The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जपानच्या भीतीने अमेरिकेने इमर्जन्सी करन्सी सुरु केली होती..!

by द पोस्टमन टीम
6 January 2026
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


७ डिसेंबर १९१४ ला जपानने पर्ल हार्बरवर ह*ल्ला केला. हवाईच्या बेटांवरसुद्धा जपान आक्र*मण करू शकतो याचा अंदाज अमेरिकेला आला होता. जर जपान आक्र*मण करण्यात यशस्वी झाला तर तो मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या चलनाची लूट करू शकतो.

यासाठी अमेरिकेने त्वरित पुढील हालचाली सुरू केल्या. अमेरिकन सरकारने नवा आदेश काढला. त्या आदेशानुसार पर्ल हार्बर बेटावरील नागरिक व व्यवसायिक यांनी कमीत कमी रोकड स्वतःजवळ बाळगावी असे सांगण्यात आले. जुन्या चलनाच्या जागेवर नवे हवाई ओव्हर प्रिंट नोट्स आणण्याची अमेरिकेच्या सरकारची योजना होती.

ब्युरो ऑफ एनग्रेव्हींग अँड प्रिंटिंगने त्याला स्पेशल करन्सी असे नाव दिले. जरी जपानने आक्र*मण करून ती रोकड चोरली तरीही ती निरुपयोगी ठरणार होती. कारण त्या चलनाची वैधता यु*द्धापुरतीच मर्यादित होती.

गव्हर्नर डेलास कार्टन यांनी नवीन विधेयक जारी केले त्यानुसार 1, 5, 10 आणि 20 डॉलरच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली. २५ जून १९४२ रोजी सर्वप्रथम नवीन ओवर प्रिंटेड नोट्स चलनात आणल्या गेल्या. त्यापैकी ‘1935A’ या सीरियल नंबरच्या $1 च्या नोटा सिल्व्हर सर्टिफिकेटद्वारे जारी करण्यात आल्या आणि या सीरियल नंबर असलेल्या नोटा फेडरल रिझर्व बँक ऑफ फ्रान्सिस्कोद्वारे चलनात आणल्या गेल्या. त्या नोटांसाठी विशिष्ट प्रकारचे ब्राऊन ट्रेझरी सील्स आणि सीरियल नंबरसुद्धा लावले गेले होते.

या नव्या नोटा लवकर ओळखू याव्यात यासाठी त्यांच्यावर, ‘HAWAII’ असं मोठ्या अक्षरात प्रिंट केलं होतं.

अमेरिकन लष्कराने, हवाई बेटावरच्या नागरिकांना त्यांच्याजवळच्या जुन्या नोटा परत करून या नव्या नोटा घेण्यास सांगितले.

अमेरिकन सरकारने या नोटा अशाप्रकारे बनवल्या होत्या जेणेकरून जपानने आक्र*मण केले तरीही या नव्या नोटा सरकार लगेच चलनातून बाद करू शकेल.

ही एमर्जन्सी करन्सी ऑक्‍टोबर १९९४ पर्यंत वापरात होती. १९४६ साली या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या. पण आता सरकारपुढे नवीनच समस्या उभी राहिली. तब्बल दोनशे मिलीयन डॉलर किंमत असलेल्या नोटांची विल्हेवाट कशी लावणार? बेटावरून मुख्य भुमीकडे एवढी मोठी रोकड घेऊन जाणे सुरक्षित नव्हते, म्हणून सरकारने हा साठा दफन करायचे ठरवले.  पण दफन जरी केला तरी एवढ्या नोटांचे विघटन व्हायला खूप वर्षे लागले असते.

यावर उपाय काय? सरकारने एका साखर कारखान्यातील भट्टीचा वापर करून सगळ्या नोटा जाळून टाकल्या.

अर्थात अशी “इमर्जन्सी करन्सी” सुरु करण्याची ही काही पहिली वेळ नाही.

फिलिपिन्समध्ये देखील अशीच एक स्पेशल करन्सी सुरू करण्यात आली होती. त्या चलनाला फिलिपिन्स ट्रेझरी सर्टिफिकेट असं म्हटलं जायचं. या चलनी नोटांवर विक्टरी असे मोठ्या अक्षरात दोन्ही बाजूंनी लिहिलेलं होतं. या नोटा १९४९ पर्यंत चलनात होत्या.

१९४४ मध्ये फ्रान्सला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बँकेच्या व्यवस्थापनासाठी एक संस्था कार्यरत होती आणि फ्रान्सला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे काम Committee French France ही संस्था बघू लागली. जर्मनीत ज्यावेळी यु*द्ध सुरु झालं त्यावेळी जर्मनीतसुद्धा अलाईड मिलिटरी मार्क्स हे चलन वापरले गेले. ते जवळपास १९४८पर्यंत वापरात होते.

ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा १९४५ ते १९४७ च्या दरम्यान अलाईड मिलिटरी मार्क्सचा वापर सुरू होता. कोरिया स्वतंत्र झाल्यानंतर, तिथे ‘Type A Military Yen’ वापरण्यात आले. तर जपानविरुद्ध काढण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान त्यांनी ‘Type B military Yen’ चलनात आणले.

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान वापरण्यात आलेल्या इमर्जन्सी नोटांना बऱ्याच लोकांनी आपल्या संग्रही ठेवले आहे. कारण तेव्हा त्या अटीतटीच्या वेळी याच नोटांनीच लोकांना तग धरून ठेवायला मदत केली होती. तुमच्यापैकी कोणाकडे या नोटा संग्रही असतील तर आम्हाला त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


ShareTweet
Previous Post

आपल्या नाशिकचा मॅग्नेटो डुप्लिकेट असेल पण हा मात्र शंभर टक्के खरा आहे..!

Next Post

पाकिस्तानने फक्त आपल्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पाकिस्तानने फक्त आपल्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलाय

जगातला पहिला सायबॉर्ग - जन्मजात रंगांधळा होता पण आता रंगांना 'ऐकू' शकतो

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.