The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer: सेमीकंडक्टर चिप्स काय असतात? त्यांनी जागतिक राजकारणात धुमाकूळ का घातलाय?

by द पोस्टमन टीम
14 February 2025
in विश्लेषण, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कोणत्याही गोष्टीमागचं अर्थशास्त्र समजून घ्यायचं असेल तर फक्त दोन गोष्टी समजून घ्यायच्या, एक मागणी आणि दुसरा पुरवठा. कोणत्याही गोष्टीच्या किमतीमागे हे मागणी-पुरवठ्याचं गणित असतं. कोरोना आणि २०२१-२२ च्या दरम्यान टीव्हीवरती किंवा वृत्तपत्रात “बाजारात सध्या सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा आहे” अशा आशयाच्या काही गोष्टी ऐकल्या असतील. आता हा सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा म्हणजे नक्की काय प्रकरण होतं? याची सुरुवात कशी झाली? या प्रकरणाचा आणि आपला काय संबंध हे आज आपण जाणून घेऊ.

सेमीकंडक्टर म्हणजे नक्की काय? 

सेमीकंडक्टरला मराठीत “अर्धवाहक” म्हणतात. सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉन प्रवाहामुळे विद्युतवाहकता संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता ही विद्युतवाहक व अवरोधक यांच्या मधली असते. आजच्या काळात, हे सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधले पायाभूत घटक आहेत. विज्ञानाच्या ज्या शाखेत अर्धवाहकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला घनस्तिथी भौतिकशास्त्र म्हणजेच इंग्रजीत सॉलिड स्टेट फिजिक्स असं म्हणतात.

आता हे सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी जरमेनियम किंवा सिलिकॉन या पदार्थांचा वापर होतो. जरमेनियम किंवा सिलिकॉन यांची विद्युतचालकता ही विद्युतवाहक आणि विद्युतरोधक यांच्या मधली असते. तापमान आणि अशुद्धता वाढली की या सेमीकंडक्टरची विद्युतचालकता वाढते. कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण कार्यरत राहण्यासाठी चिप्सची आवश्यकता असते. या चिप्स सेमीकंडक्टरपासून तयार केलेल्या असतात.

इलेक्ट्रॉनिक उपकरण कार्यरत राहण्यासाठी दोन प्रकारच्या चिप्सची गरज भासते एक असतात मेमरी चिप्स आणि दुसऱ्या असतात लॉजिक चिप्स. मेमरी चिप्सचं काम त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा डेटा साठवून ठेवणं तर लॉजिक चिप्सचं काम असतं एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण कार्यरत राहण्यासाठी जो प्रोग्रॅम तयार केला गेलेला असतो तो रन करणे. पण या दोन्ही चिप्सपैकी सर्वांत जास्त महत्वाची असते ती म्हणजे लॉजिक चीप.



सध्या या सेमीकंडक्टर चिप्सच्या क्षेत्रात दोन कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत एक म्हणजे तैवानची “तैवान सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्टअरिंग कंपनी” ज्याला TSMC असं म्हटलं जातं आणि दुसरी आहे दक्षिण कोरियाची “सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स”. वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा महत्वाचा भाग म्हणजे लॉजिक चीप. या सेमीकंडक्टर लॉजिक चिप्स तयार करण्यासाठी प्लांट उभा करावा लागतो. या प्लांटला अखंड वीज व पाणी पुरवठा होत राहणे गरजेचे असते. या प्लांटमध्ये लॉजिक चिप्स तयार करताना कमालीची अचूकता लागते. हे काम अचूकतेने करण्याकरता कंपनीला कुशल कामगार लागतात.

थोडक्यात एक छोटी लॉजिक चीप बनवण्यासाठी कंपनीला एवढी मोठी गुंतवणूक करावी लागते. ही सर्व प्रक्रिया चालू असताना कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेला बिघाड चालत नाही. असे झाल्यास चांगल्या दर्जाच्या लॉजिक चिप्स तयार होत नाहीत व या लॉजिक चिप्स जर इलेक्ट्रॉनिक उपरकणात बसवल्या तर ती उपरकणे नीट काम करणार नाहीत. या गोष्टीवरून या सेमीकंडक्टर चिप्सचं महत्व किती आहे ते समजून घ्या. जी फॅक्टरी या सेमीकंडक्टर चिप्स तयार करते त्या फॅक्टरीला “फाउंडरी”असं म्हणतात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

२०१६ साली डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विचित्र धोरणांमुळे कायम चर्चेत राहिले. लवकरच या गोष्टीचा प्रत्यय जगाला आला. २०१६ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत असलेली व्यापार तूट (ट्रेड डेफिसिट) आपण कमी करणार अशी घोषणा केली होती. सत्तेत आल्यावर चीनला शह देण्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षणवादी व्यापार धोरण अंमलात आणलं.

२०१७ साली अमेरिकेतील चीनी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश तिथल्या यंत्रणेला दिले. २४ सप्टेंबर २०१८ पासून अमेरिकेने चिनी मालावर १० टक्के दंडात्मक कर लावला. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन मालावर दंडात्मक कर लावला. तर अशा प्रकारे व्यापारावरून पेटलेल्या या यु*द्धाला “ट्रेड वॉ*र किंवा व्यापार यु*द्ध” म्हणतात.

या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट होते. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली होती आणि याचाच फायदा अमेरिकेला घ्यायचा होता. हे ट्रेड वॉ*र चालू असताना ट्रम्प यांनी चीन आपलं तंत्रज्ञान चोरतो व अमेरिकेचा गैरफायदा घेऊन व्यापारात अधिक लाभ मिळवतो असा आरोप केला.

या ट्रेड वॉ*रमध्ये अमेरिकेची मागणी काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. व्यापारातील तोटा संपवावा ही अमेरिकेची पहिली मागणी, चीनने व्यापार करताना अमेरिकेन तंत्रज्ञानाची चोरी बंद करावी ही दुसरी मागणी आणि चीन त्यांच्या देशात चीनी खाजगी कंपन्यांना कायदेशीर अनुदान देत ते अनुदान बंद करावं. 

आता या ट्रेड वॉ*रमध्ये दोन्ही देशांची काय स्थिती हे आपण बघू. या व्यापार यु*द्धात अमेरिका हा निव्वळ खरेदीदार आहे आणि चीन विक्रेता. चीन आपल्या खालावलेल्या विक्रीला सावरण्यासाठी, चीन देशांतर्गत उपभोगाला चालना देऊ शकतो पण तसं अमेरिकेला करता येत नाही. अमेरिकेला देशांतर्गत उपभोगाला जर चालना द्यायची असेल तर त्यांना काँग्रेसची मान्यता लागते व हे पाऊल उचलताना आर्थिक तूट ही आड येते. त्यात अमेरिकन सरकारवर २१ ट्रीलियन डॉलर एवढं कर्ज आहे या कर्जापैकी १ ट्रीलियन डॉलर कर्ज हे चीनने अमेरिकेला दिलं आहे. जर चीनने हे कर्ज ताबडतोब भरायला लावलं तर अमेरिकेची पंचाईत होईल.

चीन हे दुर्मिळ धातू खनिजाचे माहेरघर आहे. ही खनिजे इलेक्ट्रॉनिक उपकरणात वापरली जातात, जर चीनने या दुर्मिळ धातूंची निर्यात थांबवली तर अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे उत्पादन बंद होईल. राजकीयदृष्ट्या विचार करता चीनच्या राष्ट्राध्यक्षांना निवडणुकीला सामोरं जायची गरज नाही तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना निवडणुकीत विजयी होणे गरजेचे असते.

अमेरिकेने चीनसोबत सुरू केलेल्या या व्यापार यु*द्धामुळे अमेरिकन ग्राहक व गुंतवणूकदारांना दणका बसला. जरी या व्यापार यु*द्धामुळे अमेरिकेची आर्थिक वाढ होत असली आणि चीनची घटत असली तरी या व्यापार युद्धामुळे अमेरिकन प्रशासनावर ताण आला आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही देशांनी आता वाटाघाटी सुरू केली आहे.

आता तुम्ही म्हणाल की अमेरिका चीन व्यापार यु*द्ध व सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा या दोन्ही गोष्टींचा काय संबंध? तर सेमीकंडक्टर चिप्सचा तूटवड्याची सुरुवात ही या अमेरिका चीन व्यापार यु*द्धामुळे झाली. अमेरिका चीन व्यापार यु*द्ध सुरू असताना अमेरिकेने संरक्षणवादी व्यापार धोरणा अंतर्गत चीनमध्ये कार्यरत असलेल्या “सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्टअरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन / SMIC” या चीनी कंपनीवर व्यापार निर्बंध आणले. SMIC ही चीनमधील सर्वात मोठी सेमीकंडक्टर चिप्स तयार करणारी कंपनी होती. SMIC वर व्यापार निर्बंध लावल्यामुळे अमेरिकेत असलेल्या, ऑटोमोबाईल, सॉफ्टवेअर, व इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्स मिळणं बंद झालं. यामुळे अमेरिकेतील कंपन्यांनी सेमीकंडक्टर चिप्सचा पुरवठा व्हावा म्हणून TSMC आणि Samsung Electronics या कंपन्यांना पाचारण केले.

आता मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती तयार झाली. यामुळे सेमीकंडक्टर चिप्सचे जागतिक बाजारपेठेत दरही वाढले आणि मागणी जास्त असल्याने या दोन्ही कंपन्यांवरचा ताण ही वाढला. २०२० साली कोरोनामुळे लॉकडाउन घोषित झाला यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली त्यामुळे कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खप वाढला पण खप जरी वाढला असला तरी या कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन बंद होतं. या कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू कार्यरत राहण्यासाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन देखील बंद झाले, त्यामुळे सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा जाणवू लागला होता. 

हे सर्व चालू असताना अमेरिकेत टेक्सास प्रांतात बर्फाच्या वादळामुळे सॅमसंग कंपनीच्या सेमीकंडक्टर चिप्स प्लांटचं नुकसान झालं. पण अजूनही संकट संपलं नव्हतं, इथे सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा सुरू झाला म्हणून काही कंपन्यांनी उत्पादन वाढवलं आणि अशातच कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यांचा माल विकला जात नाही म्हणून उत्पादन थांबवलं. यामुळे ज्या सेमीकंडक्टर चिप्स तयार झाल्या होत्या त्या आयटी कंपन्यांनी भरमसाठ प्रमाणात विकत घ्यायला सुरुवात केली आणि यामुळे परत सेमीकंडक्टर चिप्सच्या मागणी-पुरवठ्याचं संतुलन बिघडलं.

२०२१ साली ग्राफिक कार्ड आणि बिटकॉइन मायनिंगसाठी सेमीकंडक्टर चिप्सच्या वाढत्या मागणीसमोर त्याला समतोल असा पुरवठा करणे सेमीकंडक्टर चीप उत्पादकांना जमले नाही. सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा आपल्याला कोणत्याही सुविधेच्या अतिरेकी केंद्रीकरणाचे काय परिणाम होतात हे दाखवलं. त्यामुळे इथून पुढची आर्थिक धोरणं ठरवताना एखाद्या देशाने आपल्या या धोरणाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होईल हा विचार करून आपापली आर्थिक धोरणं आखायला हवी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

छत्तीसगडच्या आदिवासी लोकांची ही परंपरा व्हॅलेंटाईन्स डेपेक्षा पण वाढीव आहे

Next Post

Explainer – बिटकॉइन मायनिंग पर्यावरणाला हानिकारक का ठरत आहे..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

Explainer - बिटकॉइन मायनिंग पर्यावरणाला हानिकारक का ठरत आहे..?

सेबीने NSEच्या माजी CEO चित्रा रामकृष्ण यांना का दंड ठोठावला; तो रहस्यमय 'योगी' कोण आहे?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.