाल्कन 50 च्या वैमानिकांना जीवे मारले असेही सांगितले. पण काहींच्या म्हणण्यानुसार, त्यांना बोनस देण्यात आला होता.

पायलट अचानक भांबावले असावेत असे यूएस इंटेलिजन्स सर्कलमधील काहींनी नमूद केले, परंतु यासाठी काही पुरावा किंवा स्पष्टता नाही. पायलटचे हेतू आणि त्यांना मिळालेले आदेश अद्यापही कोणाला माहिती नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एक्सप्लेनेर : भारत-पाकिस्तान दरम्यानचा कर्तारपूर कॉरिडॉर शिखांसाठी इतका महत्वाचा का आहे..?

Next Post

नुसत्या भाजीत मीठ टाकण्याच्या स्टाईलमुळे हा ‘आचारी’ इंटरनेट सेन्सेशन बनलाय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

नुसत्या भाजीत मीठ टाकण्याच्या स्टाईलमुळे हा 'आचारी' इंटरनेट सेन्सेशन बनलाय

सततच्या दुष्काळाने केनियातील २५ लाख लोकांवर स्थलांतराची नामुष्की आलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.