The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ – अमेरिकेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं कोव्हर्ट ऑपरेशन

by द पोस्टमन टीम
21 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


४१ वर्षीय क्रुटीस क्रूक ‘ग्लोबल मरीन’ या जहाज बांधणीसाठी आणि खोल महासागरातील ड्रिलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या सर्व अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी होते. नोव्हेंबर १९६९ला एक दिवस एकदम सकाळी सीआयएसाठी काम करणाऱ्या तीन व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आल्या. १५ ते २० हजार फूट खोलीतून शेकटो टनाची वस्तू बाहेर काढण्यासाठी सीआयएला ग्लोबल मरीनच्या मदतीची आवश्यकता असल्याचं त्या तीन व्यक्तींनी क्रूक यांना सांगितलं. ही गोष्ट कठीण आहे मात्र, अशक्य नक्कीच नाही, असं क्रूक म्हणाले.

आपल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कळवतो, असे त्यांनी सीआयएच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. हे ऐकून सीआयएचे अधिकारी क्रूक यांच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यानंतर काही क्षणातच क्रूक यांनी लढाऊ जहाजांची माहिती असलेलं एक पुस्तक बाहेर काढून चाळलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य पसरलं. सीआयएचे अधिकारी सोव्हिएतच्या के-१२९ सबमरिनबद्दल (पाणबुडी) बोलत होते, हे समजण्यास क्रूक यांना अगदी काही क्षण लागले होते.

शीतयु*द्धाच्या काळात एका व्हेसलच्या (जहाज) सहाय्यानं, बुडणाऱ्या रशियन पाणबुडीला हस्तगत करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केला होता, असं जर सांगितलं तर लगेच डोळ्यांसमोर एखादी वॉ*र मुव्ही तरळून जाते. मात्र, ही गोष्ट एखाद्या चित्रपटाची नसून सीआयएची खरीखुरी आणि प्रचंड धाडसी योजना होती. ‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ असं या धाडसी योजनेचं नाव होतं.

सोव्हिएतच्या के-१२९ला नेमकं काय झालं होतं ?

१९६८च्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर पॅसिफिक महासागरात गस्तीवर असलेली सोव्हिएत युनिअनची गोल्फ क्लास डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी के-१२९ अचानक नाहीशी झाली.



या पाणबुडीत तीन बॅलेस्टिक न्युक्लिअर मिसाईल्स होत्या. अचानक रेडिओ संपर्क तुटल्यानंतर ही पाणबुडी नाहीशी झाली. 

त्यानंतर सोव्हिएतनं मोठ्या प्रमाणात एक गुप्त शोध मोहिम राबवली मात्र, काहीही हाती आले नाही. त्यामुळं शोधमोहीम थांबवण्यात आली. अमेरिकेला मात्र याचा सुगावा लागला. शीतयु*द्धातील आपल्या वैऱ्यानं नक्कीच काहीतरी गमावलं आहे याचा अंदाज त्यांनी लावला.

सोव्हितनं गमावलेली वस्तू के-१२९ असल्याचं नौदलाच्या गुप्त विभागानं अचूक ताडलं. नाहीशी झालेली ही अत्याधुनिक सोव्हिएत पाणबुडी शोधून काढण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आणि सुरू झाली ‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ ही महत्त्वकांक्षी योजना.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पाणीबुडी शोधण्यासाठी अमेरिकेकडं असं काय होतं जे सोव्हिएतकडं नव्हतं?

अमेरिकेनं दुसऱ्या महायु*द्धानंतर १९५० च्या दरम्यान महासागरांमध्ये गुपचूप शेकडो ‘हायड्रोफोन्स’ लावले होते. जगभरातील जहाजांच्या प्रवासांच्या माहितीवर युएस नौदल गुपचूप लक्ष ठेऊन होते. पाण्यातील प्रत्येक जहाजाची आणि पाणबुडीची माहिती ते सहज मिळवू शकत होते. त्यामुळेच जेव्हा के-१२९ नाहीशी झाल्याची माहिती अमेरिकेला मिळाली तेव्हा त्यांनी सर्वात अगोदर तिचं ठिकाण शोधून काढलं आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी नौदलाची ‘हॅलिबूट’ ही अणुपाणबुडी रवाना केली. हॅलिबूटनं हवाई बेटांच्या उत्तर आणि पश्चिम किनारपट्टीचा १ हजार ५०० मैलांचा भाग पिंजून काढला. त्याचं ठिकाणी त्यांना महासागराच्या तळाशी त्यांच सावज निपचित पडलेलं आढळलं. हॅलिबूटनं काढलेल्या छायाचित्रांवरून ती के – १२९ असल्याचं स्पष्ट झालं होतं.

कशी झाली योजनेची सुरुवात?

‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ची सर्व जबाबदारी सीआयएचे सर्वात सक्षम प्रोग्राम मॅनेजर अशी ख्याती असलेल्या जॉन पॅरनगॉस्की यांच्याकडं देण्यात आली. पॅरनगॉस्की यांनी काही सक्षम शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची निवड करून त्यांना वॉशिंग्टन बाहेरील सॅटेलाईट सेंटरवर नेलं.

जवळजवळ १४ लाख किलो वजनाची पाणबुडी पृष्ठभागावर खेचू शकेल, अशा जहाजाची निर्मिती करण्याचं काम या निवडलेल्या लोकांना देण्यात आलं होतं. 

हे काम अतिशय कठीण होतं. कारण तोपर्यंत फक्त ९० मीटर खोलीतून पाणीबुडी यशस्वीपणे वर खेचून आणण्यात आलं होतं. मात्र, के-१२९ ही ५ हजार मीटर खोल पडलेली होती. त्यासाठी पॅरनगॉस्की यांना एका कॉन्ट्रॅक्टरची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी ‘ग्लोबल मरिन’चा दरवाजा ठोठावला होता.

सीआयएच्या मोहिमेला खाणकामाचा आधार !

ग्लोबल मरीनचे सर्वोत्कृष्ट नेव्हल आर्किटेक्ट असेलेल्या जॉन ग्रॅहम यांनी के-१२९ बाहेर काढणाऱ्या जहाजाचं डिझाईन तयार केलं. दोन स्लाइडिंग गेट्सद्वारे उघडणाऱ्या जहाजाच्या तळाशी असलेल्या छिद्रातून डेरिक क्रेन लावता येईल, अशी या जहाजाची रचना होती. क्रेनला असलेल्या स्टीलच्या दोरांना टोकाशी दोन भव्य पंजे लावले जाणार होते. याच पंज्यांच्या सहाय्यानं के-१२९ जहाजाच्या पोटात ओढली जाणार होती. मात्र, त्या अगोदर एक सर्वांत मोठी आणि महत्त्वाची समस्या सीआयए समोर उभी राहिली होती.

ज्या ठिकाणी सोव्हिएतची पाणबुडी नाहीशी झाली त्या ठिकाणी अमेरिका कोणत्या कारणानं एक भव्य जहाज उभं करणार होतं आणि तेही काही महिन्यांच्या कालावधीसाठी. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सीआयएला एखाद्या ‘कव्हर स्टोरी’ची आवश्यकता होती.

‘ग्लोबल मरिन’नं तयार केलेलं भव्य जहाज हे खाणकामासाठी आहे. जहाजाच्या मदतीनं पॅसिफिकच्या पोटात असलेलं मँगेनिजबाहेर काढलं जाणार आहे, अशी कथा ‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ची टीम सर्व जगाला सांगणार होती. ही गोष्ट सर्वांना खरी वाटावी यासाठी या जहाजाची मालकी कुणीतरी घेणं आवश्यक होत.

जहाजाची मालकी घेणारी एकच व्यक्ती सीआयएच्या नजरेसमोर होती आणि ती म्हणजे, जगविख्यात अमेरिकन उद्योगपती हावर्ड ह्युजेस. 

स्वभावानं लहरी आणि देशभक्त असलेल्या ह्युजेस यांनी सीआयएच्या प्रस्तावाला लगेच होकार कळवला. के – १२९ ज्या सुटकेसाठी तयार केलेल्या जहाजाला ‘ह्युजेस ग्लोमार एक्सप्लोरर’ हे नाव मिळालं.

द ह्युजेस ग्लोमार एक्सप्लोरर

जुलै १९७३ मध्ये ‘एक्सप्लोरर’नं खाणकाम करणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांसह जाहीरपणे फिलाडेल्फिया येथील शीपयार्ड सोडलं. काही दिवसांचा प्रवास करून एक्सप्लोरर कॅलिफोर्नियात आलं. त्याठिकाणी खाणकाम करणाऱ्या ‘एक्सप्लोरर’ला एका हेरगिरी करणाऱ्या जहाजात रुपांतरीत करण्यात आलं.

सोव्हिएतची पाणबुडी चोरण्यासाठी आवश्यक ते सर्व बदल एक्सप्लोररमध्ये करण्यात आले. जहाजावरील असंख्य कंटेनर्समध्ये सीआयएच्या तज्ञांनी आपापल्या प्रयोगशाळ्या उभारल्या. इतर डझनभर व्हॅनमध्ये एक डार्करूम, अणु सामग्री हाताळण्याच्या सुविधा, कागदपत्रे ठेवण्यासाठी, कचरा हाताळण्यासाठी एक युनिट तयार करण्यात आले. के-१२९ मधील मानवी अवशेष साठवण्यासाठी एक रेफ्रिजरेटेड शवागार देखील एक्सप्लोररमध्ये तयार करण्यात आलं होतं.

द फायनल शो बिगिन्स

एक्सप्लोररमधील सर्व यंत्रज्ञांची पूर्णपणे चाचण्या झालेल्या नव्हत्या. मात्र, जास्त वेळ एक्सप्लोररला थांबवून ठेवणं म्हणजे संपूर्ण ‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’ची गुप्तता धोक्यात घालणं होतं. त्यामुळं जॉन पॅरनगॉस्की यांनी २० जून १९७४ ला एक्सप्लोरर रवाना करण्याचे आदेश दिले. जहाजावर १७८ कर्मचारी होते. त्यापैकी कित्येकांनी जहाजावरील अत्याधुनिक तंत्रज्ञान या अगोदर पाहिलेही नव्हतं. त्यामुळं त्यांनी वेगात सर्व तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला.

जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना मोहिमेची सत्यता सांगण्यात आली होती. मोहिम पूर्ण करून ते सुरक्षित घरी येतील की नाही याची खात्री नव्हती. याबाबत देखील त्यांना पूर्व कल्पना देण्यात आली होती.

मात्र, देशभक्तीनं प्रेरित झालेल्या १७८ जणांनी जागतिक नौदलाचा इतिहास बदलून टाकण्याची तयारी केली होती.

३ जूलैला ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहचले आणि त्यांनी के – १२९ बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, पदोपदी त्यांना अनेक नैसर्गिक आणि तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागला शिवाय डोक्यावर सोव्हिएतचाही धोका होता. १८ जुलैला सोव्हिएत एक्सप्लोररजवळ येऊन ठेपलं. त्यांनी चौकशी सुरू केली. हे एक खाणकाम करणार जहाज असल्याची बतावणी एक्सप्लोररच्या कॅप्टननं केली अमेरिकेच्या सुदैवानं सोव्हिएतनं त्यावर विश्वास ठेवला. मात्र, पुन्हा दोन दिवसांनंतर एक सोव्हिएत जहाज त्याठिकाणी आलं. त्यावेळी देखील अमेरिकन कॅप्टननं त्यांना यशस्वीपणे तोंड दिलं आणि परत पाठवून दिलं.

कंट्रोल रूममधील ऑपरेटर के-१२९वर एक्सप्लोररचे पंजे ठेवण्यासाठी थेट सीसीटीव्ही फुटेज, साइड-स्कॅन सोनार, लहान थ्रस्टर्स आणि सीवेटर हायड्रॉलिक्सची मदत घेत होता. शेवटी पाणबुडीचा सर्वात मोठा तुकडा उचलण्यात यश आलं आणि जहाजावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मात्र, दोन तृतीयांश केबल परत ओढून काढल्यानंतर अचानक क्रेनचे तुकडे झाले. परिणामी पुन्हा के-१२९ चा काही भाग पॅसिफिकच्या तळाला गेला.

सीआयएचे संचालक विल्यम कोल्बी यांनी पुन्हा प्रयत्न करण्याचे आदेश दिले. मात्र, ते शक्य नसल्याचं त्यांना जहाजावरून सांगण्यात आलं. दुसरा प्रयत्न करता आला असता पण, त्यासाठी एक वर्ष वाट पहावी लागणार होती. ‘ग्लोबल मरीन’चे क्रुटीस क्रूक मोहिम पूर्ण करण्यास उत्सुक होते. कारण जोपर्यंत ही कथित खाणकामाची गोष्ट जगाच्या समोर होती तोपर्यंत खऱ्या मोहिमेला कुठलाही धोका नव्हता. मात्र, त्यांच्या या महत्त्वाकांक्षेवर पाणी फिरलं.

पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार जॅक अँडरसन यांनी १८ मार्च १९७५ रोजी ‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’चं सत्य बाहेर काढलं.

तब्बल पाच वर्षे ही मोहिम अतिशय गुप्त राहिली होती. एक्सप्लोरर जहाज आणि इतर सर्व यंत्रणांनी आपापलं काम चोखपणे केलं होतं. के-१२९ चा काही भाग मिळवण्यात अमेरिकेला यश आलं होतं. त्यात दोन अणू टॉर्पेडोंचाही समावेश होता, असं म्हटलं जातं. मात्र, यावर सीआयएनं बोलण्यास नकार दिल्यानं अमेरिकेच्या हाती ‘प्रोजेक्ट अ‍ॅझोरियन’मधून नेमकं काय हाती आलं हे अद्यापही गुलदस्त्यातचं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

उद्या उपवास म्हणून स्वीडनच्या राजाने एवढं खाल्लं की जीव गेला..!

Next Post

…म्हणून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचंय…!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

...म्हणून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचंय...!

बनारस हिंदू विद्यापिठाचं नाव बदलण्यासाठी MC छागलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पण...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.