The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यादिवशी उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती..!

by Heramb
21 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धानंतर विशेषतः प्रोजेक्ट मॅन*हॅट*ननंतर अ*ण्वस्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली. प्रत्येक देशाला स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी अ*ण्वस्त्र बाळगण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. अमेरिकेबरोबरच रशिया, कोरिया आणि ब्रिटनसारख्या राष्ट्रांमध्ये अ*ण्वस्त्र आणि तत्सम डब्लू*एमडीज्-च्या (वेपन्स ऑफ मास डि*स्ट्रक्शन) संशोधनावर जोर देण्यात आला.

‘क्युबन मिसाईल क्रायसिस’सारख्या घटनांमुळे जग सतत आ*ण्विक यु*द्धाच्या छायेखाली राहत होतं. याच क्यु*बन मिसाईल क्राय*सिसचा फायदा घेऊन, जगाचं लक्ष त्यांतील दोन महासत्तांकडे असतानाच चीनने भारतावर आक्र*मण केलं आणि हेच आक्र*मण पुढे स्वतंत्र भारताच्या इतिहासावर कधीही न भरणाऱ्या जखमेसारखं ठरलं.

आ*ण्विक सज्जता नसल्याने १९७२ साली बांग्लादेश स्वतंत्र केल्यानंतर भारतीय सैन्य पाकव्याप्त कश्मीरमध्ये उतरवता आलं नाही, कारण अमेरिकेच्या आ*ण्विक पाणबुडीने भारताकडे कूच केलं होतं. त्यानंतर भारतात आ*ण्विक चाचण्या घेण्यात आल्या आणि भारताचा आ*ण्विक कार्यक्रम सुरु झाला. पण आपल्या आ*ण्विक शक्तीचा गैरवापर करीत अमेरिकेने जागतिक राजकारणात अनेक गोष्टी आपल्या फायद्यासाठी केल्या.

उत्तर कोरियाशी अमेरिकेचे संबंध सतत ताण तणावाचे राहिले आहेत. कोरियन प्रदेशातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि उत्तर कोरियाच्या जिंगोइस्टिक हुकूमशाही राजवटीमुळे, दोन्ही देशांनी अगणित वेळा एकमेकांचा सामना केला आहे. तथापि, एक वेळ अशी होती जेव्हा अमेरिकेने उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याचा निर्णय घेतला. कदाचित आपला विश्वास बसणार नाही, पण हा निर्णय उत्तर कोरियाच्या सरकारला किंवा जनतेला घाबरवण्यासाठी नव्हता तर प्रत्यक्ष जपानप्रमाणेच अणु*बॉ*म्ब टाकण्याचा निर्णय तत्कालीन अमेरिकन प्रशासनाने घेतला होता.



सन १९५० च्या उत्तरार्धात, अमेरिकन सैन्याने उत्तर कोरिया आणि त्याचे कम्युनिस्ट सहयोगी – चीन आणि सोव्हिएत युनियन यांच्याविरुद्ध भीषण यु*द्ध केले. अमेरिकेचे अनेक सैनिक हा संघर्ष मिटवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर असताना, ३० नोव्हेंबर १९५० रोजी त्यांच्यावर चीन समर्थित सैन्याने अचानक ह*ल्ला केला.

यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रूमॅन यांनी न्यू*क्लि*अर प्रोटोकॉल सुरू करण्याची आणि परस्पर संघर्ष लवकर संपवण्यासाठी न्यू*क्लि*अर स्ट्रा*इक करण्याची धमकी दिली. एका परिषदेदरम्यान त्यांना अ*ण्वस्त्र बाळगण्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिले, “आमच्याकडे अ*ण्वस्त्रं आहेत आणि अ*ण्वस्त्रं आमच्या घातक शस्त्रांपैकी एक आहे. ”

अमेरिकन प्रशासन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन पोकळ धमकी देत नव्हते हे स्पष्ट आहे. आतापर्यंत अमेरिका हा एकमेव असा देश आहे ज्यांनी प्रत्यक्षात अ*ण्वस्त्र वापरलं. ‘लिटिल बॉय’ आणि ‘फॅटमॅन’ नावाच्या अ*ण्वस्त्रांचे भयानक परिणाम झेलून दुसऱ्या वैश्विक महायु*द्धाचा शेवट झाला होता, त्याचे गंभीर परिणाम आशियाई लोकांनी पहिले होते. आजमितीसही त्या अ*ण्वस्त्रांच्या स्फो*टाचे परिणाम कमी झालेले नाहीत. शिवाय अमेरिकेने कोरियामधून हार मानण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि या यु*द्धाचा शेवट करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही साधन वापरू’ असा धमकीवजा इशाराही दिला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अणु*बॉ*म्बमुळे होणाऱ्या विनाशाचे प्रमाण लक्षात घेणे महत्वाचे आहे. हिरोशिमावर पडलेल्या बॉ*म्बमुळे सुमारे दोन लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, त्यातील बहुसंख्य लोक निष्पाप होते. ज्यांचा मृत्यू झाला ते सुटले असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरायला नको. कारण जे यातून वाचले त्यांच्या शरीरावर किरणोत्सर्गाचे भयानक परिणाम दिसू लागले होते, न्यू*क्लिअ*र फिशनच्या (अणुखंडनाच्या) प्रक्रियेमुळे ज्या पृष्ठभागावर अणु*बॉ*म्बचा परिणाम होईल, त्या पृष्ठभागावरील अणू सुटे होतात. तर मानवी शरीराची काय अवस्था झाली असेल!

खरंतर अणवस्त्रांचा असा प्रभाव कायमस्वरूपी राहतो. भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढ्यांमध्येही हा आ*ण्विक प्रभाव येतो. जपानवर बॉ*म्ब टाकण्यासाठी जबाबदार असलेल्या वैमानिकांपैकी एकाने त्याच्या लॉगबुकवर खालील संदेश नोंदवला, “अरे देवा, आपण हे काय केले?”. जबरदस्त विनाशाची बातमी समोर आल्यामुळे, अमेरिकन बॉ*म्बस्फो*टाकडे पाहण्याचा जागतिक दृष्टीकोन बदलला.

पण कोरियात भलतेच राजकारण सुरु होते. दुसऱ्या महायु*द्धानंतर, संयुक्त असलेल्या कोरियाची हान नदीवरील थर्टी एठथ् पॅरेलल रेषेवर फाळणी करण्यात आली. या रेषेच्या उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तर कोरिया आणि दक्षिणेकडील भाग म्हणजे दक्षिण कोरिया. उत्तर कोरिया सोविएत युनियनच्या ताब्यात होता तर दक्षिण कोरिया अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या ताब्यात होता.

नंतर संयुक्त राष्ट्रांनी व्यापक मताधिकार आणि स्वतंत्र एकीकृत देशाची मागणी केली. तसे न करता सोव्हिएत युनियनने उत्तर कोरियामध्ये कम्युनिस्ट राजवट सुरूच ठेवली आणि १९५० साली थेट दक्षिण कोरियावर आक्र*मण केले. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघ यांनी संयुक्तरितीने हवाई, समुद्र आणि प्रत्यक्ष जमिनीवरून लष्करी कारवाई सुरु केली.

चीननेही उत्तर कोरियाच्या बाजूने यु*द्धात प्रवेश केला. हे युनायटेड स्टेट्ससाठी अत्यंत धक्कादायक होते कारण या संघर्षापूर्वी चीन नेहमीच या देशांच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक होता. सोविएत युनियन बरोबरच्या सैन्याने नोव्हेंबरमध्ये अमेरिकन आणि संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ह*ल्ले केले. यामुळेच अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राला अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागली.

अमेरिकन सैन्यावर हा घातक ह*ल्ला होता, यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रूमन उत्तर कोरियाविरुद्ध अ*ण्वस्त्र ह*ल्ल्याचा विचार करण्यास तयार झाले. प्रत्यक्षात यु*द्धामध्ये आ*ण्विक शस्त्र कधीच तैनात केले गेले नव्हते. पण तेव्हापासूनच अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये कधीही न संपणारा तणाव सुरु झाला.

‘कोरिया’ एकसंधपणे स्वतः त्या यु*द्धात कधीच नव्हता. पण संघर्षाच्या या घटनांनी उत्तर कोरियन सरकारला स्वतःची अ*ण्वस्त्र आणि डब्लू*एमडीज् (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन) तयार करावे लागले, ज्याचा ते आजपर्यंत उत्कटतेने पाठपुरावा करत आहेत.

अ*ण्वस्त्र ही संपूर्ण मानवजातीला उ*ध्वस्त करणारी शस्त्रं आहेत. त्यांचा वापर यु*द्धात नाही तर मुत्सद्देगिरीमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. तसेच भारताचा आदर्श समोर ठेऊन जगातील प्रत्येक देशाने अणुऊर्जेचा वापर शस्त्रास्त्रांसाठी कमीत कमी करून विद्युत ऊर्जानिर्मिती आणि तत्सम शाश्वत विकासासाठी करावा.

दुर्दैवाने आपण आजही अ*ण्वस्त्रांच्या छायेत जगत आहोत असे म्हटले तर अतिशयोक्त वाटायला नको. तालिबानचं वर्चस्व वाढत असताना आणि त्याला पाकिस्तानचा जाहीर पाठिंबा असताना दह*शत*वाद्यांच्या हातात अ*ण्वस्त्र पडली तर मानवतेचा अंत निश्चित आहेच. याशिवाय जगाच्या कानाकोपऱ्यात सुरु असलेली विविध यु*द्ध दिवसेंदिवस अ*ण्वस्त्रांचा धोका वाढवत आहेत.

शिवाय चीन, अमेरिका, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक तणावाचे मुद्दे आहेत. १९४७ नंतर कश्मीर हा जगाच्या पाठीवरील सर्वांत धोकादायक संघर्ष आहे. आजही ‘विवादित काश्मीर’वर (प्रचलित: पाकव्याप्त काश्मीर) अधिकार सांगण्यासाठी दोन्ही अ*ण्वस्त्रधारी देशांमध्ये शाब्दिक आणि मुत्सद्दी संघर्ष होताना आपल्याला दिसत आहे. हा संघर्ष शाब्दिकच रहावा आणि त्याचं आ*ण्विक यु*द्धात रूपांतर न होता विवादित काश्मीरचा प्रश्न आंतराष्ट्रीय कायद्यान्वये आणि ऐतिहासिक दस्तावैज ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ अक्सेशन’द्वारे सुटावा हीच अपेक्षा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या आहेत जगातील १० सर्वांत महागड्या कार्स!

Next Post

दाऊद इब्राहिममुळे भारताने ‘शारजाह’मध्ये क्रिकेट खेळणं बंद केलं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

दाऊद इब्राहिममुळे भारताने 'शारजाह'मध्ये क्रिकेट खेळणं बंद केलं

या फ्रेंच सरदाराने एकहाती २०० सैनिकांना धूळ चारली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.